चिंता आपल्या वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात व्यत्यय आणते आणि मनःस्तापास कारणीभूत ठरते. सर्वात वाईट म्हणजे ही आंतरिक इंद्रियगोचर घटना शरीरातील इतर अनेक घडामोडींना सोबत घेऊन येते. उदाहरणार्थ सुरुवातीला आपल्याला होत असलेल्या थरकापाबरोबरच आपल्या चेहऱ्यावर घामाचे बिंदू येऊ शकतात आणि आपल्या घश्याला कोरड पडू शकते. सकाळपर्यंत या लक्षणांचे गांभीर्य वाढत जाऊन सकाळी बद्धकोष्ठता किंवा/आणि छातीत दुखणे आणि रात्री झोप न येण्यापर्यंत पाळी येऊ शकते. चिंतेमुळे उद्भवणाऱ्या लक्षणांची श्रेणी विद्युतचुंबकीय लहरींच्या वर्णपटाच्याइतकीच विस्तृत आहे, हे तर उघडच आहे.

तथापि, लक्षणांच्या या विस्तृत वर्णपटाचे मूळ एकच आहे. ते म्हणजे: शरीरातील वात दोष (वायू घटक) यामध्ये असलेले असंतुलन.

दोषाचा समतोल साधण्यासाठी त्या विशिष्ट दोषाच्या विरुद्ध गुण धारण करणारा आहार आणि जीवनशैली यांचे पालन केले पाहिजे. वात दोषात हलकेपणा, कोरडेपणा, शीतलता आणि खडबडीतपणा असे गुण असतात. म्हणून यांना समतोल ठेवण्यासाठी शरीरात उबदारपणा, जडपणा आणि तेलकटपणा येईल असा आहारात आणि जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला दिला जातो.

कोणताही दुष्परिणाम नसणारी आपल्या चिंतेवर विजय प्राप्त करून देणारी हत्यारे

वरील तत्त्व सोप्या उपायांद्वारे सहजपणे प्रत्यक्षात आणले जाऊ शकते. चिंतेसाठी खालील आयुर्वेदिक उपाय आहेत:

  1. वात शमन करणारा आहार

    आपल्या आहारात गोड, खारट आणि आंबट चवींचा समावेश करा. तुरट, कडू आणि तिखट चवीचे पदार्थ टाळा. जेंव्हा आपण गोड म्हणतो तेंव्हा त्याचा अर्थ बाजारात मिळणारी पांढरी साखर नाही, तर फळांमधील नैसर्गिकरित्या गोड पदार्थ असा अर्थ होतो. थंड आणि कोरड्या पदार्थांऐवजी गरम, तेलकट आणि ओलसर अन्नाचा समावेश करा.

  2. वनौषधींनी आपल्या प्रणालीला शांत करा

    अश्वगंधा, शंखपुष्पी आणि ब्राह्मी यांसारखी वनौषधी मज्जासंस्थेला आराम देतात आणि मेंदूमधील विषारी द्रव्ये करतात. परंतु यांचे सेवन करण्यापूर्वी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. आयुर्वेदिक डॉक्टर एखाद्याच्या शरीराच्या प्रकृतीनुसार औषधांची शिफारस करतात. सर्वोत्तम योग्य वैद्यकीय शिफारसी मिळविण्यासाठी श्री श्री आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  3. विशेष आयुर्वेदिक मालिश

    शिलाभ्यंग हा एक विशेष आयुर्वेदिक मालिश आहे , जो शरीराला गहरी विश्रांती देतो. यामध्ये विशेष आयुर्वेदिक तेले आणि पाण्यात गरम केलेला काळा बेसॉल्ट दगड यांचा वापर केला जातो. दगडांच्या उष्णतेमुळे वायू तत्वाचे असंतुलन शमन होण्यास मदत होते आणि शरीर आणि मनाची शांती पुनः प्राप्त होते.

  4. दिनक्रम नेमाने पाळा

    दिनक्रमाच्या शिस्तीचे पालन केल्याने वात संतुलित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे झोपण्याची, उठण्याची आणि जेवणाची विशिष्ट वेळ आपण पाळणे अतिशय जरुरी आहे.

  5. योग, प्राणायाम आणि ध्यान करा

    हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे की योग, प्राणायाम आणि ध्यान चिंता कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. म्हणून या प्राचीन साधनांचा सराव करण्यासाठी दररोज काही वेळ राखून ठेवण्याची खूपच शिफारस केली जाते. त्यांचा सराव आपल्याला निव्वळ शांत करेल असे नाही तर ते आपल्याला अधिक कार्यक्षम आणि एकाग्र बनवेल.

    तुमच्या जवळच्या श्री श्री योग आणि हँपीनेस प्रोग्रॅम येथे योग, प्राणायाम आणि ध्यान शिका!

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *