या शिबिरांमध्ये काय शिकवले जाते?
सर्वसमावेशक व सर्वांगीण उपाय
विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या तंदुरुस्त शरीर, प्रसन्न मन आणि स्वस्थ जीवनशैली या प्रमुख घटकांविषयी या शिबिरामध्ये सर्वसमावेशक पद्धतीने शिकवले जाते.
तंदुरुस्त शरीर
आपल्या शरीराला तंदुरुस्त व बळकट ठेवण्यासाठी या शिबिरामध्ये योग आसन, व्यायाम आणि काही आरोग्यविषयक टीपा यांचा समावेश आहे. या सोबतच मुलांनी रोज पौष्टिक आहार घ्यावा म्हणून सात्विक व आरोग्यदायी खाद्यपदार्थांच्या निवडीबाबत संवादात्मक चर्चा.
स्वस्थ जीवनशैली
सामाजिक तसेच भावनिक जीवन कौशल्ये शिकण्यासाठी सामूहिक प्रक्रिया आणि चर्चासत्र. ज्यामुळे भावनांवर ताबा राहणे, वेगवेगळ्या समस्येचे निराकरण करणे, योग्य निर्णय घेणे आणि समवयस्कांचा दबाव हाताळता येणे हे फायदे होतात.
जीवन बदलणाऱ्या श्वासाच्या प्रक्रिया
सुदर्शन क्रिया™
सुदर्शन क्रिया™ ही श्वासोच्छवासाची शक्तिशाली प्रक्रिया ही युवकांसाठीच्या शिबीरांचा मुख्य भाग आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झालेल्या ५० हून अधिक वैज्ञानिक संशोधनातून, मानसिक तणाव हाताळण्यासाठी आणि उत्तम स्वास्थ्यासाठी सुदर्शन क्रियेचे फायदे सिद्ध झाले आहेत. किशोरवयीन मुलांना हे फायदे मिळावे म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शालेय शिबीरांमध्ये विशेष प्रक्रिया व पद्धतींचा समावेश आहे.
आणखी जाणून घ्याचांगली कामगिरी. संगीता तील माझी आवड वाढली. माझी खेळातील आणि अभ्यासातील कामगिरी सुधारली. खूपच गंमत होती.
अमेय
विद्यार्थी
आत्मविश्वास वाढला. मी माझ्या वर्गमित्र, मैत्रिणींशी देखील बोलू शकत नव्हते. आत्ता प्रार्थनेच्या वेळी सर्वां समोर आत्मविश्वासाने भाषण करू शकते.
मीरा
विद्यार्थी
जीवनातील खूप लाभदायक गोष्टी शिकायला मिळाल्या. गुरुदेव करतात तसेच मी देखील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य अणू इच्छितो, त्यांना आनंदी करू इच्छितो.
अक्षय
विद्यार्थी
माझ्यामध्येच एक चांगली व्यक्ती, एक आत्मविश्वासू व्यक्ती गवसली. मी सुदर्शन क्रिया सातत्याने करते, जिच्यामुळे माझी एकाग्रता आणि शैक्षणिक कौशल्य वाढले.
श्रीया
विद्यार्थी
संस्थापक
गुरुदेव श्री श्री रवि शंकर
गुरुदेव श्री श्री रविशंकर हे जागतिक मानवतावादी, अध्यात्मिक नेते आणि शांतीदूत आहेत. तणाव मुक्त, हिंसा मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी अभूतपूर्व अशा जागतिक चळवळीचे नेतृत्व ते करतात.
आणखी जाणून घ्याशाळांसाठीचे शिबीर
उत्कर्ष योग
शारीरिक, भावनिक आणि सामाजिक आरोग्य उत्तम करते.
वयोगट : ८ ते १३ वर्षे
मेधा योग (लेवल १)
मनावरील भार नीट हाताळा • एकाग्रता सुधारा • क्रोधावर नियंत्रण ठेवा
१३ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी
नो युवर चाइल्ड (KYC) वर्कशॉप
तुमच्या मुलाचे जिवलग मित्र व्हा!
मानसिक आरोग्य आणि पालकत्वाविषयीच्या संशोधनाबद्दल जाणून घ्या. तुम्ही चांगले पालक कसे होऊ शकता? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवा…
नो युवर टीन वर्कशॉप (KYT)
मानसिक आरोग्य आणि पालकत्व या विषयावर झालेल्या संशोधनाबद्दल जाणून घ्या. आपण एक चांगले पालक कसे बनू शकतो? अशा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवा…