जवस हे उच्च दर्जाचे अन्न आहे. याचा दाह शामकता गुण आणि यातील तंतूमय पदार्थ, प्रथिने, आँटी आँक्सिडंट, वेगवेगळे व्हिटँमिन-बी, ओमेगा-३ आणि कॅलशियम यांचे उच्च प्रमाण याला बऱ्याच आजारावर आणि रोगावर गुणकारी बनवते. वजन कमी करणे, रोग प्रतिकारक क्षमता वाढवणे, मधुमेह, हाडे ठिसुळ होणे आणि उच्च रक्त दाब इत्यादी समस्यावर उपाय म्हणून आहारात याचे सेवन सुचवले जाते.

वजन कमी करण्यासाठी जवस

स्थूल आणि गरजेपेक्षा जास्त वजन असणाऱ्या लोकांसाठी जवसाचा आहार उपयोगी पडतो हे अभ्यासात दिसून आले आहे. आयुर्वेदानुसार जवस हे जड अन्न आहे. याच्या जडपणा मुळे लगेच पोट भरते आणि जास्तीचे सेवन होण्यास आणि दोन जेवणांच्या मध्ये खाण्यास अटकाव होतो. या मध्ये जास्त प्रमाणात असणारी प्रथिने पोट साफ ठेवण्यास मदत करतात आणि वजन वाढण्यास जबाबदार विषारी घटक शरीरात जमा होऊ देत नाहीत.

वजन घटवण्यासाठी जवसाचा आहार घेताना दोन गोष्टी लक्षात ठेवा:

  1. आहारात जवसाचे प्रमाण मर्यादीत ठेवा , कारण हे उष्ण असतात. अभ्यासानुसार दिवसात एक किलो जवस खाण्यामुळे शरीरावर विषारी परिणाम होतो.
  2. जवस तुमच्या रोजच्या आहाराचा भाग बनवा. कधीतरी किंवा आठवड्यातुन एकदा चटपटीत पदार्थ म्हणुन खाण्याने इच्छीत परिणाम दिसणार नाहीत.

जवसाचा आहार कसा बनवावा

तुम्ही निरनिराळ्या प्रकारे जवसाचा आहारात उपयोग करु शकता. जवसाचे तेल किंवा भाजलेल्या बिया सलाड वर टाकु शकता, जवसाची चिक्की किंवा लाडू बनवु शकता आणि जवसाचे पीठ तुमच्या चपातीत मिसळु शकता. वजन घटवण्यासाठी जवसा पासून सोप्या पद्धतीने बनवता येऊ शकणारे काही पदार्थ जे तुम्ही नियमित खाऊ शकता.

जवस मुखवास

रोजच्या जेवणा नंतर खाता येण्याजोगे पाचक मुखवास

साहित्य:

  • एक ते दिड कप जवस
  • एक कप ओवा
  • एक कप बडीशेप
  • अर्धा कप तीळ
  • अर्धा कप सूर्यफुल बी
  • पाव चमचा हिमालयीन गुलाबी मीठ
  • पाव चमचा काळे मीठ
  • एक किंवा अधिक लिंबु

पद्धत:

  1. सगळ्या बीयांच्यावर गुलाबी आणि काळे मीठ टाका आणि त्याच्या वर लिंबाचा रस पिळा. सगळ्या बीया लगेच एकत्र करू नका.
  2. अर्ध्या तासासाठी सगळ्या बीया सुती कापडावर ऊन्हात ठेवा.
  3. आता, प्रत्येक बीया वेगवेगळ्या भाजून घ्या.
  4. सगळ्या बीया एकत्र करा आणि थंड होण्यासाठी ठेवुन द्या.
  5. थंड झाल्यावर काचेच्या बरणीत ठेवा.

जवस चटणी

ही सुकी चटणी रेसेपी आहे. चमचाभर तूप टाकून भात, चपाती किंवा डोशा सोबत खाऊ शकता.

साहित्य:

  • एक कप भाजलेले जवस बी
  • दोन चमचे सुकवलेला किंवा भाजलेला कढीपत्ता.
  • अर्धा चमचा जिरे
  • अर्धा चमचा लाल मिरची पूड
  • सेंधव मीठ, चवीनुसार

पद्धत:

सगळे पदार्थ मिक्सर मध्ये बारीक करुन डब्यात भरून ठेवा.

जवस पराठे

हा बिहार मधील पदार्थ तूप घालून दह्या सोबत खाल्ला जातो. दुपारच्या आणि संध्याकाळच्या जेवणातील रोजच्या पोळीची चव वाढवण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकता.

साहित्य:

  • दोन चमचे जवस सुकी चटणी (पद्धत वरती पहा)
  • कोथिंबीर
  • एक गाजर

पद्धत:

  1. गाजर किसून तूप किंवा तेलात तळून घ्या.
  2. तळलेले गाजर मिक्सरच्या भांड्यात काढा. त्यात सुकी जवस चटणी, कापलेली कोथिंबीर आणि चवी नुसार मीठ टाका. एक कापलेली हिरवी मिरची आणि पाव चमचा आले टाकू शकता. मिक्सर मध्ये बरीक मिश्रण करुन घ्या.
  3. गव्हाच्या कणकेचा बारीक गोळा घेऊन पोळपाटावर छोटी लाटी लाटुन घ्या.
  4. चमचा भर तयार केलेले गाजर-जवस मिश्रण लाटीवर पसरवा आणि लाटीच्या कडा दुमडुन उंडा तयार करा.
  5. उंडा चपाती सारखा लाटुन घ्या.
  6. लाटलेली चपाती गरम तव्यात टाका.
  7. एक बाजू भाजल्यावर चपाती उलटू न दुसरी बाजू भाजा.
  8. चपातीला तूप किंवा तेल लावा. एका मिनीटा नंतर पुन्हा चपाती पलटी करा.
  9. चपाती उलटी पालटी करून दोन्ही बाजू चांगल्या भाजा. झाला तुमचा पराठा तयार
  10. तेल किंवा तूप न लावता सुद्धा भाजू शकता. मसालेदार पराठा तयार होईल त्याला नंतर तूप लावू शकता.

जवस चिक्की

दुपारच्या जेवणा नंतर किंवा अल्पाहार म्हणून हे खा. सामान्यपणे हिवाळ्यात आणि थंड वातावरणात हा उत्तम आहार आहे.

साहित्य:

  • एक कप मखाना (fox nuts)
  • अर्धा कप जवस
  • अर्धा कप गूळ
  • एक चमचा ए२ गायीचे (A2) तूप

पद्धत:

  1. तुपा मध्ये मखाणा भाजून घ्या. भाजलेल्या मखाणा वरवंट्याच्या सहाय्याने बारीक करुन घ्या.
  2. जवस सुकेपणे भाजून घ्या.
  3. तवा मंद ज्योतीवर ठेऊन त्यामध्ये गूळ टाका आणि हलवत रहा.
  4. गूळ वितळल्यावर त्यामध्ये मखाण्याचे तुकडे आणि जवस बी टाका. एक मिनीट हलवत रहा.
  5. गॅस बंद करा आणि तुप लावलेल्या परातीत गरम मिश्रण काढूण समान पसरवा.
  6. मिश्रण थंड होऊ द्या.

उन्हाळ्यात खाण्या योग्य जवस सालाड

जवस बीया टाकून बनवलेले उन्हाळ्यात खाण्या योग्य स्वादिष्ट सलाड. तुमच्या आवडी नुसार इतर घटक यामध्ये घालू शकता.

साहित्य:

  • बारीक कापलेली काकडी
  • अर्धा कप किसलेला भोपळा
  • पाव कप डाळींब बीया
  • एका टमॅटोच्या कापलेल्य़ा फोडी
  • अर्ध्या लिंबाचा रस
  • एक चमचा भाजलेले जवस किंवा एक चमचा जवस तेल
  • चिमुठभर काळीमिरी पुड

पद्धत:

  1. सगळे साहित्या एकत्र मिसळा आणि पाच मिनीटांसाठी ठेऊन द्या.

या सर्व पाककृतींमध्ये जवस बीयांचा आरोग्यदायक आणि स्वादिष्ट वापर होतो. हे उच्च दर्जाचे अन्न पदार्थ तुमच्या आहाराचा भाग बनवा आणि तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नात सकारात्मक परिणाम जाणवतील.

लेखक: वंदिता कोठारी

या रेसेपी कौशल देसाई, सदस्य, आर्ट आँफ लिव्हिंग, होलिस्टिंक कुकिंग यांच्या मार्गदर्शनावर आधारित आहेत.

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *