Service - VBI Volunteers rejoicing during river rejuvenation project

डायनॅमिझम फॉर सेल्फ अँड नेशन(DSN)

वैयक्तिक अडचणींमधून मुक्तता अनुभवा आणि आंतरिक शक्ती व स्थिरता प्राप्त करा

तुमच्या मनातील अडथळे दूर करा • तुमच्या भीतीवर मात करा • तुमच्यातील शक्ती जागृत करा

*शुल्क आणि वेळ स्थानानुसार बदलू शकते.

नोंदणी करा!

तुमच्या मनाच्या अमर्याद शक्यतांचा अनुभव घ्या.

तुमच्या क्षमतांचा तुम्ही कधी विचार केला नसेल इतका जास्त विस्तार करा.

icon

भीतीवर मात करा

तुम्हाला तुमच्या भीतीवर मात करण्याचे स्वातंत्र्य मिळेल.

icon

स्वतःमध्ये बदल घडवून आणा

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी तुम्ही कोणती भूमिका बजावू शकता याचा शोध घ्या.

icon

तुमची क्षमता ओळखा

तुमच्या स्वतःबद्दल आणि तुमच्या क्षमतांबद्दल असलेल्या धारणा मोडून काढा.

डायनॅमिझम फॉर सेल्फ अँड नेशन (DSN) मध्ये भाग का घ्यावा?

आपल्या सर्वांमध्ये स्वत:च निर्माण केलेले काही अडथळे, जुन्या सवयी किंवा प्रतिबंध असतात जे आपल्याला मागे खेचतात आणि आपल्याला परिपूर्ण जीवन जगण्यापासून रोखतात. तरीही आपल्याकडून जास्तीत जास्त होईल तितके करण्याची आपल्या सर्वांची मनापासून इच्छा असते. - स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी आणि आपल्या सभोवतालच्या जगासाठी.

DSN हे एक कठोर आणि परिवर्तनकारी शिबीर आहे. हे शिबिर त्यात भाग घेणाऱ्यांचे वैयक्तिक प्रतिबंध आणि अडथळे दूर करते. त्यांच्या मनाची स्थिरता आणि सामर्थ्य जागवते आणि त्यांना सक्षम बनवते. सर्व मानसिक बंधनांच्या पलीकडे जाऊन तुमची पूर्ण क्षमता ओळखा.

मुख्य घटक

DSN हे एक कठोर आणि परिवर्तन घडवणारे शिबीर आहे जे सहभागींना त्यांच्या स्वत:च्या मनातील प्रतिबंध आणि अडथळे दूर करण्यात आणि आंतरिक शक्ती ची जाणीव करून देण्यात मदत करते.

icon

शिबिरातील सहभागींना विविध प्रक्रिया आणि चर्चेच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जाते. एक संवेदनशील आणि समजून घेणारे वातावरण तयार करून त्यात सहभागी, वास्तविक जीवनातील परिस्थिती, त्यांच्यावरील प्रतिक्रिया आणि स्वतः मधील भीती आणि प्रतिबंधांवर मात करण्यासाठी विविध उपाय शिकतात.

icon

पद्मसाधना हा योगाभ्यास तुम्हाला तुमच्या आंतरिक शक्तीची जाणीव करून देतो. दररोज सराव केल्यावर, योगासनांचा हा ४५ मिनिटांचा क्रम शांत मन, निरोगी शरीर आणि अधिक शांतता, प्रसन्नता मिळवून देऊ शकतो. आकर्षक योगासनांचा हा संच (योग शृंखला) शरीर आणि मनाला सखोल ध्यानासाठी तयार करण्यास मदत करतो.

icon

प्राचीन ज्ञानाचा खोलवर अभ्यास करणे आणि प्राचीन लोकांच्या चांगल्या जीवनाचे रहस्य पुन्हा जिवंत करणारी ही छोटी व्हिडीओ सत्रे आणि गटचर्चा व्यक्तीच्या जीवनात जाणीवेची नवीन दारे उघडतील आणि उत्तम जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करतील.

icon

तुमच्यातील सामर्थ्य जाणा आणि त्याचा समाजासाठी कसा वापर करू शकता हे जाणून घ्या. समाजात बदल घडवून आणण्यासाठी, अढळ विश्वास आणि त्यात तुमच्या योगदानाचे महत्त्व ओळखा.

संस्थापक

गुरुदेव श्री श्री रवि शंकर

गुरुदेव श्री श्री रविशंकर हे जागतिक मानवतावादी, अध्यात्मिक नेते आणि शांतीदूत आहेत. तणाव मुक्त, हिंसा मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी अभूतपूर्व अशा जागतिक चळवळीचे नेतृत्व ते करतात.

आणखी जाणून घ्या