अॅडव्हान्स्ड मेडिटेशन प्रोग्राम
गहिऱ्या विश्रांतीमुळे कार्यात गतिमानता व उत्साह येतो.
गहन शांतता अनुभवा • सखोल ध्यान • ऊर्जा पातळी वाढवा
*तुमचे योगदान, तुम्हाला आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सामाजिक योजणांसाठी लाभदायक आहे.
नोंदणी करा!मला या शिबीरातून काय मिळेल ?
गहिऱ्या ध्यानाचा अनुभव घ्या
गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी मार्गदर्शित केलेली ‘हॉलो अँड एम्टी’ म्हणजेच "पोकळ आणि रिक्त" नावाचे काही ध्यान प्रकार हा या शिबीराचा मुख्य भाग आहे. ही ध्यान शृंखला तुम्हाला सखोल विश्रांतीमध्ये जाण्यास मदत करते.
भावनिक तणावापासून मुक्तता
ध्यान केल्याने तुमच्या मज्जासंस्थेतील खोलवर असलेले मानसिक तणाव निघण्यास मदत होते. आपल्याला आलेल्या विविध अनुभवांमुळे आपल्या मनावर झालेले परिणाम ध्यानामुळे निघून जातात आणि तुम्ही तुमच्या ‘स्व’शी पुन्हा नव्या जोमाने जोडले जाता.
शांततेची गहनता अनुभवा
तुमच्या सदैव सक्रिय असलेल्या मनाच्या पलीकडे जाऊन विलक्षण शांततेचा अनुभव घ्या. येथून, तुम्हाला नवीन चैतन्य अनुभवता येईल.
प्रतिकारशक्ती वाढवा
ध्यान मज्जासंस्थेला शांत करते आणि शरीरातून उर्जेचा प्रवाह सुरळीत करते, ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
सर्जनशीलता जागृत करा
मौन ही सर्जनशीलतेची जननी आहे. हे शिबिर तुम्हाला, तुमच्या मनात अव्याहतपणे चालू असलेल्या विचारांच्या कोलाहलापासून दूर एका गहिऱ्या विश्रांतीच्या अवस्थेकडे घेऊन जाते, जिथे तुमची सुप्त कौशल्ये आणि प्रतिभा प्रकट होऊ लागतात.
उच्च ऊर्जा पातळीचा अनुभव घ्या
या शिबिरातील प्रक्रिया तुमच्या शरीर आणि मनातील प्राणशक्ति किंवा चैतन्य वाढवण्यास मदत करतात. जेव्हा प्राणशक्ति वाढते तेव्हा तुमचे मन शांत आणि सकारात्मक होते
अॅडव्हान्स्ड मेडिटेशन प्रोग्राम मध्ये भाग का घ्यावा ?
ऑनलाइन ध्यान आणि श्वसन कार्यशाळा किंवा आनंद अनुभूति शिबीरामध्ये सुदर्शन क्रिया केल्यावर तुम्हाला आंतरिक शांततेची एक झलक मिळाली असेल. या अनुभवाला तुम्ही कसे टिकवू शकाल आणि त्यात आणखी खोलवर कसे जाऊ शकाल ?
आमच्या पुढच्या स्तरावरील शिबीरातून – म्हणजेच ‘अॅडव्हान्स्ड मेडिटेशन प्रोग्राम’ या शिबिरात तुमची ध्यान साधना आणि तुमचा ध्यानाचा अनुभव पुढच्या स्तरावर जातो. या शिबिरात तुमची आध्यात्मिक मौनासोबत ओळख करून दिली जाते, ज्यामुळे तुम्हाला गहिरी विश्रांती आणि आराम मिळतो. काहीच न करता थोड़े दिवस शांत बसणे कोणासाठीही सोपे नाही. म्हणून, या शिबिराद्वारे, आम्ही तुम्हाला गहन ध्यानाच्या शृंखलेंद्वारे एक सखोल शांत अनुभव देऊ. तुम्हाला तुमची खरी क्षमता जाणवेल, तुम्हाला तुमच्या अंतरात्म्याची एक झलक मिळेल, आणि तुम्ही पूर्णपणे उत्साही व्हाल. जगाशी दोन हात करण्यासाठी तयार !
यासाठी काही पूर्वतयारी असावी लागते का ?
- तुमचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- तुम्ही ऑनलाईन मेडिटेशन अँड ब्रेथ वर्कशॉप / हॅपीनेस प्रोग्राम / यस + / विद्यार्थी प्राविण्य आणि प्रशिक्षण शिबीर(SELP) यातील एकतरी केलेले असावे.
- तुम्ही शिबिरात सहभागी असलेल्या दिवसांमध्ये इतर सर्व कामांमधून सुट्टी घ्यायला हवी. जेणेकरून तुम्ही शिबिरामध्ये पूर्णपणे सहभागी होवु शकाल आणि तुम्हाला आवश्यक असलेली व ज्यासाठी तुम्ही पात्र आहात अशी गहिरी विश्रांती मिळवाल.
खरोखर हा शरीर आणि मनासाठी ‘वार्षिक देखभाल प्रोग्रॅम’(AMP) आहे. हा प्रोग्रॅम म्हणजे संपूर्ण विश्रांती आणि निवांतपणा मिळऊन देणारी उत्तम सुट्टी आहे.
सुलक्षणा डी.
उपदेशिका
अॅडव्हान्स्ड मेडिटेशन प्रोग्राम नंतर मला माझ्या वागण्यात आणि कृतीमध्ये संपूर्ण परिवर्तन जाणवले. माझ्या बुद्धी आणि भावना यांच्यामध्ये समतोल प्राप्त झाला. थोडक्यात काय, या प्रोग्रॅममुळे माझे व्यक्तिमत्व आणखी चांगले बनले.
श्रेयोशी सुर
इलेक्ट्रिक पॉवर सिस्टम डिझायनर, न्यु दिल्ली
माझ्यामध्ये स्फोट होतोय असेच मला वाटले. काहीवेळा लेखकांना येणारा अडथळा आणि निद्रानाश यांचा मला सामना करावा लागत होता. पण अॅडव्हान्स्ड मेडिटेशन प्रोग्राम मधील गहन ध्यान केल्यानंतर मला शांतपणे झोप लागू…
सुरज दुसेजा
लेखक, बंगळूरू
संस्थापक
गुरुदेव श्री श्री रवि शंकर
गुरुदेव श्री श्री रविशंकर हे जागतिक मानवतावादी, अध्यात्मिक नेते आणि शांतीदूत आहेत. तणाव मुक्त, हिंसा मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी अभूतपूर्व अशा जागतिक चळवळीचे नेतृत्व ते करतात.
आणखी जाणून घ्यामला हा कोर्स करायचा आहे पण...
मी आनंद अनुभूती शिबीर (हॅपीनेस प्रोग्राम) केले आहे आणि मी त्यातच आनंदी आहे. उच्चस्तरीय ध्यान शिबीर करून ध्यानात तज्ञ बनण्यात मला रस नाही. मी काही एखादा योगी बनण्याचा प्रयत्न करत नाहीय.
ज्याप्रमाणे तुमच्या गाडीला दर सहा किंवा बारा महिन्यांनी सर्व्हिसिंगची गरज असते, त्याचप्रमाणे तुमच्या शरीराला आणि मनालाही काही वेळाने काही दुरुस्तीची आणि पुनरुज्जीवित करण्याची गरज असते. ऑनलाइन ध्यान आणि श्वास कार्यशाळेत /हॅपीनेस प्रोग्राममध्ये तुम्हाला सुरुवातीला जाणवलेल्या ऊर्जा आणि आनंदाचा प्रवाह वाढवण्याचा आणि टिकवून ठेवण्याचा उच्चस्तरीय ध्यान शिबीर हा एक मार्ग आहे. ध्यानात खोलवर जाऊन तुम्ही गहन विश्रांतीचा आनंद घ्याल; तुम्ही योगी होणार नाही ! खरं तर, बरेच लोक खोल विश्रांतीचा अनुभव घेण्यासाठी अनेक वेळा हे शिबीर करतात; आणि प्रत्येक वेळी त्यांना काहीतरी नवीन अनुभव येतात.
मला वाटते की एवढे गहन ध्यान करण्यासाठी मी खूप लहान आहे. मी फक्त 20 वर्षांचा आहे. आणि या टप्प्यावर, मी एवढा तणावग्रस्त नाही आहे की मला इतके ध्यान करण्याची गरज आहे.
तुम्हाला सध्या कसलाही तणाव नाही हे छानच आहे. मात्र, काळ आणि वयानुसार आयुष्यात तुमचे काम आणि जबाबदाऱ्या वाढत जातील. त्या वेळी तणावग्रस्त होण्याची वाट पाहण्यापेक्षा आणि नंतर त्यास सामोरे जाण्याऐवजी, स्वतःला तयार करणे ही चांगली कल्पना नाही का? जसे, वर्षाच्या शेवटी तुमची वार्षिक परीक्षा असते, तेव्हा परीक्षा अगदी जवळ येईपर्यंत तुम्ही अभ्यास सुरू करण्यासाठी थांबत नाही, नाही का ? पैसे कमवायला सुरुवात करण्यासाठी तुम्ही तुमची बचत संपण्याची वाट पहात नाही. तुम्ही आधीच तयारी करता. त्याचप्रमाणे, तणाव निर्माण होण्याआधीच त्याला कसे हाताळायचे हे शिकवणाऱ्या काही प्रक्रियांद्वारे आंतरिक शांती आणि सामर्थ्याचे साठे तयार करण्याबद्दल तुम्हाला काय वाटते ?
या शिबीरासाठी माझे वय जास्त नाही का? माझे वय ६५ वर्षे आहे. मला वाटत नाही की मी यात बसू शकेन.
हे शिबीर तुम्हाला श्वास घेण्याच्या प्रक्रिया शिकवणार आहे ज्यामुळे तुमची ऊर्जा वाढण्यास मदत होईल. अर्थपूर्ण आणि अंतर्ज्ञानी मौनाद्वारे तुम्ही खोल विश्रांतीचा आनंद घ्याल. या प्रक्रिया नैसर्गिक आहेत आणि तुम्हाला मजबूत आणि अधिक कणखर बनवू शकतात. हे शिबिर करण्यासाठी कोणीही अतिशय वृद्ध नाही आहे.
या शिबीरामध्ये मौन आहे असे सांगितले जाते. मला माझ्या कुटुंबाशी संवाद साधण्याची परवानगी असेल का? इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे संवाद करू शकतो का?
शिबिराचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी, शक्यतोपर मजकूर पाठवणे, ई मेल करणे आणि सर्व प्रकारचे शाब्दिक संवाद टाळण्याचा आम्ही तुम्हाला सल्ला देऊ. तुम्ही स्वत:चा शोध घेताना तुमच्या आत खोलवर जाण्यासाठी स्वत:ला जास्तीत जास्त वेळ देणे हा याचा मुख्य उद्देश आहे. वाटते त्यापेक्षा हे खूप सोपे आहे!
हे ध्यान विपश्यना ध्यानासारखेच आहे का?
नाही, उच्चस्तरीय ध्यान शिबीर (AMP) विपश्यना ध्यानासारखे नाही. AMP चा अनुभव हा सर्वात प्रभावी अनुभव मानला जातो कारण जी अंतर्दृष्टी आणि गहनता येथे मिळते ती जीवन बदलणारी असते. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) सह विविध प्रमुख संस्थांच्या संशोधन अभ्यासांनी हे सिद्ध केले आहे की आम्ही ज्या तंत्रांचा अवलंब करतो त्याने मन सतर्क रहाण्यास, चांगली रोगप्रतिकारक शक्ति राखण्यास आणि जीवनाचा उत्तम दर्जा प्राप्त करण्यास खूप मदत होते.
या शिबीरासाठी मला दिवसातील किती तास उपलब्ध असावे लागेल?
हे शिबीर तीन पूर्ण दिवसांचे आहे. हे सकाळी ६ किंवा ७ च्या सुमारास सुरू होते आणि संध्याकाळी ८ किंवा ९ च्या आसपास संपते. तर, तुमच्या दैनंदिन जीवनातून हे दिवस मोकळे ठेवण्याच्या तयारीने या आणि सुट्टीचा आनंद घ्या.
मला यामधे किती मध्यांतरे मिळतील?
हे संपूर्ण शिबीरच तुम्हाला तुमच्या दैनंदिन दिनचर्येतून विश्रांती / मध्यांतर देण्यासाठीच तयार करण्यात आले आहे ! स्वच्छतागृह, जेवण इत्यादींसाठी आम्ही अर्थातच छोटी छोटी मध्यांतरे ठेवू.
या शिबिरात मला काही मंत्र दिला जाईल का?
या शिबिरात कोणताही वैयक्तिक मंत्र दिला जात नाही. यात मार्गदर्शित ध्यानांची मालिका आहे. तथापि, जर तुम्हाला मंत्र ध्यानात स्वारस्य असेल, तर तुम्ही आमच्या सहज समाधी ध्यान योग शिबिरासाठी नाव नोंदवू शकता.
कोणत्या शारीरिक अस्वास्थ्य स्थितीमध्ये मला या शिबिरात भाग घेता येणार नाही?
जर तुम्ही ऑनलाईन ध्यान आणि श्वसन शिबिर किंवा आनंद अनुभूति शिबिर (OMBW/हॅपीनेस प्रोग्राम) पूर्ण केले असेल, तर उच्चस्तरीय ध्यान शिबिर करण्यात कोणतीही समस्या नसावी. तरीही, तुम्हाला असणाऱ्या कोणत्याही आजार/स्थितीबद्दल तुमच्या शिक्षकांना सांगितलेले बरे असेल.
या शिबिरात सहभागी होण्यासाठी मी शाकाहारी असणे आवश्यक आहे का?
अजिबात नाही. आहाराविषयीच्या तुमच्या आवडी निवडीने या शिबिरात काही फरक पडत नाही. तथापि, आम्ही तुम्हाला कार्यक्रमादरम्यान हलका, शाकाहारी आहार घेण्याचा सल्ला देऊ. त्याने तुम्हाला गहिऱ्या ध्यानात जाण्यासाठी मदत होईल.
मी सुदर्शन चक्र क्रिया नावाच्या नवीन प्रक्रियेबद्दल ऐकले आहे. ती या शिबिराचा भाग आहे का?
हे एक प्रभावी तंत्र आहे आणि ते शिकण्यासाठी तुम्ही उच्चस्तरीय ध्यान शिबीर (AMP) केल्यानंतर पात्र व्हाल. तुमच्या रोजच्या साधनेमध्ये ही एक विनामूल्य वरची श्रेणी असेल. याबाबतीत, उच्च स्तरीय ध्यान शिबीर (AMP) पूर्ण केल्यावर तुम्ही तुमच्या प्रशिक्षकांशी संपर्क साधू शकता.