आमच्या विषयी

आम्ही व्यक्तीला सक्षम करुन समाजाची सेवा करतो

एक जागतिक चळवळ...

  • ४४ वर्षांचा वारसा
  • १०,००० पेक्षा अधिक केंद्रे १८० देशांमध्ये
  • ८० करोड़ पेक्षा जास्त लोकांचे जीवन परिवर्तन

१८० देशांमध्ये कार्यरत, आर्ट ऑफ लिव्हिंग ही एक ना नफा, शैक्षणिक आणि मानवतावादी संस्था आहे ज्याची स्थापना १९८१ मध्ये जगप्रसिद्ध मानवतावादी आणि आध्यात्मिक गुरु- गुरुदेव श्री श्री रवि शंकर यांनी केली आहे. आमचे सर्व कार्यक्रम गुरुदेवांच्या तत्त्वज्ञानावर आधारित आहेत, "जोपर्यंत आपले मन तणावमुक्त आणि समाज हिंसामुक्त नसेल, तोपर्यंत आपण जागतिक शांतता साध्य करू शकत नाही."

आर्ट ऑफ लिव्हिंग हा वैविध्यपूर्ण आहे आणि जीवनाच्या सर्व स्तरातील लोकांना आकर्षित करतो.

जीवन पूर्णपणे जगणे हे आर्ट ऑफ लिव्हिंगचे तत्त्व आहे. ती संस्थेपेक्षा जास्त एक चळवळ आहे. स्वतःमध्ये शांतता शोधणे आणि आपल्या समाजातील - विविध संस्कृती, परंपरा, धर्म, राष्ट्रीयत्वाच्या लोकांना एकत्र करणे हा यांचा महत्वाचा भाग आहे आणि सर्वत्र मानवी जीवनाचे उत्थान करणे हे आपले एकच ध्येय आहे यांची आठवण करून देणे.

- गुरुदेव श्री श्री रवि शंकर

आमची केंद्रे

१८० हून अधिक देशांमध्ये कार्यरत, शांततेचा प्रसार करणारी आणि वसुधैव कुटुम्बकम् ची संकल्पना साकार करणारी आर्ट ऑफ लिव्हिंगची १०,०००  केंद्रे बघा.

संपर्क करा

भारतातील कार्यालय

फोन: +९१ ८०६७६१२३४५

फॅक्स: +९१ ८०२८४३२८३३

ईमेल: secretariat@artofliving.org

पता: गुरुदेव श्री श्री रवि शंकर यांचे कार्यालय, आर्ट ऑफ लिव्हिंग अंतरराष्ट्रीय केंद्र, २१ किमी, कनकपुरा रोड, उदयपुरा, बेंगलोर दक्षिण, कर्नाटक – ५६००८२, भारत.

संस्थापक

गुरुदेव श्री श्री रवि शंकर

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी विविध वंश, संस्कृती, विविध आर्थिक आणि सामाजिक स्तरातील आणि विविध देशातील लोकांना एकत्र केले आहे. १८० देशामध्ये विस्तारित समुदायाची ‘अध्यात्मिक वसुधैव कुटुंबकम’ बनली आहे. गुरूदेवांचा संदेश सोपा आहे, “ द्वेष आणि हिंसेवर प्रेम आणि ज्ञानाने विजय शक्य आहे.” हा संदेश निव्वळ घोषवाक्य नाहीतर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून हा संदेश सातत्याने कृतीत आणि परिणामात आणत आहेत.

आणखी जाणून घ्या