क्रोध म्हणजे काय आणि त्याने काय होते ते आपल्याला माहित आहे. राग आपले नाते संबंध बिघडवू शकतो, आपल्याला हानी पोहोचवू शकतो आणि आपल्या आत्मसन्मानाला ठेच लावू शकतो, हे आपण ऐकलेले आहे.  ज्यांनी अति क्रोध अनुभवला आहे त्यांनी लाखों वेळा ऐकले आहे की ‘रागावू‘ नको.’ फार थोड्या लोकांना कसे रागवायचे नाही ते कळले असेल. आज आपण क्रोधवर नियंत्रण कसे करावे हे बघणार आहोत.

  1. आपण रागवा,ओरडा, बेचैन व्हा, पण ते पाण्यावर मारलेली रेघ जितका वेळ टिकते, तितकाच वेळ ते असेल तर चांगले आहे.

  2. राग निरर्थक आहे कारण तो नेहमीच पूर्वी होऊन गेलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल असतो.

  3.  आपले हसणे स्वस्त करा आणि रागावणे महाग करा.

  4. राग ही एक शिक्षा आहे जी दुसऱ्याच्या चुकीसाठी स्वतःला देत आहात! पहा गुरुदेव याबद्दल बोलतात:

  5. चूक ही केवळ चूक म्हणून पहा, ‘माझी’ किंवा ‘त्याची’ चूक म्हणून नव्हे. ‘माझी चूक’ म्हणजे आत्मग्लानी; “त्याची/तिची चूक” म्हणजे राग.

  6. लोभ,असो, राग,मत्सर, द्वेष किंवा निराशा असो. या सर्व नकारात्मक भावना योगाद्वारे  आपण सुधारू  शकतो.

  7. कोणत्याही गोष्टीत परिपूर्णता, अचूकपणा असण्याची इच्छा हे रागाचे कारण असते. चुकीसाठी थोडीशी जागा ठेवा. कोणतीही कृती पूर्णपणे अचूक असणे अशक्य आहे.

  8. रागावर आपले नियंत्रण असेल आणि तो क्वचितच वापरला तर त्याचा उपयोग होतो.

  9. आधीच घडून गेलेल्या एखाद्या गोष्टीवर रागावण्याचा काहीच उपयोग नाही. तुम्ही फक्त तसे पुन्हा होणार नाही याची काळजी घेऊ शकता. 

    World Meditates with Gurudev

    on

    World Meditation Day

    21st December 2025 | 8:30 PM (IST)

    Be a part of a World Record-Breaking event!

     
    *
    *
    *
    *
    *