आयुर्वेदाच्या परिभाषित वैशिष्ट्यांपैकी एक, अथवा प्राचीन भारतीय जीवन विज्ञान यांचे निसर्गाच्या बुद्धिमत्तेशी त्यांचे असे एक नाते आहे.

आयुर्वेद आपल्याला शिकवतो की नैसर्गिकतेशिवाय आपल्या शरीराचे अस्तित्व शक्य नाही. उलट, ते त्याचा एक अंश आहे, त्याच्याशी एकरूप आहे, आणि आपल्या स्वास्थ्य व कल्याणासाठी आपण त्याच्यावर अवलंबून आहोत. तरीही या आधुनिक युगात, आपण निसर्गा पासून एका वेगळ्या परिस्थिती मध्ये राहतो आहोत की आपण नैसर्गिक आणि सहजपणे स्वतःचे पोषण करायचे विसरलेच आहोत. औद्योगिकीकरणामुळे खरे तर हंगामी असलेल्या गोष्टी पूर्ण वर्षभर उपलब्ध होतात, अणि ही वस्तुस्थिती आहे की आपण आपले जास्तीत जास्त आयुष्य घराच्या / इमारतीच्या आत घालवतो, त्यामुळे ऋतूंच्या लयीशी सुसंगत जगणे खरोखर कसे वाटते हे अगदी सहजपणे विसरत चाललो आहोत.

हंगामाप्रमाणे खाणे कां महत्त्वाचे आहे

प्रत्येक ऋतुचा आपल्या शरीरावर एक वेगळा प्रभाव पडतो. एका क्षणासाठी कल्पना करा, जानेवारीमध्ये हिवाळ्यात फिरायला जाताना आपण स्कार्फ आणि हातमोज्यामध्ये असता, तेंव्हा आईस्क्रीमचा मोठा घास घेणे काही खूप आनंददायी नाही, बरोबर ? कडक उन्हाळ्याच्या महिन्यात आपण पूलसाईड लाउंज मध्ये असताना बार्लीचे गरम गरम सूप प्यायले तर काय वाटेल ? अजिबात आवडणार नाही. अशा गोष्टीची कल्पना केल्यावर आपणास असे वाटण्याचे एक कारण असे आहे की आपले शरीर – वेगवेगळ्या प्रकारचे अन्न आपल्या शरीराला वर्षातील वेगवेगळ्या काळात समतोल राखण्यास मदत करते. 

या नैसर्गिक प्रवृत्तींविरुद्ध वागणे खरोखरच आपले नुकसान करू शकते. आपल्या आत आणि बाहेर. दोन्हीही. जरी आपण एरवी “निरोगी” आहार घेत असलो तरीही, निसर्गाच्या विरोधात जाऊन आपण काहीही खातो त्याचा परिणाम रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, अयोग्य वजन वाढणे किंवा कमी होणे असा असू शकतो, खराब त्वचा आणि केसांची प्रत, आणि आणखी गंभीर आजारांचा वाढीव धोका. आयुर्वेदिक पद्धतीने, आणि ऋतूंच्या अनुषंगाने खाल्ल्यास, त्या क्षणीच फक्तं आपल्याला छान वाटत नाही, तर हा एक प्रभावी प्रतिबंधात्मक आरोग्यदायी उपाय सुद्धा आहे.

ऋतुचर्या : ऋतूंसाठी मार्गदर्शक तत्त्वे

आयुर्वेदानुसार, आपल्यापैकी प्रत्येकाची एक नैसर्गिक प्रकृती असते: वात, पित्त किंवा कफ(अथवा वरीलपैकी दोन). वात हा हवा आणि अवकाशाच्या प्रभावामुळे असतो, पित्ताचे प्रकार अग्नि आणि पाण्याच्या प्रभावामुळे असतात, व कफाचे प्रकार पाणी आणि पृथ्वीच्या प्रभावाने असतात. प्रत्येक ऋतू आपल्यातील या शक्तींना शांत करतो किंवा प्रज्वलित करतो, म्हणजे की जर आपण आपल्या शरीराला हवामानाशी जुळवून घेण्याच्या उपाययोजना केल्या नाहीत तर ,आपल्या प्रणालींचा समतोल ढळू शकतो. 

सुदैवाने, आयुर्वेदात ऋतूचर्या म्हणून ओळखल्या जाणार्‍या हंगामी मार्गदर्शक तत्त्वांचा एक संच आहे, ज्यामध्ये “ऋतु“,म्हणजे “हंगाम” आणि “चर्या” म्हणजे “मार्गदर्शक तत्त्व”. ही मार्गदर्शक तत्त्वे वर्षभरासाठी आहार आणि जीवनशैलीतील बदलांसाठी औषधोपचार म्हणून काम करतात, यात आयुर्वेदिक शुद्धीकरण उपचारांचाही समावेश आहे, ज्यामुळे मनाची स्पष्टता राखण्यात मदत होते, आपणास आत्मिक पूर्णत्व प्राप्त होते आणि आपल्या शरीरात चैतन्य राहते.
आयुर्वेदानुसार, प्रत्येक वर्ष दोन कालखंडात विभागले गेले आहे. प्रत्येक कालावधीत तीन हंगाम आहेत : उत्तरायण म्हणजे थंडीचे महिने, ज्यामध्ये शरद, हेमंत आणि शिशिर हे ऋतू असतात, आणि दाक्षिणायन म्हणजे उष्ण महिने, ज्यामध्ये वसंत, ग्रीष्म आणि वर्षा ऋतू असतात.

आयुर्वेदातील ऊर्जावान तत्त्वे, किंवा दोष वर्षभर कसे असतात ते येथे पहा

दोषजमा
करण्याचा ऋतु
(संचय)
चिथावणीचा
ऋतु
(प्रकोप)
सुखाचा
ऋतु
(शमन)
वातग्रीष्म
(मेच्या मध्यापासून ते जुलैच्या मध्यापर्यंत)
वर्षा
(जुलै मध्यापासून ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत)
शरद
(सप्टेंबरच्या मध्यापासून ते नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत)
पित्तवर्षा
(जुलै मध्यापासून ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत)
शरद
(सप्टेंबरच्या मध्यापासून ते नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत)
हेमंत
(नोव्हेंबरच्या मध्या पासून ते जानेवारीच्या मध्यापर्यंत)
कफहेमंत
(नोव्हेंबरच्या मध्या पासून जानेवारीच्या मध्यापर्यंत)
वसंत
(मार्चच्या मध्यापासून ते मेच्या मध्यापर्यंत)
ग्रीष्म
(मेच्या मध्यापासून जुलैच्या मध्या पर्यंत)

शरद ऋतुचर्या

शरद ऋतुचर्या सप्टेंबरच्या मध्यापासून सुरु होते आणि नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत राहते. जसजशी आपल्याला पावसाळ्या नंतर, उष्णतेच्या शेवटच्या लाटेची आणि कोरडेपणाची झळ बसते, तशी तुमची अग्नि, किंवा पाचन शक्ति,पुन्हा आपली ताकद मिळवते. या संक्रमणकालीन काळात, जल आणि अग्नि, दोन्ही प्रमुख ऊर्जा आहेत ज्यामुळे पित्ताची शक्ती शांत होण्यासाठी योग्य कालावधी ठरतो.

काय खावे

या ऋतुचे ध्येय हिवाळ्यात सहजतेने संक्रमण करणे आहे. स्वत: ला शुद्ध करण्यासाठी आणि तुमच्या पचनसंस्थेला थंड महिन्यांच्या जास्त कार्यासाठी तयार करण्याकरीता, कडू, हलके, थंड, तुरट आणि गोड पदार्थ खा, जे तुमच्या पोटासाठी हलके असतील आणि जास्त चरबीयुक्त आणि मिठाचे पदार्थ टाळा. आदर्श शरद आहारात तांदूळ, मध, हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, कंदमूळ, अननस, बेरी, प्लम्स, तूप (लोणी) आणि इतर दुग्धजन्य पदार्थ, यांचा समावेश होतो.

शिफारस केलेले आयुर्वेदिक उपचार

विरेचन: विरेचन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टद्वारे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकून रक्त शुद्ध करते. ही थेरपी मूलत: एक हर्बल लॅक्सेटिव्ह थेरपी आहे , जी आपल्या पचन संस्थेची सफाई करते. जेणेकरुन तुम्ही पुढील ऋतु मध्ये ताजेतवाने होऊन प्रवेश करू शकू आणि अधिक कार्यासाठी तयार होता. विरेचनाचा सराव ऋतु संबंधित असंतुलनाच्या लक्षणांची तीव्रता कमी करण्यासाठी प्रभावी आहे.

हेमंत ऋतुचर्या

हेमंत ऋतुचर्या नोव्हेंबरच्या मध्यापासून लागतो आणि जानेवारीच्या मध्यापर्यंत राहतो. या दरम्यान आपला अग्नि सर्वात प्राबळ असतो. पृथ्वी आणि पाण्याच्या भौतिक ऊर्जा या दरम्यान खूप वरचढ असतात, म्हणजे आग्नेय पित्त तळाशी असतं आणि शांत असतं.

काय खावे

या ऋतुचा उद्देश आपणास उबदार आणि पोषण युक्त ठेवणं आहे. हीच वेळ आहे, आपण गोड, आंबट आणि खारट पदार्थ, त्याच बरोबर, तेलकट पदार्थ खायची. जठराग्नि जोरात तेवत राहू दे! गरमी वाढवणारे आणि भरपूर आंबवलेले पदार्थ (जसं किम्ची आणि सॉकरक्रॉट ) खा, आणि थंड, हलके व सुके पदार्थ खाणे टाळा. आदर्श हेमंत आहारात भोपळा, कोबी, पालक, मका, भात, गाजर, बटाटे, कांदे, बीट, सफरचंद, खजूर आणि दुधाचे पदार्थ यांचा समावेश करा. 

शिफारस केलेले आयुर्वेदिक उपचार

विरेचन: शरीरातील विषारी द्रव्य काढतं आणि तुमची पचन संस्था समाधानी ठेवतं.

अभ्यंग: अभ्यंग मूळत: एक आयुर्वेदिक तेलाने केला जाणारा मसाज आहे. ज्याची रचना आपल्या विशिष्ठ दोषमुक्तीच्या गरजेनुसार केली गेली आहे. हा उपचार एखाद्या व्यावसायिक कडून किंवा आपण स्वतः सुद्धा करु शकतो आणि आपली त्वचा स्निग्ध आणि संरक्षित राहते.

स्वेदन: स्वेदन म्हणजे सौना वापरल्या प्रमाणे आहे! हर्बल वाफ आपणास घाम गाळत विषारी द्रव्य बाहेर काढण्यास, तणाव दूर करण्यास आणि प्रवाहित करण्यास मदत करते. ते उबदार ठेवण्यासाठी देखील उत्तम आहे!

शिशीर ऋतुचर्या

शिशीर ऋतुमध्ये थंडी काही महिने स्थिरावते, जी जानेवारीच्या मध्यापासून ते मार्चच्या मध्यापर्यंत राहते. हा ओला, थंड ऋतू आपल्यासोबत जड कफ ऊर्जा वाढवतो. याचा अर्थ असा की गोष्टी संतुलित ठेवण्यासाठी आपला अग्नी आणखी तेजस्वी होणे आवश्यक आहे.

काय खावे

हेमंत ऋतु सारखा आपला आहार, भरपूर गोड, आंबट, खारट, चरबीयुक्त आणि उबदार मसाल्यांसोबत आंबवलेले पदार्थ असा चालू ठेवा. आदर्श शिशीर आहार भरपूर दुधाचे पदार्थ, कंदमुळं, सफरचंद, द्राक्ष, भात, गहू, शेंगा, आणि गोड (संयमात, अर्थातच) यांचा समावेश करा.

शिफारस केलेले आयुर्वेदिक उपचार

अभ्यंग: कठोर हिवाळी महिन्यात उबदार तेल आपल्या त्वचेला ओलावा देते आणि पोषक ठेवण्यास मदत करते.

स्वेदन: घाम गाळत रहा ! आपल्या शरीराला हिवाळ्यात हायबरनेशन मध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी स्वेदन विशेषतः या काळात उपयुक्त ठरते.

पटार पोटली: पटार पोटली हा एक मसाज आहे जो गरम केलेल्या औषधी वनस्पतींनी भरलेल्या हर्बल पाउचने केला जातो, ज्यामुळे आपले अभिसरण उत्तेजित होते, जळजळ कमी होते आणि आपले स्नायू तणाव मुक्त होतात.

वसंत ऋतुचर्या

जेंव्हा निसर्ग पुन्हा मूळ स्वरूपात येऊ लागतो, तेंव्हा आपण दाक्षिणायना मध्ये किंवा गरम महिन्यात प्रवेश करतो,. वसंत ऋतु मार्चच्या मध्यापासून ते मेच्या मध्यापर्यंत चालतो, आणि पृथ्वी व वायु च्या ऊर्जा एकत्रित होऊन हा काळ एक जीवंत संक्रमणकालीन बनवतात. कफाचा प्रभाव वाढू लागते ज्यामुळे आपला अग्नि कमी होऊ लागतो आणि त्याने आपणास बरीच अस्वस्थता जाणवू लागते.

काय खावे

हा आपल्या शरीरासाठी जास्तं संवेदनशील काळ आहे, त्यामुळे सहज पचणारे कडू आणि तुरट पदार्थ खाण्यावर भर द्या, आणि थंड, चिकट, जड, आंबट आणि गोड पदार्थ खाणे टाळा. आदर्श वसंत ऋतु आहारामध्ये आतडयांसाठी निरोगी भोजन जसे जव, आणि मध आणि हळुवार उत्तेजित करणारे मसाले जसे धणे, जीरे, हळद आणि बडीशेप. 

शिफारस केलेले आयुर्वेदिक उपचार

नस्य: जर आपण कधी नेतीपात्र चा वापर केला असेल, तर आपण कदाचीत नस्य बद्दल ही ऐकलं असेल. अ‍ॅलर्जीच्या महिन्यात, आपली श्वसन संस्था, आपल्या नासिक मार्गासह, साफ करणे खूप महत्त्वाचे आहे. नस्य मध्ये अतिरिक्त श्लेष्माची सफाई आणि उपचारात्मक तेल घालून तो भाग तेलकट ठेवणे यांचा समावेश आहे. 

ग्रीष्म ऋतुचर्या

उन्हाळा मेच्या मध्यापासून ते जुलैच्या मध्यापर्यंत चालतो. या काळात अग्नि आणि वायु ऊर्जा यांचे वर्चस्व असते. या ऋतु मध्ये कोरडा असल्याने, गोष्टी सुकवून टाकतात आणि आपल्या शरीरात पित्त व वात या दोन्ही ऊर्जा वाढवतात. आपला अग्नि पूर्ण वेळ मंद असतो, म्हणून आहार हलका ठेवणे आवश्यक आहे.

काय खावे

वर्षातील हा काळ गोड, हलके, थंड, खजिन- समृद्ध पदार्थांसाठी आहे. भरपूर औषधी वनस्पती खा आणि भरपूर फळांचे रस प्या व आंबट, तिखट अथवा गरम पदार्थ टाळा. भरपूर पाणी पित रहा आणि अँटी ऑक्सिडंट्स घ्या. आदर्श ग्रीष्म आहारामध्ये भरपूर ताजी फळे, अणि शतावरी, काकडी, भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी उपयुक्त अशी एक वनस्पती आणि हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश होतो.

शिफारस केलेले आयुर्वेदिक उपचार

अभ्यंग: होय ! पुन्हा अभ्यंग. तुमच्या लक्षात आले कां? हा ऋतु कोरडा आहे, म्हणून आपली त्वचा ओलसर, मऊ ठेवणं गरजेचं आहे. 

शिरोधाराशिरोधारा एक सखोल आरामदायक उपचार पद्धती आहे , ज्यामध्ये ऊबदार तेलाचा एक स्थिर प्रवाह असतो. जो कपाळावर ओतला जातो. अग्नि आणि वायु मनावर जी गोंधळलेली स्थिती आणतात , यावर हा सुखदायी उपचार योग्य आहे.

वर्षा ऋतुचर्या

वर्षा ऋतु जुलै मध्या पासून ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत असतो. हा सामान्यतः एक ओला, पावसाळी ऋतु असतो, ज्यामध्ये पृथ्वी आणि अग्नि ऊर्जा अग्रस्थानी असतात. या ऋतु मध्ये आपल्या अग्नीची शक्ति खूप कमी झाली असते, त्यामुळे त्या अग्निचा भडका पुन्हा एकदा पेटून उठवण्याची वेळ आली आहे. 

काय खावे

खारट, आंबट आणि तेलकट पदार्थ हे या ऋतुचे तारे आहेत. जरी आपणास आपला पाचक अग्नि सुरू व्हायला हवी अशी इच्छा असेल, तरी पण सुरुवातीला पचनासाठी जड पदार्थ टाळा आणि ऋतुमध्ये हळूहळू संक्रमण करा. आदर्श वर्षा आहारामध्ये आपण न शिजवलेले अन्न टाळतो आणि गरम, ताजे- शिजवलेल्या जेवणाला प्राधान्य देतो. आपल्या पचनाला आल्ले आणि लिंबाने मदत करा आणि भरपूर प्रमाणात पातळ सूप प्या.

शिफारस केलेले आयुर्वेदिक उपचार

पंचकर्म: पचकर्मासाठी वर्षा ही अगदी योग्य वेळ आहे , एक शुद्धीकरण जे तुम्हाला पाच उपचारांद्वारे प्राप्त होते : बस्ती, नस्य, स्वेदन, अभ्यंग, आणि स्नेहन. येणार्‍या वर्षासाठी स्वतःला रीसेट करा आणि मस्त रहा!

ऋतुचर्या ज्या प्रदेशात फक्त चार ऋतु आहेत

यूएस मध्ये, ऋतुचर्या चार ऋतूंनी वैशिष्टय़कृत आहे, भारताच्या विपरीत जेथे सहा ऋतु आहेत. तत्त्व सारखेच आहे; दोष वेगवेगळ्या ऋतूंमध्ये जमा होण्याच्या, वाढवण्याच्या आणि कमी होण्याच्या चक्रातून जातात, आणि आपल्याला आपल्या जीवनशैली आणि आहारासोबत त्यांचा समतोल साधावा लागतो.

वात ऋतु, हिवाळा आणि हिवाळ्याच्या सुरवाती पासून, सप्टेंबर च्या मध्यापासून थेट जानेवारी पर्यंत चालतो. कफ ऋतु फेब्रुवारी ते मे पर्यंत, आणि पित्त ऋतु जून ते सप्टेंबर च्या मध्यापर्यंत असतो. तथापि, आपण नेहमी आपले संकेत निसर्गाकडून घेतो : उदाहरणार्थ, मेन सारख्या उत्तरे कडील प्रदेशांमध्ये, हिवाळा जास्त काळ असतो. 

आपण आपला आहार दोषांच्या विरुद्ध गुणांद्वारे संतुलित करतो : उदाहरणार्थ पित्त ऋतु मध्ये, हवामानाचे वैशिष्टय़ आहे गरम, हलके आणि तीव्र गुण, म्हणून आपण त्याला थंड, जड, आणि बेचव जेवणाने, तिखट, खारट आणि आंबट जेवण टाळत उतारा देतो. यूएस मध्ये वसंत ऋतु हा पंचकर्म साठी खूप उत्तम काळ आहे,जो भारतापेक्षा वेगळा आहे, जेथे वर्षा ऋतु, किंवा पावसाळा, उत्तम ऋतु आहे. शुद्धीकरणासाठी शरद ऋतु हा एक चांगला ऋतु आहे.

नेहमीप्रमाणे, कोणतीही नवीन आरोग्य व्यवस्थाची हमी घेण्यापूर्वी तुमच्या वैयक्तिक वैद्याचा सल्ला घ्या अणि नेहमी आयुर्वेदिक तज्ञांच्या देखरेखीखाली आयुर्वेदिक उपचार पद्धती सुरु करा.

भारतातील आयुर्वेदिक तज्ञ वैद्य तृप्ती जोशी यांच्या माहितीवर आधारित.

पायगे ले रेइस्त (Paige Leigh Reist) एक लेखक, संपादक, ब्लॉगर आणि लेखन प्रशिक्षक आहेत.

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *