श्री गणेशाचा जन्म
कोणत्याही पूजेच्या सुरुवातीला किंवा कोणतीही नवीन गोष्ट सुरु करण्याआधी श्री गणेशाची पूजा कां करतात, हे जाणून धेण्यासाठी श्री गणेश हे कशाचे प्रतीक आहेत, हे जाणून घ्यायला हवे.
श्री गणेशाच्या जन्माची कथा सर्वांना ठाऊक आहेच.श्री गणेशाचा जन्म देवी पार्वतीच्या शरीरावरच्या मळापासून झाला.देवी पार्वती ही प्रत्येक उत्सव तसेच सण यांचे सर्वोच्च प्रतिक आहे. मात्र या प्रतीकामध्ये काही प्रमाणात नकारात्मकता असतेच.मळ हे या नकारात्मकतेचे प्रतीक आहे.जेंव्हा त्या शरीराचा शिव तत्वाशी म्हणजेच अद्वैत तत्वाशी सामना झाला, तेंव्हा त्याचे शीर म्हणजेच अहंकार गळून पडला आणि त्या शीराऐवजी त्याजागी हत्तीचे शीर बसवले गेले.
भगवान शंकराचा आशीर्वाद
कोणत्याही शुभकार्याची,पूजेची सुरुवात श्री गणेश पूजनापासून होईल असा आशीर्वाद स्वत: साक्षात भगवान शंकरांनी दिला आहे.
श्री गणेशाला हत्तीचे शीर आहे. हत्ती हे ज्ञान शक्ती आणि कर्म शक्तीचे प्रतीक आहे.विद्वत्ता आणि सहजता हे त्याचे स्थायी गुण विशेष आहेत. त्याचे अजस्त्र शीर हे बुद्धीमत्ता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. हत्ती कोणत्याही विघ्नाकडे जात नाहीत आणि कोणतेही विघ्न हत्तीला थांबवू शकत नाही.ते सहजतेने ते विघ्न पार करून जातात.म्हणून आपण जेंव्हा या विघ्नहर्ता गणपतीला पूजतो तेंव्हा आपल्यात अंगभूत असलेल्या गुणांमध्ये वृद्धी होते आणि त्याच्यातल्या गुणांचा अंगीकार केला जातो.
म्हणूनच कोणत्याही पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी आपण गणपतीला आवाहन करतो जेणेकरून आपल्या चेतनेमध्ये श्री गणेश तत्व जागृत होईल. यामुळे आपण नकारात्मकतेपासून सकारात्मकतेकडे जातो.
आपण मातीची मूर्ती बनवतो आणि आपल्या आत जे चैतन्य आहे तेच या मूर्तीत काही काळासाठी प्रस्थापित व्हावं अशी प्रार्थना करतो.
श्री गणेश पूजेचे फलित
आपण जेंव्हा श्री गणेशाची आराधना करतो, तेंव्हा आपल्यात सगळे गुण वृद्धिंगत होतात.आपल्याला जेंव्हा आत्मभान येतं, तेंव्हाच आपण ज्ञानाची अनुभूती घेऊ शकतो. जेंव्हा आपल्यात जडत्व, ग्लानी असते, तेंव्हा ज्ञान, हुशारी, चैतन्य, जीवनात पुढे जाण्याची उर्मी यातलं काहीच साध्य होऊ शकत नाही. त्यामुळे आत्मभान येणं अत्यंत जरुरी आहे, आणि त्याची आराध्य देवता आहे श्री गणेश. म्हणूनच प्रत्येक पूजेच्या आधी आपल्या अंतरात्म्याला जागृत करण्यासाठी आपण श्री गणेशाची प्रार्थना करतो.
मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करा. भक्तीभावाने प्रार्थना करा, ध्यान करा आणि श्री गणेशाची स्वत: मध्ये अनुभूती घ्या. गणपती उत्सवाचा हाच हेतू आहे, जेणेकरून आपल्या आंत दडलेलं गणेश तत्व जागृत होईल.
श्री गणेशाच्या प्रतीकांच गुपित जाणून घेण्यासाठी तर येथे क्लिक करा.
श्री गणेश तत्वाचा अंगीकार करा जो आपल्या आयुष्याच्या पदपथावरचा मार्गदर्शक ठरेल आणि आपण सजगतेने कृपेच्या सानिध्यात आयुष्याचे मार्गक्रमण करू शकाल. आपल्या आनंदाच्या प्रवासाची आमच्या सोबत सुरुवात करण्यासाठी येथे क्लिक करा.