मोफत शाळाः भारताच्या दुर्गम भागात शिक्षणाचा प्रसार
दुर्गम आदिवासी प्रदेश, ग्रामीण प्रदेश, छोटी शहरे आणि महानगरांमधील वंचित मुलांना मोफत सर्वांगीण शिक्षण देणे.
धोरण
- पालक आणि वडीलधाऱ्यांना शिक्षित करणे
- शिक्षकांना प्रशिक्षण देणे
- औपचारिक शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण
परिणाम
- भारतभरातील १२६२ हून अधिक मोफत शाळांमध्ये ८४,६८९ हून अधिक मुलांना शिक्षण दिले जात आहे.
लिंग गुणोत्तर
- आमच्या शाळांमधील लिंग गुणोत्तर राष्ट्रीय सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे.
आढावा
भारतातील दुर्लक्षित समाजातील मुलांना तणावमुक्त वातावरणात मूल्याधारित सर्वांगीण शिक्षण देणे हे आमचे ध्येय आहे. गेल्या तीन दशकांमध्ये, आर्ट ऑफ लिव्हिंगने शैक्षणिक प्रणालीमध्ये मूल्ये रुजवणारे तसेच उपजीविकेचे पर्याय आणि मुलांसाठी सुरक्षित भविष्य प्रदान करणारे शैक्षणिक प्रकल्प यशस्वीरित्या राबवले आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग सध्या भारतातील २२ राज्यांमधील ८४,६८९ हून अधिक मुलांना सेवा पुरविणाऱ्या १२६२ हून अधिक मोफत शाळा चालवते. आमच्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहेः
- रस्ते आणि वीज उपलब्ध नसलेल्या ग्रामीण भागात, शहरी झोपडपट्ट्या व दुर्गम आदिवासी भागात चालणाऱ्या मोफत शाळा.
- शाळांना दत्तक घेण्याची योजना ज्याद्वारे आम्ही पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळासह सरकारी शाळांना मदत करतो.
- महानगरांमधील झोपडपट्ट्यांमध्ये गुन्हेगारी आणि व्यसनाधीनतेला बळी पडू शकणार्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा.
मोफत शाळा उभारताना आणि चालवताना, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांनी असंख्य आव्हानांचा सामना केला आहे आणि त्यांचे निराकरण केले आहे. आम्हाला यातून जाणीव झाली आहे की आपल्या मुलांना योग्य शिक्षण देणे ही कदाचित मूल्याधारित जीवन जगण्याच्या संपूर्ण चक्रातील सर्वात सोपी प्रक्रिया आहे. तथापि, आजूबाजूच्या समुदायाची मानसिकता बदलणे आणि त्यांना शिक्षणाचे मूल्य समजावणे हे मोठे आव्हानच आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगने मूल्याधारित शिक्षणाच्या क्षेत्रात या बाबतीत ही लक्षणीय कामगिरी केली आहे.
मोफत शिक्षण
एखाद्याला त्याचं भविष्य भेट द्या
प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार आहे. आपण यासाठी मदत करू शकता.
देणगी द्याशाळेतील (बेंगळूरूमधील मोफत शाळा) सर्व शिक्षक खूप चांगले आहेत. माझ्याबद्दल माझ्या गांववाल्यांना माझा खूप अभिमान वाटतो. (आणि त्यांच्या मुलांना शाळेत पाठवतात)
प्रियांका एन.
बेंगळूरू मेट्रोलाईनची प्रथम ड्रायव्हर, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मोफत शाळेची माजी विद्यार्थिनी
जर मी मेघालयातच राहिले असते तर माझे बालपणातच लग्न झाले असते. येथे मला शिक्षण मिळाले आणि मग मला वाटू लागले आहे की मी जीवनात काहीतरी प्राप्त करू शकेन.
रिदालीन लिंगडो
आर्ट ऑफ लिव्हिंगची माजी विद्यार्थिनी, बेंगळूरू
मी गवंडी आहे. मी माझ्या मुलीची शाळेची फी भरू शकत नाही. श्री श्री ज्ञान मंदिरने माझ्या मुलीला मोफत आणि मूल्याधारित शिक्षण देण्यास मदत केली, शाळेतील तणावमुक्त, प्रेमळ, कार्यप्रेरित आणि मूल्याधारित…
अजित जाधव
पालक, श्री श्री ज्ञान मंदिर, शिंगणापूर, ता. माण, जि. सातारा
आव्हाने
भारताची जवळजवळ ४०% लोकसंख्या १८ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. एप्रिल २०१० मध्ये, शिक्षणाला प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार बनवणाऱ्या १३५ देशांच्या गटात भारत सामील झाला. शिक्षणाच्या अधिकाराची अंमलबजावणी करणे आणि भारतातील सुमारे ५० कोटी लोकांना शिक्षण देणे हे एक कठीण काम आहे. देशातील सर्वात पात्र मुले आणि तरुणांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग, सरकार आणि इतर संस्थासोबत मिळून हे आव्हान पूर्ण करत आहे. असा अंदाज आहे की भारतात सुमारे ९६% मुले प्राथमिक शिक्षण सुरू करतात, ७२% पाचवी पूर्ण करतात, ५७ % आठवी पूर्ण करतात आणि केवळ ३७% दहावी पूर्ण करतात.
आमच्या काही आव्हानांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहेः
- विविध सामाजिक-आर्थिक समस्यांमुळे पालक त्यांच्या मुलांची शाळेत नोंदणी करत नाहीत.
- थोड्या दिवसांच्या उपस्थितीनंतर घरगुती दबावामुळे मुले शाळा सोडतात.
- शिक्षणासोबतच वैयक्तिक, सामाजिक आणि आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असल्यामुळे, विद्यार्थ्यांची कामगिरी कालांतराने कमी होते.
- आणखी चांगल्या व्यावसायिक संधींसाठी शिक्षक नोकरी सोडू शकतात
या आव्हानांवर मात करण्यासाठी आम्ही काही नाविन्यपूर्ण उपाय शोधले आहेत. आमच्या जोखीम कमी करण्याच्या धोरणात आम्ही एक सर्वसमावेशक दृष्टीकोन अंगिकारला आहे. ज्यामध्ये केवळ मुलेच नव्हे तर त्यांचे पालक, आसपासचा समाज आणि शिक्षक या सर्वांची भुमिका आहे.
≈ ६६%
*2016 मधील शिक्षण दर
भारतातील कमी शिक्षित लोक
5 वर्षांपेक्षा कमी शालेय शिक्षण असलेले लोक
≤ ३७%
प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश घेणार्या एकूण विद्यार्थ्यांपैकी
दहावी पूर्ण करतात
भारतात शालेय शिक्षण मध्येच सोडून देण्याचे प्रमाण जास्त आहे
शिक्षण हे सांस्कृतिक समतेचे सर्वात मोठे साधन आहे. त्यात अति दुर्बलांनाही सक्षम करण्याची, जगात शांतता आणण्याची आणि गरीबी दूर करण्याची शक्ती आहे. बऱ्याचदा त्याकडे आनंदाच्या शोधातील एकमेव प्रकाशमय पथ म्हणून पाहिले जाते.
- गुरूदेव श्री श्री रवि शंकर
धोरण
आमचे शैक्षणिक प्रकल्प राबवण्यासाठी आम्ही एक सुस्पष्ट धोरण अवलंबतो. हे धोरण किंवा रणनीती काळानुसार विकसित करून अधिक कार्यक्षम बनवली आहे. हे धोरण तीन स्तंभांवर आधारित आहेः
समाजासोबत सक्रिय संवाद ठेवणे : मुलांनी नियमितपणे शाळेत यावे यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग सक्रियपणे समाजातील प्रभावशाली लोकापर्यंत पोहोचते. मुलांना शिकवण्यापूर्वीच आम्ही त्यांच्या पालकांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना शिक्षणाचे महत्त्व शिकवतो. शाळेतील शिक्षकांची निवड आसपासच्या समाजातूनच केली जाते आणि समाजाशी असलेले नाते मजबूत आहे हे सुनिश्चित करण्यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षण दिले जाते. यामुळे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी होते.
मोफत शिक्षण देणेः आमच्या शाळांमधील बहुसंख्य विद्यार्थी कुटुंबातून पहिल्यांदाच शिक्षण घेणार्या पिढीतील आहेत ज्यांची पार्श्वभूमी अत्यंत हलाखीची असते. मुलांना शाळेपासून दूर ठेवणाऱ्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक अडथळ्यांना तोंड देताना आर्ट ऑफ लिव्हिंग दुर्बल घटकांमधील मुलांना मोफत आणि मूल्याधारित शिक्षण प्रदान करते.
मूल्याधारित शिक्षणः आर्ट ऑफ लिव्हिंग शाळांमध्ये मुलांचे सर्वांगीण संगोपन होते. औपचारिक शिक्षणासोबतच मुलांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि परस्पर संवाद कौशल्य असे विविध जीवन कौशल्य बळकट करणे तसेच भक्कम मानवी मूल्ये आणि ध्यान प्रक्रियांद्वारे आध्यात्मिक उन्नती साधणे हे आमच्या शैक्षणिक धोरणाचे एक प्रमुख उद्दीष्ट आहे. याचा परिणाम म्हणून, कौटुंबिक मूल्ये बळकट होतात आणि प्रगतीशील दृष्टीकोनामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक अडथळे कमी होतात.
समाजासोबत सक्रिय संवाद ठेवणे
आसपासच्या समुदायातून शिक्षकांची निवड आणि प्रशिक्षण
मोफत शिक्षणाची तरतूद
बहुतांश मुले ही कुटुंबातून पहिल्यांदाच शिक्षण घेणार्या पिढीतील आहेत.
मूल्य-आधारित शिक्षण पद्धत
आत्मविश्वास, नेतृत्व कौशल्य, परस्पर संवाद कौशल्ये आणि आध्यात्मिक साधने विकसित करणे.
कुटुंबातून पहिल्यांदाच शिक्षण घेणार्या मुलांसाठी मोफत शिक्षण
आर्ट ऑफ लिव्हिंग आजपर्यंत १,००,००० पेक्षा जास्त मुलांना मोफत शिक्षण दिले आहे. त्या पैकी बहुतांश मुलांच्या बाबतीत त्यांच्या घरातून ही पहिलीच पिढी असेल जी शाळेत जात आहे.
देणगी द्यापरिणाम
या क्षेत्रातील आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाचे परिणाम म्हणून आज आर्ट ऑफ लिव्हिंगच्या १२६२ पेक्षा अधिक शाळा कार्यरत आहेत. ज्या मधून भारतातील २२ राज्यामधील आदिवासी प्रदेश, ग्रामीण भाग तसेच शहरी झोपडपट्टी भागातील १,००,००० पेक्षा अधिक मुलांना मोफत शिक्षण दिले जात आहे. आमच्या या शाळांचे काही ठळक वैशिष्ट्ये:
- बहुतेक मुले ही कुटुंबातून पहिल्यांदाच शिक्षण घेणार्या पिढीतील आहेत.
- आमच्या अनेक शाळा, अशा भागात आहेत जिथे आणखी सरकारी शाळा पोचल्या नाहीत.
- विद्यार्थ्यांना मोफत कपडे, बूट, पुस्तके, लिखाण साहित्य,बस सेवा आणि दररोजचे मध्यान्ह भोजन दिले जाते.
- आम्ही विद्यार्थ्यांना निरोगी शरीर व उत्साही मनासाठी योग, ध्यान, क्रीडा सोबतच नृत्य, संगीत, रेखाचित्र, चित्रकला सारख्या रचनात्मक उपक्रमांचे ही शिक्षण देतो.
- आमच्या शाळांमध्ये लिंग गुणोत्तर, ४८ मुली : ५२ मूले असे आहे, जे की राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.
- आजपर्यंत आम्ही सुमारे १,५०० शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे.
१,००,०००
पेक्षा अधिक मुलांना
मोफत शिक्षण दिले जात आहे
१,२६२
पेक्षा अधिक शाळा
भारताच्या २२ राज्यांमध्ये कार्यरत आहेत
२,०००
शिक्षकांना
प्रशिक्षण दिले.
४८ : ५२
मुली जसे मुलांचे
गुणोत्तर जे राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे
आमच्या प्रकल्पामधे सहभागी व्हा
एक हास्य भेट दया
वंचित मुलांसाठी आमचा शिक्षण कार्यक्रम हा आमच्या सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे. कोणत्याही समाजात दीर्घकाळ टिकणाऱ्या सुधारणा करायच्या असतील तर त्यासाठी शिक्षण हाच मार्ग आहे.
देणगी द्या