ॐ श्री कृष्णः शरणम ममः
हे प्रिय कृष्णा, मी तुला शरण आलो आहे. हे स्वामी, मला तुझ्या आश्रयात घे.
असे म्हटले जाते की श्रीकृष्णाच्या नामाचा जप केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख आणि निराशा दूर होते आणि त्या व्यक्तीला आनंद आणि शांती मिळते. हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानातील प्रत्येक देवाला त्यांच्याशी काही ना काही विशेष गुण जोडलेले आहेत. जेव्हा आपण भगवान शिवाचा विचार करतो, तेव्हा आपले मन ताबडतोब ध्यान करणाऱ्या भगवानांच्या शांत रूपाकडे जाते, ज्यांच्या कपाळावर अर्ध चंद्रकोर आहे.
जेव्हा आपण प्रभू रामाचा विचार करतो तेव्हा आपण त्याच्या विनयशीलता, कर्तव्यपरायणता आणि धार्मिकता या ठळक गुणांचा विचार करतो; आणि आणि दुर्गा देवीची दैवी मत म्हणून कल्पना करतो. तथापि, भगवान कृष्ण हा एक देव आहे ,ज्यांच्याशी संबंधित अनेक वैशिष्टे आहेत. हा तोच देव आहे ज्याने लहानपणी पूतना या राक्षसीचा वध केला आणि आई यशोदेलाही आपल्या मुखात संपूर्ण विश्व दाखवले. लोणी चोरणारा खट्याळ मुलगा , महान सर्प कालियाचा पराभव करणारा, गोपींसोबत नाचणारा आणि थट्टा करणारा आणि नंतर कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाला परम ज्ञान देणारा म्हणूनही तोच स्मरणात आहे.
धर्मग्रंथ सांगतात की प्रत्येक जीवात काही ना काही गुण असतात जे घेऊनच ते जन्माला येतात. आणि, जास्तीत जास्त १६ असू शकतात. आणि या विश्वातील सर्व देवतांपैकी, श्रीकृष्ण हे एकमेव होते ज्यांच्याकडे सर्व १६ गुण होते, ज्यामुळे तो “संपूर्ण अवतार” बनला. या जन्माष्टमीनिमित्त भक्तीचे दैवत भगवान श्रीकृष्णाच्या काही कथा वाचूया.
कथा १: भक्तांचा भक्त
श्रीमद्भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या जन्माविषयी अनेक कथा आहेत. असे म्हटले जाते की परमेश्वराला त्याच्या बालस्वरूपात पाहणे ही सर्वात दुर्मिळ घटना आहे आणि देवही ते रूप पाहण्यासाठी युगानुयुगे प्रतीक्षा करतात. एक प्रचलित कथा अशी आहे की भगवान शिव एका तपस्वीचे रूप घेऊन गोकुळात प्रवेश करतात जेणेकरून त्यांना भगवान कृष्णाचे दर्शन घेता येईल. या संपूर्ण परिस्थितीबद्दल अनेक भजने गायली गेली आहेत. तथापि, यास जोडलेली आणखी एक कथा आहे जी फार कमी लोकांना माहिती आहे.
असे लिहिले आहे की भगवान शिव भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाचे दर्शन घेण्यासाठी ज्या त्रासातून गेले होते, ते पाहिल्यानंतर, नारद ऋषींनी भगवान शिव आणि भगवान श्रीकृष्ण दोघांमध्ये मध्यस्थी केली. भगवान कृष्ण आणि भगवान शिव दोघेही एकमेकांना भगवान म्हणून संबोधत होते आणि आपण दुसऱ्याचे भक्त असल्याचा दावा करत होते याची त्यांना गंमत वाटली. नारद ऋषींनी त्यांना खरोखर कोण कोणाचा भक्त आहे हे जाहीर करण्याची विनंती केली.
भगवान शिवांनी घोषित केले की ते नेहमीच भगवान कृष्णाचे भक्त आहेत आणि त्यांनी घेतलेल्या प्रत्येक अवतारात भगवान शिव त्यांच्या भक्त आणि सेवकाची भूमिका बजावण्यात यशस्वी झाले आहेत. भगवान शिवांनी पुढे असा युक्तिवाद केला की ते भगवान कृष्णाचे सर्वात मोठे भक्त आहेत. यावर भगवान श्रीकृष्ण हसले आणि लगेच उत्तर दिले की भगवान शिव हे त्यांचे भक्त असल्याने ते स्वत: आपोआपच त्यांचे भक्त झाले. ही देवाणघेवाण ऐकून नारद ऋषींनी अश्रूपूर्ण डोळ्यांनी दोन्ही देवांना नमस्कार केला.
भगवान कृष्णाने आपण आपल्या भक्तांचे सेवक आहोत असे म्हटल्याची अनेकांसाठी ही पहिलीच घटना होती. ही घटना श्री कृष्णाबद्दल असलेल्या या श्रद्धेला दुजारा देते की ते संपूर्ण विश्वावर प्रभुत्व गाजवू शकतात परंतु ते नेहमी त्यांच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. जसे भगवान शिव ‘देवों के देव’ (देवांचा देव) म्हणून ओळखले जातात, तसेच भगवान कृष्णाला ‘भक्तों के भक्त’ (भक्तांचे भक्त) म्हणून ओळखले जाते.
कथा २: गोपी आणि वाया गेलेले अन्न
भगवान श्रीकृष्णांबद्दलच्या कथांचा त्यांच्या गोपींच्या भक्तीबद्दल न बोलता उल्लेख करणे कठीण होईल. असे म्हणतात की एके दिवशी सर्व गोपींनी कृष्णाला एक भव्य मेजवानी देण्याचे ठरवले होते. त्यांनी त्यांची घरातील कामे पूर्ण केली आणि नंतर त्यांच्या प्रिय कृष्णासाठी तासन् तास खपून परिपूर्ण स्वयंपाक केला, त्यांनी सर्व पदार्थ सुशोभित भांड्यांमध्ये भरले आणि नंदा घरी (भगवान कृष्णाचे वडील) गेल्या.
जेव्हा त्या घरात गेल्या तेव्हा त्यांनी पाहिले की सर्व पाहुणे बसले आहेत आणि मध्यभागी कृष्ण बसलेला होता, त्यांची आई यशोदा श्री कृष्णाच्या हातावर पाणी घालत होती आणि श्रीकृष्ण हात धुवत होता. जेव्हा पाहुण्यांनी गोपी आणि त्यांनी आणलेले अन्न पाहिले तेव्हा त्यांना अपराधी वाटू लागले, कारण त्यांचे नुकतेच जेवण झाले होते. आपले सर्व प्रयत्न वाया गेलेले पाहून गोपींचे मन दु:खी होईल असे सर्वांना वाटले.
पण, गोपींचे डोळे फक्त भगवान श्रीकृष्णाकडेच होते आणि त्या त्याच्याकडेच बघत राहिल्या. काही सेकंदांनंतर, त्यांनी हातात धरलेले भांडे खाली ठेवले आणि आनंदाने, हात हलवत नाचू लागल्या . नंदराय, आई यशोदा आणि बाकीचे पाहुणे चकित झाले होते की, आपले प्रयत्न वाया गेलेले पाहून आनंद का होत असेल? एका पाहुण्याने हिंमत दाखवून गोपींना त्यांच्या आनंदाचे कारण विचारले.
गोपींनी त्यांचा नाच थांबवला आणि हसत हसत सांगितले की त्यांनी जेवण बनवण्यात जो वेळ घालवला , त्यावेळी त्या जेवण झाल्यावर कृष्णाच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसेल त्याची कल्पना करत राहिल्या. जेव्हा आम्ही घरात प्रवेश केला, तेव्हा आमच्या डोळ्यांना कृष्णाचा चेहरा दिसला आणि त्यांच्या चेहऱ्यावर तेच समाधान दिसले. त्याने कोणाचे अन्न खाल्ले याने काही फरक पडत नाही कारण त्या फक्त ते समाधान बघण्यासाठी जगल्या आणि ते पहाणे हा त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा आनंद होता.
अशा कथांमधून आपल्याला जाणवते की लोकांमध्ये अशी भक्ती निर्माण करणारा भगवान गौरवशाली आहे आणि आपल्या स्वामींप्रती अशी भक्ती करण्यास सक्षम असलेल्या गोपी गौरवशाली होत्या.
कथा ३: भगवान कृष्ण: परिपूर्ण गुरु
भगवान कृष्णाने त्यांच्या मनातली एक खंत व्यक्त करताना म्हटले की, त्यांचे प्रियजन कसे अप्राप्य संकल्प (वचनबद्धता) करायचे आणि मग ते पूर्ण करण्यासाठी श्रीकृष्णाना कसे आकाश पाताळ एक करावे लागायचे. . शेवटी तो भक्तांचा भक्त आहे. असाच एक प्रसंग अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू याच्या वधानंतर घडला. अभिमन्यूला चक्रव्यूह नावाच्या सामरिक चालीत मारले गेले, जिथे त्याला सर्व मुख्य कौरव योद्ध्यांनी मारले. या हालचालीचा विचार दुशालाचा पती जयद्रथ याने केला होता, जी १०० कौरव भावांची एकुलती एक बहीण होती.
अभिमन्यूच्या मृत्यूनंतर, अर्जुनाने शपथ घेतली होती की दुसऱ्या दिवसाच्या सूर्यास्तापर्यंत तो जयद्रथला मारून टाकेल आणि जर तो तसे करू शकला नाही तर तो आत्मदहन करील. त्या रात्री कौरवांना खूप आनंद झाला कारण त्यांचा विश्वास होता की ते युद्ध जिंकले आहेत. त्यांनी जयद्रथला त्यांच्या सैन्याच्या मध्यभागी लपविण्याची योजना आखली होती जेणेकरून अर्जुन त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि, जर काही योगायोगाने, अर्जुनाने जयद्रथला मारण्यात यश मिळविले, तर त्यांच्याकडे आणखी एक हुकमी एक्का होता. जयद्रथचे वडील ऋषी होते आणि त्यांनी आपल्या मुलाला वरदान दिले होते की जयद्रथचा जर कुणी वध केला तर त्याचे हजार तुकडे होतील. या ना त्या प्रकारे अर्जुनाचा मृत्यू निश्चित होता.
म्हणून, दुसऱ्या दिवशी महाभारताचे युद्ध भडकले, अर्जुनाने त्याच्या आणि जयद्रथमध्ये उभे असलेल्या सैनिकांना मारण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. त्या दिवशी त्याने शेकडो आणि हजारो सैनिकांना मारले पण त्याला जयद्रथ दिसत नव्हता. जसजशी संध्याकाळ जवळ येऊ लागली, तसतसे धार्मिकतेच्या बाजूने उभे राहणारे भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या सुदर्शन चक्राचा उपयोग क्षणभर सूर्याला लपवण्यासाठी केला. सूर्यास्त झाल्याचा कौरवांनी विचार केला आणि उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. तेव्हाच जयद्रथ लपून बाहेर आला आणि अर्जुनासमोर खुषिने उभा झाला.
भगवान श्रीकृष्णाने त्यांचे सुदर्शन चक्र परत घेतले आणि सूर्य पुन्हा चमकू लागला. अजून सूर्यास्त झालेला नाही हे लक्षात येताच जयद्रथ घाबरून परत आपल्या बाजुला पळू लागला. अर्जुनाने लगेच जयद्रथला मारण्यासाठी धनुष्य हाती घेतले पण भगवान श्रीकृष्णाने त्याचा हात धरला. त्याने अर्जुनाला जयद्रथचे डोके अशा प्रकारे कापण्याची सूचना केली की ते त्याच्या वडिलांच्या मांडीवर पडेल.
अर्जुनाने आपला बाण सोडला. बाणाने जयद्रथचे डोके कापले आणि त्याचे बळ इतके होते की ते युद्धापासून काही मैल दूर उडून तंतोतंत त्याच्या वडिलांच्या, वृद्धक्षत्राच्या मांडीवर पडले. वृद्धक्षत्र डोळे मिटून बसले होते आणि आपल्या मुलाचे डोके आपल्या मांडीवर पाहून त्यांना धक्काच बसला. त्याच्या लगेच झालेल्या प्रतिक्रियेमुळे जयद्रथचे डोके जमिनीवर पडले. वृद्धक्षत्राने जयद्रथाचे डोके जमिनीवर फेकले असल्याने त्याचेच हजार तुकडे झाले.
या कथेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या गुरूची भूमिका साकारली होती. अर्जुनाने जे काम हाती घेतले होते ते जवळजवळ अशक्य होते. वेळ, ज्ञान आणि सामर्थ्याच्या मर्यादा होत्या ज्यामुळे अर्जुनाच्या शत्रूचे रक्षण होत. परंतु, एका गुरूप्रमाणे, भगवान कृष्णाने अर्जुनाला परिपूर्ण सल्ला दिला होता, त्याला केवळ निश्चित असलेला मृत्यू टाळण्यास मदत केली नाही तर त्याने घेतलेली वचनबद्धता देखील पूर्ण केली.
आपल्या जीवनातही, आपल्या गुरूंचे शहाणपण आणि आशीर्वादच आपल्याला नियतीने आपल्यासमोर आणलेल्या अशक्यप्राय परिस्थितीला पार करण्यास मदत करतात. आनंद आणि दुःख हे जीवनाच्या नाण्याच्या दोन बाजू आहेत ज्यातून आपण सुटू शकत नाही. परंतू, गुरूच्या कृपेने किंवा ज्या देवाची आपण उपासना करतो त्याने आपण आपले जीवन अधिक संतुलीतपणे जगू शकतो, वाटेत येणाऱ्या अडखळ्यांचा कमी परिणाम होतो.
तुम्ही भगवान कृष्णाच्या आणखी न ऐकलेल्या कथा ऐकू शकता आणि आर्ट ऑफ लिव्हिंग अॅपवरील नारद भक्ती सूत्र भाष्यात गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे प्रतीकात्मक वर्णन ऐकू शकता.
आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल.
आपल्या टिप्पण्या द्या @artofliving