intuition process

इंट्युशन प्रोसेस

योग्य वेळी योग्य विचार करणे

शिक्षणात सुधारणा • उत्तम धारणा • निर्णयक्षमतेच्या गुणवत्तेत सुधारणा

१० दिवस (वयोगट ५-८ वर्ष), १७ दिवस (वयोगट ८-१८ वर्ष)

*तुमचे योगदान, तुम्हाला आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सामाजिक योजणांसाठी लाभदायक आहे.

तुमचे बालक काय शिकेल

icon

इंट्युशन

जी त्यांना त्यांच्या जीवनातील प्रत्येक बाबतीत मार्गदर्शन करू शकेल

icon

गतिमानता

मनाची एक शिथिल परंतु गतिमान चौकट ठेवू शकेल

icon

कल्पकता

कल्पकतेने विचार करून नाविन्यपूर्ण गोष्टी करू शकेल

icon

निर्णय घेणे

इंट्युशन प्रोसेसमुळे चांगले निर्णय घेऊ शकेल

आर्ट ऑफ लिव्हिंगची इंट्युशन प्रोसेस - म्हणजे काय

 

इंट्युशन प्रोसेस हा एक क्रांतिकारी कार्यक्रम आहे जो मुलांना आणि किशोरवयीनांना त्यांच्या अंतर्ज्ञानी परिमाण विकसित करण्यास सक्षम करतो. वास्तविक जीवनात त्याचा उपयोग परिवर्तनीय आहे, कारण याचा सराव करणारी बालके दूरदृष्टी विकसित करतात, अधिक नाविन्यपूर्ण बनतात आणि जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये अधिक चांगल्या निवडी करण्यास सक्षम बनतात.

आपल्या चेतनेमध्ये अफाट, अनपेक्षित क्षमता आहे. इंट्युशन प्रोसेस मुलांना मनाच्या शक्यता सुरक्षित आणि नैसर्गिक मार्गाने मुक्त करण्यात मदत करते. हे मनाला पाच ज्ञानेंद्रियांच्या पलिकडे जाणण्यास सक्षम करते आणि इंट्युशन किंवा 'सहाव्या इंद्रिया'मध्ये प्रवेश करते.

वाचन, रंग भरणे, चालणे, खेळ खेळणे आणि यासारख्या बऱ्याच क्षमता डोळ्यांवर पट्टी बांधून दर्शविल्या जातात. अर्थात ती क्षमता अधिक शक्तिशाली करते आणि त्यांच्या जीवनातील सर्व पैलूंवर परिणाम करते.

एक मजबूत आणि सुविकसित इंट्युशन असल्यामुळे शैक्षणिक कामगिरी, खेळ, प्रतिभा, संवाद, परस्पर संबंध आणि शोध आणि नाविन्यपूर्ण उपक्रम यामध्ये सुधारणा होते.

इंट्युशन प्रोसेस ज्युनिअर (वयोगट ५-८ वर्ष)

कालावधी: १० दिवस

कार्यक्रमाचे वेळापत्रक

दिवसस्वरूपकालावधी
आठवडा १: शुक्र-रविव्यक्तीशः तास/दिवस
आठवडा १: सोम-रविऑनलाईन (झूम)१५ मिनिटे/दिवस
आठवडा २: रविवारव्यक्तीशः तास

कार्यक्रमाचा तपशील

आठवडा १

  • व्यक्तीशः सत्र (शुक्र-रवि):
    • कालावधी: दररोज २ तास
    • केंद्रबिंदू: इंट्युशन क्षमतांचा परिचय
  • ऑनलाईन सत्र (सोम-शनि):
    • कालावधी: दररोज १५ मिनिटे
    • व्यासपीठ: झूम / ऑनलाईन
    • तज्ञ प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली
  • अभ्यासाची उद्दिष्टे:
    • अंगभूत इंट्युशनची क्षमता विकसित करणे
    • विशेष संकल्पित केलेले व्यायाम करणे
    • मनोरंजक खेळ आणि अद्वितीय उपक्रमांमध्ये भाग घेणे
  • पालकांचा सहभाग:
    • आठवडा १ च्या शेवटच्या २ तासांना उपस्थित राहाणे
    • मुलांच्या शिक्षणाबद्दल मर्मज्ञान अंतरदृष्टि मिळवणे
    • त्यांच्या मुलाची इंट्युशन कशी वाढवायची ते शिकणे

आठवडा २

  • व्यक्तीशः सत्र (रवि):
    • कालावधी: २ तास
    • केंद्रबिंदू: पुनरावलोकन करणे आणि अभ्यास सखोल करणे
  • पालकांचा सहभाग:
    • शेवटचा १ तास उपस्थित राहणे
    • मुलाच्या इंट्युशनच्या प्रवासातील पुढील टप्पे समजून घेणे

इंट्युशन म्हणजे योग्य क्षणी योग्य विचार करणे

गुरुदेव श्री श्री रवि शंकर

इंट्युशन प्रोसेस किड्स (वयोगट ८ ते १३ वर्षे)

इंट्युशन प्रोसेस टीन्स (वयोगट १३ ते १८ वर्षे)

कालावधी: १७ दिवस

कार्यक्रमाचे वेळापत्रक

दिवसस्वरूपकालावधी
आठवडा १: शुक्र-रविव्यक्तीशः तास/दिवस
आठवडा १: सोम-गुरुऑनलाईन (झूम)१५ मिनिटे/दिवस (किड्स),
३० मिनिटे/दिवस (टीन्स)
आठवडा २: शुक्र-रविव्यक्तीशः तास/दिवस
आठवडा २: सोम-शनिऑनलाईन (झूम)३० मिनिटे/दिवस
आठवडा 3: रविवार  व्यक्तीशः तास/दिवस

कार्यक्रमाचा तपशील

आठवडा १

  • व्यक्तीशः सत्रे (शुक्र-रवि):
    • कालावधी: दररोज २ तास
    • केंद्रबिंदू: शारीरिक आणि मानसिक आरोग्याची तंत्रे
  • ऑनलाईन सत्रे (सोम-गुरु):
    • व्यासपीठ: झूम / ऑनलाईन
    • तज्ञ प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली
  • अभ्यासाची उद्दिष्टे:
    • शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी वयानुसार उचित तंत्रे
    • योग आणि श्वास तंत्रे
    • तणावापासून मुक्तता आणि भावनांचे व्यवस्थापन
    • इंट्युशन विकासाची तयारी
  • शिकवण्याच्या पद्धती:
    • खेळ
    • सांघिक चर्चा

आठवडा २

  • व्यक्तीशः सत्रे (शुक्र-रवि):
    • कालावधी: दररोज २ तास
    • केंद्रबिंदू: इंट्युशन क्षमतांचा विकास
  • ऑनलाईन सत्रे (सोम-शनि):
    • कालावधी: बालके आणि किशोरांसाठी दररोज ३० मिनिटे
    • व्यासपीठ: झूम / ऑनलाईन
    • तज्ञ प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली
  • अभ्यासाची उद्दिष्टे:
    • अंगभूत इंट्युशनची क्षमता विकसित करणे
    • विशेष संकल्पित केलेले व्यायाम करणे
    • श्वासोच्छवासाचे कार्य आणि मार्गदर्शित ध्यान शिकणे
  • शिकवण्याच्या पद्धती:
    • मनोरंजक खेळ
    • अद्वितीय उपक्रम
  • पालकांचा सहभाग:
    • दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या २ तासांसाठी उपस्थित राहणे
    • मुलांच्या शिक्षणाबद्दल मर्मज्ञान मिळवणे
    • त्यांच्या मुलाची इंट्युशन कसे वाढवायचे ते शिकणे

आठवडा ३

  • व्यक्तीशः सत्र (रविवार):
    • कालावधी: २ तास
    • केंद्रबिंदू: पुनरावलोकन, खोलीकरण आणि भविष्याचे मार्गदर्शन
  • शिकण्याची उद्दिष्टे:
    • शिकलेल्या तंत्रांचे पुनरावलोकन करून त्यांना बळकट करणे
    • पुढे जाण्याचा मार्ग समजून घेणे
  • पालकांचा सहभाग:
    • शेवटची २० मिनिटे उपस्थित राहणे
    • मुलाच्या इंट्युशन प्रवासातील पुढील टप्पे समजून घेणे

इंट्युशन प्रोसेसवरील संशोधन

icon

२२%

किशोरांच्या
अचूकतेमध्ये वाढ

icon

२९%

मानसिक
आरोग्यामध्ये वाढ

icon

६९%

भावनिक
समस्यांमध्ये घट

icon

६७%

अतिक्रियाशीलतेत
घट होते

icon

५०%

समवयस्कांच्या
समस्यांमध्ये घट

icon

७८%

वर्तणूक
समस्यांमध्ये घट

संस्थापक

गुरुदेव श्री श्री रवि शंकर

गुरुदेव श्री श्री रविशंकर हे जागतिक मानवतावादी, अध्यात्मिक नेते आणि शांतीदूत आहेत. तणाव मुक्त, हिंसा मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी अभूतपूर्व अशा जागतिक चळवळीचे नेतृत्व ते करतात.

आणखी जाणून घ्या

मला माझ्या मुलाच्या नावाची नोंदणी करायची आहे पण...

इंट्युशन काय आहे?

इंट्युशन म्हणजे तर्क किंवा तार्किक विश्लेषणावर अवलंबून न राहता काहीतरी समजून घेण्याची किंवा जाणून घेण्याची क्षमता. इंट्युशन आपल्या सर्वांमध्ये नैसर्गिकरित्या असते, परंतु मनाच्या या पैलूचे पालनपोषण आणि विकास करण्याकडे फारसे लक्ष दिल्या जात नाही..

इंट्युशन विकसित करण्याचे काय फायदे आहेत?

मजबूत इंट्युशन क्षमता जीवनाच्या सर्व क्षेत्रात यश मिळवण्याचा मार्ग मोकळा करतात.

  • शिकण्याची क्षमता सुधारते
  • अधिक चांगले निर्णय घेणे
  • वाढलेली सर्जनशीलता आणि नाविन्यता
  • समस्या सोडवण्याच्या कौशल्यात सुधारणा
  • उत्तम दूरदृष्टी
  • मजबूत आत्मविश्वास
  • उत्तम आंतरवैयक्तिक कौशल्ये
  • अज्ञाताची भीती कमी

तुम्ही हा कार्यक्रम फक्त मुलांसाठी आणि किशोरांसाठी का चालवता?

आपण सर्वजण आपल्या ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे जाणण्याची नैसर्गिक अंतःप्रज्ञेची क्षमता घेऊन जन्माला आलो आहोत. ही क्षमता मुलांमध्ये विशेषतः दिसून येते. याचे कारण असे की त्यांचे मन अजूनही ताजे, कमी पछाडलेले आणि निसर्गाशी अधिक सुसंगत आहे.

हा कार्यक्रम ऑनलाईन आहे की व्यक्तीशः?

अंतर्ज्ञान प्रक्रिया छोट्या मुलांसाठी, बालकांसाठी आणि किशोरांसाठी हे संकरित कार्यक्रम आहेत ज्यात ऑनलाईन आणि वैयक्तिक सत्रे हे दोन्ही सामील आहेत.

इंट्युशन प्रोसेस छोट्या मुलांसाठी या  कार्यक्रमात चार दिवस दररोज दोन तासांच्या व्यक्तीशः सत्रांचा समावेश असतो. यात प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली सात ऑनलाईन सत्रांना (सोमवार ते शनिवार) देखील समाविष्ट केले आहे.

इंट्युशन प्रोसेस बालके आणि किशोरवयीन या कार्यक्रमांमध्ये ७ दिवस व्यक्तीशः सत्रे आणि शिक्षकांच्या देखरेखीखाली १० दिवसांची ऑनलाईन सत्रे असतात

मुलांची इंट्युशन वाढवण्यासाठी तुम्ही कोणती तंत्रे शिकवता?

या कार्यक्रमात मुलांना खालील गोष्टींची ओळख करून दिली जाते

  • मन शिथिल करण्याची आणि इंट्युशन मिळविण्यात मदत करण्यासाठी लागणारी योगिक तंत्रे.
  • वयानुसार श्वसनाची तंत्रे.
  • मार्गदर्शित ध्यान आणि विश्रांतीची तंत्रे.
  • इंट्युशन सुधारण्यासाठी खेळ आणि क्रीयाकलापातून मौजमजेत शिक्षण.
  • घरी सराव करावयाच्या बाबतीत सूचना.

मुलाची अंतःप्रज्ञेची क्षमता विकसित होण्यासाठी किती वेळ लागतो?

कार्यक्रमाचे फायदे सर्वांसाठी आहेत. कार्यक्रमाच्या शिकवणींचे पालन केल्यावर मुले आणि पालक त्यांचे अनुभव सांगत असल्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.

प्रत्येक मूल अद्वितीय आहे. इंट्युशन क्षमता निर्माण करण्यासाठी लागणारा वेळ हा प्रत्येकाचा वेगळा असतो. मुलाच्या स्वतःच्या प्रयत्नांवर आणि दैनंदिन सरावावर प्रगती अवलंबून असते.

हा कार्यक्रम मुलाला दररोज १५ ते २५ मिनिटे घरगुती सराव करण्यास प्रोत्साहित करतो. नियमित सराव केल्याने मुले आणि पालकांनी त्यांच्या इंट्युशन क्षमतांमध्ये सुधारणा नोंदवली आहे. हा महत्त्वाचा शोध मुलांनी अनुभवलेल्या प्रगतीवर आधारित आहे.

हा कार्यक्रम किती काळाचा आणि कोणत्या वयोगटासाठी आहे?

इंट्युशन प्रोसेस छोट्या बालकांसाठी (५ ते ७ वर्षे)

१०-दिवसीय कार्यक्रम - व्यक्तीशः सत्र प्रत्येकी २ तासांसाठी ४ दिवस, ऑनलाईन सत्र प्रत्येकी १५ मिनिटांसाठी ६ दिवस

इंट्युशन प्रोसेस किड्स (८+ ते १३ वर्षे)

१७-दिवसीय कार्यक्रम - व्यक्तीशः सत्र प्रत्येकी २ तासांसाठी ७ दिवस, ऑनलाईन सत्र प्रत्येकी १५ मिनिटांसाठी १० दिवस.

इंट्युशन प्रोसेस टीन्स ( १४  ते १८ वर्षे)

१७-दिवसीय कार्यक्रम - व्यक्तीशः सत्र प्रत्येकी २ तासांसाठी ७ दिवस, ऑनलाईन सत्र प्रत्येकी ३० मिनिटांसाठी १० दिवस.