आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण सारखे आजारी पडायचो आठवतंय ना? आधी सर्दी आणि मग ताप, लहान असताना नेहमी आपल्याला हळद दुधात टाकून किंवा औषधी वनस्पतींचे गरम पेय दिले जायचे. आपल्याला आठवत असेल आपण ते पेय तोंड वाकडे करून थोडेसे रडून कसेतरी पिऊन टाकायचो. जीवनात नेहमी प्रौढ व्यक्तीला लहानपणीच्या आठवणींना उजाळा देणे आवडते तर लहान मुलांना लवकर मोठे व्हायला आवडते, नाही का?
सन २०२० च्या कोविड लाटेनंतर ‘ काढा ‘ हा शब्द चांगले आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती, चिंतामुक्ती या शब्दांना समानार्थी झालाय. कारण आपण सगळे विकल्प तपासून बघितले कोरोना काळात. त्या काळात लोकांच्या संभाषणामध्ये काढा कसा करायचा आणि तुम्ही ठीक आहात ना ही वाक्य सर्रास असायची.
‘काढा ‘ हा त्या वेळेला अमृतासारखा का मानला गेला? काढ्याच्या पुनःरुत्थनावर कोणी प्रकाश टाकू शकेल का?
काढ्याची जादू
काढ्यात नक्की असे काय आहे कि तो गेल्या ५००० वर्षांपासून वापरला जातोय. काढा हे एक आयुर्वेदिक मान्यताप्राप्त औषधी द्रव्य आहे. त्यात साधारण सगळीकडे सापडणाऱ्या औषधी वनस्पतीचे मिश्रण असते ज्याची मात्रा आपल्या आजाराप्रमाणे वेगवेगळी असते. त्यातील काही औषधी वनस्पती इतक्या सामान्य वापरातील आहेत की आपल्याला शंका येते की खरच या उपचारासाठी परिणामकारक आहेत का.
‘पण या अलौकिक नाही आहेत.’
‘फक्त एकच चिमुटभर टाकायचय?’
‘हे तर खूप ठिकाणी तयार उपलब्ध असते?’
‘हे कसे काय एवढे परिणामकारक असेल?’
हेच तर खरे सौंदर्य आहे भारतीय पारंपारिक सूत्रांचे. आपले पूर्वज अन्नाला खरोखरच ‘ आपल्या आत्म्याचे खाद्य ‘ असे पवित्र मानायचे. शरीराला जीवनाचे उच्चतम ध्येय साधण्यासाठीचे वाहन असे समजले जायचे. जर वाहन व्यवस्थित काम करत असेल तरच आपल्याला ध्येयाकडे पोहोचता येते. आयुर्वेदात अन्नाला औषधसारखे बघितले जाते. पवित्र मानले जाते. अन्न हे शरीर व मनाला रोगमुक्त ठेवते. ते आपल्याला आतून तृप्ती देते, ज्यामुळे आपण बाहेरच्या जगात आपल्या परीने सर्वोत्तम काम करू शकतो.
आणि म्हणूनच आपल्या स्वयंपाक घरात अनेक औषधी वनस्पती असतात ज्या काळाच्या कसोटीवर खऱ्या ठरल्या आहेत. अलीकडच्या काळात वेगवेगळ्या संस्कृतींनी औषधी वनस्पतींना आपल्या आहारात समाविष्ट करून घेतलंय.
आता आपण परत आपल्या काढ्याबद्दल बोलूयात. आपण काढा पॅक करुन एक कप अत्याधिक किमतीत विकू शकता, तो घरी बनवू शकता
काढ्याचा प्रसार व्हायला हवा
जेव्हा ‘आयुष मंत्रालय ‘ भारत सरकार यांनी २०२० मध्ये रोगप्रतिकारक औषधंची काही प्रमाणे जाहीर केली, तेव्हा खूप लोकांनी त्यांना फोन करून किंवा व्हाट्सअप मेसेज वर आपापल्या काढा बनवण्याच्या पद्धती सांगितल्या. सरकारने माहिती दिल्याने घरगुती औषधे जसे की हळद, मध, च्यवनप्राश या गोष्टी लोकप्रिय झाल्या, असे एका अहवालात म्हटले आहे. (व्यापार संशोधक नेल्सनचा अहवाल)
मसाले आणि औषधी वनस्पती जरी त्याच असल्या तरी दर वेळेला चव बदलते.
काढा कसा उपयुक्त ठरतो? काढा करताना आपण तुळशीची पाने, हळद, लवंग, दालचिनी उकळत्या पाण्यात एकत्र उकळतो, त्यावेळी त्याचा अर्क पाण्यात उतरतो. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि रोगावर मात करण्यास मदत होते.
नैसर्गिक औषधांची यादी आपल्या स्वयंपाक घरात ठेवण्याकरिता:
- अमृत – रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
- आवळा – शरीरातील जंतूंचा नाश करतो. पेशींचे रक्षण करतो.
- तुळस – श्वसन प्रक्रियेतील वरच्या अवयवांना मोकळे ठेवते, विषाणूचा नाश करते, मज्जासंस्थेचे संरक्षण करते.
- हळद – सूज कमी करते, शरीरातील श्लेष्मा कमी करते, विषाणूचा नाश करते.
- जिरे – जठराच्या समस्या कमी करते.
- काळी मिरी -पचनशक्ती वाढवते, श्वसन प्रक्रिया सुलभ करते.
आपल्या शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली जाणून घेऊया
आयुर्वेदिक मान्यतेनुसार रोगप्रतिकारक प्रणाली तीन प्रकारची असते:
* सहज (नैसर्गिक): ही पालकांकडून अनुवांशिकतेने आलेली नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती आहे. आयुर्वेदिक सिद्धांतानुसार अनुवांशिक घटक हे पेशींच्या स्तरावर समजतात. जेव्हा दोन्ही पालक अनुवांशिकतेने सुदृढ असतात तेव्हा मुलांमध्ये पण तशीच सुदृढता येते. जर अनुवांशिकतेने काही आजार असतील तर तेच पुढच्या पिढीमध्ये येतात.
* कालज (वेळ): कालज बळ हे ठराविक वेळेनुसार ताकद देते. वर्षातील वेळ (ऋतू व नैसर्गिक कालचक्र) आणि त्या व्यक्तीचे वय यांचा खूप प्रभाव रोगप्रतिकारक शक्तीवर पडतो. त्यामुळे दिवसातील वेळ, ऋतु, व्यक्तीचे वय हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप महत्वाचे घटक आहेत. आपली ऊर्जा नेहमी सकाळी जास्त असते (संध्याकाळच्या तुलनेने). तसेच काही जागा ऋतुमानानुसार व हवामानानुसार आरोग्यासाठी चांगल्या असतात.
* युक्तीकृत (कमावलेली रोगप्रतिकारक शक्ती): युक्तीकृत रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे पथ्य करून, चांगली जीवनशैली आत्मसात करुन, योगाचा सराव करून कामावलेली शक्ती. रसायन हे आयुर्वेदातील आठ अंगापैकी एक आहे जे चांगले आरोग्य राखण्यास मदत करते. ते आपल्या संपूर्ण अस्तित्वाला पुनर्जीवित करते आणि रोगांशी प्रतिकार करण्याची मानसिक व शारीरिक क्षमता वाढवते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काढा हा एक परिणामकारक मार्ग आहे. पण चांगले आरोग्य आणि परिणामकारक रोगप्रतिकार शक्ती सातत्याने राखण्यासाठी पोषणयुक्त आणि शिस्तबद्ध जीवनशैली आत्मसात करणे गरजेचे आहे.
या गोष्टी माहीत असाव्यात
* काढा आपली रोगप्रतिकार क्षमता वाढवतो. ‘ कोविड १९’ आजारावर मात करण्यासाठी फक्त काढ्याचाच उपयोग करणे पुरेसे नाही.
* काढा घेण्याबरोबरच चांगली झोप, चांगला आहार, नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.
* जर तुम्हाला आम्लपित्ताचा त्रास असेल तर काढा एक दिवसा आड घ्या. किंवा काढा घेण्याबद्दल आपल्या आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घ्या.
* जर तुम्ही दररोज हळद टाकून दूध घेत असाल तर काढ्यात हळदीचे प्रमाण एक चिमुटभर असू दे.
* कोणत्याही गोष्टीचे अति करणे घातक असते. त्यामुळे सगळ्या औषधी वनस्पती थोडया थोडया प्रमाणात टाका. जास्त प्रमाणात सेवन केल्याने नाकातून रक्त येण्याचा किंवा पित्ताचा प्रदीर्घ त्रास होऊ शकतो.
* काढ्यातील काही घटक हे ठराविक ऋतुसाठी किंवा काही कालावधीसाठी चांगले असतात. हे चांगले जाणून घेण्यासाठी व ऋतुचक्रानुसार बदल करण्यासाठी आपल्या आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घ्या.
काढा करण्याची कृती
२ पूर्ण चमचे गूळ
पाव चमचा आले पावडर
पाव चमचा हळद पावडर
पाव चमचा काळी मिरी
पाव चमचा जिरे पावडर
पाच ते सात तुळशीची पाने
हे सर्व घटक १ ग्लास पाण्यात मिसळून घ्या. मग त्या पाण्याला उकळी काढा. थोडे गार झाल्यावर लगेच कोमट असताना प्या.
तुम्हाला काढा आवडू शकतो किंवा नावडू शकतो. पण १ काढा जरुर प्या.कारण हा काढा खऱ्या अर्थाने सुपरहिरो (नायक) आहे.
वरील काही माहिती डॉ निशा मणीकंठन ( निर्देशक – श्री श्री आयुर्वेद ) यांच्या ‘ आयुर्वेद सिम्प्लिफाईड : बॉडी – माईंड मॅट्रिक्स ‘ या पुस्तकातून घेतली आहे.
जर तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती बद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा तुम्हाला ती वाढवायची असेल तर ‘ऑनलाईन मेडिटेशन अँड ब्रेथ वर्कशॉप’ ही कार्यशाळा आवर्जून करा.