
ब्लेसिंग प्रोग्राम
तुमच्यातील आशीर्वाद देण्याचे सामर्थ्य ओळखा.
तुम्ही दिलेले आशीर्वाद एखाद्या व्यक्तीचे जीवन बदलू शकतात.
पात्रता: हॅप्पीनेस प्रोग्राम, २ ॲडव्हान्स मेडिटेशन प्रोग्रॅम, सहज समाधी ध्यान योग
*तुमचे योगदान, तुम्हाला आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सामाजिक योजणांसाठी लाभदायक आहे.
नोंदणी करापूर्ण समाधानी असणे हा चेतनेचा एक सुंदर गुण आहे आणि अशा स्थितीत दुसऱ्यांना आशीर्वाद देण्याचे आणि त्यांना बरे करण्याचे माध्यम बनण्याची आपल्याला क्षमता मिळते. आशीर्वाद शिबीर (ब्लेसिंग प्रोग्राम) हे त्यातील काही अद्वितीय ध्यान प्रक्रियांद्वारे समृद्ध, तृप्त आणि समाधानी असण्याचा अनुभव देते. हे गुण आपल्या सर्वांसाठी अगदी स्वाभाविक आहेत आणि हे शिबीर आपल्याला त्याची जाणीव करून देते.
आशीर्वाद नेहमी इतरांना देण्यासाठी असतो, स्वतःसाठी नाही. ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे, त्यांची सेवा करण्यासाठी आणि शांतता आणि सुसंवाद साधण्यासाठी उपलब्ध असणे, त्यांना आशीर्वाद देण्यास सक्षम असणे ही इतरांची काळजी घेण्याच्या आणि दुसऱ्यांना सामावून घेण्याच्या वृत्तीची परिपूर्ण अभिव्यक्तीच आहे. यासंदर्भात अनेकांनी विलक्षण अनुभव नोंदवले आहेत.
तुमच्यातील सामर्थ्य ओळखा

तुमच्यामधील परिपूर्णता, समृद्धी आणि समाधान अनुभवा.

इतरांचे त्रास कमी करण्याचे, बरे करण्याचे माध्यम व्हा.

आशीर्वाद देण्याची तुमची क्षमता जाणा
माझ्या आयुष्यात मिळालेली सर्वात सुंदर देणगी आहे ही.

गायत्री यु.
रिसोर्स मॅनेजर
संस्थापक
गुरुदेव श्री श्री रवि शंकर
गुरुदेव श्री श्री रविशंकर हे मानवतावादी, अध्यात्मिक नेते आणि शांतीदूत आहेत, १८० पेक्षा जास्त देशातील लोकांच्या जीवनात त्यांनी योग, ध्यान, आणि व्यावहारिक ज्ञान आणले आहे.
आणखी जाणून घ्या