जगभरात तीस कोटी रुग्ण असलेला दमा हा जगातील सर्वात प्रचलित, असंसर्गजन्य रोगांपैकी एक आहे. आता मुलांमध्येही हा आजार वाढीस लागला आहे. आयुर्वेदात दम्याच्या मूळ कारणाकडे लक्ष देत समग्र उपचार प्रदान केला जातो.
आयुर्वेदानुसार, जीवनशैलीत काही बदल केले आणि आयुर्वेदिक उपचार घेतला तर दम्याचा सामना करता येतो. परंतु आपण त्याचे उपाय जाणून घेण्यापूर्वी, फुफ्फुसाच्या या स्थितीचे कारण काय आहे हे आपण समजून घेऊ या.
दम्याची कारणे
आयुर्वेदानुसार, दमा हा वात आणि कफ दोषांमधील असंतुलनाचा परिणाम आहे. खालील खाद्यपदार्थ किंवा प्रवृत्ती दोष वाढवतात आणि दमा कायम ठेवतात.:
- धूळ, धूर आणि वारा यांचा संपर्क
- थंड ठिकाणी राहणे/थंड पाण्याचा वापर
- वात किंवा कफ वाढवणारे थंड वारे, पेये आणि अन्न
- रक्ताभिसरण करणाऱ्या वाहिन्यांना अडथळा आणणाऱ्या अन्नघटकांचे सेवन
- चयापचय क्रियेतील अवशेष
- कोरडेपणा
- श्वसन प्रणालीची कमजोरी
- अति उपवास आणि शरीरातील अशुद्धे बाहेर काढून टाकण्यासाठी वापरलेली पद्धत.
- ओटीपोटात वायूंची ऊर्ध्वगामी हालचाल
- मांस आणि मासे यांचे सेवन
- जास्त प्रमाणात दही आणि न उकळलेले दूध घेणे
आयुर्वेदात दम्याचा उपचार
आहारातील काही बदल आणि योग्य आयुर्वेदिक उपचारांची शिफारस केली जाते.
दम्यासाठी घरगुती उपाय: दम्याचे रुग्ण काय खाऊ शकतात?
- जुना तांदूळ/भात
- लाल तांदूळ
- हरभरा
- गहू, बार्ली
- जुने तूप
- शेळीचे दूध
- मध
- भोपळा, तोंडली
- लिंबूवर्गीय फळे
- राजगिरा
- मनुका, वेलची
या गोष्टी टाळणे उत्तम
- मेंढीचे दूध
- मेंढीच्या दुधापासून काढलेले तूप
- दूषित पाणी
- मांस, मासे
- कंद
- मोहरी
- कोरडे, तळलेले, मसालेदार अन्न
- थंड आणि रेफ्रिजरेटेड अन्न
- पचायला जड पदार्थ
- दही आणि न उकळलेले दूध, जास्त प्रमाणात
दम्यासाठी आयुर्वेद उपचार
शरीरातील कफ शेकण्याच्या प्रक्रियेमुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेने विरघळतो. तिळाच्या तेलाचा गरम शेक पाठीवर आणि छातीवर दिल्याने दम्याच्या लक्षणांपासून आराम मिळतो.
विशेष आयुर्वेदिक उपचार श्वसन प्रणालीच्या सूक्ष्म वाहिन्यांमधून कफ सोडण्यास मदत करतात. हे वाहिन्यांना नरम करतात आणि त्यामुळे वात दोषाच्या सामान्य हालचालीस मदत लाभते.
इतरही अनेक उपचार आहेत. या स्थितीतून मुक्त होण्यासाठी आणि श्वसन संस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी डॉक्टर औषधांचा सल्ला देतात.
जागरूकता आणि योग्य काळजी घेतल्यास दम्यापासून आराम मिळू शकतो. परिणामकारक आराम मिळावा म्हणून प्रमाणित आयुर्वेद डॉक्टरांकडून वैयक्तिक नाडी परीक्षा करून घेणे उत्तम.
*श्री श्री आयुर्वेदच्या डॉक्टर, डॉ. शारिका मेनन, यांनी दिलेल्या माहितीनुसार*