आपत्ती मदतकार्य

आपत्तीनंतर आवश्यक सामग्री पुरवणे आणि आघातानंतर मानसिक धक्यातून सावरण्यासाठी त्वरित कार्य करणे. आमच्याबरोबर स्वयंसेवक बना.


दान करा.

icon

रणनीती

आवश्यक सामग्री पुरवणे, मानसिक आघाताचे निवारण आणि दीर्घकालीन पुनर्वसन.

icon

परिणाम

सर्व मोठ्या आपत्तींमध्ये मदत दिली.

icon

व्याप्ती

५.६ दशलक्ष लोकांना लाभ झाला.

आढावा

प्रत्येक आपत्ती मग ती नैसर्गिक असो वा मानवनिर्मित आणि तिची विशिष्ट भौगोलिक स्थिती, तिच्या आव्हानांचा अनोखा संच असतो. आमच्या स्वयंसेवकांच्या जागतिक नेटवर्कद्वारे, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि आमची सह संस्था, द इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हॅल्यूज (IAHV), जगातील विविध भागांमध्ये नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींना त्वरेने प्रतिसाद देण्यास सक्षम आहे. परिणामी, आज दोन्ही संस्थांनी भारतामध्ये आणि जगभरातील अनेक देशांमध्ये अल्पकालीन आणि दीर्घकालीन आपत्ती पुनर्वसन कार्यक्रमांचे महत्त्वपूर्ण प्रदाता म्हणून स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.

एकट्या भारतात, आम्ही २००१ पासून सर्व मोठ्या आपत्तींमध्ये मदत पथके एकत्रित केली आहेत आणि आमच्या प्रयत्नांमुळे १,५०,००० लोकांना मदत मिळाली आहे.

मानसिक धक्क्यातून सावरल्याशिवाय अन्न आणि औषधे उपयोगी नाहीत. लोक जेवू शकत नाहीत किंवा झोपू शकत नाहीत कारण त्यांचे मन त्यांच्यावर झालेल्या भयानक शोकांतिकेने भरलेले आहे. एक बरा करणारा  स्पर्श, आधार  आणि भविष्याबद्दल  एक सकारात्मक  दृष्टी, यामुळे आपत्ती ग्रस्त  त्यांचे जीवन पुन्हा उमेदीने जगण्यास सक्षम होतील.

- गुरुदेव श्री श्री रवि शंकर

योजना

जेव्हा आपत्ती येते तेव्हा आवश्यक सामुग्री उपलब्ध करणे आणि काळजी घेणे याद्वारे आमचे कार्य  सुरू होते. या आपत्कालीन सेवा अन्न, कपडे, औषध आणि निवारा उपलब्ध  करतात. डॉक्टर, समुपदेशक आणि इतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य तज्ञ यांची व्यवस्था करणे या सर्व गोष्टी तात्काळ मदत करण्याचा महत्वाचा भाग बनतात.

ज्यांना गंभीर शारीरिक आणि भावनिक आघात झाला आहे अशा आपत्तींमधून वाचलेल्यांसाठी केवळ भौतिक मदत पुरेशी नाही. मानसिक आघात कमी करणे आणि लोकांना जगण्याची उमेद निर्माण करण्यात  मदत करणे आवश्यक आहे. आमचे ट्रॉमा रिलीफ प्रोग्राम आपद्ग्रस्तांना  श्वासोच्छवासाच्या विविध तंत्राद्वारे त्यांच्या भावना आणि तणावावर प्रक्रिया कशी करावी आणि त्यांचे लक्ष भूतकाळातून भविष्यातील शक्यतांकडे कसे वळवायचे हे शिकवतात.

जेव्हा आपत्तीतून वाचलेल्यांचे शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या पूर्णपणे पुनर्वसन केले जाते तेव्हाच खरे निवारण घडू शकते. शाश्वत उपाय विकसित करण्यात आपद्ग्रस्तांना मदत करण्यासाठी, आमचे जागतिक स्वयंसेवक गावांमध्ये आणि  समाजात, घरे, स्वच्छता व्यवस्था, रस्ते, शाळा, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रे आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे  काम करतात.

आमची रणनीती

icon

त्वरित आधार द्या

भौतिक मदत आणि आपत्कालीन सेवा.

icon

मानसिक आघात निवारण

भावनिक आधार प्रदान करणे.

icon

दीर्घकालीन पुनर्वसन

मूलभूत पायाभूत सुविधांची पुनर्बांधणी.

परिणाम

जगभरातील त्सुनामीग्रस्त भागात व्यापक मदत आणि पुनर्वसन कार्यापासून ते गुजरातमधील भूकंप मदत कार्यापर्यंत, आमच्या स्वयंसेवकांनी आपत्तीग्रस्तांच्या शारीरिक, भावनिक आणि भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी सहानुभूती, वचनबद्धता आणि काळजीने काम केले आहे. अलीकडच्या काळात आम्ही केलेल्या काही कामांमध्ये हे समाविष्ट आहे:

भूकंप

गुजरात भूकंप
भारत (जानेवारी २००१)

बाम भूकंप
इराण (डिसेंबर २००३)

काश्मीर-पाकिस्तान भूकंप
भारत (ऑक्टोबर २००५)

गोरखा भूकंप
नेपाळ (एप्रिल २०१५)

पूर

एल्बे नदीला पूर जर्मनी
(ऑगस्ट २००२)

सुरत पूर भारत
(
ऑगस्ट २००६)

दक्षिण भारतातील पूर मदत
(२००९)

मुंबई पूर भारत
(
जानेवारी २००१)

उत्तराखंड पूर 
(२००५)

चक्रीवादळ

ओरिसा चक्रीवादळ भारत
(ऑक्टोबर १९९९)

ओडिशा चक्रीवादळ फनी
(२०१९)

चक्रीवादळ कॅटरिना

यूएसए (ऑगस्ट २००५)

त्सुनामी

हिंदी महासागर त्सुनामी

(२००४)

तुमच्या पाठिंब्याने आम्ही बरेच काही साध्य करू शकतो.

जीवन पुन्हा सुरू करण्यात मदत करा.

सामाजिक उपक्रमांच्या बहुआयामी दृष्टीकोनाने अनेकांचे जीवन वाचवले आहे, अनेकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणले आहे आणि समुदायांना प्रगतीचा अनुभव घेण्यास मदत केली आहे. सेवा कार्याचा प्रत्येक भाग समर्पित विश्लेषण, विचारपूर्वक काळजी घेऊन तयार केला जातो - मानवता अग्रस्थानी ठेवून.

आता दान करा