तुमच्या आरोग्य विषयक समस्यांची कारणे जाणुन घेण्याचे आयुर्वेदिक गुपीत
संस्कृत मधील शब्द “आयुर्वेद” म्हणजे जीवनाचे विज्ञान, म्हणजे आरोग्य आणि उपचार यांचे प्राचीन शास्त्र. यानुसार ब्रह्मांडामध्ये प्रत्येक गोष्ट पाच मुलभूत घटकाची (पंच महाभूत) – आकाश, वायु, अग्नि, जल आणि पृथ्वी यापासून तयार झालेली आहे. आयुर्वेद या पाच मुलभूत घटकांच्या तत्वांच्या आधारे काम करते. शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी या घटकांच्या संतुलनाचे महत्व याच्यामध्ये स्पष्ट केलेले आहे.
व्यक्तीवर, या पाच पैकी एका घटकाचा जास्त असतो, कारण ती त्याची नैसर्गिक प्रकृती असते. प्रकृती तीन दोषामध्ये विभागली जाते:
- वात दोष – या मध्ये वायु आणि आकाश तत्वांचे अधिक्य असते.
- पित्त दोष – या मध्ये अग्नि तत्वाचे अधिक्य असते.
- कफ दोष – या मध्ये पृथ्वी आणि जलतत्वांचे अधिक्य असते.
बहुतेक लोकांची प्रकृती ही दोन दोषांपासून मिळून बनलेली असते. या दोषांच्या प्रभावामुळे शरीराचा आकार, प्रवृत्ती (खाण्यापिण्याची आवडनिवड), मन आणि भावना ठरते. उदाहरणार्थ, कफ दोष असणाऱ्या लोकांचे भरीव, भक्कम शरीर आणि भावनिक स्थिरता या मध्ये पृथ्वी तत्त्व स्पष्ट जाणवते.
या पैकी कुठल्याही एका दोषा मध्ये असंतुलन आजारांचे कारण असते. चला तर मग दोष आणि दोषांमध्ये उद्भवणाऱ्या असंतुलनाचे परिणाम जाणुन घेऊया.
वात असंतुलन
या तीन दोषां मध्ये वात दोष जास्त महत्वाचा आहे कारण वात दीर्घकाळ असंतुलित राहिल्यास इतर दोन दोष (पित्त आणि कफ) असंतुलीत होतात.
वात असंतुलनाची लक्षणे आणि परिणाम
लक्षणे
शारीरिक:
- बद्धकोष्ठता
- पोट फुगणे किंवा पोटाची शिथिलता
- निर्जलीकरण
- कोरडी आणि खरखरीत त्वचा
- अंगदुखी
- तोंडाची तुरट चव
- शरीरात त्राण नसणे, थकवा, उत्साहहीनता
- अशांत किंवा झोप पुरेशी न येणे
- शरीर थरथरणे आणि झटके येणे
- चक्कर येणे किंवा भ्रमिष्ट होणे
- थंडी विषयी संवेदनशीलता आणि ऊब मिळण्याची गरज भासणे
वर्तणुकी संबंधी :
- असंबद्ध, उतावीळ, चिंताग्रस्त, उत्तेजित, अशांत
- अंग काढूण घेणारे
- गोंधळलेले, भयग्रस्त आणि डळमळीत
- निराधार समजणारे
- शरीराची जास्तीची हलचाल किंवा अधिक बोलणे
परिणाम
- स्नायुंचा अनावश्यक वापर
- सांधेदूखी
- शरीराचा कडकपणा
- डोकेदूखी
- बद्धकोष्ठता
- वजन कमी होणे
- गोळा येणे
- बेशुद्ध होणे, झटके येणे, अर्धांगवायुचा झटका
- पोटशूळ
- कोरडेपणा, खवले
- अकारण भीती
पित्त असंतुलन
पित्त दोष हा अग्नि किंवा उष्णतेशी संबंधित आहे. जेव्हा आरोग्यात बदल जाणवतात, तेव्हा पित्त प्रकृती त्याच्या मुळाशी असते. पित्ताचा प्रभाव पचन संस्था, यकृत, त्वचा, डोळे किंवा मेंदू यावर असतो.
पित्त असंतुलनाची लक्षणे आणि परिणाम
लक्षणे
शारीरिक:
- जास्तीची तहान किंवा भूक
- छातीत जळजळ आणि अँसिडीटी
- डोळे, हात आणि तळ पायांची जळजळ
- शरीरात उष्मा जाणवणे
- त्वचेवर ओरखडे, पुरळ आणि फोड येणे
- उलटी (पिवळसर पाणी बाहेर येणे)
- प्रकाशाची अति संवेदनशीलता
- शरीराची दुर्गंधी
- मळमळ आणि डोकेदूखी
- जुलाब
- तोंडाला कडवटपणा
- उष्णतेची संवेदनशीलता आणि थंडाव्याची गरज जाणवणे
वर्तणुकी संबंधी:
- अडखळत आणि हातवारे करत बोलणे
- दुसऱ्या विषयी मनात धारणा ठेवणारी किंवा टीकात्मक वृत्ती
- रागीट, शीघ्रकोपी, धोकादायक
- वितंडवादी, आक्रामक
- उतावीळ आणि अस्वस्थ
- निराश
परिणाम
- आम्लपित्त
- दाह सूज
- रक्तस्त्राव
- उच्च रक्तदाब
- जळजळ जाणवणे
- अधिकचा स्त्राव
- त्वचेवर ओरखडे, पुरळ, फोड
- पछाडून जाणे
कफ असंतुलन
तिन्ही दोषात कफ हा अधिक प्रभावी आहे. यामुळे शरीराला आकार येतो आणि शरीरास आवश्यक वंगण मिळते. याचे हे गुण वात दोषाची शारीरिक हालचाल आणि पित्त दोषाची पचनक्रिया यांच्या मध्ये प्रतिसंतुलन निर्माण करण्यास मदत करतात. प्रचंड, वजनदार फुटबॉल खेळाडू किंवा कुस्तीपटू यांच्या मध्ये कफ दोषाचे प्राबल्य असते.
कफ दोषाची लक्षणे आणि परिणाम
लक्षणे
शारीरिक:
- आळस
- क्षुधा कमी किंवा अजिबात नसणे, तिटकारा
- शरीरात पाणी जमा होणे
- स्त्रावांचा संचय, श्लेष्मा जमा होणे
- तोंडात स्त्राव जमा होणे
- श्वास घेण्यास त्रास
- जास्तीची झोप
- तोंडाचा गोडपणा
वर्तणुकी संबंधी :
- जडपणा जाणवणे
- खिन्न, दुःखी
- मंद, निष्क्रिय
- निराधार किंवा प्रेम विहीन असल्याची भावना
- लालची, फसवणुकीची व स्वार्थी वृत्ती.
परिणाम
- लठ्ठपणा
- सूज
- शरीरात पाणी जमा होणे
- श्लेष्माचे जास्त प्रमाण
- शरीराची अधिकची वाढ
- नैराश्य
दोष आणि त्यांच्या असंतुलनाचे परिणाम जाणून घेतल्यामुळे आपल्या आरोग्य विषयक समस्याची कारणे समजतात. जर तुम्हाला वरील पैकी एखादे लक्षण किंवा परिणाम जाणवत असतील तर आयुर्वेदीक वैद्यांना भेटा. ते आयुर्वेदीक उपचार आणि योग्य आहाराद्वारे तुमच्या दोषांचे निराकारण करून दोषां मध्ये समतोल आणतील.