शास्त्रीय नांव : ऑलीयम सॅटीवेम (Allium sativem)
संस्कृत नांव : लशुन
इंग्रजी नांव : Garlic

लसणाचे झुडूप २-३ फुट वाढते, खोड घट्ट, पाने अरुंद आणि चपटी असतात. या वनस्पतीच्या मुळाला लसूण कंद म्हणतात. या कंदावर पांढरे आणि पारदर्शक आवरण असते.

लसणाच्या लागवडीसाठी सुपीक, भुसभुशीत आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची गरज असते. त्यामुळे तिचे कंद चांगले पोसवतात आणि लसूण काढणे सोपे जाते.

अति उष्ण लसणाचे कंद पोसवत नाहीत. याच्या लागवडीसाठी पाण्याची खूप गरज असते. हे बागायती पिक आहे. पाण्याची सोय असल्यास हे बारमाही पिक घेता येते. लसूण थंड आणि कोरड्या हवामानात वाढतो.

लसणाचे फायदे

डांग्या खोकला, रक्त दोष, घटसर्प, बहिरेपणा, कुष्ठ रोग, संधिवात, मुळव्याध, यकृताचे आणि पित्ताशयाचे विकार इ. वर लसूण गुणकारी आहे.

कामोत्तेजना कमी होणे, संभोग शक्ती क्षीण झाल्यास लसणाचा उपयोग होतो.

श्वसन दोष, दमा

  • श्वास मोकळा होण्यासाठी एक लसूण पाकळी गरम करून किंचित मीठ लाऊन खावी.
  • दमा कमी होण्यासाठी एक पेला गरम पाण्यात दोन चमचे मध आणि १० थेंब लसूण रस घ्यावा.
  • झोपण्यापूर्वी ३ लसूण पाकळ्या दुधात उकळून घेतल्याने दमा रात्री त्रास देत नाही.
  • दमा नाहीसा होण्यासाठी एक लसूण कुडी बारीक वाटून १२० मि.ली.माल्ट व्हिनेगर मध्ये टाकून उकळवावा.थंड झाल्यावर गाळून,तेवढाच मध घालून ठेवावा.हे रसायन दोन चमचे मेथ्याच्या काढ्याबरोबर रात्री घ्यावे.
  • न्युमोनिया नाहीसा होण्यासाठी एक लिटर पाण्यात एक ग्रॅम लसूण आणि २५० मि.ली.दुध घालून उकळवावे.पाव हिस्सा करावे.हे दुध दिवसातून तीन वेळा घ्यावे.
  • क्षय रोगासाठी लसूण दुधात उकळून घ्यावे,असे आयुर्वेदात सांगितले आहे.

पचन विकार

  • लसणीमुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात.पाचक रस जास्त प्रमाणात पाझरतात.लसणीमुळे आतड्यांच्या सर्पिल हालचालींना चालना मिळते.
  • कोणत्याही पचन विकारावर लसणाचा दुधातील किंवा पाण्यातील काढा घ्यावा.
  • आतड्यातील जंतू संसर्गावर लसूण गुणकारी आहे.कृमिनाशक आहे.दररोज दोन लसूण कुड्या खाल्याने हे लाभ मिळतात.
  • कोलायटीस,आव पडणे यावर गार्लिकची एक कॅप्सूल पुरेशी होते.
  • पोटातील सर्व आजारांसाठी लसूण एक भाग,सैंधव मीठ आणि तुपात भाजलेली हिंग पाव भाग, आल्याच्या रसातून घेणे लाभदायक आहे

उच्च रक्त दाब

  • लसणामुळे रक्त वाहीन्यावरचा दाब आणि ताण कमी होतो.नाडीचे आणि हृदयाचे ठोके कमी पडतात.उच्च रक्त दाब: लसणाचे सहा थेंब चार चमचे पाण्यातून दोन वेळा घेतल्याने नियंत्रित राहतो.
  • वाढलेला रक्त दाब कमी होण्यासाठी लसूण,पुदिना,जिरे,धने,काळी मिरी आणि सैंधव मिठाच्या चटणीचे सेवन करावे.

हृदय रोग

लसणाच्या नियमित वापराने रक्त वाहीन्यामधील साचलेले कोलॅस्टेरोल (Cholesterol) निघून जाते.त्यामुळे रक्त वाहिन्या कडक आणि कठीण होत नाहीत.त्यामुळे हृदयाचा झटका येण्याची संभावना कमी होते.हृदयाचा झटका आल्याबरोबर पाच सहा कच्च्या लसूण पाकळ्या चावून चावून खाल्ल्याने हार्ट फेल होण्याचा धोका टळतो.त्यानंतर दुधासोबत लसूण खाणे सुरु ठेवल्याने पुढील धोका टळतो.

कर्करोग

आहारात लसणाचा सातत्याने वापर केल्यास कर्करोगाची शक्यता कमी होते.कारण लसूण कर्करोगाच्या पेशींना वाढू देत नाही.कर्करोगामध्ये नियमित लसणाचे सेवन करत राहिल्याने पांढऱ्या पेशींची वाढ होऊन कर्करोगाच्या पेशींची वाढ ३९ % नी कमी होते.म्हणून सातत्याने लसणाचा रस सेवन करावा.

त्वचा विकार

  • मुरुमे आणि मोड्या (Pimples) कमी होण्यासाठी लसूण नियमित चेहऱ्यावर चोळावा.
  • नायटा,इसब झालेल्या त्वचेवर लसूण चोळल्याने टी त्वचा जाळून जाऊन रोग बरा होतो.
  • लसणामुळे रक्त शुध्द होते,रक्तातील विषाचा नाश होतो.
  • जखमा आणि व्रणासाठी निर्जंतुक पाण्यात लसूण रस ३ : १ या प्रमाणात मिसळून लावावे.२४ तासात गुण दिसतो.
  • पू कोरडा होण्यासाठी लसूण रस लाऊन पट्टी बांधावी.

लसणाचे ५ औषधी गुणधर्म

  • लसूण हि कांद्याच्या कुळातील वनस्पती आहे.तिला असणारा उग्र वास हा तिच्यातील गंधकामुळे येतो.या गंधकामुळेच तिला औषधी गुणधर्म प्राप्त झालेत.जगभर लसणाचा उपयोग मसाल्यातील पदार्थ,चटण्या,सॉस,लोणच्यांमध्ये आणि औषधी म्हणून करतात.
  • लसूण गंधकाच्या (Sulpher) संयुगांनी युक्त असल्याने त्याला उग्र दर्प असतो.यामध्ये जंतुनाशक (Anti septic)घटक आहेत.
  • लसूण तेलामध्ये गंधकाचे प्रमाण जास्त असते.म्हणूनच त्यात औषधी गुणधर्म असतात.
  • लसूण पौष्टिक,वीर्यवर्धक,उष्ण,पाचक,मल निस्सारक आहे.
  • लसूण मेधाशक्ती वर्धक आहे

लसणाचे दोन प्रकार

  1. काश्मीरी लसूण: हा लसूण फक्त हिमालयातील बर्फाच्छादित पर्वतावर उगवतो.समुद्र सपाटी पासून अति उंचीवर आणि प्रदूषित न झालेल्या वातावरणात हा उगवत असल्याने आज देखील हा अत्यंत शुध्द स्वरुपात उपलब्ध असल्याने यामध्ये लसणाचे औषधी गुण प्रचुर प्रमाणात आहेत.
  2. सर्वत्र उगवणारा लसूण: याच्या मुळातील कंदामध्ये ५ ते ३५ लसणाच्या पाकळ्या असतात.एका वेगळ्या प्रकारच्या लसणाच्या कंदामध्ये एकच लसूण येतो.

१०० ग्रॅम चांगल्या लसणामध्ये आढळणारे घटक

  • आर्द्रता (water) ६२%
  • प्रथिने (Protiens) ६.३%
  • स्निग्ध पदार्थ ०.१%
  • खनिजे (Minerals) १ %
  • कार्बोदके (Carbo Hydreds)२९.८%
  • चोथा (Fibre)०.८%
  • कॅल्शियम(Calcium) – ३० मि.ग्रॅ
  • फॉस्फोरस(Phosphorus) – ३१० मि.ग्रॅ
  • लोह(Iron) – १.३ मि.ग्रॅ
  • विटॅमिन क(Vitamin C) १३ मि.ग्रॅ
  • विटॅमिन बी कॉम्प्लेक्स(B complex) –अल्प प्रमाणात
  • लसणाचा उष्मांक मुल्य १४५ आहे

खबरदारी

  • लसूण उष्ण आणि तीक्ष्ण असल्याने पित्त प्रकृतीवाल्यानी लसणाचा वापर वैद्याचा सल्ला घेऊन करावा.
  • गरोदरपणात लसूण खाऊ नये.
  • पित्त विकारात साखरे सोबत, कफ विकारात मधासोबत आणि वात विकारात तुपासोबत लसूण खावी.

    Wait!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity


    *
    *
    *
    *
    *