कर्म योग
युवा नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम
समाजात बदल घडवून आणण्यासाठी आत्मविश्वास आणि आंतरिक शक्तीने जगा.
शिबिराचे फायदे
एक असा नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम ज्याने लाखांहून अधिक तरुणांना त्यांच्या जीवनात आणि समाजात बदल घडवून आणण्यास मदत केली आहे.
आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जा
आव्हानांवर मात करण्यासाठी आणि तुमचे ध्येय गाठण्यासाठी तुमची खरी क्षमता आणि आत्मविश्वास यांचा शोध घेण्यास ही कार्यशाळा मदत करेल.
नेतृत्व करा
आर्ट ऑफ लिव्हिंग सोबत काम करा आणि नद्यांचे पुनरुज्जीवन करणे, शौचालये आणि शाळा बांधणे आणि यासारख्या बऱ्याच मूलभूत उपक्रमांचे नेतृत्व करा.
छोटेसे उद्योजक बना
कार्यक्रमानंतर तुम्ही आमच्यासोबत छोटेसे उद्योजक बनण्याचा पर्याय निवडू शकता. आम्ही त्यासाठी प्रशिक्षण, उत्पादने, सेवा आणि एक संधी तुम्हाला उपलब्ध करून देवू.
आदर्श गाव तयार करा
एक आनंदी आणि समृद्ध गाव बनवण्यासाठी आणि बदल घडवून आणण्याचा पाया तयार करण्यासाठी परिवर्तनासाठी काय आवश्यक आहे ते जाणून घ्या.
ग्रामीण युवा सक्षमीकरण कार्यक्रम
हा कार्यक्रम ताण , व्यवस्थापन, संवाद सुधारणे आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ग्रामीण तरुणांना त्यांच्या जीवनाचा स्वतः ताबा घेण्यास मदत करतो.
खास महिलांसाठी, महिला नेतृत्व प्रशिक्षण शिबिर (महिला युथ लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्रम WLTP) ची वैशिष्टे
स्वसंरक्षण प्रशिक्षण
मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची आरोग्याची काळजी
महिलांशी संबंधित शासकीय योजना आणि कायदे
स्थानिक प्रशासनात महिलांची भूमिका (ग्रामसभा)
आमच्या गांवात झालेल्या युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिरामुळे माझ्या पतीचे मद्यपान सुटले. त्याने मला हे शिबीर करण्याचा आग्रह केला. या शिबिरामुळे माझ्यात देखील खूप बदल झाले. समाजासाठी काहीतरी करण्यासाठी मी प्रेरित…
बसंती महातो
गांव - सांबांबुआ, ओडिशा
कित्येक वर्षे आमचा जिल्हा दुष्काळी असायचा. इतर तरुणांप्रमाणे मी देखील येथून बाहेर पडून शहरात जावे आणि पैसे कमवावे असे वाटायचे. माझ्या डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या युवक नेतृत्व प्रशिक्षण…
कृष्णा नरवडे
जावळी, महाराष्ट्र
काही वर्षांपूर्वी मी दारूच्या आहारी गेलो होतो. आपण मला केंव्हाही, कोठेही खोटे बोलताना पकडू शकत होता. एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये दिवसा प्राध्यापकाची नोकरी करतो, यावर लोक विश्वासच ठेवायचे नाहीत. माझे कुटुंबीय…
डॉ. पुरुषोत्तम वायाळ
महाराष्ट्र
संस्थापक
गुरुदेव श्री श्री रवि शंकर
गुरुदेव श्री श्री रविशंकर हे जागतिक मानवतावादी, अध्यात्मिक नेते आणि शांतीदूत आहेत. तणाव मुक्त, हिंसा मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी अभूतपूर्व अशा जागतिक चळवळीचे नेतृत्व ते करतात.
आणखी जाणून घ्यामला सहभागी व्हायचे आहे पण...
हा ८ दिवसांचा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम आहे का?
होय, कार्यक्रमाला तुमचा पूर्ण दिवसाचा वेळ द्यावा लागेल. पण ह्या कार्यक्रम दरम्यान मधल्या सुट्ट्या आणि विश्रांतीचा कालावधी असेल.
या ८ दिवसात काय शिकवले जाते?
तुम्हाला योग, ध्यान आणि प्राणायाम शिकवले जाईल. यामध्ये सुदर्शन क्रिया, व्यावहारिक शहाणपण, संवाद आणि नेतृत्वाची कला, रोजच्या जीवनात आवश्यक अशी कौशल्ये (सॉफ्ट स्किल्स) आणि रोजगारक्षमता, समुदायांचे व्यवस्थापन करण्याची कौशल्ये यांचा समावेश आहे.
मला समाजात बदल घडवून आणण्यात रस नाही. हा कार्यक्रम मला कशी मदत करेल?
हा कार्यक्रम तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होण्यास मदत करतो. या कार्यक्रमात शिकविली जाणारी तंत्रे तुम्हाला काम आणि घरातील आव्हाने हाताळण्यासाठी योग्य संतुलन प्राप्त करून देऊ शकतात.
कार्यक्रम फक्त ग्रामीण तरुणांसाठी आहे का?
हा कार्यक्रम प्रामुख्याने १८ ते ३५ वयोगटातील तरुणांसाठी आहे.
मी एक शहरी तरुण आहे आणि मला खेड्यात काम करण्याची इच्छा आहे. हा कार्यक्रम केल्याने मला फायदा होईल का?
नक्कीच. या कार्यक्रमातून तुम्हाला ग्रामीण समुदायांमध्ये काम करण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल आणि याच्यासोबत निगडीत कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळेल.