सात्विक अन्न

  • सात्विक पदार्थ म्हणजे शरीर शुद्ध करणारे आणि मन शांत करणारे
  • शिजवलेले अन्न ३-४ तासांच्या आत जर सेवन केले तर ते सात्विक मानले जाऊ शकते
  • उदाहरणे – ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा, धान्य आणि ताजे दूध

राजसिक अन्न

  • असे पदार्थ जे शरीर आणि मनाला चालना देऊन कृतीसाठी उत्तेजित करतात. हे पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केल्यास अतिक्रियाशीलता, अस्वस्थता, राग, चिडचिड आणि निद्रानाश होऊ शकतो.
  • अति चविष्ट पदार्थ राजसिक आहेत
  • उदाहरणे – मसालेदार अन्न, कांदा, लसूण, चहा, कॉफी आणि तळलेले पदार्थ

तामसिक अन्न

  • तामसिक पदार्थ म्हणजे ज्यामुळे मन सुस्त होते आणि जडत्व येते,विचारांचा गोंधळ उडतो आणि दिशाभूल होते
  • शिळे किंवा पुन्हा गरम केलेले अन्न, तेलकट किंवा जड अन्न आणि कृत्रिम रसायने वापरुन टिकवलेले अन्न या श्रेणीत येते.
  • उदाहरणे – मांसाहार, शिळे अन्न, तळलेल्या पदार्थांचे (फॅट्सचे) जास्त सेवन, तेलयुक्त आणि साखर युक्त अन्न

पौष्टिक आहार म्हणजे काय?

फक्त योग्य प्रकारचे अन्नच नव्हे तर योग्य वेळी योग्य प्रमाणात अन्न खाणे आवश्यक आहे. जास्त प्रमाणात अन्न खाल्ल्याने आळशीपणा येतो, तर कमी प्रमाणात खाल्ले तर पुरेसे पोषण मिळत नाही. बऱ्याच वेळा, आपल्याला माहित असते की आपले पोट भरले आहे, परंतु आपल्याला चविष्ट पदार्थांचा मोह होतो. अन्नाचे योग्य प्रमाण कप किंवा ग्रॅममध्ये मोजले जाऊ शकत नाही, पण जेव्हा आपण आपल्या शरीराचे लक्षपूर्वक ऐकतो तेव्हा आपल्याला नक्की कधी थांबायचे हे समजते!

आपण योग्य प्रमाणात योग्य प्रकारचे अन्न खात असलो तरीही, जर आपल्या खाण्याच्या वेळा अनियमित असतील तर सगळी मेहनत वाया जाते आणि शरीराची नैसर्गिक लय बाधित होते. म्हणूनच, दररोज ठराविक वेळी अन्न खाणे आणि ते नियमित अंतराने खाणे हे सर्वात महत्वाचे आहे. असे म्हणतात की स्वयंपाक करणाऱ्या/तसेच खाणाऱ्या व्यक्तीच्या मनाच्या स्थितीचाही अन्नावर परिणाम होतो. एकाद्याने रागात असताना शिजवलेल्या अन्नातील उर्जा ही प्रेम, समाधान आणि कृतज्ञतेच्या भावनेतून शिजवलेल्या अन्नापेक्षा नक्कीच कमी असेल. स्वयंपाक करताना आणि खाताना काही सुरेल संगीत ऐकल्याने किंवा जप केल्याने अन्नातील प्राण (जीवन शक्ती) शिल्लक राखण्यास मदत होते.

आपल्या प्रकृतीमानानुसार योग्य असलेला वैयक्तिक आहार देखील योग विज्ञानाद्वारे निर्धारित केला जातो.एका व्यक्तीसाठी अनुकूल असलेले अन्न दुसऱ्या प्रकृतीमानाच्या व्यक्तीसाठी हानिकारक असू शकते. आपल्यासाठी कोणत्या प्रकारचे अन्न आवश्यक आहे आणि काय खाणे टाळले पाहिजे हे ठरवण्यासाठी आयुर्वेदिक वैद्याचा सल्ला घेणे चांगले.आपण जे खातो तसेच आपण असतो (जे खाल तसे व्हाल!)असे प्राचीन भारतीय ग्रंथ सांगतात, त्यानुसार आपण जे अन्न खातो त्याकडे थोडे लक्ष देणे नक्कीच फायदेशीर ठरते!

    Wait!

    Don’t miss this Once-In-A-lifetime opportunity to join the Global Happiness Program with Gurudev!

    Have questions? Let us call you back

     
    *
    *
    *
    *
    *