two little girls playing on trees

उत्कर्ष योग

शारीरिक, भावनिक आणि सामाजिक आरोग्य उत्तम करते.

वयोगट : ८ ते १३ वर्षे

पहिल्या आठवड्यापासूनच बदल पहा !

नोंदणी करा!

मुलांना कसा फायदा होईल?

icon

रोगप्रतिकारशक्ती आणि भूक वाढवा

शिबिरातील व्यायाम आणि प्रक्रिया केल्याने भूक वाढते, ऊर्जा वाढते आणि निरोगीपणाची आणि सर्वांगीण विकासाची भावना वाढते.

icon

क्रोधावर नियंत्रण

मुलांना क्रोध,आक्रमकता आणि नैराश्यावर मात करण्यासाठी मदत करणारे मार्ग शोधा; त्यांच्या ऊर्जेचा उत्पादनक्षम वापर करा!

icon

एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचा कालावधी वाढवा

आमच्या संशोधन-समर्थित प्रक्रिया मुलांना शांत होण्यास मदत करतात, फोकस तसेच स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवतात.

icon

आनंद वृद्धिंगत करा

शिबिरातील मजेशीर संवादांद्वारे, मुले त्यांच्या संकोचांपासून मुक्त होतात आणि त्यांचे खरे, नैसर्गिक आणि आनंदी स्वरूप अनुभवतात !

उत्कर्ष योग म्हणजे काय?

मुलांमध्ये अमर्याद ऊर्जा असते जी चिंता, क्रोध , आक्रमकता आणि नैराश्य म्हणून प्रकट होते.

उत्कर्ष योग शिबिरात मुलांना त्यांची ऊर्जा सकारात्मक कार्यात वळविण्यास मदत करण्यासाठी सुलभ श्वासाच्या प्रक्रिया, ज्ञानाची छोटी छोटी सुत्रे आणि शक्तिशाली सुदर्शन क्रिया प्रदान केली जाते. शांत आणि आनंदी मनाने मुले अधिक चांगल्या प्रकारे आणि अधिक स्मरणशक्ती तसेच स्पष्टतेने लक्ष केंद्रित करू शकतील. हे मुलांना समुहात काम करणे (टीमवर्क) आणि सर्जनशील पद्धतीने समस्या सोडविण्याच्या भावनेने सुसज्ज करते.

आपलेपणाच्या आणि एकजुटीच्या भावनेने मजेशीर आणि आकर्षक वातावरणात शिकणे आणि समरस होवून जाणे, या सोबत या शिबीरातील मुलांसाठीची मोठी गोष्ट म्हणजे एक मोठे हास्य आणि सकारात्मक मन होय! (‘YES’ mind !)

संस्थापक

गुरुदेव श्री श्री रवि शंकर

गुरुदेव श्री श्री रविशंकर हे जागतिक मानवतावादी, अध्यात्मिक नेते आणि शांतीदूत आहेत. तणाव मुक्त, हिंसा मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी अभूतपूर्व अशा जागतिक चळवळीचे नेतृत्व ते करतात.

आणखी जाणून घ्या

मला हा कोर्स करायचा आहे पण...

या शिबीराबद्दल अधिक सांगू शकाल का?

उत्कर्ष योग गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी विकसित केलेल्या प्रक्रिया, प्राचीन योगपद्धति आणि व्यायाम यावर आधारित आहे. ध्यान, योग आणि श्वासोच्छवासाच्या प्रक्रियांसह (प्राणायाम) मुलांना त्यांच्या भीती आणि चिंतांवर मात करत परिपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगायला शिकवले जाते. मुलांना अध्यात्म आणि भारतीय परंपरेची ओळख ही करून दिली जाते.

या प्रक्रियेमुळे माझे आरोग्य सुधारेल का?

होय, नक्कीच! सुदर्शन क्रिया™ चा नियमित सराव झोप सुधारण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि तणाव आणि नैराश्याची पातळी कमी करण्यासाठी ओळखला जातो. कार्यशाळेचा लाभ घेतलेल्या लोकांची ही प्रशंसापत्रे तुम्हाला फक्त वाचण्याची गरज आहे. तुम्हाला काही आजार असतील तर तुमच्या शिक्षकांना अगोदरच सांगा जेणेकरून ते तुम्हाला सर्वोत्तम आणि तुमच्यासाठी योग्य असलेले अनुभव देऊ शकतील!

तुम्ही शुल्क का आकारता?

कारण एक , तुम्ही तुमचा वेळ कार्यशाळेला देत आहात याची प्रतिबद्धता असण्यासाठी. कारण दोन, तुम्हाला जीवनावश्यक कौशल्ये शिकवण्याव्यतिरिक्त, तुमची देणगी भारतातील अनेक सेवा प्रकल्पांना निधी देते. उदाहरणार्थ, ७०,००० आदिवासी मुलांना शाळेत पाठवणे, ४३ नद्यांचे पुनरुज्जीवन करणे, २,०४,८०२ ग्रामीण तरुणांना उपजीविकेच्या कौशल्याने सक्षम करणे आणि ७२० गावांमध्ये सौर दिवे लावणे.

मला कोणताही तणाव नाहीये. मग मी या कार्यशाळेत का सामील व्हावे?

आपण तणावग्रस्त नसल्यास, उत्तमच! तुम्ही सर्वोत्तम जीवन जगत आहात. पण याचा विचार करा: जेव्हा तुमचे पैसे संपायला लागतात तेव्हा तुम्ही पैसे वाचवायला सुरुवात करता का? की तुमची तब्येत बिघडल्यावरच व्यायाम सुरू करायचा? नाही नां ? जेव्हा गरज पडेल अशा वेळी वापरण्यासाठी मानसिक मजबूती व सामर्थ्याचे आंतरिक साठे तयार असावेत याबद्दल तुम्हाला काय वाटते? पण अहो, हा तुमचा निर्णय आहे. तुम्ही तणावग्रस्त होइपर्यंत वाट बघू शकता आणि ही कार्यशाळा तुम्हाला मदत करण्यासाठी तेव्हा ही तत्पर असेल.