'आश्रम' हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ आहे प्रयत्न किंवा परिश्रम न करता: म्हणून जेव्हा तुम्ही आश्रमात येता, तेव्हा तुम्ही प्रयत्नविना तुमच्यासोबत आणलेले सर्व मानसिक ओझे/भय आणि असुरक्षितता सहजतेने टाकून देऊ शकता. आश्रम चा समानार्थी शब्द म्हणजे गहिरी विश्रांती.

गेल्या ४४ वर्षांत आर्ट ऑफ लिव्हिंगने जगभरात अनेक आश्रम स्थापन केले आहेत. ही केंद्रे सामाजिक विकासाचे स्थान बनली आहेत, तसेच आत्म-विकास आणि चिंतनासाठीचे आधार स्तंभ आहेत. ह्याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आश्रम एक अशी जागा झालेली आहे जिथे सर्व धर्म आणि विचारसरणीच्या लोकांना समान मंच मिळतो, तिथे भेट देणारे अनेकदा आश्रमाचे वर्णन घरापासून दूर असलेले आपले आणखी एक घर म्हणून करतात.

आश्रमाला समस्त मानवतेसाठी प्रेम आणि करुणेचे दीपस्तंभ बनवा. त्याद्वारे सर्व स्तरातील, सर्व विचारधारेतील, सर्व पार्श्वभूमीतील लोकांना एकत्र येऊ द्या.

- गुरुदेव श्री श्री रवि शंकर