sri sri sanskar kendra

श्री श्री संस्कार केंद्र

श्री श्री सेंटर्स फॉर व्हॅल्यू अँड कल्चर (SSCVC)

“रोपट्याला पूर्णत्वाने बहरण्यासाठी पाणी घालत राहावे लागते, तसे बालकांमध्ये मानवी मुल्ये रुजण्यासाठी त्यांच्यावर ‘संस्कार’ होत राहणे गरजेचे आहे.”

~ गुरुदेव श्री श्री रवि शंकर
 

श्री श्री संस्कार केंद्राबद्धल

प्रत्येक समाजामध्ये दया, करुणा, क्षमा, औदार्य, आदर सन्मान, प्रामाणिकपणा, एकता, समाधान अशी मुल्ये खोलवर रुजली आहेत. विभक्त कुटुंब पद्धती, प्रसिद्धी माध्यमांचा पगडा, मुलांसाठी वेळ नसणे आणि गतिमान जीवनशैलीमुळे मुले आपला उच्च वारसा, परंपरा आणि मानवी मूल्ये जीवनात बिंबवण्यापासून दुरावत आहेत.

श्री श्री संस्कार केंद्रामध्ये मुले मानवी मुल्ये आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहित होतात, त्यांच्यामध्ये उत्तम गुण वाढीस लागतात आणि त्यांच्यामध्ये आपली उच्च संस्कृती आणि त्यातील विविधता यांच्याबद्धल आदर भाव निर्माण होतो.

गोष्टी, श्लोक, मंत्रोच्चार, आश्चर्यकारक गोष्टी, खेळ, योग आणि विविध उपक्रम अशी रंजक, परस्पर संवादी आणि प्रेमळ सत्रे हा श्री श्री संस्कार केंद्र शिबिराचा मुख्य गाभा आहे. ज्या शाळांमध्ये ही शिबीरे झालेली आहेत तेथील मुलांमध्ये मानवी मुल्यांचा भक्कम पाया आणि सर्वांगीण विकास झालेला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही ‘श्री श्री सेंटर्स फॉर वॅल्यूज् अँड कल्चर’ या नांवाने परिचित आहोत.

YouTube Thumbnail

या शिबिरामधून मुलांना काय मिळते

icon

मानवी मुल्यांची प्राप्ती

काळजी घेणे, आदर भावना, जबाबदारी, प्रामाणिकपणा, उदारता अशी अनेक मानवी मूल्ये आपल्या मुलांमध्ये विकसित होताना पहाल.

icon

भक्कम पाया

त्यांच्यामध्ये जीवन कौशल्ये वृद्धींगत होण्यासाठी, हसत खेळत जबाबदाऱ्या घेण्यासाठी आणि स्पर्धात्मक युगाचा सामना करण्यासाठी अगदी लहान वयातच त्यांचा पाया भक्कम करा.

icon

संस्कृती बद्धल आदरभाव

मुलांमध्ये शास्त्रीय विचारसरणी, प्राचीन संस्कृतीबद्धल आदर आणि जीवना बद्धल विशाल दृष्टीकोण वृद्धीस लागतो.

icon

उत्सव आणि ज्ञान

कुटुंबियांना त्यांच्या मुलांशी घट्ट आपलेपणा, एकत्र उत्सव साजरा करण्याची वृत्ती अनुभवास येते. मुले आणखी सजग होतात , तसेच मुलांमध्ये समाज आणि पर्यावरण यांच्याप्रती आपलेपणाची भावना वाढू लागते.

icon

स्मरणशक्ती आणि एकाग्रता

खालील संशोधनामधून हे पाहायला मिळाले की ज्या मुलांनी दोन वर्षे मंत्रोच्चार केलेला होता , त्यांनी स्मरणशक्ती चाचणीमध्ये चांगली कामगिरी केली, चाचणीमधील चुका कमी झाल्या आणि चाचणी कमी वेळेत संपवली. पेपर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

icon

मंत्रोच्चाराचा लाभ

संशोधनामधून हे पण पाहायला मिळाले आहे की ‘ओम’ च्या उच्चारामुळे वेगास मज्जातंतू उत्तेजित होऊन त्याचा उपयोग औदासिन्य आणि अपस्मार, फिट यावरील उपचारासाठी होतो. पेपर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बेसिक शिबिरे

(६ - १० वर्षे)

  • ऑन लाईन शिबीर M1-A
    • सत्रे, प्रत्येकी तास
  • ऑनलाईन शिबीर M1-B
    • सत्रे, प्रत्येकी तास
  • समक्ष शिबीर M1
    • १२ सत्रे, प्रत्येकी तास

रामायण प्रोग्रॅम

(६ - १३ वर्षे)

  • ऑनलाईन भाग A
    • सत्रे, प्रत्येकी तास
  • ऑन लाईन भाग B
    • सत्रे, प्रत्येकी तास
  • समक्ष
    • १० सत्रे, प्रत्येकी तास

संस्थापक

गुरुदेव श्री श्री रवि शंकर

गुरुदेव श्री श्री रविशंकर हे जागतिक मानवतावादी, अध्यात्मिक नेते आणि शांतीदूत आहेत. तणाव मुक्त, हिंसा मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी अभूतपूर्व अशा जागतिक चळवळीचे नेतृत्व ते करतात.

आणखी जाणून घ्या

मला यात रस आहे परंतु मला काही प्रश्न आहेत...

रामायण प्रोग्रॅम हा बेसिक प्रोग्रॅमपेक्षा भिन्न कसा आहे?

श्री श्री संस्कार केंद्र दोन परिपूर्ण पण विभिन्न असे शिबिर (प्रोग्रॅम) देते, जे प्रेमळ, परस्पर संवादी आणि उत्साही वातावरणात होतात.
रामायणाचे शिबीर हे रामायण या महाकाव्यावर आधारित आहे, जे मुलांसाठी मुल्यांचा खजिना आहे. यातील गंमतीदार आणि परस्पर संवादी सत्रांमुळे मुले अधिक सक्षम बनतात आणि त्यांच्यामध्ये आदर भाव निर्माण होतो. हे शिबीर समक्ष आणि ऑन लाईन असे एकत्र स्वरुपात असते. (रामायण भाग अ आणि रामायण भाग ब ). वयोगट: ६ ते १३ वर्षासाठी.
बेसिक शिबीर हे M१ (समक्ष) आणि M१- अ आणि M१- ब (ऑन लाईन), यांच्या मदतीने मुले त्यांच्या जीवनासाठी मजबूत पाया निर्माण होईल, अशी मुल्ये आणि शहाणपणा आत्मसात करतात. यातील प्रत्येक सत्र प्रेरणादाई गोष्टी आणि अर्थपूर्ण श्लोक/ दोहा याद्वारे महत्वाच्या मानवी मुल्यांवर आधारित आहे. वयोगट: ६ ते १३ वर्षासाठी.

मुलांसाठी खूप ऑन लाईन वर्ग उपलब्ध आहेत. हे आणखी एक ओझे लाद्ल्यासारखे होऊ शकेल. कृपया मार्गदर्शन करा.

हे शिबिर म्हणजे इतर ऑन लाईन वर्गांपासून चांगली विश्रांती आहे. बहुतांशी पालकांचे म्हणणे असे आहे की या शिबिराला यायला त्यांची मुले उत्सुक असतात.

बेसिक प्रोग्रॅम मधील दोन्ही शिबिरांना माझ्या मुलाने उपस्थित राहणे आवश्यक आहे कां?

दोन्ही ऑन लाईन प्रकार (M१- अ आणि M१- ब ) हे एकमेकांशी संलग्न आहेत, ज्यामध्ये वेगवेगळी मुल्ये आहेत. हे दोन्ही अद्वितीय भिन्न असे आहेत. प्रत्येक प्रकार हा त्यातील श्लोक, मंत्र, उपक्रम आणि विविध घटकांनी समृद्ध आहे. यापैकी कोणत्याही क्रमाने प्रथम करू शकता.

माझ्ये पाल्याने बेसिक शिबिर मधील (प्रोग्रॅममधील ) कोणता करावा, समक्ष कि ऑन लाईन?

६ ते १० वयोगटाच्या मुलांसाठी असलेल्या ऑन लाईन आणि समक्ष प्रोग्रममधील प्राथमिक अंतर्भूत गोष्टी समान आहेत. या शिबिरांमध्ये प्रेरणादाई गोष्टी, श्लोक, मंत्र, दोहे, “दादी मां के नुस्के’, संस्कृतीमधील आश्चर्ये, मंत्रोच्चार, योगासाने, खेळ, उपक्रम आणि उत्सव हे सर्व प्रेमळ आणि परस्पर संवादी वातावरणात घेतले जाते.
ऑन लाईन प्रोग्रॅम M१- अ आणि M१ - ब हे परस्पर पूरक आहेत ज्याची प्रत्येकी १ तासांची ८ सत्रे असतात. तर M१ हे समक्ष होणारे शिबीर आहे ज्याची २ तासांची १२ सत्रे होतात.
समक्ष/ऑन लाईन शिबिरांची वेगळी वैशिष्ट्ये आहेत. मुलांच्या वेळेच्या उपलब्धतेनुसार पालक कोणताही निवडू शकतात.

आम्ही स्वतः श्लोक आणि गोष्टी शिकवतो. या शिबिराचा (प्रोग्रॅमचा) मुलांना काय लाभ होईल?

श्री श्री संस्कार केंद्राची शिबिरे हा श्लोक आणि गोष्टी शिवाय इतर बाबींनी परिपूर्ण कार्यक्रम आहे. श्लोक आणि गोष्टींशिवाय यामध्ये ‘दादीमां के नुस्के’, योगासन, संस्कृतीमधील आश्चर्ये आणि मंत्रोच्चार आहे. ग्रुपमधील संवादांमुळे मुले एकमेकाद्वारे शिकतात आणि जबाबदारी, दया, आदर भाव, दातृत्व आणि प्रामाणिकपणा अश्या मुल्यांच्या सखोल परिणामाची अनुभूती त्यांना होते.

माझ्या पाल्याने रामायणाच्या दोन्ही ऑन लाईन शिबिरांना ( प्रोग्रॅम्सना ) हजर राहणे गरजेचे आहे कां?

रामायणाचे दोन्ही भाग(भाग अ आणि भाग ब ) मिळून संपूर्ण गोष्ट पूर्ण होते. भाग अ मध्ये रामचरितमानस मधील काही कांड समाविष्ट आहेत. उर्वरित कांड भाग ब मध्ये आहेत. दोन्ही संवाद रुपी सत्रे राम कथा आणि त्यातील चौपाई/दोहा यांचे शिक्षण, श्रवण आणि मनन (विशेष बनवलेल्या व्हिडीओसह) विशेष ज्ञान, खेळ, उपक्रम, योगासने, ध्यान आणि उत्सवा द्वारे अंतर्भूत आहेत. मुलांनी हे शिबिर (प्रोग्रॅम ) क्रमाने करणे गरजेचे आहे. गोष्ट उलगडण्यासारखे भाग अ नंतर भाग ब आहे.

माझ्या पाल्याला रामायणाची गोष्ट माहित आहे. श्री श्री संस्कार केंद्राच्या रामायण मुळे त्यात काय भर पडेल?

गोष्ट (राम कथा) शिवाय यातील विविध पात्रे आणि प्रसंगांद्वारे व्यक्त होणाऱ्या मुल्यांवर भर दिला आहे. मुलांना त्यांच्या जीवनात या मूल्यांचे अनुकरण करण्यास प्रोत्साहित केले जाते. विशेष व्हिडीओच्या सहाय्याने रामचरितमानस मधील चौपाई/ दोहे यांच्या पाठांतरामुळे आपली उच्च संस्कृती आणि पुरातन ग्रंथांबाबत आवड आणि आदर निर्माण होतो. शिवाय प्रत्येक सत्रात ध्यान, योगासने, खेळ आणि उपक्रम असतात. समूहामध्ये शिकणे खूप सुलभ आणि मनोरंजक होते ज्यांचा सखोल परिणाम राहतो.