स्वामी विवेकानंद यांच्यामध्ये दिव्यत्वाप्रती प्रेम आणि स्वदेशाप्रती प्रेम यांचा उत्कृष्ट मिलाफ पाहायला मिळतो. स्वामीजी युवकांचे कायमस्वरूपी प्रेरणास्थान आहेत.
~ गुरुदेव श्री श्री रवि शंकर
स्वामी विवेकानंद यांची जयंती ‘राष्ट्रीय युवक दिन’ म्हणून घोषित केलेली आहे. युवकांसाठी सच्चा आदर्श, जो पिढ्यान पिढ्या प्रेरणा देत राहील. खरंतर गत कालातील कित्येक महान व्यक्तींच्या जीवनापासून खूप काही शिकण्यासारखे असते, परंतु ते जीवनात कसे अंमलात आणावे हे क्वचितच समजत असते. हे आपल्यासाठी सोपे व्हावे म्हणून आम्ही प्रथमच स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील ८ अप्रतिम बोध आणि ते आपल्या जीवनात कसे आत्मसात करावेत हे येथे देत आहोत.
एक सूचना : हे खूप सुलभ आणि सोपे आहे आणि ते आपण जीवनातील कोणत्याही टप्प्यामध्ये आत्मसात करु शकतो. याकरिता प्रत्येकाने संवेदनशील आणि कनवाळू असणे आवश्यक आहे.
स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील सारांश बोध
- बोध १ : विनयशीलता हा अनमोल सद्गुण आहे
- बोध २ : जीवनामध्ये जिज्ञासा आवश्यक आहे
- बोध ३ : करुणा आणि दयाभाव हे बहुमोल गुण आहेत.
- बोध ४ : प्रार्थनेमुळे आपण कोणत्याही संकटातून बाहेर येऊ शकतो
- बोध ५ : एकोपा टिकण्यासाठी काम करा
- बोध ६ : संस्कृती आणि श्रद्धा यांच्याप्रती आदर गरजेचा आहे
- बोध ७ : सर्वांगीण, समग्र दृष्टिकोन हवा
- बोध ८ : विनोदबुद्धी हे सुज्ञपणाचे लक्षण आहे
अनुकरणीय जीवन
स्वामी विवेकानंद कोण होते? विचारधारा, आदर्शवाद, धैर्य,प्रगत विचारसरणी, सामर्थ्य आणि सुज्ञपणा यांचेच ते प्रतिनिधी होते.एक महान व्यक्ती होते.त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव नरेंद्रनाथ दत्त. त्यांचा जन्म १२ जानेवारी, १८६३ रोजी झाला.त्यांना सात भावंडे होती . नरेंद्रनाथ जन्मतःच खूप हुशार होते, शाळेच्या अभ्यासामध्ये उत्कृष्ट होते. त्यांच्या जन्मावेळी भारत ब्रिटिशांच्या राजवटीखाली होता. इंग्लिश ही ब्रिटिशांची भाषा आहे असे कळल्याने सुरुवातीला त्यांनी इंग्लिश भाषा शिकणे सोडले होते. परंतु ती अभ्यासक्रमात असल्याने नंतर त्यांना ती शिकावी लागली. खेळ, संगीत, जिम्नॅस्टिक्स्, कुस्ती, शरीर सौष्ठव अशा अनेक विषयामध्ये त्यांना आवड होती.
कोलकाता येथील महाविद्यालयातून त्यांनी तत्वज्ञान या विषयामध्ये एम.ए.ची पदवी घेतली आणि त्या विषयात ते पारंगत झाले. धर्माचे विविध पैलू, श्रद्धा, शिक्षण, अध्यात्म आणि मानवतावाद या गोष्टींची शिकवण देण्यावर त्यांचा विशेष भर होता. त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या ज्ञानाचा प्रसार करण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले.
कालांतराने नरेंद्रनाथ हे स्वामी विवेकानंद म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या इतर अनेक समाजोपयोगी कामांशिवाय ब्राह्मो समाज आणि रामकृष्ण मिशन या संस्था सामाजिक कल्याण, धार्मिक सुसंवाद आणि गरिबी व दुखः निर्मूलन यासाठी वचनबद्ध होत्या.
एक व्यक्ती ‘साधी राहणी आणि उच्च विचार सरणी’ असे जीवन जगली, हेच मुळात आपल्या सर्वांसाठी एक धडा आहे. त्यांच्या जीवनातील निवडक आणि विशेष प्रसंग येथे आपण पाहू या:
बोध १ : विनयशीलता हा एक मौल्यवान सद्गुण आहे
माझ्या वडिलांनी मला झोपवताना वाचून दाखवलेल्या अनेक प्रेरणादायी गोष्टी माझ्या लक्षात आहेत. एक प्रसंग, जेव्हा स्वामी विवेकानंद इंग्लंड मध्ये होते तेव्हाचा. चर्चा सुरु असताना त्यांनी त्यांच्या मित्राचे चुकीचे इंग्लिश दुरुस्त केले. मित्राने प्रत्युत्तर दिले की, इंग्लिश त्याची मातृभाषा असल्याने ती दुरुस्त करण्याची गरज नाही.
स्वामी विवेकानंद हसले आणि नम्रपणे म्हणाले , “मला भाषेचा वापर कळतो. कारण मी ती भाषा ‘ शिकलो ’ आहे तर तुम्ही ती भाषा फक्त ‘ निवडली ’ आहे!” त्यांचा हा हजर जबाबीपणा ऐकून तो मित्र भारावून गेला.
अशा अनेक प्रसंगामध्ये स्वामीजींनी दिलेल्या विद्वत्तापूर्ण, ज्ञान प्रचुर, तर्कशुद्ध आणि करुणामय प्रत्युत्तरांची समाजावर छाप पडली आहे.
जीवन बोध:
अनेकदा लोक आपणास उलट प्रश्न विचारतात, टोमणे मारतात, खास करुन जेंव्हा आपण त्यांची चूक निदर्शनास आणतो तेव्हा. अशा प्रसंगी दिलेल्या उत्तरामध्ये असलेल्या आपल्या विनयशीलतेमुळे प्रसंग हलका फुलका होऊन संबंध बिघडण्याचे वाचते. स्वामी विवेकानंदांची ही गोष्ट स्मरणात ठेवल्याने आपणास समतोल न गमावता, तसेच वाद न घालता, उत्तर कसे द्यावे हे कळते.

बोध २ : जीवनामध्ये कुतूहल आवश्यक आहे
‘देव खरंच अस्तित्वात आहे का?’ स्वामी विवेकानंद याना हा नेहमी प्रश्न पडत असे. सतत ते याचा शोध घेत असत.हा प्रश्न त्यांना सतत अस्वस्थ करत होता. परंतु रामकृष्णांनी त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर दिले. ते म्हणाले, “होय, मी देव पाहिला आहे.”
सुरवातीला रामकृष्णांची शरीरयष्टी आणि साधी राहणी यामुळे स्वामी विवेकानंद यांच्यावर त्यांचा प्रभाव पडला नव्हता. पण नंतर रामकृष्ण यांनीच त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. ते म्हणाले, “मी देव पाहिला आहे, जसे मी आत्ता तुला पाहत आहे. देव प्रत्येक मनुष्यात आहे, फक्त त्याला पाहण्याची नजर आपल्याकडे हवी.” मग स्वामी विवेकानंद याना ते पटले.
जीवन बोध:
जीवनाबाबत हव्या असलेल्या कुतूहलपूर्ण प्रश्नांची उत्तम आणि सर्वांगीण उत्तरे प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. जीवना बाबत अंतिम सत्याच्या उत्सुकतेमुळे कित्येकांचे जीवन परिवर्तन झाले आहे. ध्यानात असू द्या, दिसते ते फसवे असू शकते!
बोध ३ : दयाभाव हा सदोदित सोन्यासारखा गुण आहे
स्वामी विवेकानंद यांच्या आईने त्यांना एकदा सुरी देण्यास सांगितले. ते सुरी घेऊन आले, सुरीचे धारदार टोक आपल्याकडे करुन मुठीचा भाग आईकडे करुन त्यांनी सुरी दिली. याचा आईवर खूप मोठा प्रभाव पडला आणि ती म्हणाली की तू आता सामाजिक कल्याणाचे कार्य करण्यास सिद्ध झाला आहेस. त्यांनी आपल्या आईला “असे का म्हणतेस” असे विचारले असता ती म्हणाली की तू सुरीचा धारदार भाग आपल्याकडे करुन मला जखम होऊ नये याची काळजी घेतलीस, यातून तुझ्यातील दयाभाव आणि करुणा दिसून आली .आईने हाच दयाभाव आणि करुणा समस्त मानावांप्रती आणि समाजाप्रती ठेवण्यास सांगितले.
जीवन बोध:
खूप वेळा आपल्या छोट्या छोट्या कृतीतून प्रिय आणि नजीकच्या व्यक्तीप्रती दयाभाव आणि करुणा व्यक्त होत असते. आपण इतरांमधील सद्गुणांची स्तुती करुन मानवी मूल्ये वाढण्यासाठी प्रेरणा देऊ शकतो, जेणेकरून समाजामध्ये सत्कृत्ये करत राहण्यास ते सक्षम होतील. खरंतर दयाभाव आणि करुणा हा आपल्या प्रत्येकाचा मूळ स्वभावच आहे.
बोध ४ : प्रार्थनेमुळे आपण कोणत्याही संकटातून बाहेर येऊ शकतो
जेव्हा स्वामी विवेकानंद यांच्या घरची माणसे अडचणीत आली होती तेव्हा स्वामीजींनी रामकृष्ण यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली. तेव्हा रामकृष्ण यांनी त्यांना सुचवले की, ‘मंदिरात जा आणि स्वतः प्रार्थना कर.’ स्वामी विवेकानंद तीनवेळा मंदिरात गेले. मात्र तेथे त्यांनी ‘विवेक आणि वैराग्य” यांची मागणी केली. हीच त्यांच्या अध्यात्मिक जीवनाची सुरुवात होती.
जीवन बोध :
संकटकाळात केलेल्या प्रार्थनेमुळे आपल्यातील सद्गुणांची ओळख होते. गुरुदेव श्री श्री रविशंकरजी म्हणतात की, ‘आपणास सामर्थ्य दिले जात नाही तर समर्थ होण्याची संधी दिली जाते . तसेच आपणास श्रद्धा दिली जात नाहीतर श्रद्धा निर्माण होण्याची संधी मिळत असते. म्हणून प्रार्थनेतून योग्य मागणी केल्याने संकटकाळावर मात करण्यास आपल्याला अंतर्गत सामर्थ्य प्राप्त होते आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळते.’
बोध ५ : एकता टिकण्यासाठी काम करा
स्वामी विवेकानंद हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जागतिक धर्मसभेमध्ये गेले होते. हिंदुत्वाची मूळ तत्वे आणि त्यांची योग्य मांडणी समजावण्यासाठी हे एक उत्कृष्ट व्यासपीठ होते. या धर्मसभेमध्ये आपले म्हणणे प्रभावीपणे मांडण्यासाठी अनेक वक्ते उत्तमोत्तम तयारी करून आलेले होते.
विस्मयकारक हिंदुस्थान जाणण्यासाठी आणखी थोडे सखोल जाऊ! हा देश जीवन उत्तम करण्यासाठी अध्यात्मिक व सर्वांगीण ज्ञानाने संपन्न आहे.ही गुपिते शोधा आणि या कालातीत ज्ञानामधून आपल्या सामर्थ्यांचा शोध घ्या. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या‘प्राणायाम आणि ध्यान’ कार्यक्रमामध्ये मध्ये आणखी जाणून घ्या.
जेव्हा स्वामी विवेकानंद यांची बोलण्याची पाळी आली, तेव्हा त्यांनी श्रोत्यांना उद्देशून सुरुवात केली की, “अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो!”,… हे संबोधन आजतागायत खूप लोकप्रिय आहे. त्यांची बोलण्याची ही पद्धत श्रोत्यांना चांगलीच भावली होती.

जीवनबोध :
निव्वळ आपल्या बोलण्यामुळे, शब्दांमुळे आपण लोकांशी जवळीक निर्माण करु शकतो, त्यांना जिंकू शकतो. या जगतामध्ये सौहार्दपूर्ण जवळीक निर्माण करायची आणि टिकवायची असेल तर आपल्या वाणीमध्ये, बोलण्यामध्ये पावित्र्य, शुद्धता असणे ही पहिली अट असेल, खास करून कार्पोरेट जगतात. लोकांमधील बंधुभाव आणि एकता टिकवण्याचे खूप सामर्थ्य स्नेहपूर्ण व प्रेमळ शब्दांमध्ये आहे.
महात्मा गांधींनी १९२१ साली बेलूर मठास भेट दिली असता स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त बोलताना ते म्हणाले:
“मी त्यांचे कार्य खूप खोलवर जाणून घेतले आहे, आणि इतके खोलवर जाणून घेतल्यानंतर माझे मातृभूमिप्रती असलेले प्रेम हजारो पटीने वाढले आहे. माझ्या तरुण मित्रांनो, मी आपणास सांगू इच्छितो की ज्या भूमीमध्ये स्वामी विवेकानंद यांनी जीवन व्यतीत केले त्या भूमीमधून मोकळ्या हातांनी न जाता काहीतरी पवित्र असे आत्मसात करुन घ्या आणि जा.”
बोध ६ : संस्कृती आणि श्रद्धा यांच्याप्रती आदर आवश्यक आहे
एके दिवशी एका ब्रिटीश व्यक्तीने वक्तव्य केले की, भारतीयांचे कपडे असभ्य असतात. त्यावर स्वामी विवेकानंदांनी उत्तर दिले होते, “तुमच्या संस्कृतीमध्ये कपड्यांमुळे मनुष्य बनतो परंतु आमच्या संस्कृतीमध्ये चारित्र्य माणसाला घडवते.” हा संवाद जगभर फार गाजला होता, या उत्तरातून स्वामी विवेकानंदांची सखोल जागतिक जाण दिसून येते..
जीवनबोध :
आपली संस्कृती आणि परंपरा यांचा आदर करा. संस्कृती, परंपरा आणि श्रद्धा यांच्यामुळे समाज वैशिष्ट्यपूर्ण बनतो. आपली संस्कृती आणि परंपरा यांचे वैशिष्ट्य,त्यांचे महत्व यांच्याप्रती आपणास असणारे गाढे ज्ञान आपणास इतरांचा संशय, दृष्टीकोण वा भ्रामक कल्पना दूर करण्यास मदत करते.
बोध ७ : सर्वांगीण, समग्र दृष्टीकोण हवा
जागतिक धर्मसभेमध्ये स्वामी विवेकानंदांच्या ध्यानात आले की हिंदुस्थानी श्रेष्ठ ग्रंथ ‘ भगवद्गीता ’ सर्वात तळाशी ठेवला आहे. याचे वेगवेगळे अर्थ काढले गेले असते. पण मला हे खूपच भावले की स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात भगवद्गीतेच्या स्थानाचा उल्लेख करत केली की, ‘हा चांगला भक्कम पाया आहे!’.(भगवद्गीता सर्वात तळाशी ठेवल्याचा संदर्भ ). कमीपणाची भावना न बाळगता असे विनोदी उत्तर देऊन त्यांनी हिंदू धर्माविषयी स्वाभिमान व्यक्त केला.
जीवनबोध :
आपल्या श्रद्धा आणि धर्म यांचे सखोल ज्ञान आपला दृष्टीकोण समग्र आणि सर्वांगीण बनवतो. यामुळे आपल्याला आपली संस्कृती सखोलपणे समजण्यास मदत होते, तसेच आपण इतर संस्कृती देखील तितक्याच सन्मानपूर्वक समजून घेऊ शकतो.
१८९३ च्या जागतिक धर्म सभेतील सुप्रसिद्ध शिकागो व्याख्यान, : ”रोमन जुलूमशाहीने इस्राईलांचे पवित्र मंदिर छिन्न भिन्न केलेल्या वर्षीच ते आमच्या दक्षिण भारतात आश्रयाला आले. त्यांच्याप्रती आमच्या हृदयात अत्यंत पवित्र भावना आहेत, हे मी येथे अत्यंत अभिमानाने सांगू इच्छितो. आमच्या आश्रयाला आलेल्या धर्माचा देखील आम्ही आदरच करतो आणि त्या महान झोरोस्ट्रीयन राष्ट्राच्या अवशेषांचे आम्ही संगोपन करत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. बंधू भगिनींनो, माझ्या बालपणी पाठ केलेल्या श्लोकांचा येथे उल्लेख करु इच्छितो, लाखो लोक या श्लोकांचे दैनंदिन पारायण करत असतात…. “ विविध स्त्रोतांप्रमाणे विविध मार्ग माणसांनी अंगिकारल्याने ती माणसे विविध प्रवृत्ती धारण करतात, काही मार्ग सरळ सोट तर काही वेडे वाकडे , पण सर्व मार्ग येतात तुझ्याकडेच.”
सांगता समारंभा दरम्यानचा एक उतारा: ‘एक बीज जमिनीत पेरले जाते, मग जमीन, हवा आणि पाणी यांचा त्याच्याशी संबंध येतो. आता ते बीज जमीन बनते की हवा बनते की पाणी? नाही, ते बीज एक रोप, झाड बनते. ते त्याच्या नैसर्गिक नियमानुसार वाढत राहते. जमीन, हवा आणि पाणी यांचा स्वीकार करुन त्यांना ते रोप बनवते, झाड म्हणून वाढवते. हीच बाब धर्मांना लागू होते. ख्रिश्चन, हिंदू किंवा बुद्धिस्ट बनत नाही, की हिंदू किंवा बुद्धिस्ट ख्रिश्चन बनत नाहीत. पण ते सर्वजण परस्परांच्या तत्वांना स्वीकारत असतात. तसेच ते स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्व देखील जतन करतात आणि आपल्या धर्माच्या नियमानुसार प्रगती करत असतात.’
बोध ८ : विनोदबुद्धी हे सुज्ञपणाचे लक्षण आहे
गुरुदेवांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील ही गोष्ट एकदा सांगितली होती. ती थोडक्यात अशी .. .
“हॉटेलमध्ये स्वामी विवेकानंद आपल्या प्राध्यापका बरोबर एकाच टेबलवर जेवायला बसले असताना ते प्राध्यापक म्हणाले, “डुक्कर आणि पक्षी कधी एकाच टेबलवर जेवायला बसू शकत नाहीत .”
स्वामी विवेकानंद उत्तरले, “सर, केव्हाही सांगा, मी दूर उडून जातो!”
सुज्ञ माणसाकडे कोणताही संघर्षाचा प्रसंग विनोदामध्ये रुपांतर करण्याची क्षमता असते. विनोद बुद्धी हे सुज्ञपणाचे आणखी एक लक्षण आहे. जर आपल्याकडे विनोद बुद्धी असेल तर आपण कोणत्याही संघर्षाच्या प्रसंगावर मात करु शकतो.
जीवनबोध :
गुरुदेवांनी समारोप केल्याप्रमाणे, विनोद बुद्धी हे सुज्ञपणाचे लक्षण आहे. मग आपण वेळोवेळी प्रसंग आनंदी बनवू शकतो आणि विनोद बुद्धीमुळे कित्येक वादाचे प्रसंग हलके फुलके करु शकतो.
त्यांच्या सुधारणांच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांनी समाजात लक्षणीय बदल घडवून आणले. त्यांचे कार्य, विचार आणि कल्पना यांनी कित्येकांना नवीन दिशा दिली. आजच्या युवा पिढीला स्वामी विवेकानंद यांचे जीवनचरित्र वाचणे देखील खूप प्रेरणादायी आहे आणि असेच ते येणाऱ्या कित्येक पिढ्यांना असणार आहे.
या जीवन बोधांसह नवीन येणारे २०२० वर्ष येऊ दे! काही बोध आपणास जगण्यास शिकवतात, असे काही धडे आहेत जे आपण इतरांकडून शिकतो.
स्वामी विवेकानंद यांची शिकवण आपणास आणि इतरांना आनंदी जीवन प्रदान करण्याची खात्री देते.
आपणास हे जीवनबोध आपल्या जीवनात प्रत्यक्ष कसे अंगीकारायचे अशी शंका आहे? तर आनंदी आणि निस्वार्थी सेवाभावी जीवन जगण्याचे गुपित आता ऐका ….
- ध्यान : यामुळे आपली क्षमता आणि आनंदी होण्याची पातळी वाढते. दैनंदिन जीवनातील कार्यविधी आणि नैराश्य आपणास तणावग्रस्त बनवू शकतात. पण जेव्हा आपण दररोज २० मिनिटे सहज सुलभ ध्यान करतो तेव्हा आपल्यातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात आणि आपले मन ताजेतवाने बनते.त्यामुळे सजगता वाढते. म्हणून आजपासून ध्यान करणे सुरु करा.
- योग : मन आणि शरीर एकत्रितपणे निरोगी राखण्याचा योग हा एक सहज सुलभ मार्ग आहे. . उत्तम मानसिक आणि शारीरिक आरोग्यामुळे इतरांना सहाय्य करणे आणि स्वतः आनंदात जगणे शक्य होते. साधी साधी आसने आपल्याला आरोग्य प्राप्त होण्यासाठी चालना देतात.