गुरुदेव श्री श्री रवि शंकर

जागतिक मानवतावादी आणि आध्यात्मिक नेता

अधिकृत संकेतस्थळ

गुरुदेव श्री श्री रवि शंकर हे जागतिक मानवतावादी नेते, आध्यात्मिक शिक्षक आणि शांती दूत आहेत. तणावमुक्त, हिंसामुक्त समाजाच्या त्यांच्या संकल्पनेने, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेवा प्रकल्प आणि शिबीरांच्या माध्यमातून जगभरातील कोट्यवधी लोकांना एकत्र केले आहे.

प्रारंभ

१९५६ साली दक्षिण भारतात जन्मलेले गुरुदेव श्री श्री रवि शंकर हे एक प्रतिभावान बालक होते. वयाच्या चौथ्या वर्षी ते भगवद्गीता या प्राचीन संस्कृत ग्रंथातील काही भागांचे पठण करू शकले आणि अनेकदा ते गहन ध्यानात बसलेले दिसत. गुरुदेवांचे पहिले शिक्षक पं. सुधाकर चतुर्वेदी यांचा महात्मा गांधींशी प्रदीर्घ संबंध होता. १९७३ मध्ये वयाच्या सतराव्या वर्षी गुरुदेवांनी वैदिक साहित्य आणि भौतिकशास्त्र या दोन्ही विषयांत पदवी घेतली होती.

"जीवन पूर्णपणे जगणे हे आर्ट ऑफ लिव्हिंगचे तत्त्व आहे. ती संस्थेपेक्षा जास्त एक चळवळ आहे. स्वतःमध्ये शांतता शोधणे आणि आपल्या समाजातील - विविध संस्कृती, परंपरा, धर्म, राष्ट्रीयत्वाच्या लोकांना एकत्र करणे हा याचा महत्वाचा भाग आहे आणि सर्वत्र मानवी जीवनाचे उत्थान करणे हे आपले एकच ध्येय आहे ह्याची आठवण करून देणे."

- गुरुदेव श्री श्री रवि शंकर

आर्ट ऑफ लिव्हिंग आणि मानवी मूल्यांसाठी जागतिक संघटना (IAHV) यांची स्थापना

गुरुदेवांनी आर्ट ऑफ लिव्हिंग ही आंतरराष्ट्रीय, ना-नफा, शैक्षणिक आणि मानवतावादी संस्था म्हणून स्थापन केली. त्यांच्या शैक्षणिक आणि स्वयं-विकास शिबिरांमध्ये मानसिक ताण दूर करून निरामय जीवन जगण्यासाठी काही प्रभावी साधना शिकवल्या जातात. केवळ एका विशिष्ट स्तरातील लोकांपुरतेच मर्यादित न राहता, या साधना पद्धती जागतिक स्तरावर आणि समाजाच्या सर्व स्तरांवर प्रभावी ठरल्या आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्यक्रम सध्या १८० देशांमध्ये शिकवले जातात. १९९७ मध्ये गुरुदेवांनी आर्ट ऑफ लिव्हिंगची सहसंस्था ‘इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज- IAHV’ ची स्थापना केली. IAHV ही कायमस्वरूपी विकास प्रकल्पांमध्ये सहभाग घेते, मानवी मूल्यांची जोपासना करते आणि संघर्ष निवारण करते.

सेवेसाठी प्रेरणा आणि ज्ञानाचे वैश्विकीकरण

Gurudev at an evening of wisdom, music and meditation in Washington DC

एक प्रख्यात मानवतावादी नेता असलेल्या गुरुदेवांच्या शिबिरांमुळे विविध पार्श्वभूमीतील लोकांना मदत झाली आहे. जसे नैसर्गिक आपत्तींचे बळी, दहशतवादी हल्ले आणि युद्धातून वाचलेले लोक, उपेक्षित लोकसंख्येतील मुले आणि संघर्षग्रस्त समुदाय, इ. तसेच त्यांच्या संदेशातून प्रेरणा घेऊन अध्यात्मावर आधारित सेवेची एक लाट निर्माण झाली आहे व मोठ्या संख्येने स्वयंसेवक जगभरातील संवेदनशील भागातील या प्रकल्पांना पुढे घेऊन जात आहेत.

एक आध्यात्मिक शिक्षक म्हणून, गुरुदेवांनी योग आणि ध्यानाची परंपरा पुनरुज्जीवित केली आहे आणि त्यांना २१ व्या शतकाशी सुसंगत स्वरूपात दिली जात आहे. प्राचीन ज्ञानाचे पुनरुज्जीवन करण्यापलिकडे, गुरुदेवांनी वैयक्तिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी नवीन तंत्रे तयार केली आहेत. ह्या मध्ये सुदर्शन क्रिया समाविष्ट आहे त्यामुळे लाखो लोकांना तणावातून मुक्त होण्यास आणि दैनंदिन जीवनात उर्जेचे आंतरिक भंडार आणि आंतरिक शांतता शोधण्यात मदत झाली आहे.

एक शांततेची मूर्ती

Gurudev Sri Sri Ravi Shankar peace meditation

शांततेचे दूत म्हणून, गुरुदेवांनी जगभरातील संघर्ष निवारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, जसे ते सार्वजनिक मंचांवर आणि जगभरातील संमेलनांमध्ये त्यांच्या अहिंसेच्या (हिंसामुक्त समाज) उद्दीष्टांचा विनामूल्य प्रसार करतात. शांततेचे एकमेव उद्दिष्ट असलेली तटस्थ व्यक्ती म्हणून तसेच संघर्षग्रस्त लोकांसाठी ते आशेचा एक किरण म्हणून ओळखले जातात. कोलंबिया, इराक, आयव्हरी कोस्ट, काश्मीर आणि बिहारमध्ये विरोधी पक्षांना वाटाघाटीच्या मंचावर आणण्याचे विशेष श्रेय त्यांना मिळाले आहे. आपल्या पुढाकारातून आणि भाषणांद्वारे, गुरुदेवांनी मानवी मूल्यांना बळकटी देण्यावर आणि आपण एका जागतिक कुटुंबाचे भाग आहोत यांची जाणीव करून देण्यावर सातत्याने भर दिला आहे. आंतरधर्मीय सौहार्द वाढवणे आणि धर्मांधतेवर उपाय म्हणून बहु-सांस्कृतिक शिक्षणाचे आवाहन करणे हे कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे महत्त्वपूर्ण भाग आहेत.

गुरुदेवांनी मानवी मूल्ये आणि सेवेचे पुनर्जागरण करून जगभरातील लाखो लोकांच्या जीवनाला स्पर्श केला आहे. वंश, राष्ट्रीयता आणि धर्म यांच्या पलीकडे जाऊन गुरुदेवांनी तणाव आणि हिंसाचारापासून मुक्त अशा एका वैश्विक कुटुंबाचा (वसुधैव कुटुंबकम) संदेश पुन्हा जागृत केला आहे.

Gurudev Sri Sri Ravi Shankar

गुरुदेवांना भेटा

गुरुदेव श्री श्री रवि शंकर यांच्यासोबत आगामी कार्यक्रम

 

Smiling young people enjoying a program session

सुदर्शन क्रिया शिका

गुरुदेवांचे जगाला दिलेले सर्वात अनोखे दान.

 
meditation during happiness program

मार्गदर्शित ध्यान

ध्यान साधे, सोपे आणि सर्वांना सुलभ केले!