आपण सर्वजण आयुष्यातील या परिपूर्ण क्षणांची स्वप्ने पाहतो: शालेय क्रीडा स्पर्धा चॅम्पियनशिप ट्रॉफी किंवा शैक्षणिक सुवर्णपदक जिंकणे, उच्च मानांकित विद्यापीठात प्रवेश प्राप्त करणे, आणि नंतर त्या पहिल्यावाहिल्या स्वप्नातील नोकरीची ऑफर मिळवणे. तो पहिला पगार किती छान होता!
परंतु कदाचित सर्वात परिपूर्ण स्वप्न म्हणजे लग्नासाठी आलेली ती पहिली मागणी, जी विवाहाच्या वेदीवर नेणारी असते. त्या परिपूर्ण जोडीदारासह आणि प्रत्येक बाबतीत अगदी आपणास हवा होता तसा तो असणे. तरुण वयात आपण सर्वजण हेच शोधत असतो की गर्दीत आपला हात धरण्यासाठी एक साथीदार, विशेषत: जेंव्हा जीवन आपल्याला अनपेक्षित संकटात टाकत असते.
अब्जावधी लोकांना विवाह व्यवस्थेकडे नेणारे हे एक सर्वांनी पाहिलेले स्वप्न आहे. आहे. भारतात, हा एक अनेक विधी असलेला कार्यक्रम आहे, आणि त्यापैकी, सप्तपदीने ही वचनबद्धता पूर्ण होते. सप्तपदी व्रत आपल्या संस्कृतीत वैदिक काळापासून आहे!
दोन व्यक्तींना कायमचे एकत्र बांधणाऱ्या ख्रिश्चन विवाहाच्या प्रतिज्ञांशी जसे आपण ‘मी करतो’, जोडतो. सप्तपदी भारतीय विवाहांशी आणि विशेषतः हिंदू विवाह प्रतिज्ञांशी संबंधित आहे. परंतु कदाचित हिंदू श्लोक संस्कृतमध्ये असल्यामुळे, आपण लग्नगाठ बांधताना आपण कोणती प्रतिज्ञा करतो हे बऱ्याच लोकांना माहिती नसते.
खरे सांगायचे तर, हे माझ्यासाठी देखील नवीनच होते. तासन् तास चालणाऱ्या आणि कंटाळवाणा वाटणार्या या विधींमागचा अर्थ मला माहित नव्हता, त्यामुळे, आपण आत्ता किंवा या पुढे कधीतरी काय वचन देणार आहात किंवा बोलणार आहात हे जाणून घेण्यासाठी किंवा ‘ते’ इतर लोक काय वचने देतात हे जाणून घेण्यासाठी, माझ्याप्रमाणे आपणदेखील उत्सुक असाल तर, चला माझ्या सोबत! सप्तपदी विधींचा गूढार्थ जाणून घेऊ.
सप्तपदी म्हणजे काय?
सप्तपदी म्हणजे संस्कृतमध्ये सात पावले. सप्त म्हणजे ‘सात’ आणि पदी म्हणजे ‘पावले’. जोडप्याने त्यांच्या विवाह समारंभात अग्नीच्या पवित्र साक्षीने एकत्र टाकलेली, सात वचनांचे प्रतीक असलेली ही सात पाऊले असतात.
सप्तपदीत काय होते?
खरंच! हे खूपच रोमँटिक आहे, आपण एकमेकांचे हात किंवा वस्त्र धरतो. अग्नि हा अग्नीचा वैदिक देव आहे, जो जोडप्याने दिलेल्या सर्व वचनांचा साक्षीदार आहे असे मानले जाते. अग्नीची उपस्थिती सर्वशक्तिमान उर्जा स्त्रोत, सूर्य, तसेच जीवनस्त्रोत, आपल्यातील पाचक अग्नीचे प्रतिनिधित्व करते.
हिंदूंची धारणा अशी आहे की आपण केवळ एकमेकांचे नाव, पत्ता, कुटुंबे आणि मनच यांचे नव्हे तर आपल्या आत्म्यांचे देखील मिलन होत आहे. ही प्रथा इतकी पवित्र कां आहे , कारण या दिवशी आपणास भगवान शिव आणि त्यांची पत्नी देवी पार्वती मानले जाते. तर, आपले मिलन तितकेच अद्वितीय आहे, दैवी आहे! खरं तर, म्हणूनच आपण देवी-देवतांना आवाहन करतो आणि नातेवाईक आणि मित्र परिवारांना आमंत्रित करतो – आपण आणि आपला सोबती यांच्यातील पवित्र आणि दैवी मिलन पाहण्यासाठी.
खोल आणि गंभीर आहे नां हे सर्व ? बरोबर?
होय, ते आहे, आणि ते अभिप्रेत आहे. त्यामुळेच आपल्या जोडीदारासोबतचे आपले मिलन किती महत्त्वाचे आणि पवित्र जाणवते. समस्त हिंदू विवाह विधी प्रतिज्ञा गांभीर्य आणि अनन्यता मान्य करतात – सर्व आस्थेने. त्याच विधीमध्ये, लग्नाची ही सात वचने आपणास आपल्या जोडीदारासोबत कायमचे जोडण्याचा प्रयत्न करतात.
तुम्हाला माहीत आहे कां?
सप्तपदी हा दक्षिण भारतात सर्व कालीन-सन्मानित विधी आहे, तर सात फेरे किंवा अग्नीभोवती सात प्रदक्षिणा
इतर भागांमध्ये, विशेषतः उत्तर भारतात प्रचलित आहे. येथे, जोडपे सात वेळा पवित्र अग्नीची परिक्रमा करतात: हे सात फेरे आयुष्यातील आपले जोडीदारासोबतच्या सात जन्मासाठीचे आपल्या मिलनाचे प्रतीक आहे.
गुजराती विवाहांमध्ये जोडपे केवळ चार वेळा अग्नीभोवती फेरे घेतात. धर्म (धार्मिक मार्ग) अनुसरण करणे, अर्थ (संपत्ती) कमवणे, काम (प्रेम) अनुभवणे आणि मोक्ष (मुक्ती) प्राप्त करणे हे ध्येय आहे.
लग्नाच्या सात प्रतिज्ञा
जेव्हा मी प्रतिज्ञांचा विचार केला, तेव्हा माझा पहिला विचार होता, तो एकदम खाजगी आणि सानुकूलित गोष्टी ज्या आपण चित्रपटांमध्ये पाहतो. हिंदू विवाहाची शपथ थोडी वेगळी आहे कारण आपल्याकडे जोडप्याने लिहिलेली एकवचनी शपथ नाही. त्याचप्रमाणे, जेंव्हा आपण या प्रक्रियेतून जातो, तेंव्हा आपणास सुखद धक्का बसतो – जसे की काल-परीक्षित परंपरेची क्षणिकता आपणास अनुभवास येते. अखेरीस, या प्रतिज्ञांचा सन्मान, त्यांची पुनरावृत्ती यांचे शतकानुशतके पालन केले गेले आहे.
आपल्या कल्पना आणि स्वप्ने लग्नाच्या सात प्रतिज्ञांमध्ये गुंफलेली आहेत, कसे ते पहा…
१. आपण परस्परांना जीवनातील उत्कृष्ट गोष्टी प्रदान करण्याचे वचन देतो: अन्न, शारीरिक व भावनिक पोषण आणि संपत्ती. यामुळे आपल्या सर्व मूलभूत गरजा पूर्ण होतात.
२. आपण परस्परांची काळजी घेण्याचे वचन देतो, एकमेकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आणि सामर्थ्यासाठी प्रार्थना करतो. म्हणून, प्रत्येक वेळी आपली काळजी घेण्यासाठी कोणीतरी असते.
३. या व्रतामध्ये आपण परस्परांबद्धल आपुलकी आणि आवड निर्माण करण्याचे वचन देतो. त्यामुळे आपणास एक चांगली व्यक्ती बनण्यास सक्षम बनवून, आपणास प्रेम वाटते.
४. आपण आजीवन सोबती होण्याचे व्रत करतो. त्यामुळे चांगल्या आणि वाईट काळात आपण एकटे नसतो.
५. आपण प्रगती करण्याची प्रार्थना करता: विचारात आणि कृतीत. भिन्न दृष्टीकोनांमध्ये परस्परांस मान्य मार्ग शोधण्यासाठी.
६. आपण आपल्या मुलांची, कुटुंबाची आणि समाजाची काळजी घेण्याचे व्रत घेतो, त्यांची एकत्र समृद्धी सुनिश्चित करतो. त्यामुळे आपल्या एकत्रित येण्यामुळे सर्वांना लाभ होतो.
७. शेवटी, आपण उदात्त मनाचा अवलंब करण्याचे वचन देतो, एकात्मतेने पवित्र आणि अध्यात्मिक जीवन जगतो. आपण दोघेही जीवनातील तात्विक आणि अध्यात्मिक मार्गावर चालण्यास सहमत आहात. मग पहा, सप्तपदीची वचनबद्धता जोडप्यांच्या सर्व अपेक्षा आणि महत्त्वाकांक्षा स्वीकारतात.
त्यांची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की आपण पाहिलेले तसेच भविष्यात येणारे हरएक स्वप्न प्रतिज्ञांमध्ये समाविष्ट केले आहे: संपत्ती, यश, प्रसिद्धी आणि अध्यात्म शोधणे, पालक बनणे आणि परोपकारी बनणे. या कालातीत व्रतांमध्ये त्या सर्वांचा समावेश आहे: आपला प्रगतीचा आणि आपल्या खास व्यक्तीसोबत कोणत्याही दिशेने पंख पसरण्याचा आपला अधिकार प्राप्त करणे.
सप्तपदीची आख्यायिका
सप्तपदी परंपरा आणि तिची सुरुवात कशी झाली यामागे एक सुंदर कथा आहे. सावित्री आणि सत्यवान यांची कथा.
जेंव्हा तिचा प्रिय पती, सत्यवान, लहान वयात मरण पावतो, तेंव्हा त्याची एकनिष्ठ पत्नी, सावित्री मृत्यूचा देव यमाच्या मागे जाते, कारण तो त्याचा आत्मा वाहून नेतात. जेंव्हा यमाला समजले की ती त्याच्या मागे येत आहे, तेंव्हा त्याने तिला मागे परतण्यास सांगितले. ती उत्तर देते की, ती आधीच त्याच्याबरोबर सात पावले चालली आहे आणि म्हणूनच ती त्याची सोबती बनली आहे. त्याची सोबतीण म्हणून ती त्याच्याशी संभाषण सुरू करते. तिच्या बुद्धीने आणि बुद्धिमत्तेने, तिने स्वतः मृत्यूच्या परमेश्वरावर विजय मिळवला, जो तिच्या पतीला पुन्हा त्याचे जीवन देतो. मैत्री किंवा कोणत्याही नात्याच्या सुरुवातीच्या सात फेऱ्यांचे असे महत्त्व आहे.
प्रेमाचे अस्तित्व आपल्या जीवनात असले तरी मला आश्चर्य वाटते की आपल्या पूर्वजांना दोन लोकांच्या मिलनाबाबत इतकी स्पष्ट दृष्टी होती. जीवनाच्या प्रवासात प्रत्येक व्यक्ती हा मित्र आणि समान जोडीदार असतो हे त्यांना समजले. त्यांनी भिन्न मतांची शक्यता, अडथळे सोडवण्यासाठी संवादाचे महत्त्व आणि कठिण काळात एकमेकांना पूरक आणि समर्थन देण्याची गरज मान्य केली. एवढ्या प्रमाणात की मरण देखील एकत्र आलेल्या आत्म्यांना वेगळे करू शकत नाही.
लग्नाची ही सात वचने केवळ वैयक्तिक प्रतिज्ञा किंवा प्रत्येक जोडीदाराने एक म्हणून जगण्यासाठी स्वीकारलेल्या बंधनांचा उद्देश पूर्ण करत नाहीत. तर अधिक महत्त्व निर्माण करतात कारण ते कालांतराने आणि भविष्यात सभ्यता एकत्र बांधतात. कसे? आपण आपल्या आजोबांशी जोडणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा आपण विचार करू शकता नां? रक्ताची नाती? बरं, हीच, आपण विवाहबद्ध झालो तेंव्हा आपल्याकडूनअसलेली ही एक सामान्य आकांक्षा आहे – जी सप्तपदी विवाह प्रतिज्ञामध्ये समाविष्ट आहे.
लेखिका : अनुषा चेल्लाप्पा
डी के हरी आणि डी के हेमा हरी , भारत ज्ञान संस्थापक यांच्या सप्तपदी मधील माहितीवर आधारित.