वाहव्वा..आता छान उन्हाळा सुरू होतोय ! कंटाळवाणी थंडी संपतेय !!
पण, थांबुया, आधीच उड्या नको मारायला ! कारण ? मुलं खट्याळ मुलं खाईन खाईन करणारी, वेगवेगळे प्रकार खायची हट्ट करणारी ही मुलं!! तुमच्याकडेही अशी मुलं असतीलच ना? सारखी स्वयंपाकघरात घुटमळणारी, काहीतरी चटकदार खायला मिळतंय का ते पहाणारी.
अशा मुलांना चविष्ट व पौष्टिक असं काही खायला देता आलं तर?
मुलांना सामन्यपणे प्रक्रिया केलेले व डबाबंद पदार्थ आवडतात.त्यातून कॅलरीज भरपूर मिळतात असं सांगितलं जातं पण पोषणमूल्य ? काहीच नाही!! पण यात मुलांचा तरी काय दोष? टीव्हीवर ती आकर्षक जाहिराती पहातात, साखर, मीठ, तेल इत्यादी गोष्टी नको तितक्या वापरुन हे पदार्थ टिकाऊ बनवले जातात. आकर्षक जाहिरातींना ती मुलं बळी पडतात.
आपण त्यांना यापासून कसं बरं दूर ठेवू शकु? शक्य आहे!
आपणच त्यांना पोषक आहार स्वतः तयार करुन दिला तर ? हे पदार्थ करुन पहा झटपट होणारे,मुलांना आवडणारे आणि आपल्याला जसे हवे आहेत तसे.
हे तुम्ही शाळेत जाताना मुलांना डब्यातून सुद्धा देऊ शकता.
1. व्हेज कटलेट: (तव्यावर परतवलेलं किंवा भाजलेले)
साहित्य:
- अर्धा कप हिरवे मटार
- एक कप कापलेले गाजर
- अर्धा कप चिरलेले हिरवे फरसबी
- पाव कप चिरलेले बीटरूट
- एक छोटासा आल्याचा तुकडा
- एक किंवा दोन मिरच्या
- चवीपुरतं मीठ
- गरजेपुरतं तेल
- दोन चमचे बेसन किंवा तांदळाचे पीठ
- ब्रेडचा चुरा
चटणी:
- थोडीशी कोथिंबीरीची पाने
- अर्धा कप पुदिना
- १ चमचा फुटाणे
- चवीप्रमाणे मीठ
- अर्धा चमचा जिर
- दोन हिरव्या मिरच्या
- पाव इंच आलं
- एका लिंबाचा रस
कृती:
- सगळ्या भाज्या शिजवून घ्याव्यात. त्यातलं अनावश्यक पाणी काढावं.
- सगळं हाताने बारीक करावं आणि त्याच्यात मीठ , ब्रेडचा चुरा, आलं , मिरची घालून सगळं एकत्र करावं. ब्रेडच्या चुऱ्यामुळे मिश्रण चिकट होणार नाही.
- ह्या मिश्रणाचे पॅटीसचे आकार बनवावेत आणि बाजूला करून ठेवावेत.
- तांदळाच्या पिठ किंवा बेसन पीठ ह्यात पाणी घालाव.
- ह्या पाण्यात पॅटीस बुडवावित. आणि प्रत्येक बाजूला ब्रेडचा चुरा लावावा.
- तापलेल्या तव्यावर थोडं तेल घालावं.
- पॅटीस छानपैकी दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यावं किंवा ओव्हन मधून भाजून घेतलं तरी चालेल.
हिरवी चटणी:
- कोथिंबीर बारीक कापून घ्यावी. पुदिनाची पान, फुटाणे आणि बाकीचे सगळे पदार्थ पाणी घालून ते मिक्सरमधून बारीक करावं.
- गरमागरम कटलेट बरोबर चटणी वाढावी.
सूचना:
- तुम्ही त्यात कॉलीफ्लॉवर सारख्या आणखी भाज्या वाढवू शकता.
- त्यातल तेल तळताना पूर्ण निथळण्यासाठी तुम्ही भाज्यामधील अतिरिक्त पाणी पूर्णपणे काढून घ्या.
- गॅसची आच मध्यम ठेवा. लहान आचेवर पॅटीस बनायला खूप वेळ लागतो किंवा मोठ्या आचेवर ते जळतात.
2. फ्रुट सॅलड चाट मसाल्याबरोबर
तुम्ही पौष्टीक पदार्थ मुलांना शाळेतही देऊ शकता किंवा घरीही देवू शकता. हे बनवायला अगदी सोपे आणि फक्त काही मिनिटे लागतात , जर तुमच्याकडे घरी फळे असतील तर.
साहित्य:
- तुमच्या आवडीची सगळी फळ जसे सीताफळ, केळी ,मोसंबी, संत्री, अननस ,सफरचंद ,द्राक्ष, ऋतुमानाप्रमाणे आंबा, पपई, कलिंगड.
- सुकामेवा जसे किसमिस, काजू, बदाम , पिस्ता , अक्रोड, हेझलनट्स
- चाट मसाला
- सेंधव मीठ
- मिरपूड
- मीठ, गरजेनुसार
कृती:
- सगळी फळ धुवून छान बारीक कापून एकत्र करा. यांत बदाम, पिस्ते आणि आक्रोडाचे आदी सुकामेवांचे काप घालू शकता.
- थोडासा चाट मसाला घाला.
- मुलांच्या आवडीप्रमाणे सेंधव मीठ , मिरपूड घाला.
- हे सगळं मिक्स करा, छान डेकोरेशन करण्यासाठी तुम्ही चेरी पण ठेवू शकता.
हा मुलांना शाळेत किंवा घरी देण्यासाठी खूप पौष्टिक खाऊ आहे.
सूचना:
- हे मुलांना टूथपिकने खायला आवडेल . त्यामुळे तुम्ही त्यांना काटेचमचे किंवा टूथपिक देऊ शकता, कदाचित सुकामेवा खायला अवघड होईल.
- ऋतुमानाप्रमाणे फळ निवडा. अशी फळे जी जास्तीत जास्त शरीराला चांगली आहेत, ज्यात पोषक तत्व भरपूर प्रमाणात आहेत. उदाहरणार्थ उन्हाळ्यामध्ये आंबा , द्राक्षे , प्लमस् येतात.
- सुंदर अशा काचेच्या डेझर्ट बाऊलमध्ये “रेनबो इन अ कप” म्हणून तुम्ही हे देऊ शकतात आणि जे त्यांना खायला प्रवृत्त करेल.
3. खजुर आणि सुक्यामेव्याचे लाडू
साहित्य:
- एक कप खजूर
- एक कप तूप
- अर्धा कप बदाम
- अर्धा कप काजू
- दोन चमचे काळ्या मनुका किंवा किसमिस
- अर्धा कप सुकं खोबरं ( ऐच्छिक)
कृती:
- बिया काढून खजुराची पेस्ट करून घ्या. त्यात पाणी घालू नका. बाजूला ठेवा.
- त्तूप गरम करा आणि सगळे तुकडे केलेले ड्रायफ्रूट्स आणि खोबरं परतवून घ्या.
- हे सगळं बारीक गॅसवर पाच मिनिटं परतून घेऊन ड्रायफ्रूट्स खुसखुशीत होईपर्यंत भाजा.
- त्यात खजुराची पेस्ट घालून जोपर्यंत खजूर तेल सोडत नाही तोपर्यंत परत थोडा वेळ भाजा. खजुरानी तेल सोडल्यावर गॅस बंद करा.
- मिश्रण कोमट झाल्यावर छोटे छोटे सुंदर असे लाडू वळा.
हा तोंडाला पाणी आणणाऱ्या पदार्थात सुकामेवा असल्याने जे तुमच्या मुलांच्या परिपूर्ण पोषक जेवणाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी उत्तम आहे. शाळेत नेण्यासाठी पण मुलांना एक आदर्श नाष्टा आहे.
सूचना:
यात तुम्ही जरदाळू आणि सुके अंजीर सुद्धा घालू शकता.जेणेकरून त्यांचे पोषणमूल्य वाढेल.
4. मोड आलेल्या मूग डाळीचं सॅलड (हिरवी मूग डाळ स्प्लिट)
साहित्य:
- एक कप मोड आलेले मूग/ हिरव्या मुगाची डाळ
- अर्धा कप काकडी
- पाव कप गाजर
- दोन कापलेले टोमॅटो
- एक हिरवी मिरची
- चवीप्रमाणे मीठ
- एक लिंबू
कृती:
- हिरवी मूगडाळ धुवून घ्यावी.
- बाऊल मध्ये घेवून तीन कप पाणी टाकावे.
- सहा ते बारा तास भिजत ठेवावे.
- बारा तासाने त्यातलं सगळं पाणी काढून टाकावे. आणि अंधारात बंद करून ठेवावे.
- तुम्हाला हवे तसे मोड आल्यास सॅलडसाठी तयार.
- त्यात काकडी, गाजर ,टोमॅटो, हिरवी मिरची आणि मीठ टाका.
- वरतून लिंबू पिळा आणि हलवा. आता ते खायला तयार आहे.
सूचना:
- हिरवी मूगडाळ धुतल्यामुळे सगळी विषारी द्रव्ये, त्यात असलेली कीटक नाशके निघून जातात. त्यात अडकलेली घाण, कचरा असेल तो पण निघून जातो.
- गरम हवेमध्ये मूग डाळीला मोड लवकर येतात, थंड हवेमध्ये मोड उशिरा येतात.
- या सॅलेडमुळे भरपूर प्रोटीन मिळतं आणि हे सॅलड पोळी बरोबर पण खाऊ शकता. हे शरीराला खूप चांगलं आहे. शाळेत किंवा घरी मुलांना द्यायला पौष्टिक आहार.
मुलांना देण्याची पद्धत:
- डिश आकर्षक करून सजवून द्यावं म्हणजे ते मुलांना खूप आवडेल . त्यांना मजा येईल. मिकी माऊसचा डोसा आणि त्यासोबत हे सॅलड ज्यामुळे त्यांची कल्पना शक्ती आणि चव पण वाढते.
- आकर्षक कटलरी वापरून त्याच्यावर छान डेकोरेशन करून द्यावं. डिश नक्षीदार असावी. फ्रूट सॅलड साठी काचेचा बाऊल वापरावा आणि स्मूदी साठी मोठा लांब काचेचा ग्लास वापरावा. ह्यामुळे त्यातला पदार्थाचा रंग उठून दिसेल.
- ऋतुप्रमाणे फळ , भाज्या वापराव्यात. जेणेकरून त्या ताज्या आणि सकस असतील.
5. मसाला इडली
साहित्य:
- पाच सहा इडल्या छोट्या तुकड्यांमध्ये कापलेल्या
- दोन टोमॅटो कापलेले
- एक चिमूट हिंग
- दोन हिरव्या मिरच्या
- पाव चमचा हळदी पावडर
- राई एक चमचा
- कढीपत्ता दहा-बारा पाने
- दोन तीन चमचे पाणी
- दोन चमचे तूप
- थोडीशी कोथिंबीर
- चवीपुरतं मीठ
कृती:
- तूप गरम करा. त्यात मोहरी टाका. हिंग , कढीपत्ता टाका.
- मोहरी तडतडल्यावर मिरचीचे तुकडे , कापलेले टोमॅटो टाका. चवीपुरतं मीठ टाका.
- मिश्रणात थोडेसे पाणी घाला आणि पाणी आटल्यानंतर बाजूला ठेवा.
- गॅसवर भांडे ठेवून त्यात इडलीचे छोटे कापलेले तुकडे टाका. मिश्रण टाका. काही वेळ परतून घ्या.
- गॅस बंद करा आणि नंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
यम्मी आणि खायला पौष्टीक नाष्टा मुलांसाठी तयार.
सूचना:
त्यात सेंधव मीठ घातल्यावर ते जास्त चवदार होतं. मीठ सेवन करण्यासाठी कमी घालावं , कारण इडली मध्ये आधीच मीठ असते.
6. गूळ आणि गरम दुधाबरोबर पोहे
साहित्य:
- चार चमचे पोहे
- दोन-तीन चमचे गूळ
- एक-दोन ग्लास दूध
कृती:
- दूध गरम करा.
- त्यामध्ये पोहे टाका .पोहे भिजू द्यावे. अंदाजे पोह्याच्या जाडीप्रमाने दहा ते वीस मिनिटांनी पोहे भिजतील.
- त्यामध्ये किसलेला गूळ घाला आणि एकत्र करा.
हा नाश्ता बनवायला खूप सोपा आणि खूप पौष्टिक आहे. आणि जेवायच्या वेळेपर्यंत त्यांचं पोट पूर्ण भरलेलं असेल.
लक्षात ठेवा!
मुलांना तेच आवडत जे तुम्ही चवीने खाता आणि ज्याची तुम्हाला सवय असते . जर तुम्ही पौष्टिक आहार खाल्ला तर मुलं पौष्टिक आहार खातात. जर तुम्ही मुलांना पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज वगैरे खावू घातलं तर मुलं पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज हेच मागतात . त्यामुळे तुम्ही त्यांना नेहमी पौष्टिक आणि चविष्ट आहार दिला तर भविष्यात मुल तुमचे आभार मानतील त्यांची काळजी आणि पौष्टिक पर्याय बद्द्ल. शेवटी, घरगुती पदार्थ काहीही प्रक्रिया केलेल्या पदार्थांपेक्षा सर्वोत्तम.
7. फळांची स्मुदी
साहित्य:
- दोन-तीन केळी सोलून तुकडे केलीली
- एक कप स्ट्रॉबेरी
- दोन-तीन चमचे मध
- पाणी
कृती:
- केळी, स्ट्रॉबेरी आणि मध मिक्सर मधून काढून घ्या.
- तुम्हाला थोडसं पातळ हवे असल्यास त्यात पाणी घाला.
सूचना:
- तुम्ही आंबा स्मुदी बनवू शकता (आंबा, मध आणि पाणी) किंवा ब्ल्यूबेरी स्मुदी (ब्ल्यू बेरीज, ब्लॅक बेरीज, स्ट्रॉबेरी आणि पाणी) सुद्धा . मिक्स आणि साम्य असणारे सीझनल फळ पण वापरू शकता.
- रासबेरी किंवा चेरी पण वापरू शकता स्ट्रॉबेरी ऐवजी, जर तुम्हाला आवडत असेल तर.
- जर तुम्हाला घट्ट स्मुदी आवडत असेल तर पाणी घालू नका .
- वेगवेगळी फळ घाला की ज्याने रंगीबेरंगी स्मुदि तयार होईल जी मुलांना आकर्षित करेल.
- मोठ्या लांब काचेच्या ग्लासात मस्त रंगीबेरंगी स्ट्रॉ आणि टोपी लावून द्या. मुलं ओठांवर जीभ फिरवत स्वाद घेतील.
म्हणून पुढच्या वेळेस जेव्हा मुलं म्हणतील , भूक लागली तेव्हा म्हणू नका “थांब , आताच तर जेवण झाले आहे… “ त्याऐवजी ह्या नाश्त्याच्या नवीन पद्धती आणि पदार्थ मुलांना बनवून द्या. ह्या चविष्ट आणि आरोग्यदायी पौष्टीक पदार्थामध्ये मुलांना आवडणारे साहित्य आहे. ह्या सगळ्या पदार्थाच्या कृती सोप्या आहेत आणि त्या वाढत्या वयातील मुलांच्या जीभेचे चोचले पुरवतात. आयुर्वेदात असे ताजे व नैसर्गिक पदार्थ तुम्हाला भरपूर मिळू शकतात. आयुर्वेदिक स्वयंपाकामुळे तुमचे दैनंदिन अन्न विविध प्रकारचे होऊ शकते. नवीन नवीन रेसिपी बनवा.
जर हे पदार्थ तुम्हाला आवडल्यास , तुम्ही अजून आरोग्यदायी आयुर्वेदिक पद्धतीने नवीन पदार्थ शोधू शकता. नैसर्गिक आणि ताजे खाद्यपदार्थांच्या निवडींची समृद्ध श्रेणी आयुर्वेदामध्ये आहे. आयुर्वेदिक स्वयंपाक तुमच्या दैनंदिन खण्यामध्ये विविध प्रकारचे मेनू जोडू शकतो.