हॅपीनेस प्रोग्राम
जगातील सर्वात प्रभावी अशी श्वासोच्छवासाची प्रक्रिया- सुदर्शन क्रिया™ आत्मसात करा, जगभरातील ४.५ कोटी लोक याचा नियमित सराव करतात
ताण-तणाव दूर करा • नातेसंबंध सुधारा • रोगप्रतिकार शक्ति वाढवा
*आपल्या योगदानाचा आपल्याला आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अनेक सामाजिक प्रकल्पांना फायदा होतो.
नोंदणी करामला या शिबिरातून काय मिळेल?
अधिक मनःशांती
मन शांत करण्यासाठी आणि आपल्या दैनंदिन जीवनात अधिक शांती आणि आनंद आणण्यासाठी प्रभावी प्रक्रिया.
अधिक ऊर्जा
थकवा कमी करून उर्जेची उच्च पातळी अनुभवा. आपण दिवसभरासाठीची ठरवलेली सर्व उद्दिष्टे पूर्ण करूयात.
ताण-तणाव आणि चिंता दूर करा
ताण-तणाव कमी करण्यासाठी, चिंता निवारण करण्यासाठी आणि आव्हानांमध्येही सहज राहण्यासाठी वैज्ञानिक मार्ग जाणून घ्या.
आपल्या मनावर ताबा
आधुनिक जीवनातील चढ-उतारांना सामोरे जाण्यासाठी या शिबीरामध्ये गुपिते/युक्ती सांगितली जातात. अधिक जागृत व सूज्ञतेने जीवन जगायला शिका.
आयुष्य बदलवणारा अनुभव
सुदर्शन क्रिये™ बद्दल विज्ञान काय सांगते?
स्वतंत्रपणे संशोधन केलेल्या आणि जागतिक स्तरावर प्रकाशित झालेल्या १०० हून अधिक शोध लेखांनुसार फायदे असे आहेत:
▴ ३३%
६ आठवड्यांमध्ये वाढ
रोगप्रतिकारक शक्ति
▴२१%
१ आठवड्यात वाढ
जीवनात समाधान
जीवन परिवर्तनीय
एक सोपी श्वसन प्रक्रिया जिच्यामुळे आपली चिंता ४४% नी कमी होते.
शरीरामध्ये सुसंवाद बिंबवण्यासाठी सुदर्शन क्रिया मदत करते.
संस्थापक
गुरुदेव श्री श्री रविशंकर
गुरुदेव श्री श्री रविशंकर हे जागतिक मानवतावादी, अध्यात्मिक नेते आणि शांतीदूत आहेत. तणाव मुक्त, हिंसा मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी अभूतपूर्व अशा जागतिक चळवळीचे नेतृत्व ते करतात.
आणखी जाणून घ्यामी शिबिरासाठी नोंदणी करू इच्छितो परंतु …
या प्रक्रियेचे काही दुष्परिणाम आहेत का?
एक अविरत हास्य हा एकमेव परिणाम आहे ! 🙂 जागतिक स्तरावर लाखो लोक सुदर्शन क्रिये™चा नियमित सराव करतात, ज्याचे आरोग्यासाठीचे लाभ सर्वसंमत आहेत.
आमच्या प्रक्रियांचा सराव करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. तुम्हाला दमा, उच्च रक्तदाब, हृदयाच्या समस्या आणि पाठदुखी यापैकी काही विकार असल्यास आम्ही सत्रादरम्यान तुम्हाला वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करू.
या प्रक्रियेमुळे माझे आरोग्य सुधारेल का?
होय, नक्कीच! सुदर्शन क्रिये™ची नियमित साधना झोप सुधारण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि तणाव आणि नैराश्याची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.. कार्यशाळेचा लाभ घेतलेल्या लोकांची प्रशंसापत्रे वाचून बघा. तुमचे आजार किंवा व्याधी तुमच्या शिक्षकांना आधीच सांगा जेणेकरून ते तुम्हाला चांगला आणि तुमच्यासाठी योग्य असा अनुभव देऊ शकतील !
तुम्ही शुल्क कां आकारता?
पहिले कारण म्हणजे, तुम्ही तुमचा वेळ कार्यशाळेला देण्यासाठी वचनबद्ध राहता. दुसरे कारण म्हणजे, तुम्हाला जीवनावश्यक कौशल्ये शिकवण्याव्यतिरिक्त, तुमची ही देणगी भारतातील अनेक सेवा प्रकल्पांसाठी निधी म्हणून वापरली जाते. उदाहरणार्थ, ७०,००० आदिवासी मुलांना शाळेत पाठवणे, ४३ नद्यांचे पुनरुज्जीवन करणे, २,०४,८०२ ग्रामीण तरुणांना उपजीविकेच्या कौशल्याने सक्षम करणे आणि ७२० गावांमध्ये सौर दिवे लावणे या सेवा अशा देणग्यातूनच शक्य झाल्या आहेत.
मला कोणताही तणाव नाहीये. मग मी या कार्यशाळेत का सामील व्हावे?
तुम्ही तणावग्रस्त नसलात तर उत्तमच ! तुम्ही उत्तम जीवन जगत आहात. पण जरा याचा विचार करा: जेव्हा तुमचे पैसे संपायला लागतात तेव्हा तुम्ही पैसे वाचवायला सुरुवात करता का? की तुमची तब्येत बिघडल्यावरच व्यायाम सुरू करायचा? नाही नां ? जेव्हा गरज पडेल अशा वेळी वापरण्यासाठी मानसिक बळ व सामर्थ्याचे आंतरिक साठे तयार करावे असे तुम्हाला वाटते का ? अर्थात, हा तुमचाच निर्णय आहे. तुम्ही तणावग्रस्त होण्याची वाट बघू शकता; ही कार्यशाळा तुम्हाला मदत करण्यासाठी तेव्हाही तत्पर असेल.