झोपण्यासाठी कुठली दिशा उत्तम आहे ?

आयुर्वेदाच्या आरोग्याच्या त्रिसूत्रात आहार, विहार आणि निद्रा ह्यांचा समावेश आहे. शांत झोपेला आयुर्वेदात खूप अधिक महत्व दिलेले आहे, त्यामुळेच, आयुर्वेदात चांगली झोप कशी मिळवावी याबद्दल अनेक सल्ले दिलेले आहेत. तसेच अनेक प्रश्न आहेत जसे की झोपताना वैज्ञानिकदृष्ट्या झोपण्यासाठी कोणती दिशा सर्वोत्तम आहे? वास्तु शास्त्र आणि आयुर्वेदानुसार झोपण्यासाठी कोणती दिशा आणि बाजू सर्वोत्तम आहेत?

झोपण्याच्या योग्य दिशेबद्दल विज्ञान काय सांगते?

निद्रेत भू-चुंबकीय परिणाम टाळण्याकरता झोपण्याची दिशा महत्त्वाची आहे. पृथ्वी एक मोठे  पण कमकुवत चुंबक आहे; पण तिचा माणसांवर होणारा प्रभाव लक्षणीय  आहे. 

पृथ्वीचे चुंबकीय धन क्षेत्र उत्तरेकडे आहे आणि ऋण क्षेत्र दक्षिणेकडे आहे. माणसाचे मस्तक हे चुंबकीय धन बाजू आहे आणि तळपाय ऋण बाजू आहे. चुंबकाच्या दोन धन  बाजू एकमेकाला दूर लोटतात , म्हणून जर आपण झोपताना आपले डोके उत्तरेकडे ठेवले, तर एकमेकाला दूर लोटणाऱ्या शक्ती थकवा निर्माण करतील, असे मला वाटते.

झोपण्याच्या दिशेबद्दल वास्तुशास्त्र काय सांगते? 

वास्तुशास्त्र म्हणजे आयुर्वेदाचे सहशास्त्र, ज्यात दिशांबद्दल माहिती आहे. हे स्थापत्य शास्त्र, पर्यावरणीय सुस्वास्थ्य आणि निरामय जीवन यांचे प्राचीन विज्ञान आहे. वास्तुशास्त्राचा उद्देश पंचमहाभूते, (आकाश, वायु, अग्नि, जल आणि पृथ्वी हे पाच मुख्य घटक), दिशा तसेच  ऊर्जा क्षेत्रांचा वापर करून आरोग्य, संपत्ती, समृद्धी आणि आनंदासाठी एक अनुकूल वातावरण तयार करणे हा आहे.

उत्तर अमेरिकेतील मोठे वास्तुतज्ञ मायकल मास्त्रो ह्यांना निद्रेसाठीच्या दिशांबदल विचारले तेव्हा त्यांचा हा सल्ला होता : “आपण कधीच आपलं डोकं उत्तर दिशेकडे ठेवून झोपू नये. धन चुंबकीय ऊर्जा उत्तर ध्रुवाकडून येते; आपलं शरीर हे डोक्याच्या बाजूस धन चुंबकीय ऊर्जा असलेले चुंबक आहे. म्हणून उत्तर दिशेस मस्तक करून झोपणे हे दोन धन चुंबकीय टोकांना एकत्र आणण्यासारखे आहे. ते एकमेकांना दूर लोटतात आणि रक्त प्रवाह आणि पचन क्रियेत व्यत्यय आणतात, जेणेकरून शांत झोप देत नाही. जर तुम्हाला शारिरीक समस्या असतील, तर दक्षिण दिशेकडे मस्तक करून झोपणे खूप फायद्याचे ठरेल (हे सल्ले दक्षिण गोलार्धात बदलत नाहीत).”

झोपण्याच्या दिशेबदल आपले शास्त्रग्रंथ काय सांगतात? 

प्राच्यां दिशि स्थिता देवास्थत्पूजार्थं च तच्छिरः

(शुश्रूत संहिता १९.६)

सुश्रुत संहितेनुसार डोके पूर्वेकडे करून झोपावे. जर पाय दक्षिण दिशेला करुन झोपलात तर प्राण ऊर्जा कमी होते. जैविक ऊर्जेचा प्रवाह उत्तरेकडून दक्षिणेकडे असतो. शरीरात नैसर्गिक प्राणाचे आगमन तळपायापासून होते आणि गर्भात आत्म्याचे आगमन डोक्याकडून होते. 

यथा स्वकियान्याजिनानी सर्वे संस्तीर्या वीरः सिशुपूर्धारण्यम्  अगस्तासस्तम (दक्षिणं) अभितो दिशं तु शिरंसि तेषं कुरुसात्तमानम्

(महाभारत)

 भगवान कृष्ण युधिष्ठिराला सल्ला देतात- मस्तक दक्षिण दिशेला आणि पाय उत्तरेकडे करुन झोप. 

उत्तरेकडे झोपणे 

उत्तरेकडे मस्तक करुन झोपण्याचा सल्ला कुणीही अजिबात देत नाहीत. त्याने शरीरातील ऊर्जा बाहेर जाते, कारण तशाने शरीर- मन- आत्मा एकसंघ राहात नाहीत. वैद्यकीयदृष्ट्या म्हटले जाते की उत्तरेकडे मस्तक करून झोपल्यास आपल्या शरीरातील लोह मेंदूत गोठून जाते. त्यामुळे रक्ताभिसरणात समस्या, वाढीव तणाव, शारीरिक व मानसिक समस्या, आणि निद्रानाश उद्भवतात. 

डॉक्टर वसंत लाड म्हणतात, “फक्त मृत व्यक्ति उत्तरेकडे डोके करुन झोपतात”. अर्थात, उत्तर दिशा ही आत्म्याला शरीरातून बाहेर पडायचा मार्ग आहे ह्या विश्वासावर आधारित हिंदु प्रथा आहे की मृत व्यक्तीची अंतिम क्रिया होईपर्यंत प्रेताचे डोके उत्तर दिशेला ठेवण्याची व्यवस्था केली जाते.

पूर्वेकडे झोपणे 

सूर्य पूर्वेला उगवतो आणि ही दिशा सकारात्मक उर्जा कंपने, शक्तिशाली कृती, कायाकल्प आणि ऊर्जेची दिशा मानली जाते. जेव्हा आपण आपळे मस्तक पूर्वेला करून झोपतो, तेव्हा सूर्याची ऊर्जा डोक्याकडून शरीरात प्रवेश करते आणि तळपायातून बाहेर निघते, त्यामुळे तुमचे डोके शांत राहते, तळपाय उबदार राहतात. हे विशेषतः विद्यार्थ्यांना फायदेशीर आहे, कारण त्यायोगे स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता सुधारते आणि एकूणच स्वास्थासाठी चांगले असते.

ही स्थिती ध्यानासाठी आणि इतर आध्यात्मिक साधनेसाठी देखील चांगली मानली जाते. पूर्व- पश्‍चिम दिशेत झोपल्यास सर्जनशीलता वाढवते, गर्भधारणेची  शक्यता वाढते आणि तीनही दोष (वात, पित्त आणि कफा) संतुलित होतात.

अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जे लोक पूर्वेकडे मस्तक करुन झोपतात त्यांच्या आर. इ.एम.(रॅपिड आय मुव्हमेंट) ची आवर्तने व डोळ्यांची हालचाल तुलनेने कमी होते.म्हणजेच त्यामुळे स्वप्न पडण्याचे प्रमाण कमी होते व गाढ झोप लागते. 

पश्‍चिमेकडे झोपणे

पश्‍चिम- पूर्व झोपण्याचा सल्ला दिला जात नाही. काहीजण म्हणतात की त्याने रजस वाढतो किंवा महत्त्वाकांक्षा आणि अस्वस्थता वाढते. तर काहींचे मत आहे की ती झोपण्याची तटस्थ स्थिती आहे. तथापि, वास्तुशास्त्रानुसार आपले डोके पश्‍चिमेकडे ठेवून झोपल्याने झोप अस्वस्थ होते, भयानक स्वप्ने पडू शकतात आणि हिंसक वृत्ती निर्माण होऊ शकते. 

दक्षिणेकडे झोपणे 

चुंबकाच्या सिद्धांतानुसार, ऋण दक्षिण  आणि धन डोकं ह्या मध्ये एक परस्पर आकर्षण तयार होउन शांत झोप लागते. आपल्या पुराणानुसार, दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे, आणि मृत्यूच्या पुनर्संचयित झोपेप्रमाणे, शांत गाढ झोपेला प्रोत्साहन देते. वास्तुचे अभ्यासक अशा झोपेला स्वास्थ्य, रक्तदाब कमी करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी, धन, समृद्धी आणि सुसंवादासाठी सर्वात उत्तम प्रकारची झोप मानतात. 

ज्यांना वात आहे, ज्यांना नेहमी चिंता आणि हात  थंड पडण्याचा त्रास आहे, त्यांना डोकं दक्षिण अथवा आग्नेय दिशेने ठेवून झोपण्याचा सल्ला दिला जातो. ज्यांचे पित्त उत्तेजित होत असते त्यांनी (काही काळासाठी) वायव्य  दिशेने झोपावे. 

पश्‍चिम दिशेने (काही काळ) डोके करुन झोपल्यास, कफा विकृती संतुलनात आणता येते.

२००९ साली, हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या फिजिओलॉजी विभागामध्ये कोणत्याही दिशेने डोके ठेवून झोपल्याने हृदयाच्या ठोक्यांवर, रक्तदाबावर प्रभावाची शक्यता आणि उताणे पडून विश्रांती दरम्यान सीरम कॉर्टिसोलवर काही परिणाम होतो का हे पाहण्यासाठी एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात आढळले की ज्यांना मस्तक दक्षिण दिशेने ठेवून झोपण्यास निर्देश दिले त्यांना सर्वात कमी एस. बी. पी. (सीसटॉलीक ब्लड प्रेशर), डी. बी. पी. (डायसटॉलीक ब्लड प्रेशर), एच आर (हार्ट रेट- हृदयाची गती), आणि एस सी (सीरम कॉर्टिसोल) होते. हे सांख्यिकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण निष्कर्ष होते, जरी वेगवेगळ्या गटांमध्ये पुढील अभ्यासाची आवश्यकता आहे अशी शिफारस करण्यात आली होती.

वास्तुशास्त्र  आणि आयुर्वेदिक ग्रंथांनी शतकांपूर्वी जी शिफारस केली होती याचा पुनरुच्चार आधुनिक विज्ञान करत आहे.

निष्कर्ष 

  • दक्षिण- उत्तर : डोके दक्षिण दिशेला व पाय उत्तरेकडे करुन झोपावे.
  • पूर्व- पाश्चिम : डोके पूर्वेकडे व पाय पश्चिमेकडे करुन झोपणे सुद्धा ठीक आहे.
  • पश्चिमेकडे डोके ठेवून झोपणे टाळा.
  • कधीही उत्तरेकडे डोके ठेवून झोपू नका.

झोपण्याची एक योग्य बाजू सुद्धा आहे का ?

आयुर्वेद, डाव्या कुशीवर वळून झोपण्यास सुचवते, जेणेकरून तुम्ही व्यवस्थित श्वास घेऊ शकता. हे तुमच्या हृदयावरील दबाव कमी करते, रक्ताभिसरणाला मदत करते आणि आरोग्यासाठी चांगले असते.

एक पुरातन म्हण सांगते, “भोगी पोटावर झोपतो, रोगी पाठीवर, तर योगी कुशीवर झोपतो.”

कुशीवर झोपल्यामुळे सूर्य नाडी (उजवी नासिका), चंद्र नाडी (डावी नासिका) सक्रीय होतात आणि शरीरात प्राणाचा प्रवाह वाढतो. या अवस्था  पेशींना जागृत अवस्थेत, दैवी चेतनेशी जोडलेली ठेवतात आणि आपल्या शरीराचे आणि मनाचे रक्षण करतात.

अशा ऊर्जा क्षेत्रातून होणारा चैतन्याचा प्रवाह केवळ आपल्याच शरीराला चैतन्य देत नाही, तर आपल्या अवती- भवतीच्या वातावरणात देखील चैतन्य पसरवतो.

त्यामुळे, झोपा, पण योग्य दिशेला!

चिंतामुक्त होण्यासाठी व झोपेबाबतच्या त्रासावर उपाय करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यशाळेत येऊन प्रभावी तंत्रे शिकून घ्या.

अनुराधा गुप्ता, इंजीनिअर, एम. बी. ए., आणि आयुर्वेदिक वेलनेस सल्लागार आहे. त्यांना कॉर्पोरेट पार्श्वभूमी आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आणि इतर नॉन प्रॉफिट संस्थांच्या स्वयंसेवक आहेत. तुम्ही त्यांना फेसबुक किंवा लिंक्डइन वर शोधू शकता.

झोपेच्या सर्वोत्तम दिशानिर्देशांवर नेहमी विचारले जाणारे प्रश्न

पूर्व दिशा झोपण्यासाठी सर्वात उत्तम दिशा आहे, विशेषतः विद्यार्थ्यांसाठी. ही दिशा स्मृती, एकाग्रता आणि सर्वांगीण आरोग्यात सुधारणा आणते.
पूर्व दिशा झोपण्यासाठी सर्वात उत्तम दिशा आहे.
पश्चिमेकडे डोके करुन झोपणे टाळावे,असे सांगितले आहे.
उत्तर दिशेकडे डोके करुन झोपणे योग्य नाही.उत्तर दिशेचा चुंबकीय ध्रुव पृथ्वीला हळुहळू आकर्षित करत असतो.आपल्या रक्तात लोह असते.सामान्यतः रक्तप्रवाहाची दिशा हृदयाच्या खालच्या बाजूकडे असते.
पण झोपताना डोके उत्तरेला असेल तर दोन्हीतील अपकर्षणामुळे आपल्याला त्रास होतो.
असं सुचवलं जातं की उत्तर दिशेकडे डोकं ठेवून कधीच झोपू नये.
होय, तुम्ही तुमचं डोकं दक्षिणेकडे आणि पाय उत्तरेकडे ठेवून झोपू शकता.
होय तुमचं डोकं पूर्वेकडे ठेवून झोपणे चांगले आहे. निद्रेसाठी ही सर्वात उत्तम दिशा आहे.
झोपण्यासाठी पूर्व दिशा सर्वात उत्तम आहे.
रात्री झोपण्याची उत्तम दिशा म्हणजे तुमचे डोके पूर्वेकडे आणि पाय पश्चिमेकडे.
बायकोने बिछान्याच्या डाव्या बाजूला आणि नवर्‍याने उजव्या बाजूला झोपावे.
पूर्ण शरीराच्या स्नायूंना आराम द्या. खांदे, चेहेरा, तोंड, कपाळ, गाल, छाती, हात, पाय, मांड्या आणि पोटर्‍या, हे सारे अवयव एकामागून एक शिथिल करा आणि लवकर झोपून जा.

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *