जीवन एक उत्सव
१९८१ पासून प्राणायाम, ध्यान आणि योग शिबिरांद्वारे आरोग्य प्राप्ती
समाधान शोधा...
जागतिक चळवळ...
- ४३ वर्षांची परंपरा
- १८० देशांमध्ये १०,००० पेक्षा जास्त शाखा
- ५० कोटीपेक्षा जास्त लोकांचे जीवन परिवर्तन
ध्यान शिबिरे
ध्यान म्हणजे काहीही न करण्याची सूक्ष्म कला
World Meditation Day
● Livewith Gurudev Sri Sri Ravi Shankar
गुरुदेवांसोबत जागतिक ध्यान
● थेट प्रक्षेपण २१ डिसेंबर, रात्री ८
जीवन परिवर्तनीय
एक सोपी श्वसन प्रक्रिया जिच्यामुळे आपली चिंता ४४% नी कमी होते.
शरीरामध्ये सुसंवाद बिंबवण्यासाठी सुदर्शन क्रिया मदत करते.
जीवन परिवर्तन करणारी श्वसन प्रक्रिया
सुदर्शन क्रिया™
आर्ट ऑफ लिविंग शिबिराची आधारशिला असणाऱ्या सुदर्शन क्रिये™ ने जगभरातील लाखो लोकांचा मानसिक ताण तणाव कमी होऊन त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारली आहे. येल विद्यापीठ आणि हार्वर्ड विद्यापीठ तसेच विविध देशांमध्ये प्रसिद्ध झालेल्या विविध संशोधन आणि सर्वेक्षणातून हे सिद्ध झाले आहे कि सुदर्शन क्रिया, ताण तणाव निर्माण करणारे संप्रेरक (कॉर्टिसॉल) चे प्रमाण घटवण्यापासून ते एकंदरीत जीवनातील समाधान वृद्धिंगत होण्यापर्यंत लाभदायक ठरत आहे.
आणखी जाणून घ्यायोग शिबिरे
योग म्हणजे शरीर आणि मन यांच्यातील ऐक्य
माझ्या उर्जेचा स्तर वाढला आणि महत्वाचे म्हणजे माझ्यातून नकारात्मकता काढून टाकण्याचे साधन मला प्राप्त झाले आहे. जेंव्हा माझा दिवस ताण तणावयुक्त असतो तेंव्हा मी संपूर्णपणे सुदर्शन क्रियेवर अवलंबून राहू शकतो.
शशांक दिक्षित, 40
आयटी सुरक्षा तज्ञ
सुदर्शन क्रियेच्या सातत्याच्या सरावाने माझ्यामध्ये असाधारण सुधारणा झाली. माझी एकाग्रता वाढली. कमी वेळेत मी खूप गोष्टी शिकलो, ज्याचा लाभ मला माझ्या करीअरमध्ये आत्मविश्वास प्राप्त होण्यासाठी झाला.
अमन के. लोहिया, 35
सॉफ्टवेअर व्यावसाईक
सुदर्शन क्रिया केल्यानंतर अगदी निवांत आणि शांत झालो. आत्ता मी बहु आयामी बनलोय. खूप गोष्टी करू शकतो – मार्शल आर्ट शिकणे, विविध वाद्ये वाजवणे. ज्यांनी मला सुदर्शन क्रियेबद्दल सांगितले त्यांचा…
सौरभ पौल
इंजिनिअर आणि तबला वादक
दुःखी असणे म्हणजे सामान्यच असते, असे मला वाटायचे. पण जेंव्हापासून मी सुदर्शन क्रिया करू लागले आहे माझे नांव बदलून “ख़ुशी” झाले आहे. आत्ता आनंद हाच माझ्या जीवनाचा मार्ग आहे.
शैलजा, 38
प्रशिक्षिका, आयटी व्यावसाईक
Founder, The Art of Living
Gurudev Sri Sri Ravi Shankar
Gurudev Sri Sri Ravi Shankar is a global humanitarian, spiritual leader and ambassador of peace. Gurudev’s vision of personal and social transformation through mental health and wellness has ignited a global movement in over 180 countries, uplifting the lives of more than 500 million people.
Biographyसंस्थापक - आर्ट ऑफ लिविंग
गुरुदेव श्री श्री रवि शंकर
गुरुदेव श्री श्री रवि शंकर एक मानवतावादी, आध्यात्मिक मार्गदर्शक आणि शांतीदूत आहेत. गुरुदेवांच्या मानसिक स्वास्थ्य आणि सर्वांगीण आरोग्य यांच्या माध्यमातून वैयक्तिक आणि सामाजिक परिवर्तनाच्या परिकल्पनेमुळे १८० देशातील ५० करोड लोकांच्या जीवनाचा उद्धार करणारे वैश्विक आंदोलन प्रज्वलित झाले आहे.
आणखी जाणून घ्यामी प्रोग्रॅम करू इच्छितो, परंतु ...
६० वर्षावरील व्यक्तींनी ध्यान करू नये काय?
ध्यानामुळे आपल्या जीवनात जे लाभ होतात ते पाहाल तर ते खूप प्रसंगानुरूप असल्याचे आपल्या ध्यानात येईल. पूर्वीच्या काळात स्व च्या परिचयासाठी, आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी ध्यानाचा उपयोग करायचे. दुःख आणि समस्या यांच्या पासून सुटकेचा तो मार्ग होता. आपल्या क्षमतांच्या विकासाचा तो मार्ग होता.
आत्मज्ञान बाजूला राहू द्या. समाजातील सद्याच्या ताण आणि तणावासाठी ध्यानाची नितांत आवश्यकता आहे. जर आपण ज्यादा जबाबदारी घेत असाल तर ज्यादा ध्यान करणे आवश्यक आहे. जितक्या ज्यादा जबाबदाऱ्या आणि महत्वाकांक्षा असतील आपणास तितक्या जास्त ध्यानाची गरज आहे.
आपण काहीही करत नसाल तर कदाचित ध्यानाची इतकी गरज भासणार नाही. पण जितके आपण व्यस्त असाल तितका वेळ कमी असणार आपल्याकडे, ज्यादा इच्छा आणि महत्वाकांक्षा असणार - आपणास तितके ज्यादा ध्यान करण्याची गरज असणार. कारण ध्यानामुळे निव्वळ ताण तणाव आणि मानसिक ताण कमी होत नाही तर आपल्या क्षमतांचा विकास होतो, आपली मज्जा संस्था आणि मन मजबूत होते, निव्वळ आपले ताण तणाव कमी होण्यास मदत होत नाही तर आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढून मन आनंदी बनवते, आपणास आणखी सक्षम बनवून आपण हर प्रकारे उन्नत होतो. आणखी काय हवे असते? आपणास आनंदी आणि निरोगी बनायचे असेल तर ध्यान करावे लागेल.
गरजेइतका मी लवचिक नाही आहे
आर्ट ऑफ लिविंगच्या उपलब्ध कोर्सेसचा लाभ घेण्यासाठी आपणास डोक्यावर उभे राहण्याची राहण्याची गरज नाही.
आमच्या प्रोग्रॅममध्ये शिकवल्या जाणाऱ्या श्वसन प्रक्रिया आणि ध्यान करण्यासाठी काहीही विशेष शारीरिक कौशल्यांची गरज नाही तसेच जगभरातील ५ ते ९० वयोगटातील कोट्यावधी लोक यांचा सराव करत आहेत.
मी आत्ता व्यस्त आहे
आपण आत्ता व्यस्त आहात, पण आपण आनंदी केंव्हा होणार आहात? आनंद केवळ वर्तमान क्षणात आहे. बहुतांशी वेळा आपले मन भूतकाळ आणि भविष्यकाळ असे पुढे आणि मागे हिंदोळत असते. आपल्याबाबत जे घडले आहे त्याबद्धल आपणास पश्चाताप किंवा क्रोध वाटत असतो, किंवा जे होणार आहे त्याबद्धल चिंता वाटत असते. आपल्या मनाचे निरीक्षण करा.
आपण लक्ष दिले तर पहा, चांगल्या गोष्टी आपण लांबणीवर टाकत असतो, पण नकारात्मक गोष्टी आपण पुढे ढकलत नाही. आपण म्हणत नाही कि, "माझे रागावणे मी पुढे ढकलतो." म्हणतो कां आपण असे?
आपण आपला आनंद भविष्यकाळातील चांगल्या वेळेसाठी पुढे ढकलतो आणि ती वेळ कधीही येत नाही. आपले जीवन आपण आत्ता जगतो आहोत तर आपल्या भविष्याची काळजी देखील घेतली जाणार आहे. हेच आर्ट ऑफ लिविंग आहे.
हे प्रोग्रॅम कोणी बनवले आहेत?
आत्ताचे मानवतावादी नेते आणि अध्यात्मिक मार्गदर्शक १९८२ साली शिमोगा, कर्नाटक, भारत येथे दहा दिवसाच्या मौनात गेले आणि तेथे सुदर्शन क्रिया™ अस्तित्वात आली. त्यांच्या शब्दात:
"माझा जगभर प्रवास झाला होता. योग आणि ध्यान मी शिकवले होते. तरीदेखील मी चिंतीत असायचो कि लोकांनी आनंदी जीवन जगण्यासाठी मी काय मदत करू शकतो. कश्याची तरी कमतरता आहे, हे मला जाणवायचे. लोक त्यांची साधना दररोज करत असले तरी जेंव्हा ते त्यांच्या जीवनात परतायचे तेंव्हा त्यांचे जीवन विभागलेले असायचे. ते वेगळ्या व्यक्ती जाणवायच्या. म्हणून मी विचार करायचो कि आंतरिक मौन आणि जीवनाची बाह्य अभिव्यक्ती यामधील अंतर कसे सांधले जाईल."
दहा दिवसांच्या मौनामध्ये सुदर्शन क्रिया™ एक प्रेरणा बनून प्रकट झाली. निसर्गाला ठाऊक आहे कि काय द्यायचे आणि कधी द्यायचे. मौनातून बाहेर आल्यावर मला जे प्राप्त झाले होते ते मी लोकांना शिकवणे सुरु केले आणि लोकांना अद्भुत अनुभूती येऊ लागल्या
~ गुरुदेव श्री श्री रवि शंकर
तेंव्हापासून लयबध्द शक्तिशाली श्वसन प्रक्रिया - सुदर्शन क्रिया™ आर्ट ऑफ लिव्हिंग प्रोग्रॅमची आधारशीला बनली. श्री श्री रवि शंकरजी यांनी पहिले शिबीर शिमोगा येथे शिकवले. श्री श्री रवि शंकरजींनी, प्राचीन ज्ञान या आधुनिक काळासाठी खूप व्यावहारिक बनवले. गेल्या चार दशकांपासून कोट्यावधी लोकांच्या दैनंदिन आयुष्यासाठी योग, प्राणायाम आणि ध्यान यांची ओळख करून देत आहेत.
मला कधीपासून परिणाम जाणवू लागेल?
आपण यासाठी फी कां घेता?
आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रोग्रॅम महाग नाही आहेत. प्रोग्रॅम आयोजित करण्यासाठी काही खर्च असतो. स्वयंसेवकांना हॉल आणि इतर बाबींचे भाडे द्यावे लागते. प्रोग्रॅमच्या जमा होणाऱ्या रकमेतून काही टक्के यावर खर्च केला जातो. उर्वरित रक्कमेने भारतातील विविध सेवा प्रकल्पांना सहाय्य होते.
तसेच फुकट प्रोग्रॅम दिला तर लोकांना त्याचे महत्व राहत नाही. लोक जबाबदारीने बसून प्रोग्रॅम शिकत नाहीत.
जीवन परिवर्तन करणारा अनुभव
We care, we share
Art of Living's Social Impact
Strengthen your roots, broaden your vision and be of service to humanity are the underlying principles of the Art of Living. From child education to river rejuvenation, from pesticide free farming to ethics in business, from conflict resolution to disaster relief, the Art of Living has become a platform for people from around India and the world to serve humanity.
Learn moreआम्ही काळजी घेतो, आम्ही शेअर करतो
आर्ट ऑफ लिव्हिंगचा समाजिक प्रभाव
सामर्थ्यशाली पाया, व्यापक दृष्टीकोण आणि मानवतेची सेवा हि आर्ट ऑफ लिव्हिंगची अंतर्भूत तत्वे आहेत. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण असो, कि नद्यांचे पुनर्रुजीवन, रसायनमुक्त शेती, व्यवसायामधील नितीमुल्ये, कि नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत, आर्ट ऑफ लिव्हिंग देशभरातील आणि जगभरातील व्यक्तींना सेवा देण्यासाठी एक तत्पर व्यासपीठ बनले आहे.
आणखी जाणून घ्याज्ञान
प्रेमासोबत ज्ञान आनंद आहे, प्रेम रहित ज्ञान दुःख होय