दम्यावर आयुर्वेदिक उपचार | Healing Asthma with Ayurveda

परिचय|Introduction

दम्याची लक्षणे | Symptoms of ashtma

दम्याची कारणे | Causes of asthma

दम्यासाठी आहार | Diet for people with asthma

आहारात हे टाळा | Food items that one needs to avoid

दम्यावरील आयुर्वेदिक उपचार | Ayurveda therapies for asthma

दम्यासाठी / अस्थमा साठी मुद्रा | Mudra for asthma

दम्यासाठी घरेलु उपचार | Home remedies for asthma


परिचय|Introduction

जगभरात जवळपास तीस करोड रुग्णांना असणारा दमा हा सर्वात जास्त प्रचलित असा असंसर्गजन्य रोग आहे. हा रोग आता लहान मुलांत ही आढळू लागला आहे. आयुर्वेदात दमाच्या मूळ कारणावर लक्ष देत तो बरा करण्याची सर्वांगीण उपचार पद्धती उपलब्ध आहे.

आयुर्वेदानुसार जीवन शैलीत विशिष्ट बदल करीत आयुर्वेदिक उपचार केल्यास दमा आटोक्यात आणला जाऊ शकतो. पण याच्या उपायांचा ऊहापोह करण्यापूर्वी आपण दम्याच्या आजारात फुफ्फुसांची अशी स्थिती कां होते हे जाणून घेऊ या.

 


दम्याची लक्षणे | Symptoms of ashtma

दम्याची काही लक्षणे खालील प्रमाणे आहे

  • वारंवार येणारा खोकला
  • अस्वस्थता वाटणे
  • श्वास घेताना त्रास होणे
  • श्वास घेताना आवाज येणे
  • दम लगाने
  • छातीमध्ये वाटणारी पकड
  • बारगड्यांमध्ये दुखणे
  • भोजनात अरुची  
  • पायी चालताना दम लागणे
  • आवाजामध्ये  खरखराहट
  • श्वास सोडताना ज्यास्त कष्ट होणे 

दम्याची कारणे | Causes of asthma

आयुर्वेदानुसार वात आणि कफ दोषात समतोल बिघडल्याने दमा बळावतो. या दोषांना वाढविणारे अन्नपदार्थ आणि कार्यपध्दतीमुळे दमा शरीरात वाढू लागतो, काही दम्याची कारणे खाली दिलेली आहेत जसे :

  • धूळ, धूर आणि वाहती हवा यांच्या संपर्कात आल्यास
  • थंड जागी राहिल्यामुळे किंवा थंड पाणी पिल्याने
  • वात किंवा कफाचा समतोल बिघडविणारे थंडगार वारे, पेय किंवा अन्नामुळे
  • अभिसरणाच्या मार्गात अडथळा आणणाऱ्या घटकांचे सेवन केल्यास किंवा संपर्कात आल्यास
  • चयापचयातील अवशेष
  • कोरडेपणा
  • श्वसन प्रणालीची कमजोरी
  • अति उपवास आणि निष्कासन उपचारांचा अवलंब
  • पोटातील वायूची वरच्या दिशेने वाटचाल
  • मांस आणि मासे यांचे सेवन
  • दही किंवा न उकळलेल्या दुधाचे अति सेवन

दम्यासाठी आहार | Diet for people with asthma

येथे दम्यासाठी आहारात काही विशिष्ट बदल आणि योग्य त्या आयुर्वेदिक उपचारांची शिफारस केली आहे.

दम्यावर घरगुती उपाय : दमेकरी काय काय खाऊ शकतात?

  • जुनाट तांदूळ / भात
  • लाल तांदूळ
  • कुळीथ
  • गहू, बार्ली
  • बकरीचे दूध
  • मध
  • भोपळे, पडवळ
  • लिंबू वर्गीय फळे
  • चवळी, राजगिरा
  • मनुका, विलायची

चपाती मध्ये सम प्रमाणात गहू आणि जव टाकून त्यात थोडा ओवा घालावा. भाताचे पाणी बाहेर काढून त्यात ४ से ५ लवंग टाकून शिजवावे. याचा उपयोग सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत करावा. बाहेर थंडी असल्यास भात खाऊ नये.


    आहारात हे टाळा | Food items that one needs to avoid

    • मेंढीचे दूध
    • मेंढीच्या दूधापासून तयार केलेले तूप
    • दूषित पाणी
    • मांस, मासे
    • कंद
    • मोहरी
    • सुके, तळलेले आणि मसालेदार अन्नपदार्थ
    • पचायला जड अन्न
    • दही आणि न उकळलेल्या दूधाचे अति सेवन
    • आईस्क्रीम आणि थंड पदार्थ

    वरील गोष्टी आहारात टाळाव्यात. अस्थम्याच्या रोग्याने भरपेट भोजन करू नये. रात्री ७.३० नंतर खाऊ नये. रात्रि भोजनानंतर २ तासात झोपून घ्यावे. सकाळी ध्यान प्राणायाम करावे.


    दम्यावरील आयुर्वेदिक उपचार | Ayurveda therapies for asthma

    धूपणाच्या क्रियेने जी उष्णता शरीरात तयार होते, त्याने शरीरातील कफ पातळ होतो. पाठीवर आणि छातीवर तिळाच्या तेलाचे उष्ण धूपण केल्यास दम्याची लक्षणे कमी होतात.

    विशेष आयुर्वेदिक उपचारांमुळे श्वसन प्रणालीच्या सूक्ष्म नाड्यातील कफ मोकळा होण्यास मदत होते. यामुळे नाड्या नरम होतात आणि वात दोषाचे सहज चलन शक्य होते.

    तसेच इतर उपचारांचा पर्याय उपलब्ध आहे. आहे त्या स्थितीत आराम मिळण्यासाठी आणि श्वसन प्रणालीत चालना मिळण्यासाठी डॉक्टर काही औषधे घेण्याचा सल्ला देतात.

    सजगतेने नीट काळजी घेतल्यास दमा आटोक्यात आणणे शक्य आहे. प्रभावी परिणामांसाठी प्रमाणित आयुर्वेदिक डॉक्टरकडून व्यक्तिगत नाडी परीक्षा करवून घेणे योग्य ठरते.

    दम्यासाठी काही श्री श्री आयुर्वेदिक औषधांची नावे खाली दिली आहेत. कृपया या औषधांचे सेवन प्रशिक्षित आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे.

    • तुळशी -  ५ ते ६ पाने खावीत नाहीतर तुलसी टेबलेट घ्यावी. (तुळशी च्या पानामध्ये पारा असल्याने दातांना त्रास होऊ शकतो म्हणून गोळ्या घ्याव्यात)
    • कुष्मांड रसायन
    • लवंगादि वटी - (कफ बाहेर काढण्यास मदत)
    • चवनप्राश

    दम्यासाठी / अस्थमा साठी मुद्रा | Mudra for asthma

    लिंग मुद्रा

    • सुखासन पद्मासन घालावे
    • दोनी हाथाच्या बोटांना एकमेकात गुंफून घ्यावे
    • उजव्या हाथाच्या अंगठ्याला सरळ ठेवावे
    • वेळ - ५ मिनट ते १५ मिनट पर्यंत

    दम्यासाठी घरेलु उपचार | Home remedies for asthma

    • प्रतिदिन - १५ ग्राम मोहरीचे तेल आणि १५ ग्राम देशी गूळ - मिसळून या मिश्रणाचे दिवसातून दोन वेळा सेवन करावे. गरम पानी प्यावे.  
    • छोटा पीपल १/२ ग्राम, सौंठ १/२ ग्राम, १ चमचा आल्याचा रस और १ चमचा मध  - या चारींचे मिश्रण  करून दिवसातून २ वेळा  चाटण्याने आराम मिळतो.  
    • रात्री श्वास घेताना जास्त त्रास होत असेल तर - गरम पानी घेऊन, दोन्ही पाय  गुढघ्यापर्यंत १० से १५ मिनट बुडवून ठेवावे. हे केल्याने श्वास कष्ट दूर होतात. डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. 

    Talk by Dr. on asthma

    श्री श्री रविशंकरजी यांच्या मार्गदर्शनाने श्री श्री आयुर्वेदच्या डॉक्टर, डॉ. शरिका मेनन यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार.