meditation yoga - smiling young woman near a lake

हॅपीनेस प्रोग्राम फॉर यूथ

आनंदाचे रहस्य आपल्या श्वासात आहे.

२२-३५ वर्षे वयोगटासाठी

दररोज २-३ तास अशाप्रकारे ३ दिवस किंवा ६ दिवसांचे शिबिर

*तुमचे योगदान, तुम्हाला आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सामाजिक योजणांसाठी लाभदायक आहे.

नोंदणी करा!

मला या शिबिरातून काय मिळेल?

icon

स्थिर, केंद्रित आणि शांत मन

मन शांत करण्यासाठी आणि तुमच्या दैनंदिन जीवनात अधिक शांती आणि आनंद आणण्यासाठी प्रभावी प्रक्रिया जाणून घ्या.

icon

अधिक ऊर्जा

थकवा नाहीसा करून उर्जेची उच्च पातळी अनुभवा. तुम्ही दिवसभरासाठीची ठरवलेली सर्व उद्दिष्टे पूर्ण करा.

icon

ताण-तणाव आणि चिंता मुक्त जीवन

तणाव कमी करण्यासाठी, चिंता कमी करण्यासाठी आणि आव्हानांमध्येही सहज राहण्यासाठी संशोधनावर आधारित मार्ग प्राप्त करून घ्या.

icon

आपल्या मनावर प्रभुत्व

जीवनातील चढ-उतारांना सामोरे जाण्यासाठी या शिबीरामध्ये रहस्य सांगितली जातात. अधिक जागृत व सूज्ञपणाने जीवन जगायला शिका.

हे नेमके कसे शक्य होते?

सुदर्शन क्रिया™ हा आनंद अनुभूति / हॅपीनेस शिबिराचा गाभा आहे. या श्वासोछ्ववासाच्या प्रक्रियेमध्ये श्वासाच्या अशा विशिष्ट नैसर्गिक लयींचा समावेश आहे, ज्यामुळे शरीर, मन आणि भावना यांच्यात सुसूत्रता येते. ही प्रक्रिया तणाव, थकवा आणि क्रोध, निराशा आणि नैराश्य यासारख्या नकारात्मक नष्ट करते, आणि तुम्हाला शांत तरीही उत्साही, केंद्रित तरीही आरामशीर वाटते.

या शिबीरामध्ये काय समाविष्ट आहे ?

  • सुदर्शन क्रिया™
  • आधुनिक जीवनातील चढ-उतारांना सामोरे जाण्यासाठी प्राचीनकालीन ज्ञान
  • उर्जेचे रहस्य

संस्थापक

गुरुदेव श्री श्री रवि शंकर

गुरुदेव श्री श्री रविशंकर हे जागतिक मानवतावादी, अध्यात्मिक नेते आणि शांतीदूत आहेत. तणाव मुक्त, हिंसा मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी अभूतपूर्व अशा जागतिक चळवळीचे नेतृत्व ते करतात.

आणखी जाणून घ्या

मी शिबिरासाठी नोंदणी करू इच्छितों परंतु…

या प्रक्रियेचे काही दुष्परिणाम आहेत का?

एक निरंतर हास्य हा एकमेव दुष्परिणाम आहे ! 🙂 जागतिक स्तरावर लाखो लोक सुदर्शन क्रिये™ चा नियमित सराव करतात, ज्याचे आरोग्यासाठीचे लाभसिद्ध झालेले आहेत.

आमच्या प्रक्रियांचा सराव करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. तुम्हाला दमा, उच्च रक्तदाब, हृदयाच्या समस्या अथवा पाठदुखी इत्यादि व्याधी असल्यास, आम्ही सत्रादरम्यान तुम्हाला वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करू.

या प्रक्रियेमुळे माझे आरोग्य सुधारेल का?

होय, नक्कीच! सुदर्शन क्रिया™ ची नियमित साधना झोप सुधारण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि तणाव व नैराश्याची पातळी कमी करण्यासाठी नावाजली गेली आहे. या कार्यशाळेचा लाभ घेतलेल्या लोकांची ही प्रशंसापत्रे वाचून बघा. तुमचे आजार किंवा व्याधी तुमच्या शिक्षकांना कार्यशाळेच्या सुरवातीलाच सांगा जेणेकरून ते तुम्हाला चांगला आणि तुमच्यासाठी योग्य असा अनुभव देऊ शकतील!

तुम्ही शुल्क का आकारता?

पहिले कारण म्हणजे, तुम्ही तुमचा वेळ कार्यशाळेला देण्यासाठी वचनबद्ध राहाता. दुसरे कारण म्हणजे, तुम्हाला जीवनावश्यक कौशल्ये शिकवण्याव्यतिरिक्त, तुमची ही देणगी भारतातील अनेक सेवा प्रकल्पांसाठी निधी म्हणून वापरली जाते. उदाहरणार्थ, ७०,००० आदिवासी मुलांना शाळेत पाठवणे, ४३ नद्यांचे पुनरुज्जीवन करणे, २,०४,८०२ ग्रामीण तरुणांना उपजीविकेच्या कौशल्याने सक्षम करणे आणि ७२० गावांमध्ये सौर दिवे लावणे अशा सेवा या शुल्कातून शक्य झाल्या आहेत.

मला कोणताही तणाव नाहीये. मग मी या कार्यशाळेत का सामील व्हावे?

तुम्ही तणावग्रस्त नसाल तर उत्तमच! तुम्ही उत्तम जीवन जगत आहात. पण जरा याचा विचार करा: जेव्हा तुमचे पैसे संपायला लागतात तेव्हाच तुम्ही पैसे वाचवायला सुरुवात करता का? अथवा, तुमची तब्येत बिघडल्यावरच व्यायाम सुरू कराळ का? नाही ना? जेव्हा गरज पडेल अशा वेळी वापरण्यासाठी मानसिक बळ व सामर्थ्याचे आंतरिक साठे तयार करावे असे तुम्हाला वाटते का ? अर्थात, हा तुमचाच निर्णय असणार आहे. तुम्ही तणावग्रस्त होण्याची वाट बघू शकता; ही कार्यशाळा तुम्हाला मदत करण्यासाठी तेव्हाही तत्पर असेल.