नो युवर चाइल्ड (KYC) वर्कशॉप
आपल्या मुलाचे चांगले मित्र व्हा!
मानसिक आरोग्य आणि पालकत्वा विषयी जाणून घ्या. तुम्ही चांगले पालक कसे होऊ शकता? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवा...
नोंदणी करा!यातून आपण काय शिकणार?
मुलांची वर्तन
वेगवेगळ्या परिस्थितीत तुमचे मूल काय विचार करते ते समजून घ्या
प्रभावी संवाद
नकारात्मक प्रतिक्रियांऐवजी सकारात्मक प्रतिसाद द्या!
व्यक्तिमत्व विकास
बौद्धिकदृष्ट्या उत्तेजित, सामाजिकदृष्ट्या जबाबदार आणि संवेदनशील बालक/किशोरांना कसे वाढवायचे ते शिका
मूल्य आधारित पालकत्व
आपल्या मुलाला वेळेनुसार परिस्थिती हाताळण्यासाठी मानवी मूल्यांनी सुसज्ज करा
पालकांसाठीचे शिक्षण खरेच महत्त्वाचे का आहे?
पालक बनणे हा जीवनातील सर्वात मोठा आनंद आहे. ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी जबाबदारी देखील आहे. आजच्या संदर्भात, आई किंवा वडिलांची जबाबदारी केवळ अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण यापुरती मर्यादित नाही.
आजची मुलं ही केवळ कठपुतळी नाहीत, जी आपण ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करतील. पालक आणि मुले यांच्यातील नाते हे समीकरण इतके साधे कधीच नव्हते. आजच्या वेगवान, तंत्रज्ञानावर आधारित, स्वावलंबी विभक्त कुटुंबाच्या युगात, पालकांना त्यांच्या अनुभवी आणि सुज्ञ वडिलांच्या अनुभवांची खूप उणीव भासते. अर्थात, पालकांसाठी, असे कोणतेही हात धरून ठेवणारे अनुभव केवळ स्वागतार्ह नसून आवश्यक आहेत. या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही या कार्यशाळेला (नो युवर चिल्ड्रेन/ नो युवर टीन) फॉरमॅट दिला आहे.
हा प्रोग्रॅम खूपच उपयुक्त आहे. आमच्यातील संवाद आत्ता नक्कीच सुधारले आहेत. आत्ता कसे वागावे आणि कसे वागल्याने त्यांचा पाया भक्कम होईल याचा तक्ता बनवू.
वसुधा
पालक - ‘नो युवर चाइल्ड प्रोग्राम’
अलीकडे काय समस्या आहे हे ध्यानात आले होते पण ती हाताळायचा कशी हे समजत नव्हते. या प्रोग्रॅमची मला एक सुसंस्कारी आणि चांगले व्यक्तिमत्व निर्माण करण्यास मदत होईल.
रश्मी
पालक – ऑनलाईन ‘नो युवर चाइल्ड प्रोग्राम’
हे सत्र खूपच सुंदर होते. उज्वल युक्त्यांसह खूप माहितींनी युक्त. मी यामध्ये सहभागी झाले हे मला खूप छान वाटते. भविष्यात अश्या सत्रांच्या प्रतीक्षेत आहे.
शिल्पा
पालक – ऑन लाईन ‘नो युवर टीन प्रोग्रॅम’
हा केवायटी माझे डोळे उघडणारा होता. आपण एक हि प्रश्न न उत्तर देता सोडला नाही. माझ्या पतींची देखील या प्रोग्रामसाठी नोंदणी केली होती. हा प्रोग्रम जर दोघा पालकांनी मिळून एकत्र…
आकांक्षा
पालक – ऑन लाईन ‘नो युवर टीन प्रोग्रॅम’
संस्थापक
गुरुदेव श्री श्री रवि शंकर
गुरुदेव श्री श्री रविशंकर हे जागतिक मानवतावादी, अध्यात्मिक नेते आणि शांतीदूत आहेत. तणाव मुक्त, हिंसा मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी अभूतपूर्व अशा जागतिक चळवळीचे नेतृत्व ते करतात.
आणखी जाणून घ्यामला हे शिबिर करायचे आहे पण...
आपल्या स्वतःच्या मुलांचे संगोपन करण्यासाठी आपल्याला खरोखर शिबिरांची आवश्यकता आहे का? पालकांच्या पिढ्या हे स्वतःहून करत आल्या आहेत.
याउलट, न्यूक्लियर फॅमिली ही बऱ्यापैकी आधुनिक संकल्पना आहे. जुन्या पिढ्यांमध्ये घरात वडील होते आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी काही नियम घालून दिल असतात. आजच्या जागतिकीकरण आणि उदारमतवादी जगात, रेषा इतक्या स्पष्टपणे रेखाटल्या जात नाहीत. हे प्रत्येकाचे स्वतःचे धोरण आणि तत्वज्ञान आहे. आणि या पिढीची आव्हानेही अद्वितीय आहेत. या परिस्थितीत, ही शिबिरे तुम्हाला योग्य दिशेने निर्देशित करण्यात मदत करू शकते - अंधारात प्रकाश दिसु लागतो आश्या प्रकारे काहीतरी.
दोन तासांची शिबिरे मला माझ्या मुलांचे संगोपन करण्याबाबतच्या अडचणी सोडवण्यास मदत करू शकते का?
पालकत्व ही आजीवन चालू असलेली गोष्ट आहे. तथापि, या दोन तासांत, आम्ही मुलांच्या वर्तणुकीच्या पद्धतींचे मूळ कारण विश्लेषण करतो आणि मुलांना त्यांच्या पूर्ण क्षमतेने फुलण्यास मदत करण्यासाठी पालकांना ज्ञानाने सुसज्ज करतो. हे इनपुट तुमच्या मुला/किशोरवयीन मुलांसोबतच्या तुमच्या नातेसंबंधाचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहेत कारण ते प्रौढत्वाकडे जातात.
ही शिबिरातून मला कोणत्या समस्यांचे निराकरण होईल?
यामध्ये खाण्याच्या सवयी, वर्तणुकीशी संबंधित समस्या, करिअरच्या निवडी, समवयस्कांचा दबाव, संप्रेषणातील अंतर, जास्त स्क्रीन वेळ यासारख्या सामान्य समस्यांचे आकलन समाविष्ट आहे... तुम्ही नाव द्या. कार्यशाळा हे एक संवादात्मक सत्र आहे, जे तुम्हाला या सामान्य बालपण/किशोरवयीन वर्तनामागील कारण समजून घेण्यास मदत करेल.
मी माझ्या मुलांना शिबिरात आणू शकतो का?
हे शिबिर फक्त पालकांसाठी आहे.
मी एक कार्यरत पालक आहे जो इतर अनेक मागण्यांनसाठी संघर्ष करात असतो. या शिबिरात सामायिक केलेल्या माहितीची अंमलबजावणी करण्यासाठी मला कोणतेही अतिरिक्त समर्थन दिले जाईल का?
या कार्यशाळेतून मिळालेली माहिती तुम्हाला कामाचा दबाव आणि पालकत्वाचा समतोल साधण्यास मदत करेल. तुमच्या लक्षात येईल की तुम्ही तुमच्या मुलांचे वागणे सहानुभूतीने आणि समजुतीने व्यवस्थापित करू शकता.
जर माझ्या मुलाला लक्ष केंद्रित न करणे आश्या विकाराने ग्रस्त असेल, तर ही कार्यशाळा मला मदत करेल का?
या स्थितीसाठी आम्ही तुमच्या समुपदेशकाचा सल्ला घेण्याची शिफारस करतो. तथापि, बालपणातील विविध वर्तनांचे मूळ कारण विश्लेषण तुम्हाला तुमच्या मुलाला/किशोरांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करेल. हे पालक-मुलाच्या मजबूत बंधनासाठी मार्ग मोकळा करते.
माझ्या मुलाला समुपदेशनाची गरज आहे की नाही याबद्दल मी संभ्रमात आहे.
KYC/ KYT कार्यशाळा तुम्हाला मुलाच्या/किशोरांच्या कठीण वर्तनामागील काही कारणे ओळखण्यात मदत करतील. हे आपण शोधत असलेल्या उत्तरांसह सुसज्ज होऊ शकते.
शालेय शिक्षणातल्या या ऑनलाइनच्या युगाने माझ्या मुलाला व्यापून टाकले आहे. त्याला गेम आणि इंटरनेटचे व्यसन आहे. ही कार्यशाळा मला मार्गदर्शन करू शकेल का?
मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्ये व्यसनाधीन वर्तन हे भावनिक पातळीवर एका खोल समस्येतून उद्भवते. कार्यशाळा तुम्हाला सामान्य कारणांबद्दल जागरूक होण्यास मदत करेल. व्यसनांवर दीर्घकालीन उपाय म्हणून आम्ही आमची मुले आणि किशोरवयीन अभ्यासक्रमांची शिफारस करतो.
मला एक विशेष मूल आहे. त्यासाठी ही कार्यशाळा मला मदतपूर्व आहे का?
विशेष मुलांच्या पालकांना खूप संयम, सहानुभूती, सकारात्मकता आणि उर्जेची आवश्यकता असते. कार्यशाळा तुमच्या मुलाच्या दैनंदिन दिनचर्येसाठी चांगल्या पद्धती ओळखण्यात नक्कीच मदत करतील. आम्ही शिफारस करतो की पालकांनी त्यांचे दिवस अधिक कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यासाठी तणावमुक्तीची तंत्रे शिकून सराव करा.
कोरोना या महामारीने माझ्या मुलाच्या दैनंदिन दिनचर्येत आणि वर्तनात बरेच बदल केले आहेत. अशा अभूतपूर्व परिस्थितीत, मला माहित नाही की मी या नकारात्मक बदलाचा कसा सामना करेन. मला या कार्यशाळेचा फायदा होईल का?
होय. ही कार्यशाळा तुम्हाला तुमच्या मुलाच्या बदललेल्या वागणुकीची मूळ कारणे समजून घेण्यास आणि त्याच्या दैनंदिन दिनचर्येत सकारात्मक बदल करण्यास मदत करेल. ही कार्यशाळा तुम्हाला साथीच्या आजारामुळे आणि वयाशी संबंधित कारणांमुळे मुलांच्या वर्तनात होणारे बदल समजून घेण्यास मदत करेल.