Youth programs - Girl

मेधा योग (लेवल १)

मनावरील भार नीट हाताळा, एकाग्रता सुधारा, क्रोधावर नियंत्रण ठेवा

१३ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी

३ तास ४ दिवसांसाठी

पहिल्या आठवड्यापासूनच बदल पहा!

नोंदणी करा!

किशोरवयीन मुलांना याचा कसा फायदा होईल?

icon

क्रोध आणि आक्रमकता शांतपणे हाताळणे

तणाव दूर करण्यासाठी आणि चिंता कमी करण्यासाठीच्या विशेष प्रक्रियांसह राग, आक्रमकता आणि नैराश्यावर मात करा.

icon

एकाग्रता सुधारते

अधिक एकाग्रतेने तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा द्या आणि जास्तीत जास्त कार्यक्षम राहून कार्याची गुणवत्ता वाढवा.

icon

दबावाला प्रभावीपणे सामोरे जाने

सहकाऱ्यांचा दबाव, स्पर्धा, आपण कसे दिसतो याबद्दल चिंता, संप्रेरक/हार्मोन्स मधील बदल, नातेसंबंधातील प्रश्न इत्यादी पौगंडावस्थेतील सर्व आव्हानांमधून पार व्हायला शिका.

मेधा योग म्हणजे काय?

संशोधनात असे दिसून आले आहे की ‘ किशोर वयात आनंदी असलेली मुले प्रौढ वयात निरोगी राहतात'. पण आनंदी असलेली किशोरवयीन मुले दुर्मिळ होत चालली आहेत. बालपणापासून प्रौढत्वापर्यंतचे संक्रमण तणाव वाढविणाऱ्या आव्हानांनी भरलेले असते, जसे की – शैक्षणिक अभ्यासक्रम , प्रवेश परीक्षा, सहकाऱ्यांचा दबाव आणि नातेसंबंध इत्यादि.

मेधा योग स्तर १ किशोरवयीन मुलांना तणावमुक्त आणि आनंदी, तरीही एकचित्त आणि कार्यक्षम बनवण्यावर भर देते. हे शिबीर किशोरवयीन मुलांना नकारात्मक भावनांवर मात करण्यास आणि श्वासोच्छवासाच्या विशेष प्रक्रियांद्वारे तणावाचा सामना करण्यास मदत करते. अभ्यास, सहकाऱ्यांचा दबाव आणि आत्मसन्मान यासारख्या विषयांवर काही ज्ञान सूत्रे आणि चर्चांसह, हे शिबीर त्यांना त्यांची पूर्ण क्षमता साध्य करण्यासाठी मार्गदर्शन करते. याव्यतिरिक्त, गटात एकत्र काम करणे (टीमवर्क) आणि सहकार्य यासारखी महत्त्वपूर्ण जीवन कौशल्ये संवादात्मक प्रक्रिया आणि खेळांद्वारे विकसित केली जातात.

आपलेपणाच्या आणि एकजुटीच्या भावनेने मजेशीर व आकर्षक वातावरणात मुले शिकतात आणि इतरांसोबत मिसळतात. तसेच किशोरवयीन मुले हे ही शिकतात की यश आणि आनंद एकत्र साध्य होवू शकतात.

मेधा योगावर संशोधन

icon

अचूकता

  • किशोरवयीन मुलांच्या कामगिरीच्या अचूकतेत सरासरी २२ % वाढ

icon

मानसिक स्वास्थ्य

  • मानसिक आरोग्याच्या गुणांकामध्ये २९ टक्के वाढ
  • उच्चतम मानसिक आरोग्य असलेल्या अभ्यासांतर्गत लोकसंख्येत २३७% वाढ

icon

भावनिक समस्या

  • अभ्यासांतर्गत लोकसंख्येच्या भावनिक समस्यांमध्ये ६९% घट

icon

हायपरएक्टिव्हिटी

  • अभ्यासांतर्गत लोकसंख्येच्या  हायपरएक्टिव्हिटी मध्ये ६७ टक्के घट

icon

सहकाऱ्यां सोबत होणाऱ्या समस्या

  • अभ्यासांतर्गत लोकसंख्येच्या सहकाऱ्यांसोबतच्या समस्यांमध्ये 50% घट

icon

आचरण समस्या

  • अभ्यासांतर्गत लोकसंख्येच्या आचराणातील समस्यांमध्ये ७८ टक्के घट.

संस्थापक

गुरुदेव श्री श्री रवि शंकर

गुरुदेव श्री श्री रविशंकर हे जागतिक मानवतावादी, अध्यात्मिक नेते आणि शांतीदूत आहेत. तणाव मुक्त, हिंसा मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी अभूतपूर्व अशा जागतिक चळवळीचे नेतृत्व ते करतात.

आणखी जाणून घ्या

मला हे शिबीर करायचे आहे पण...

शिबिराबद्दल अधिक सांगू शकाल का?

मेधा योग हा गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी विकसित केलेल्या प्रक्रियांवर आधारित आहे. प्राचीन योगपद्धति आणि व्यायाम यावर आधारित आहे. ध्यान, योग आणि श्वासोच्छवासाच्या प्रक्रियांसह मुलांना त्यांच्या भीती आणि चिंतांवर मात करत परिपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगायला शिकवले जाते. ते खुल्या व्यासपीठावर त्यांच्या समस्यांवर चर्चा करतात आणि त्यांच्या सहकारी सहभागींबरोबर आपलेपणा अनुभवतात. किशोरवयीन मुलांना आपलेपणाची भावना सर्वात जास्त आवश्यक असते आणि हे शिबीर त्यांना ती प्रदान करते.  मुलांना अध्यात्म आणि भारतीय परंपरेची ओळखही करून दिली जाते.

जेव्हा मी साइन अप करतो/करते, तेव्हा काय होते?

आपल्याला आपल्या किशोरवयीन मुलांच्या तपशीलांसह एक फॉर्म भरण्यास सांगितले जाईल. एकदा ते पूर्ण झाल्यानंतर, आपल्याला पेमेंट गेटवेवर निर्देशित केले जाईल. एवढंच, तुमचं काम संपलं ! यानंतर आम्ही मेल आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्या संपर्कात राहू, जेणेकरून तुम्हाला कार्यक्रमाच्या वेळेची माहिती मिळेल.

आणखी एक ऑनलाइन क्लास? तो करावा की नाही याबद्दल मी साशंक आहे?

आपल्याला काय म्हणायचे आहे हे आम्हाला पूर्णपणे समजते. परंतु जर आपल्या किशोरवयीन मुलाने संघर्षमुक्त, शांत, आनंदी आणि उत्पादक जीवन जगले तर ते योग्य ठरणार नाही का? आपल्या किशोरवयीन मुलांना वयाशी संबंधित दबाव आणि ताणतणाव असतात.ज्यामुळे त्यांच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम होतो परंतु त्याबद्दल त्यांना माहित असू शकते किंवा नसूही शकते. हे शिबीर या आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करेल

माझी किशोरवयीन मुले या शिबिरात थेट प्रश्न विचारू शकतात का?

हो ! हे शिबीर संवादात्मक आहे आणि किशोरवयीन मुलांनी आपली मते आणि निरीक्षणे मांडण्यासाठी आणि त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी स्वागत आहे.

माझा मुलगा / मुलगी अंतर्मुख आहे आणि कदाचित या शिबिराच्या उपक्रमांमध्ये तो / ती भाग घेऊ शकत नाही. त्याचा त्याला/तिला फायदा होईल का?

होय, नक्कीच ! या शिबिराचा तुमच्या किशोरवयीन मुलांना खूप फायदा होईल. लाजाळू किशोरवयीन मुले या शिबिरादरम्यान आणि नंतर त्यांच्या संकोचांवर मात करण्यास आणि बोलण्यास शिकतात.