पित्त होण्याची कारणे / असमतोलाची लक्षणे
परिचय | Introduction
पित्त या शब्दाची व्युत्पत्ती मूळ शब्द ‘तप’ पासून झालेली आहे. तप म्हणजे उष्णता. पित्तात दोन्ही तत्वांचा समावेश आहे, ‘अग्नी’ आणि ‘जल’ तत्व. पित्ताचा प्रवाही गुण गतिशीलता दर्शवितो. अष्टांग हृदयम मध्ये पित्ताच्या सात प्रकारांचे वर्णन केले आहे:
‘पित्तम सस्नेह तिक्षोस्नम् लघुविश्राम सरं द्रवम्’,
असे सूत्र आहे. म्हणजेच पित्त हे किंचित तैलीय, भेदक, उष्ण, हलके, सुगंधी, प्रवाही आणि जलरूपी असते. पित्तामुळे चयापचय क्रियेला किंवा परिवर्तनाला चालना मिळते. पित्त पचन, शरीराचे तापमान स्थिर राखणे, दृष्टीय आकलन, त्वचेचा रंग आणि वर्ण, बुद्धी आणि भावना नियंत्रित करते.
पित्त दोषात असमतोल झाल्यास शारीरिक अनारोग्य, आजार आणि भावनिक समस्या उद्भवू लागतात. यालाच पित्त होण्याची कारणे अथवा लक्षणे म्हणता येईल, जसे :
पित्त होण्याची कारणे / असमतोलाची लक्षणे
पित्त दोषाची शारारिक लक्षणे
- भूक आणि / किंवा तहान वाढणे.
- संसर्ग
- केस पांढरे होणे / गळणे.
- भोवळ येणे आणि / किंवा अर्धशिशी
- अचानक भयंकर उष्णता जाणवणे आणि शरीराला गारवा देणाऱ्या पदार्थाची निकड भासणे.
- श्वासात आणि शरीराची दुर्गंधी
- घश्याला कोरड पडणे.
- जेवणाची वेळ टळल्यास मळमळ वाटणे.
- निद्रानाश
- स्तनात / वृषणात नाजुकपणा जाणवणे.
- वेदनादायी मासिक पाळीचा त्रास
पित्त दोषाने होणारे वागणुकीतील बदल (लक्षणे)
- उतावीळपणा
- निराशा
- अहंकारात वाढ
- अति ध्येयवादी
- संताप
- मत्सर
- तार्किक
- अस्थिर वर्तन
- परिपूर्णतेचा सोस
पित्तामुळे होणारे आजार
पित्तामुळे अनेक आजार उद्भवू शकतात, त्यातील काही खालील प्रमाणे आहेत
- छातीत जळजळ
- उन्हाने त्वचेचा क्षोभ, इसब, मुरूम, त्वचेचे रोग
- आम्लदाह, पोटातील व्रण
- ताप
- रक्तात गुठळ्या आणि पक्षाघात
- मुत्रपिंडाचा संसर्ग
- थायरॉइड ग्रंथीचे विकार
- कावीळ
- सांधेदुखी (आर्था्यटीस)
- अतिसार
- जुनाट थकव्याची लक्षणे
- अधूदृष्टी किंवा आंधळेपणा
- रोगप्रतिकार प्रणालीचा आजार
- औदासिन्य
पित्त दोषाच्या समतोलामुळे ध्येय आणि उद्देश साध्य करण्यास उत्तेजना मिळते, एकाग्रता वाढते, समस्येचे निराकरण करण्याची क्षमता वाढते आणि आत्मविश्वास वाढतो.
पित्त कशामुळे होते
- पित्त वाढविणाऱ्या अन्नाचे सेवन (तिखट, आंबट, खारट, मसालेदार, तेलकट, प्रक्रिया केलेले पदार्थआणि लाल मांस)
- कॉफी, ब्लॅक टी, निकोटीन (धुम्रपान), अल्कोहोल आणि इतर मादक पदार्थ
- उन्हात सतत वास्तव्य
- भावनिक ताण
- अतिश्रम किंवा/आणि अतिआळस
पित्त झाल्यावर घरगुती उपाय
- योग्य आहाराचे सेवन करा
- मध्यममार्ग निवडा
- चांगल्या गोष्टींचा आस्वाद घ्या
- ध्यान करा आणि कृतज्ञ रहा
- योग
- आयुर्वेदिक औषधे
१. योग्य आहाराचे सेवन करा
पित्ताचे शमन करणाऱ्या आहाराचे सेवन करा (कडवट, तुरट, मधुर चवीचा आहार). दुध, तूप, लोणी हे उत्तमरीत्या पित्ताचे शमन करतात. आंबट फळांऐवजी गोड फळे खा. मध आणि काकवी सोडून बाकी गोड वस्तूंचा वापर करू शकता.
२. मध्यममार्ग निवडा
कार्यशीलता आणि विश्रांती ह्यात योग्य समन्वय साधा. कामातच फार गुंतून राहू नका किंवा खूप लोळणे टाळा.
३. चांगल्या गोष्टींचा आस्वाद घ्या
नियमित आहार घ्या आणि चांगल्या संगतीत आणि निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवा.
४. ध्यान करा आणि कृतज्ञ रहा
ध्यान करा आणि आपल्या पित्त प्रकृतीच्या भरकटणाऱ्या मनाला स्थिर करा. तसेच तुम्हाला लाभलेल्या सर्व गोष्टींची यादी करा आणि त्याबद्दल कृतज्ञ भाव ठेवा.
५. योग
खालील योगासने पित्ताच्या असमतोलाचा प्रभाव कमी करण्यास मदतीची ठरतात.
- १. मार्जारासन
- २. शिशू आसन
- ३. चंद्र नमस्कार
- ४. उत्कटासन
- ५. भुजंगासन
- ६. विपरीत शलभासन
- ७. पश्चीमोत्तानासन
- ८. अर्धनौकासन
- ९. अर्धसर्वांगासन
- १०. सेतूबंधासन
- ११. शवासन
- १२.योगिक श्वास
६. आयुर्वेदिक औषधे
पित्ताचा समतोल साधणाऱ्या काही आयुर्वेदिक औषधांची नावे खाली दिली आहेत. कृपया या औषधांचे सेवन प्रशिक्षित आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे.
- अम्ल पित्तादि वटी (अति आम्लतेसाठी) - Amlapittari vati (for hyperacidity)
- अविपत्तिकर चूर्ण (पाचन समस्या, आणि अति आम्लतेसाठी) - Avipattikar churna (digestive problems, hyperacidity)
- यष्टिमधु (ऍसिड पेप्टिक रोगासाठी, आम्लतेमुळे होणाऱ्या रोगांसाठी) - Yashtimadhu (for acid peptic diseases)
- निशमलाकि (अँटी-एलर्जी, असोशिकता निवारणासाठी) - Nishamalaki (anti-allergic)
मत्सरभाव किंवा निराश वाटणे आणि थकवा, आम्लपित्त आणि छातीतील जळजळ या लक्षणांसाठी एकच उपाय आहे: आपल्या पित्त दोषाला संतुलित करणे! -तुम्ही श्री श्री आयुर्वेदिक हॉस्पिटल किंवा पंचकर्म सेंटरमध्ये तुमच्या पित्त दोषाचे संतुलन करण्याचा उपचार घेऊ शकता.