सुमधुर गणेश भजन – सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची – हजारो भक्त गात असतात. तथापि, मयुरेश्वराची प्रार्थना केल्यावर प्रेरणा मिळाल्याने संत समर्थ रामदास या रामभक्ताने हे सुंदर गणेश भजन रचले हे अनेकांना माहित नसेल. मोरगाव गणेश मंदिरात स्थित, हे स्थान भगवान गणेशाच्या भक्तांसाठी प्रसिद्ध अष्टविनायक यात्रेची सुरुवात देखील करते. पुण्याजवळील आठ गणेश मंदिरांचा संच, या तीर्थक्षेत्रात उपासनेचा क्रम आहे , जो एकाच वेळी पूर्ण केला पाहिजे. अर्थातच, राहण्याची सुविधा आहे. तथापि, भक्ताने घरी परत जाऊ नये. आणि यात्रा  जिथून सुरू झाली तिथून संपली पाहिजे – म्हणजेच  मोरगाव गणेश मंदिरात.

हा ६५४-किमी लांबीचा उपासना मार्ग गुहा, पर्वत आणि नद्यांचा किनारा व्यापतो. चांगल्या पायाभूत सुविधांमुळे तीर्थयात्रा दोन-तीन दिवसांत पूर्ण होते. जरी जास्त वेळ लागला तरी हरकत नाही. तथापि, महाराष्ट्रातील या भव्य आठ गणेश मंदिरात गणेश दर्शन करताना किती वेळ लागला हे महत्वाचे नाही. कारण भक्ताची प्रार्थना आणि श्रद्धा याचे काही मोजमाप नाही . एक उल्लेखनीय, अवर्णनीय अनुभव जो व्यक्तीसोबत राहतो आणि श्रोत्याला प्रेरणा देतो.

या प्रत्येक प्रसिद्ध भगवान गणेश मंदिरांच्या बद्दलच्या आख्यायिका तितक्याच विलक्षण आहेत. आणि त्यातून मंदिराशी आणि स्वतः गणेशाशी एक बंध निर्माण होतो. महाराष्ट्रातील या प्रसिद्ध आठ गणेश मंदिरांमधील मंत्र आणि दंतकथांचा हा एक संक्षिप्त प्रवास असा आहे.

मोरेश्वर, मोरगावाचा गणपती

अष्टविनायक यात्रेतील पहिले मंदिर, तीर्थयात्रा पूर्ण करण्यासाठी येथे पुन्हा या.

निजे भुस्वानंदजद्भरत भूम्या परतारे
तुर्योस्तिरे परमसुखदेवता निवाससि
मयुराय नाथ स्तवामासिच
अतस्व संध्याये शिवहारिणी ब्रह्मजनकम

हे! मोरगावचे भगवान मयूरेश्वर, जडभारत ऋषींच्या भूमीवर, कऱ्हा  नदीच्या तीरावर, ज्याला भुस्वानंद (जमीनवरील आनंद) म्हणून ओळखले जाते तेथे आपले वास्तव्य आहे.  श्री मोरेश्वर, जो त्रिगुणांपासून दूर आहे, जो स्वयंभू आहे, ज्याला कोणतेही रूप नाही, जो ओंकारस्वरूप आहे, जो सदैव योगाच्या चौथ्या अवस्थेत आहे आणि जो मोरावर स्वार आहे – त्याने माझा नमस्कार स्वीकारावा.

अष्टविनायक तीर्थक्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे मंदिर मानल्या जाणाऱ्या, मयूरेश्वराने (मोरावर स्वार झालेला भगवान गणेश) या ठिकाणी सिंधुरासुर राक्षसाचा वध केला असे मानले जाते. तीन डोळ्यांची मूर्ती, तिची सोंड डावीकडे वळलेली असून, तिचे रक्षण करणारा नागराज आहे. या मूर्तीच्या बाजूला रिद्धि आणि सिद्धीच्या आणखी दोन मूर्ती आहेत.

तथापि,  ब्रह्मदेवाने दोन वेळा निर्माण केलेल्या मूर्ती पैकी ही मूळ मूर्ती नाही असे म्हटले जाते.

आख्यायिका: आपल्या पत्नी विनिता यांना त्यांच्या मुलांबद्दलच्या एका  घटनेनंतर, कश्यप ऋषींनी तिला पक्ष्याच्या रूपात आणखी एक मुलगा होण्याचे वरदान दिले. मूल जन्मण्यापूर्वीच गणपतीने ते अंडे फोडले  आणि एक मोर जन्माला आला. दोघांमध्ये द्वंद्वयुद्ध झाले. अस्वस्थ झालेल्या विनिताने हस्तक्षेप केला आणि लढाई थांबली. तिच्या मयूर रूपी  मुलाने भगवान गणेशाचे वाहन होण्याचे निवडले पण त्याची एक विशिष्ठ अट होती की भगवान गणेश त्याच्या नावाने ओळखला जावा. त्यामुळे मयूरेश्वर किंवा मोरेश्वर हे नाव जन्माला आले. 

सिद्धिविनायक, सिद्धटेक गणपती

सिद्धी प्राप्त करण्यासाठी एक पवित्र मंदिर,अष्टविनायक यात्रेतील दुसरा मुक्काम

स्थितो भीमातीरे जगद्वान कामेन हरिना
विजेतु दैत्यो तच्युति मलभवौ कैतभमधु
महाविघ्नार्तेन प्रखर तपसा सीतपादो
गणेश सिद्धिशो गिरिवरापू पंचजनक

भयंकर संकटांनी ग्रासलेल्या भगवान विष्णूंनी भीमा नदीच्या काठावर असलेल्या सिद्धटेक पर्वतावर तपश्चर्या केली. गणेशाकडून वरदान मिळाल्यावर भगवान विष्णूने मधु आणि कैटभ या दोन राक्षसांचा वध केला. हे सिद्धेश्वर श्रीगणेश, माझा नमस्कार स्विकार करा. 

अष्टविनायक तीर्थक्षेत्रात ही एकमेव मूर्ती आहे  ज्याची सोंड उजवीकडे आहे. भगवान विष्णूने निर्माण केलेले मूळ मंदिर पडून गेले आणि नंतर एका मेंढपाळाने तेथे गणेशाचे रूप पाहिले. मग तो इतर लोकांसोबत त्या जागेची पूजा करू लागला. बऱ्याच वर्षांनंतर पेशव्यांच्या राजवटीत मंदिर बांधण्यात आले.

आख्यायिका: भगवान विष्णू मधु आणि कैटभ या राक्षसांशी १००० वर्षांच्या युद्धात गुंतले होते. भगवान गणेशाची प्रार्थना केल्यावर, विश्वाचा पालनकर्ता – भगवान विष्णूना सिद्धी प्राप्त झाली. आणि त्यांनी राक्षसांचा  पराभव केला. भगवान विष्णूने चार दरवाजांचे मंदिर तयार केले आणि श्रीगणेशाची मूर्ती स्थापन केली.  भगवान विष्णूने येथे सिद्धी प्राप्त केल्यामुळे या गजाननाला सिद्धिविनायक म्हटले गेले. सिद्धटेक किंवा सिद्धक्षेत्र हे त्या ठिकाणाचे नाव झाले.

बल्लाळेश्वर, पालीचा गणपती

अष्टविनायक यात्रेतील तिसऱ्या मंदिरात स्वयंभू मूर्ती तुमची वाट पाहत आहे.

वेदो संस्तुवैभवो गजमुखो भक्ताभिमानी यो
बल्लालेरव्य सुभक्तपाल नरात; ख्यात सदा तिष्ठती
क्षेत्रे पल्लीपुरे यथा कृतयुगे चास्मिता लौकीके
भक्तेर्भविते मूर्तिमान गणपती सिद्धीश्वर तम भजे

वेदांमध्ये ज्याची स्तुती करण्यात आली आहे, जो आपल्या भक्ताच्या (बल्लाळ) नावाने प्रसिद्ध आहे, जो आपल्या भक्तांचे रक्षण करतो आणि या कृतयुगात जो पल्लीपूर किंवा पाली येथे निवास करतो, अशा गणेशाची मी पूजा करतो.

बल्लाळेश्वराच्या तीन फूट उंचीच्या मूर्तीमध्ये गणेशाचे ब्राह्मण वस्त्र परिधान केलेले दुर्मिळ रूप आहे. विशेष म्हणजे मंदिराचा आकार देवनागिरी लिपीतील श्री या अक्षरासारखा आहे. 

आख्यायिका: चिंतेत असलेल्या कल्याणशेठ यांनी आपल्या बल्लाळ या तरुण मुलाला  गणेशाच्या अविरत पूजेची शिक्षा केली. एके दिवशी, रागाच्या भरात, वडिलांनी बल्लाळाला जंगलातील झाडाला बांधले आणि त्याच्या बचावासाठी गणेशाची प्रार्थना करण्यास सांगितले. मुलाने प्रार्थना केली आणि भगवान गणेश स्वतः ब्राह्मणाच्या रूपात प्रकट झाले. त्याने मुलाला मुक्त करताच, बल्लाळाने परमेश्वराला याच प्रदेशात राहण्याची विनंती केली. प्रसन्न झालेल्या गणेशाने सहमती दर्शवली आणि एका दगडात वास केला जो बल्लाळेश्वर विनायकाची मूर्ती मानला जातो. 

महाडचा गणपती

अष्टविनायक यात्रेच्या चौथ्या मुक्कामात दोन गणेशमूर्तींना अभिवादन

भक्ताभिमानी गणराज एकम
क्षेत्रे मधख्ये वरदम् प्रसन्नम्
यष्टिष्ठति श्री वरदो गणेशम्
विनायकस्त प्रणमामि भक्तम्

गणांचा नेता, आपल्या भक्तांचा अभिमान असलेल्या आणि महाड येथे राहणाऱ्या आणि प्रसन्न रुप असलेल्या भगवान गणराजाला मी नमस्कार करतो.

मूळ गणेशमूर्ती १६०० च्या उत्तरार्धात तलावात बुडलेल्या अवस्थेत सापडली होती. १७२५ मध्ये कल्याणच्या सुभेदाराने पुन्हा मंदिर बांधले.

आख्यायिका: ग्रित्सामव या एका विद्वानाने एकदा त्याच्या उत्पत्तीबद्दल जे ऐकले आणि त्यामुळे त्याचे हृदय भंग पावले आणि तो अत्यंत दु:खी झाला. तो जन्माने ब्राह्मण नव्हता. ग्रित्सामव पुष्पक वनात गेला आणि त्याने कठोर तपश्चर्या सुरू केली. भगवान गणेशानी त्यांची प्रार्थना ऐकली आणि त्यांच्यासमोर प्रकट झाले. ग्रित्सामव यांना ब्राह्मण म्हणून ओळखले जावे अशी गणेशाला प्रार्थना केली आणि त्यानंतर त्यांनी भगवान गणेशाला पुष्पक जंगलात राहण्यास सांगितले. श्रीगणेशाने दोन्ही इच्छा पूर्ण केल्या. ग्रित्सामवने भगवान गणेशाला – वरद विनायक म्हटले, जो सर्व इच्छा पूर्ण करतो – आणि महाड येथे मंदिर बांधले.

चिंतामणी, थेऊरचा गणपती

शांती आणि आध्यात्मिक प्राप्तीसाठी, अष्टविनायक यात्रेच्या या ५ व्या मंदिरात प्रार्थना करा.

ब्रह्म सृष्ट्यादिसक्त स्थिराहितम् पिडितो विघ्नसन्दे
आक्रान्तो भूतिराक्य कृतिगणराजसा जीविता त्यक्तु मिसचिना
स्वात्मानं सर्वयुक्त गणपतिमामल सत्यचिंतामणियम
मुक्त स्तपायंत स्थिरमतिसुखदं स्तवरे दुधी मिधे

जो सुखाच्या शोधात आहे, जो सर्व प्रकारच्या संकटांत आहे त्याने स्थावर (थेऊर) जाऊन श्रीचिंतामणीची पूजा करावी आणि सर्व चिंता आणि संकटांपासून मुक्त व्हावे.

हे मंदिर अद्वितीय आहे कारण ते ध्यानासाठी राखीव आहे, पुरातन मंदिरांप्रमाणे या मंदिराचे हे वैशिष्ट्य आहे. 

आख्यायिका: लोभी गुणापासून भगवान गणेशाने आपले मौल्यवान चिंतामणि रत्न परत मिळवून दिल्यानंतर कपिल ऋषी प्रसन्न झाले. ऋषींनी गणेशाला त्याचा हार घातला आणि चिंतामणी विनायक हे नाव दिले. कदंबाच्या झाडाखाली ही घटना घडल्याने थेऊरला कदंबनगर असे संबोधले जाते

गिरिजात्मज, लेण्याद्रीचा गणपती

डोंगरावर असलेले अष्टविनायक यात्रेतील एकमेव मंदिर

मायासा भुवनेश्वरी शिवस्ति देहश्रीता सुंदरी
विघ्नेशम् सुत्माप्तुकम् संहिता कुर्वेतापो दुष्करम्
ताख्य भूतप्रकट प्रसन्न वरदो तिष्टतया स्थापितम्
वन्देह गिरिजात्मज परमज तम लेखनांद्रिशितम्

विश्वमाता, भगवान शिवाची सुंदर पत्नी, देवी पार्वतीने श्रीगणेशाची कठोर तपश्चर्या केली आणि शेवटी श्रीगणेशाला पुत्ररूपात प्राप्त केले. लेखनाद्री (लेण्याद्री) पर्वतावर राहणारा, गिरिजा पार्वतीचा पुत्र गिरिजात्मजाला मी नमस्कार करतो..

हे मंदिर बौद्ध उत्पत्तीच्या १८ लेण्यांच्या गुंफा संकुलात उभे आहे. हे प्रसिद्ध भगवान गणेश मंदिर आठव्या गुहेत विराजमान आहे. 

आख्यायिका: देवी पार्वतीने गणेशाची आई होण्यासाठी लेण्याद्री पर्वतावरील गुहेत कठोर तपश्चर्या केली. प्रसन्न होऊन, भगवान गणेशाने वचन दिले की तो तिचा मुलगा म्हणून जन्म घेईल. चतुर्थीला, भाद्रपदाच्या चौथ्या दिवशी, तिने आपल्या शरीरातील मळातून मूर्ती तयार केली. सहा हात आणि तीन डोळे असलेला- एक लहान मुलगा- भगवान गणेशाने, जिवंत झालेल्या मूर्तीमध्ये प्रवेश केला. असे मानले जाते की गणेशाने लेण्याद्रीमध्ये पंधरा वर्षे वास्तव्य केले होते. 

विघ्नेश्वर, ओझरचा गणपती

अष्टविनायक यात्रेतील व्या मंदिरात अडथळे पार करण्याचा आशीर्वाद घ्या.

भक्तानुग्रहे गजमुखो विगेश्वरो ब्रह्मपम्
नाना मूर्ति धरोपी नैजमहिमा खंडा सदात्मा प्रभू
स्वेच्छा विघ्नहर सदासुखकर सिद्ध कल्लो स्वेपुं
क्षेत्रे चोजारके नमोस्तु सततम तमसे
परब्रम्हणे

माझे मन अशा भगवंतावर एकाग्र होवो, जो गजमुखी, परोपकारी आणि अडथळे दूर करणारा आहे. त्याने विघ्नासुर राक्षसाचा पराभव केला. तो स्वतः ब्रह्म आहे. त्याची महानता त्याच्या विविध रूपांमध्ये अबाधित आहे. तो सर्वात मोठा कलाकार आहे. ओझर येथे राहणाऱ्या आपल्या भक्तांना तो आनंद देतो.

असे मानले जाते की सोन्याचे शिखर असलेले हे मंदिर पेशवे राजा चिमाजी अप्पा यांनी १७०० च्या उत्तरार्धात पोर्तुगीजांचा पराभव करून बांधले होते. 

आख्यायिका:राजा अभिनंदनने आयोजित केलेल्या प्रार्थनेचा नाश करण्यासाठी देवांचा राजा इंद्र याने विघ्नासूर या राक्षसाची निर्मिती केली होती. तथापि, राक्षसाने भीषण हल्ला केला, मालमत्तेचा नाश केला आणि लोकांना मारले. भगवान गणेशाने दुःखी लोकांची प्रार्थना ऐकली आणि विघ्नासुर पराभव केला. पराभूत झालेल्या राक्षसाने भगवान गणेशाला दया दाखवण्याची विनंती केली. भगवान गणेशाने त्याला एका अटीसह जाऊ देण्याचे मान्य केले: जिथे गणपतीची पूजा केली जाईल तिथे विघ्नसुर जाणार नाही . मग राक्षसाने विनंती केली: गणेशाच्या नावापुढे त्याचे नाव घेतले पाहिजे. अशा प्रकारे भगवान गणेशाचे आणखी एक नाव जन्माला आले- विघ्नहर किंवा विघ्नेश्वर (विघ्न म्हणजे अडथळा किंवा अशुभ चिन्ह).

महागणपती, रांजणगावचा गणपती

अष्टविनायक यात्रेच्या शेवटच्या मुक्कामात महागणपती रूपाचा अनुभव घ्या.

श्री शंभुवरप्रदा सुतपसा नामना सहस्त्र स्वकम
दत्तवा श्री विजय पदम शिवकर तस्मे प्रसन्न प्रभु
तेन स्थापीत एव सद्गुणवपु गणपती क्षेत्रे सदातिष्ठति
तम वंदे मणिपुरके गणपती देवम महंत मुद्रा 

भगवान शिवशंकरांनी श्रीगणेशाची पूजा करून वरदान प्राप्त केले. मणिपूर (रांजणगाव) येथे वास्तव्यास असलेल्या श्रीगणेशाला मी वंदन करतो, ज्याने भगवान शिवाला वरदान दिले, ज्याचे रूप सुंदर आणि प्रसन्न आहे आणि जो सद्गुणांची मूर्ती आहे.

सूर्य दक्षिणेकडे जाताना (दक्षिणायनात) सूर्यप्रकाशाची सौम्य किरणे या मूर्तीवर पडतात. असे या मंदिराचे बांधकाम आहे. कदाचित त्यामुळेच – हे रूप भगवान गणेशाचे सर्वात शक्तिशाली आणि भयंकर रूप मानले जाते.

आख्यायिका:एकदा भगवान शिव त्रिपुरासुराशी लढत होते आणि ते त्याचा पराभव करू शकले नाहीत. हिंदू देवतांपैकी ब्रह्मांडाचा नाश करणारा/परिवर्तक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवान शिवाला याचे कारण कळले: त्यांनी भगवान गणेशाला आदरांजली वाहिली नाही. त्यांनी भगवान गणेशाला आवाहन करण्यासाठी षडाक्षर मंत्राचा पाठ केला, तेव्हा श्री गणेश प्रकट झाले आणि त्यांना युद्धात मार्गदर्शन केले. त्यानंतर भगवान शिवाने एक मंदिर तयार केले जेथे भगवान गणेशाची स्थापना केली.

आणि अर्थातच, अष्टविनायक तीर्थयात्रा पूर्ण करण्यासाठी प्रथम मंदिर – मोरेश्वर – येथे परत एकदा जातात.

प्राचीन भगवान गणेश मंदिरांना भेट देणे हा एक सुंदर अनुभव आहे – मग तो विश्वास, आकर्षण, इतिहास, साहसी भावना किंवा अगदी संशयाने प्रेरित असेल. तथापि, ज्ञानी लोकानीं असे म्हटले आहे की प्रार्थनेच्या खऱ्या प्रकारात आत्मसमर्पण आणि विश्वास यांचा समावेश होतो. गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात: “पूजा आणि प्रार्थना ही भीती किंवा लोभातून नाही तर,  प्रेम आणि भक्तीच्या शुद्ध भावनेतून करावी लागते. पूजेचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे बाह्य पूजा जी बाहेरून केली जाते आणि दुसरी आंतरिक रूप जी मनात (मानस पूजा) केली जाते. पूजेचे अंतर्गत स्वरूप श्रेष्ठ आहे आणि त्याचे महत्त्व अधिक आहे.”

गुरुदेव आदि शंकराचार्यांच्या सुंदर लिखित गणेश स्तोत्रममधील भावनेवर ध्यान करण्यास सांगतात:

जगथ कारणं करंगनां रूपं
सुराधिम सुखाधीम गुणेसं गणेशम
जगथ वापीनं विश्व वंध्यम सुरेशम
पर ब्रह्म रूपम गणेशम् भजे मा

परम चैतन्य जे संपूर्ण विश्वाचे कारण आहे, ज्याच्यापासून सर्व काही उत्पन्न झाले आहे, ज्याच्या आत सर्वकाही अस्तित्वात आहे आणि टिकून आहे आणि त्या दैवी शक्तीमध्ये सर्वकाही पुन्हा सामावून जाणार आहे
ही दैवी ऊर्जा, जी प्रत्येक गोष्टीच्या अस्तित्वाचे कारण आहे, ज्याला आपण देव म्हणतो, परब्रह्म किंवा अंतिम चैतन्य जो गणेशाशिवाय दुसरा कोणी नाही.

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *