दीर्घकाळ करावा लागणारा प्रवास, बारा तासांचे काम आणि जीवनातील एकंदरीत व्यस्ततेमुळे आपल्यापैकी बहुतेक जणांना व्यायाम करणे शक्य होत नाही. काहीजण शारीरिक स्थितीमुळे व्यायाम करू शकत नाहीत. या दोन्ही परिस्थितीत ज्यांना वजन कमी करायचं आहे, अशांना समस्या निर्माण होते. आता आपण व्यायाम न करता वजन कसे कमी करता येईल हे पाहू.

तणावावर मात करा

विश्वास ठेवा अगर नका ठेऊ पण तुम्ही कशा प्रकारे आपल्या जीवनातील ताण तणाव आणि भावनांना हाताळता याची वजन कमी करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. तणावामुळे शरीरातील पॅरासिंपथेटिक संस्था (parasympathetic nervous system) निष्क्रिय होते. ही चेतासंस्था शरीरासाठी आवश्यक प्रक्रिया कार्यान्वित करीत असते जसे की पचनाची क्रिया. म्हणूनच याला विश्राम आणि पचन संस्था असे सुद्धा म्हटले जाते. तणावामुळे सुद्धा लोक सतत खात राहतात आणि त्यामुळे वजन वाढते. खाली दिलेल्या जीवनशैलीविषयक सवयी तणावावर मात करण्यासाठी मदत करतात.

  • सुदर्शन क्रियेचा सराव: सुदर्शन क्रिया हे एक श्वासाचे तंत्र आहे, ज्याला फक्त वीस मिनिटे लागतात. याचा फायदा तणाव, चिंताग्रस्त मनस्थिती आणि नैराश्य दूर करण्यामध्ये होतो असे दिसून आले आहे.
  • दररोज ध्यान करा: सुदर्शन क्रियेनंतर ध्यान करा. दिवसातून थोड्या थोड्या वेळाने ध्यान करा. ध्यानामुळे शरीराला आणि मनाला खरी विश्रांती मिळते.
  • चांगली झोप घ्या: आठ तासांची चांगली झोप घेतल्यामुळे तणाव दूर होतो आणि शरीरातील इंद्रिय ताजीतवानी करण्यास मदत होते. झोपेची गुणवत्ता वाढवण्यासाठी या गोष्टी करू शकता.
  • स्वत:वर प्रेम करा: स्वतःचा सन्मान करा. तुमचे वजन तुमची ओळख होऊ देऊ नका. तुम्ही नक्कीच तुमच्या वजनापेक्षा खूप मोठे आहात.

खाण्याच्या सवयी बदला

तुम्हाला एखाद्या वजन कमी करणाऱ्या विशिष्ट आहाराचा (Diet) अवलंब करण्याची गरज नाही, कारण त्याचा परिणाम फार काळ टिकत नाही. ज्या क्षणी तुम्ही पुन्हा नेहमीचा आहार घेऊ लागतात, तुमचे वजन वाढेल. आणि हे सांगायला नको की विशिष्ट आहार घेत राहणे हे किती त्रासाचे आणि कटकटीचे असते. त्या ऐवजी तुम्ही हे करू शकतात.

  • तंतूमय पदार्थांचा समावेश करा: पूर्ण धान्य, मसूर, भाज्या आणि फळे यांच्याशी मैत्री करा.
  • पचायला जड आणि पौष्टिक नसलेला आहार टाळा: पचायला जड असणारे पदार्थ जसे दुग्धजन्य पदार्थ आणि मांसाहार, तसेच जे अन्न पौष्टिक नाही, जसे की तळलेले, प्रक्रिया केलेले आणि पाकीट बंद पदार्थ सुद्धा टाळा.
  • वेळेवर खा: जेव्हा तुम्ही नियमित वेळेवर खात नाही तेव्हा तुमचे शरीर पचनासाठी आणि चयापचयाच्या क्रियेसाठी तयार नसते.
  • उष्मांक मोजू नका: आपली भूक मारू नका किंवा प्रत्येक जेवणाचे उष्मांक मोजू नका. वजन कमी करण्यासाठी हा मार्ग फार काळ टिकणार नाही. याने केवळ कुपोषण आणि तणाव निर्माण होतो. त्या ऐवजी सकस आणि पूर्ण आहार घ्या.
  • लक्षपूर्वक जेवा: अन्नाचे पचन तेव्हाच चांगले होते, जेव्हा आपण शांत मनस्थितीत खातो. म्हणून घाई गडबडीत खाणे, खाताना बोलणे, काम करताकरता खाणे टाळा. जेवणासाठी वेळ द्या. प्रत्येक घासाचा आस्वाद घ्या आणि प्रत्येक घास ३२ वेळा चावून खा.
  • कोमट पाणी: दिवसातून थोड्या थोड्या वेळाने कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सक्रिय राहते. याने शरीरातील अपद्रव्य/ विषारी द्रव्य बाहेर काढण्यास मदत होते.
  • आधीचे जेवण पचू द्या: आधीचे खाल्लेले अन्न पचल्यानंतरच खा. सहज पचन होण्यासाठी दोन जेवणाच्या मध्ये चार तासांचे अंतर ठेवा.
  • उपवास: उपवासाच्या वेळी पचनशक्ती शरीरातील अपद्रव्य/ विषारी द्रव्य बाहेर टाकण्यासाठी वापरली जाते. म्हणून नियमितपणे, पंधरा दिवसातून एकदा उपवास केला पाहिजे. दररोज ठराविक तास उपवास केल्याने सुद्धा वजन कमी करायला मदत होते.

आयुर्वेदिक शुद्धी प्रक्रिया

वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक शुद्धीप्रक्रिया हा एक अतिशय परिणामकारक पर्याय आहे. आयुर्वेदिक शुद्धीप्रक्रियेच्या उपचाराने तुम्ही एका आठवड्यात पाच ते सहा किलो वजन कमी करू शकता. चांगले परिणाम मिळण्यासाठी आयुर्वेदिक शुद्धी प्रक्रिया तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावी.वजन कमी करण्यासाठीच्या काही शुद्धी प्रक्रिया उपचार खाली दिल्याप्रमाणे

  • विरेचन: या प्रकारात गुदद्वारा द्वारे शुद्धी केली जाते.
  • अभ्यंग आणि बाष्प स्नान: अभ्यंग म्हणजे औषधी तेल वापरून केलेली मालिश. बाष्प स्नानात शरीराला बंद खोलीत वाफ दिली जाते.
  • उदवर्तन : या प्रकारात तेलाऐवजी वनस्पती चूर्णाने संपूर्ण शरीराची मालिश केली जाते. ही शुद्धी प्रक्रिया लसिका संस्था आणि रक्ताभिसरण संस्था यांच्या शुद्धीसाठी अत्यंत प्रभावी आहे.

आयुर्वेदिक डॉक्टर तुमच्या प्रकृतीनुसार वजन कमी करण्याचे उपचार सुचवू शकतात.

पूजा वेणुगोपाल – श्री श्री योग प्रशिक्षक, यांच्या माहितीवर आधारित

लेखन : वंदिता कोठारी

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *