मी चार महिन्यांची गरोदर होते, जेव्हा मी पहिल्यांदा भगवद्ग गीता वाचली. माझ्या सासूबाईंनी वेद, रामायण, पुराणे आणि भगवद्ग गीता यासारखे पवित्र ग्रंथ वाचण्याचा आग्रह कां धरला याचे मला नवल वाटायचे. पहिल्या प्रकरणाच्या शेवटी पोहचता पोहचता मला समजले होते की मी योग्य वेळी योग्य गोष्ट करत आहे.

जीवनात एकदा तरी भगवद्ग गीता वाचण्याचा सल्ला गुरुदेव श्री श्री रवि शंकर देतात. असे करणे तुम्हाला जीवनातील रहस्यांमध्ये खोलवर जाण्यास मदत करते. गीतेमधून सर्व वयोगटातील लोकांना शिकण्यासारखे आहे , कारण मानवी मूल्ये, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, प्रेरणा, व्यवस्थापन, नेतृत्व आणि संभाषण कौशल्ये यासारख्या जीवनातील अनेक पैलूंबद्दल बरेच ज्ञान त्यात सर्वांसाठी उपलब्ध आहे.

गीतेमध्ये पालकत्वाविषयी काही आहे का ?

या लेखात आपण गीतेतील तीन श्लोक, त्यांचे भाषांतर आणि पालकांना त्यांच्या मुलांना योग्य मार्गाने प्रेरित करण्यासाठी आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी करावयाचे उपाय यावर लक्ष केंद्रित करीत आहोत.

भगवद्गीता अध्याय २ श्लोक ६२

ध्यायतो विषयान्पुंस: सङ्गस्तेषूपजायते |

सङ्गात्सञ्जायते काम: कामात्क्रोधोऽभिजायते || 2.62||

भाषांतर

भोग्य वस्तूंचा सतत विचार करीत राहणाऱ्या मनुष्याला त्यांच्याबद्दल आसक्ती निर्माण होते; त्या आसक्तीतून इच्छा उत्पन्न होते, आणि (अपूर्ण राहिलेल्या) इच्छांमुळे रागाचा विस्फोट होतो.

पालकांसाठी महत्वाचे

पालकांचे मुलांवर प्रेम असणे स्वाभाविक आहे. पण जेव्हा प्रेम एका आसक्तीचे रूप घेते तेव्हा नाती गुदमरतात.

बाळाच्या जन्माच्या आधीपासूनच माता त्याच्यावर प्रेम करत असते. बाळ किशोरवयाचे होते आणि आईपेक्षा मुल त्याच्या मित्रांना जास्त महत्त्व देते. यामुळे तिला निराशा वाटते. ती त्याला स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करते. त्याचा परिणाम नात्यामध्ये गुदमरलेपणाची भावना निर्माण होते. भगवद्गीता सांगते की निसर्ग सर्वांवर प्रेम करतो, परंतु तो कोणालाही बांधून ठेवत नाही. त्याच प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करू शकता, परंतु कोणत्याही बंधनांशिवाय. असे केल्याने तुमचे नाते निरोगी राहील. अन्यथा घरातील वातावरण अनेकदा तणावग्रस्त बनू शकते.

गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात की, ध्यान ही मनातल्या इच्छा – आकांक्षा सोडून देण्याची कला आहे.

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ऑनलाइन मेडिटेशन आणि ब्रेथ वर्कशॉपमध्ये राग नियंत्रित करण्यासाठी मदत करणारी शक्तिशाली श्वसन तंत्रे आणि ज्ञान याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घ्या.

याबाबत आणखी काही माहिती…

भगवद्गीता अध्याय ६ श्लोक ५

उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ।

आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥ 6.5॥

भाषांतर

आपल्या प्रयत्नांद्वारे स्वतःची उन्नती करा आणि स्वतःची अधोगती होऊ देऊ नका. कारण, मन हे जसे स्वतःचे मित्र आहे, तसे ते स्वतःचे शत्रू देखील बनू शकते.

पालकांसाठी महत्वाचे

संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की इतरांच्या कृतींचे अनुकरण करण्याची ही लहान बालकाची जी क्षमता आहे ही एक शिकण्याची पद्धत आहे. ते त्यांच्या जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात जवळचे काळजी घेणारे (पालकांच्या गैरहजेरीत मुलांची काळजी घेणारी व्यक्ती), त्यांचे पालक यांचे अनुकरण करू लागतात. मुलांच्या वर्तनाच्या जडणघडणीमध्ये पालकांचे आचरण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मुले नेहमी त्यांच्या पालकांचे निरीक्षण करतात. पालक जे बोलतात त्यावरूनच नव्हे तर त्यांच्या आचरणातूनही ते शिकतात. म्हणून नेहमी योग्य गोष्टी सांगा आणि आपली वागणूक मृदू असू द्या.

हे तेव्हाच घडू शकते जेव्हा तुम्ही तुमच्या मनावर चांगले गुण बिंबवता आणि त्याला आपला मित्र बनवता. असे केले नाहीतर तुमच्या मनाला वाईट सवयी लागतील आणि मग तुमचे मन तुमचं शत्रू बनेल. उदाहरणार्थ, जर पालकांना खोटं बोलण्याची वाईट सवय असेल, तर मुलांना पण तीच सवय लागू शकते. तुमची मुलं तुमचे निरीक्षण करत असतात, म्हणूनच स्वतःच्या मनाला मित्र बनवा. हे तुम्हाला तुमच्या मुलांसमोर एक चांगले उदाहरण सादर करण्यात मदत करेल. त्याचा परिणाम म्हणजे घरात आनंदी वातावरण असेल. जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला स्वतःचा एक चांगला मित्र बनवता, तेव्हा मुले त्याचे अनुकरण करतील.

जगातील सर्वात विनासायास ध्यानाचा कार्यक्रम आहे. “सहज समाधी ध्यान योग” जो तुमच्या मेंदूच्या लहरींना शांत अल्फा लहरींच्या अवस्थेत आणतो , त्यामुळे तुमची मज्जासंस्था शांत होते, शरीर आणि मनाला गहन विश्रांती मिळते.

समीक्षण

शगुन पंत, दिल्ली, सांगतात, ” सहज समाधी ध्यान योगामुळे ‘मी हरलो आहे!’ पासून ‘माझे मन स्पष्ट आणि माझ्या नियंत्रणात आहे’ इथपर्यंत आरामशीरपणे रुपांतर झाले.”

सहज समाधी ध्यान योगाबद्दल अधिक जाणून घ्या.

भगवद्ग गीता अध्याय १६ मधील श्लोक १-३

श्रीभगवानुवाच |

अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थिति: |

दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् || 1||

अहिंसा सत्यमक्रोधस्त्याग: शान्तिरपैशुनम् |

दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम् || 2||

तेज: क्षमा धृति: शौचमद्रोहोनातिमानिता |

भवन्ति सम्पदं दैवीमभिजातस्य भारत || 3||

भाषांतर

भगवान कृष्ण म्हणाले: हे! हे,अर्जुना… अस्तित्वाचे शुद्धीकरण, आध्यात्मिक ज्ञानाची जोपासना, दान, आत्मसंयम, त्याग, वेदांचा अभ्यास, साधेपणा आणि सरळपणा; अहिंसा, सत्यता, रागापासून मुक्तता; त्याग, शांतता, चुकांचा तिरस्कार, करुणा आणि लोभापासून मुक्तता; सौम्यता, नम्रता आणि स्थिर दृढनिश्चय; जोम, क्षमा, धैर्य, स्वच्छता आणि मत्सरापासून मुक्तता हे संतांचे गुण दैवी स्वभाव असलेल्या ईश्वरी पुरुषांचे असतात.

पालकांसाठी महत्वाचे

ही मानवी मूल्ये पालकांनी त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाचा एक भाग म्हणून जोपासणे आवश्यक आहे. हे गुण त्यांच्या स्वतःच्या मुलांच्या चारित्र्य निर्मितीमध्ये कायमचे प्रभावी ठरतात. मुले जेव्हा त्यांच्या पालकांना प्रत्यक्ष दैनंदिन व्यवहारात ही मुल्ये आचरणात आणताना पाहतात, तेव्हा मुले या सद्गुणांवर चिंतन करू लागतात आणि ती हे गुण आत्मसात करतात.

निष्कर्ष

ज्याप्रमाणे अर्जुनाला भगवान कृष्णामध्ये एक सखा आणि पिता आढळला आणि अर्जुनाने श्रीकृष्णाच्या शिकवणीची अंमलबजावणी केली, त्याचप्रमाणे तुम्ही या श्लोकांमधील ज्ञानाचा उपयोग तुमचे मुलांबरोबरचे नाते सुधारण्यासाठी करू शकता.

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी दिलेल्या माहितीवर आधारित

लेखिका: प्रतिभा शर्मा

संदर्भासाठी लिंक

“जेव्हा तुमचे मन तुमचे शत्रू बनते”, (When your mind becomes your enemy) भगवद्ग गीतेवरील गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे यांचे विवेचन.

संबंधित लिंक

गीता ज्ञान हे गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे भगवद्ग गीतेवरील हिंदीतील व्याख्यान आहे.

The Signature Edition of Bhagavad Gita – गुरुदेव श्री श्री रविशंकर यांची भगवद्ग गीतेची संग्रहित करण्यासारखी मर्यादित स्वाक्षरी आवृत्ती.(मार्गदर्शित ध्यान व भजनांसह) हे १४ भाषांमध्ये बोलणारे पुस्तक आहे

प्रतिभा शर्मा या एक शिक्षिका आणि एक लेखिकासुद्धा आहेत. व्यक्त न करता येणाऱ्या भावना, संवेदना आणि अनुभवांना शब्द देण्याची त्यांना कमालीची तळमळ आहे. त्या जीवशास्त्र विषयातील विज्ञान पदवीधर आहेत आणि व्यवस्थापनामध्ये पदव्युत्तर पदवीधर आहेत. लहान मुले आणि किशोरवयीन मुले ही संवाद साधणे आणि शिकणे यासाठीचे त्यांचे आवडते विषय आहेत. युनिसेफसाठी “लिंगवाद आणि बाल हक्क” या विषयावरील अहवाल लेखन हा त्यांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा आहे.

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *