आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर हा त्यांच्या सुगंधी किंवा औषधी गुणधर्मांमुळे अन्न, औषध किंवा सुगंधी वस्तु बनवण्यासाठी केला जातो. आयुर्वेदिक वनस्पती म्हणजे वनस्पतीच्या हिरव्या पानांचा किंवा फुलांच्या भागांचा (ताज्या किंवा वाळलेल्या) संदर्भ, तर मसाले वनस्पतीच्या इतर भागांपासून (सामान्यतः वाळलेल्या) बनवले जातात, ज्यात बिया, लहान फळे, साल, मुळे आणि फळे यांचा समावेश आहे.
स्वयंपाकासंबंधी आयुर्वेदिक वनस्पती आणि आयुर्वेदिक वनस्पती हे वेगळे वेगळे आहेत. त्यातील काही औषधी वनस्पतींबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.
दालचीनी
दालचीनी चे फायदे
दालचिनीचे झाड सदाहरित आणि छोट्या झुडूपासारखे असते. पूर्ण वाढलेले झाड ६ ते १५ मी. उंचीचे असते. त्याच्या खोडाची साल निवडून घेऊन वाळवतात. त्यांचा आकार कौलासारखा गोल, जाड, मऊ आणि तांबूस रंगाचा असतो.
दालचिनीची पैदास कोणत्याही प्रकारच्या जमिनीत होऊ शकत असल्याने अत्यंत सुपीक जमिनीपासून मुरुमाड, रेताड जमिनीत दालचिनी पिकते.
दालचिनी हे बागायती पिक असले तरीदेखील समुद्र सपाटी पासून १००० मी. उंचीवर हे पिक कोठेही घेतले जाते. दालचीनिला सुगंध असतो. यांचा वापर सर्वत्र मसाल्याचा पदार्थ आणि औषधी म्हणून करतात. याचे तेल ही काढले जाते, दालचिनीची पाने देखील ‘तेजपत्र‘ म्हणून मसाल्यात वापरतात.
दालचिनी चवीला तिखट-गोड असते. दालचिनी उष्ण, दीपन, पाचक, मुत्रल, कफनाशक, स्तंभक गुणधर्माची आहे. मनाची अस्वस्थता कमी करते. यकृताचे कार्य सुधारणा करते. स्मरणशक्ती वाढवते.
दालचिनीचे उष्मांक मूल्य ३५५ आहे.
- पचन विकार | Digestive disorders
- सर्दीसाठी | Cough and cold
- स्त्रीरोग | Gynaecological benefits
- स्वयंपाकाची लज्जत वाढवण्यासाठी | Adding flavor to food
- इतर उपयोग | Other health benefits
आले
आल्याचे फायदे
आल्याच्या लागवडीसाठी उष्ण आणि दमट हवामानाची गरज असते, त्यामुळे उष्ण कटीबंधात सर्वत्र त्याची लागवड होते. ते खरिफ तसेच रब्बी हंगामात येते. याला पाण्याची फारशी गरज लागत नाही. मुरुमाड, ठिसूळ आणि वालुकामय शेतजमिनीमध्ये आले उगवू शकते. परंतु चांगले उत्पादन येण्यासाठी एकाच जमिनीत सातत्याने आले न लावता जमीन आलटून, पालटून आल्याची शेती करावी.
आले हे अडीच-तीन फुट वाढणाऱ्या झुडुपाची, जमिनीखाली उगवणारी, पिवळ्या रंगाची मुळी होय. आले दीर्घकाळ टिकण्यासाठी उन्हात तसेच काही ठिकाणी दुधात बुडवून वाळवून त्याची सुंठ बनवतात. सुंठ आल्यापेक्षा उग्र असते. सुंठीचे तेल काढतात. ओल्या मातीत ठेऊन आले बराच काल टिकते.
जगभर आल्याचा उपयोग मसाल्याचा पदार्थ आणि औषधी म्हणून होतो. आल्याला ‘महा औषधी‘ म्हणतात, यावरूनच त्याचे औषधी परिणाम ध्यानात येतात.
- पचन विकार | Digestive Disorders
- श्वसन विकार | Respiratory disorder
- स्त्री रोग | Gynecological problems
- वेदना शमन | Pain killer
दही
थंड आणि मधुर दही कोणाला आवडत नाही? दही कशा सोबतही खा – त्याची चव वाढवतेच. दही फक्त आहाराची लज्जतच वाढवत नाही तर आरोग्यही प्रदान करते. म्हणून तर सर्व आहार तज्ञांची यादी दह्याशिवाय सुरु आणि पूर्ण होत नाही.
सर्वच प्राण्यांचे दुध आणि दुग्धजन्य पदार्थ पौष्टिक आहेत, परंतु या पौष्टीकतेमध्ये दह्याचा क्रमांक वरचा लागतो कारण दह्यासोबत खाल्लेले अन्न सहज पचते आणि त्या अन्नातील जीवनसत्वे आणि प्रथिने सहजरीत्या रक्तात आणि शरीरात शोषली जातात. म्हणून दह्याला ‘परिपूर्ण आहार‘ म्हणून सर्वत्र मान्यता आहे.
दही खाण्याचे फायदे
- पोट ‘भरल्याचे’ समाधान टिकून राहते
- भरपूर प्रथिनांनी युक्त आहार
- ऊर्जेने युक्त आहार
- प्रतिकारशक्ती वाढते
- मधुमेह नियंत्रित राहतो
- पचन क्रिया सुधारते
- हृदय विकाराची शक्यता कमी होते
- जीवनसत्वानी परिपूर्ण
- आतड्यांचे आरोग्य सुधारते
- चेहरा,त्वचा उजळते
- केसांसाठी उपयुक्त
- मानसिक स्वास्थ्यासाठी
लसूण
लसणाचे ५ औषधी गुणधर्म
लसणाचे झुडूप २-३ फुट वाढते, खोड घट्ट, पाने अरुंद आणि चपटी असतात. या वनस्पतीच्या मुळाला लसूण कंद म्हणतात. या कंदावर पांढरे आणि पारदर्शक आवरण असते. लसणाच्या लागवडीसाठी सुपीक, भुसभुशीत आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची गरज असते. त्यामुळे तिचे कंद चांगले पोसवतात आणि लसूण काढणे सोपे जाते. अति उष्ण भागात लसणाचे कंद पोसवत नाहीत. याच्या लागवडीसाठी पाण्याची खूप गरज असते. हे बागायती पिक आहे. पाण्याची सोय असल्यास हे बारमाही पिक घेता येते. लसूण थंड आणि कोरड्या हवामानात वाढतो.
डांग्या खोकला, रक्त दोष, घटसर्प, बहिरेपणा, कुष्ठ रोग, संधिवात, मुळव्याध, यकृताचे आणि पित्ताशयाचे विकार इ. आजारावर लसूण गुणकारी आहे. कामोत्तेजना कमी होणे, संभोग शक्ती क्षीण झाल्यास लसणाचा उपयोग होतो.
- श्वसन दोष, दमा | Asthma and respiratory disease
- पचन विकार | Digestive disorder
- उच्च रक्त दाब |High blood pressure
- हृदय रोग | Heart trouble
- कर्करोग | Cancer
- त्वचा विकार | Skin diseases