“आज प्रकाशाचा सण आहे. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. येथील प्रत्येकजण प्रकाश आहे. हा सण सर्व भारत, नेपाळ, सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका, इंडोनेशिया, मॉरीशस, सुरीनाम, त्रिनिदाद आणि दक्षिण आफ्रिका मध्ये साजरा केला जातो. लोक एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात आणि फराळ, मिठाई वाटतात. दिवाळीच्या दरम्यान आपण आपली गत काळातील दुःखे विसरून जातो. डोक्यात जे भरले गेले असते ते फटाके वाजवतो आणि सारे काही विसरून जातो. फटाक्यांप्रमाणे गत काळ देखील जळून जातो, नष्ट होतो आणि आपले मन नवीन नूतन बनते. हि दिवाळी होय. फक्त दिवे आणि मेणबत्त्या लाऊन काही होणार नाही तर आपणा प्रत्येकाला आनंदी आणि प्रज्वलित व्हावे लागेल. प्रत्येकाला आनंदी आणि बुध्दीवान बनावे लागेल. बुद्धीमत्तेचा प्रकाश प्रज्वलित झाला आहे. प्रकाशाला ज्ञान रुपी प्रकाश बणऊन त्याचा प्रसार करूया आणि आज उत्सव साजरा करूया – तुम्ही काय म्हणता?

भूतकाळ झटकून टाका, नवीन सुरुवात करा.

भूतकाळाला जाऊ द्या, विसरून जा. आपल्या विद्वत्तेने जीवन एक उत्सव बनवूया. वास्तविक बुध्दीमत्तेशिवाय उत्सव साजरा होऊ शकत नाही. ‘ईश्वर माझ्यासोबत आहे’ हे जाणणे, हीच बुध्दीमत्ता आहे. आपल्याकडे जी काही संपत्ती, संपदा आहे तिचे आज दर्शन घ्या. ध्यानात घ्या कि आपण संपन्न आहोत आणि पूर्णत्वाचा अनुभव घ्या. नाहीतर मन सतत अभावामध्ये राहील. ‘अरेरे..हे नाही..ते नाही, या साठी दुःखी आहोत, त्यासाठी दुःखी आहोत.’

संपत्तीच्या अभावाकडून समृध्दीकडे वळा. प्राचीन परंपरा आहे कि आपण आपल्या समोर सोन्या चांदीची नाणी ठेवतो, सारी संपत्ती ठेवतो आणि म्हणतो, “पहा, ईश्वराने मला कितीतरी दिलेले आहे आणि या सर्वा प्रती मी कृतज्ञ आहे.” अशी समृध्दी अनुभवा. मग ध्यानात येईल कि तुम्हाला किती आणि काय काय दिले आहे.

मग आपण धन आणि ऐश्वर्याची देवता लक्ष्मीची पूजा करतो. आपल्या मार्गातील अडथळे नाहीसे करणाऱ्या विघ्नहर्त्या गणेशाची पूजा करतो. त्यांचे स्मरण करतो.

खरी संपत्ती: अंतर्मनातील शांती, प्रेम आणि आत्मविश्वास

युरोप मध्ये २७ देश आहेत. प्रत्येक देशासाठी एकेक दिवा लाऊन काहीकाळ ध्यान करूया. आपण ध्यान करतो म्हणजे विशाल आणि सर्व समावेशक आत्म्याला आपल्या समृध्दी आणि संपन्नतेबध्दल कृतज्ञता व्यक्त करत असतो, धन्यवाद देत असतो. आणखी प्राप्तीसाठी देखील प्रार्थना करत असतो, ज्यामुळे आपण आणखी सेवा करू शकू. सोने चांदी हि बाह्य प्रतीके आहेत. खरी संपत्ती आपल्या आंत आहे. आंत खूप सारे प्रेम, शांती आणि आनंद आहे. यापेक्षा ज्यादा आणखी काय हवे. विद्वत्ता खरे धन आहे. आपले चारित्र्य, आपली शांती आणि आपला आत्मविश्वास-हीच खरी संपत्ती आहे. जेंव्हा तुम्ही ईश्वराच्या सानिध्यात असून प्रगती करत असता तेंव्हा यापेक्षा वेगळी संपत्ती असूच शकत नाही. हा श्रेष्ठ विचार तुम्हाला तेंव्हाच सुचतो जेंव्हा तुमचे ईश्वराशी आणि त्या अनंततेशी तादात्म्य झालेले असते. जेंव्हा लाटेला याची अनुभूती होते कि ती सागराशी संलग्न आहे आणि तिचाच हिस्सा आहे – तेंव्हा तिला एक विशाल शक्ती प्राप्त होते.”

गुरुदेव श्री श्री रवि शंकर नी हा दिवाळी संदेश वर्ष २००९ मध्ये दिला होता.

    Wait!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity


    *
    *
    *
    *
    *