बालकांसाठी तसेच किशोरवयीन मुलांसाठी शिबीर
एकाग्र, तणावमुक्त व्हा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मुलांसाठी असलेल्या शिबीरांमध्ये त्यांना मन: शांती, मानसिक सुस्पष्टता, एकाग्रता आणि भावनिक स्थिरता, आपल्याकडे जे आहे ते इतरांना देणे, सलोख्याने खेळणे आणि इतरांशी आपुलकीची भावना विकसित करणे अशा मूल्यांचे पोषण करणाऱ्या प्रक्रियांद्वारे त्यांच्या सर्वांगीण विकासास हातभार लावला जातो.
हे शिबीर किशोरवयीन मुलांना आनंदी जीवन जगण्यासाठी व्यवहारिक साधने, संशोधन समर्थित सुदर्शन क्रिया तसेच तणाव आणि भावना हाताळण्यासाठी जीवन कौशल्ये शिकायला मिळतात, आणि त्यामुळे त्यांची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते आणि शैक्षणिकदृष्ट्याही ते उत्तम कामगिरी करतात. मुलांचे त्यांच्या समवयस्क मुलांसोबत तसेच, पालक आणि शिक्षकांसोबतचे नाते ही अधिक सकारात्मक बनते.
प्रेरीत व्हा, सक्षम व्हा, साध्य करा
५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्य सुदृढ़ करण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष शिबीर

सुदर्शन क्रिया
संशोधनावर आधारित सुदर्शन क्रिया तसेच तणाव आणि भावना प्रभावीपणे हाताळायला मदत करते. तसेच त्याने लक्ष केंद्रित करण्याचीक्षमता आणि एकाग्रता सुधारते; आणि ग्रहण क्षमता वाढते.

योगिक तंत्रे
काही योगासने, आणि विश्राम देणाऱ्या प्रक्रिया ज्यामुळे मन स्थिर होण्यास मदत होते. स्मरणशक्ती आणि धारणा सुधारण्यासाठी सोप्या पद्धती आणि आत्मविश्वास व एकाग्रता वाढविण्यासाठी विशेष प्रक्रिया.

व्यावहारिक साधने व जीवन कौशल्ये
नकारात्मक भावनांपासून मुक्त होण्यासाठी, शैक्षणिक जीवनात स्वयंप्रेरणेने उत्तम कामगिरी करण्यासाठी आणि समवयस्कांचा दबाव आणि जीवनातील विविध आव्हानांचा सामना करताना योग्य निर्णय घेण्यासाठी सुलभ व व्यवहारिक जीवन कौशल्ये शिका.

संवादात्मक खेळ व उपक्रम
मजेशीर खेळ, वैयक्तिक तसेच सांघिक उपक्रम आणि वैविध्यपूर्ण ज्ञानचर्चा यातून मुलांना त्यांचे ध्येय ठरवणे, उत्तम निर्णय घेणे, समस्या सोडवणे, संघर्ष निराकरण आणि उत्तम सामाजिक वर्तणुक आणि सहकार्यातून काम करायला प्रोत्साहित केले जाते.