know your teen workshop parenting

नो युवर टीन (KYT) वर्कशॉप

तुमच्या मुलाचा सर्वात चांगला मित्र व्हा!

मानसिक आरोग्य आणि पालकत्व या विषयावर झालेल्या संशोधनाबद्दल जाणून घ्या. आपण एक चांगले पालक कसे बनू शकतो? अशा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवा...

नोंदणी करा!

या कार्यशाळेतुन मला काय शिकायला मिळेल?

icon

मुलांची वर्तणुक

वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये मुलं कशा प्रकारे विचार करतात हे समजून घ्या.

icon

प्रभावीपणे संवाद साधा

नकारात्मक प्रतिक्रियांऐवजी सकारात्मक प्रतिसाद निर्माण करा!

icon

व्यक्तिमत्व विकास

चौकस बुद्धिमता असलेले, सामाजिकदृष्ट्या जबाबदार आणि संवेदनशील मुलं कशी घडवायची ते जाणून घ्या.

icon

मूल्यांवर आधारित पालकत्व

तुमच्या मुलाला काळ-प्रमाणित मानवी मूल्यांनी सुसज्ज करा.

पालकत्वाबद्दलचे शिक्षण महत्वाचे का आहे?

पालकत्व हे आयुष्यातील सर्वोच्च आनंदापैकी एक आहे. तसेच ती तुमच्या आयुष्यतील एक मोठी जबाबदारी देखील आहे. आजच्या युगात पालक असणे म्हणजे फक्त अन्न, वस्त्र, निवारा व शिक्षण एवढेच पुरवणे याच्या खूप पलिकडचे आहे.

मुले ही केवळ तुमच्या ठरवलेल्या नियमांचे पालन करणाऱ्या कठपुतळी सारखे नसतात. नात्यांची समीकरणे इतकी सोपी कधीच नव्हती. आजच्या वेगवान, तंत्रज्ञान-चालित, स्वावलंबी एकल कुटुंबांच्या जगात, पालक त्यांच्या सुज्ञ आणि अनुभवी वडिलधाऱ्यांच्या सल्ल्याला मुकतात. खरोखरच या विषयामध्ये मार्गदर्शन मिळणे ही फक्त स्वागतार्हच नाही तर आवश्यक गोष्ट आहे. हे लक्षात घेऊन आम्ही ‘तुमच्या बालकांना जाणून घेण्यासाठी कार्यशाळा’ (नो यूअर चाइल्ड वर्कशॉप - KYC) आणि ‘तुमच्या किशोरवयीन मुलांना जाणून घेण्यासाठी कार्यशाळा’(नो यूअर टीन वर्कशॉप- KYT) "या कार्यशाळांची रचना केली आहे.

संस्थापक

गुरुदेव श्री श्री रवि शंकर

गुरुदेव श्री श्री रविशंकर हे जागतिक मानवतावादी, अध्यात्मिक नेते आणि शांतीदूत आहेत. तणाव मुक्त, हिंसा मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी अभूतपूर्व अशा जागतिक चळवळीचे नेतृत्व ते करतात.

आणखी जाणून घ्या

मला हा कोर्स करायचा आहे पण...

आपल्या स्वतःच्या मुलांचे संगोपन कसे करावे यासाठी आपल्याला खरोखरच कार्यशाळेची गरज आहे का? पिढ्यानपिढ्या पासून पालक हे स्वतःहूनच करत आले आहेत.

खरेतर याच्या उलट , एकल कुटुंब किंवा विभक्त कुटुंब पद्धती ही बऱ्यापैकी अलीकडच्या काळातील संकल्पना आहे. जुन्या पिढ्यांमध्ये घरात वडीलधारी लोक असत आणि त्यांनी आखुन दिलेले काही अलिखित नियम असत, ज्याचे कुटुंबातील सर्व सदस्य पालन करत असे. आजच्या जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या जगात या गोष्टी तितक्या स्पष्ट नाहियेत. या बाबतीत प्रत्येकाचे स्वतःचे काही धोरण आणि तत्वज्ञान असते. आणि ह्या पिढी समोरील आव्हाने सुद्धा सर्वांपेक्षा वेगळी आहेत. या परिस्थितीत, ही कार्यशाळा तुम्हाला योग्य दिशेने मार्गदर्शन करू शकते. अंधारात एखाद्या ज्योती सारखी मार्गदर्शक ठरू शकते.

दोन तासांची कार्यशाळा खरोखरच मला माझ्या मुलांच्या संगोपनाशी निगडीत समस्या सोडवण्यास मदत करू शकते का?

पालकत्व ही एक आयुष्य भर चालणारी प्रक्रिया आहे. तथापि, या दोन तासांत, आम्ही वेगवेगळ्या परिस्थितिंमध्ये मुलांच्या वर्तणुकीमागच्या मूळ कारणांचे विश्लेषण करतो आणि याद्वारे पालक आपल्या मुलांना त्यांच्या पूर्ण क्षमतेने विकसित होण्यास मदत करू शकतात. मुले बालवयातून/किशोरवयातुन प्रौढत्वाकडे वाटचाल करत असताना पालकांचे त्यांच्यासोबत असलेले सुंदर व निरागस नाते त्याच पद्धतीने टिकवून ठेवण्यासाठी देखील ही माहिती महत्त्वाची आहे.

ही कार्यशाळा मला कोणकोणत्या विषयांमध्ये मदत करू शकते?

या कार्यशाळेमध्ये मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, वर्तणुकीशी निगडीत समस्या, व्यावसायिक क्षेत्राची निवड, मित्र मैत्रिणींचा दबाव, योग्य संवादाची कमतरता, स्क्रीनवर जास्त वेळ घालवणे (मोबाइल,संगणक, टीव्ही ई.), यासारख्या दैनंदिन जीवनातील समस्यांविषयी अवगत केले जाते. या कार्यशाळेमध्ये संवादपूर्ण ज्ञान चर्चांद्वारे तुम्हाला, बालवयीन/किशोरवयीन मुलांच्या अशा वर्तणुकीमागील कारण समजण्यास मदत होईल.

या कार्यशाळेत मी माझ्या मुलांना आणू शकते का?

ही केवळ पालकांसाठीची कार्यशाळा आहे.

मी दिवसभर नोकरी/व्यवसायात व्यस्त असतो व माझ्यावर भरपूर जबाबदाऱ्या आहेत, या कार्यशाळेत शिकवलेल्या गोष्टी व मार्गदर्शक तत्त्वे लागु करणे मला शक्य होईल का?

कार्यशाळेदरम्यान मिळालेल्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला तुमच्या कामाचा दबाव आणि पालकत्व या दोन्ही गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे संतुलित करण्यास मदत होईल. तुम्ही तुमच्या लहान मुलांची /किशोरवयीन मुलांची वर्तणुक समजून घेवून त्यांना प्रेमाने हाताळण्यासाठी सुसज्ज असाल.

जर माझ्या मुलाने अटेंशन डेफिसिट डिसऑर्डर (अवधान अस्थिरता स्थिती) चे गंभीर लक्षणे दाखवली तर काय करावे? ही कार्यशाळा मला मदत करू शकेल का?

या स्थितीसाठी तुमच्या वैद्यकीय समुपदेशकाचा सल्ला घेण्याची आम्ही शिफारस करतो. तथापि, बालपणातील विविध वर्तनांमागील मूळ कारणांचे विश्लेषण तुम्हाला, तुमच्या बालकाला/किशोरवयीन मुलाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करेल. यातून आई-वडील आणि मुलाचे नाते अधिकच घट्ट होण्यासाठी मार्ग तयार होतो.

माझ्या मुलाला समुपदेशनाची गरज आहे का याबाबत मी संभ्रमात आहे.

केवायसी/केवायटी (KYC / KYT) ही कार्यशाळा तुम्हाला तुमच्या बालवयीन/किशोरवयीन मुलाच्या त्रासदायक वर्तणुकीमागील काही कारणे समजण्यास मदत करेल. तुम्ही शोधत असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या कार्यशाळेत मिळतील.

ऑनलाइन शिक्षणाच्या जगाने आणि पद्धतीने माझ्या मुलावर खूप प्रभाव टाकला आहे. त्याला ऑनलाइन गेम आणि इंटरनेटचे व्यसन लागले आहे. ही कार्यशाळा मला मार्गदर्शन करू शकेल का?

लहान बालक किंवा किशोरवयीन मुले एखाद्या गोष्टीच्या अति आहारी जात असतील किंवा व्यसनाधीन वर्तन करत असतील तर ते सखोल भावनिक पातळीवरील समस्येमुळे उद्भवलेले असते. या कार्यशाळेमुळे तुम्हाला अशा वर्तनामागील सामान्य कारणांची जाणीव होण्यास मदत होईल. व्यसनधीनतेवर दीर्घकालीन उपाय म्हणून आम्ही आर्ट ऑफ लिविंग तर्फे घेण्यात येणाऱ्या बालकांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी असलेल्या विविध शिबीरांची शिफारस करतो.

मला एक विशेष मुल (स्पेशल चाइल्ड) आहे. ही कार्यशाळा मला मदत करेल का?

विशेष मुलाचे संगोपन करत असलेल्या पालकांना खूप संयम, करुणा, सकारात्मकता आणि उर्जेची आवश्यकता असते. या कार्यशाळेमुळे तुम्हाला तुमच्या मुलासाठी उत्तम दैनंदिन दिनचर्या ठरवण्यासाठी निश्चितपणे मदत मिळेल. पालकांनीही अधिक कार्यक्षमतेने त्यांचा वेळ व्यवस्थापित करण्यासाठी, तणावमुक्तीसाठीच्या प्रक्रिया शिकाव्यात आणि त्यांचा सराव करावा अशीही आम्ही शिफारस करतो.

कोरोना महामारीमुळे माझ्या बालकाच्या/किशोरवयीन मुलाच्या दिनचर्येत तसेच वर्तनात बदल झाला आहे. अशा अभूतपूर्व परिस्थितीत, मला दिसणाऱ्या या नकारात्मक बदलांना कसे सामोरे जावे हे मला कळत नाहीये. याविषयी, ही कार्यशाळा माझी काही मदत करू शकेल का?

होय! ही कार्यशाळा तुम्हाला तुमच्या बालकाच्या/किशोरवयीन मुलाच्या वर्तनामागील मूळ कारण समजण्यास मदत करेल आणि त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी तुम्ही त्यांना कशी मदत करू शकता हे ओळखण्यासही मदत करेल. हे तुम्हाला कोरोना महामारीच्या संदर्भात तुमच्या बालकाच्या/किशोरवयीन मुलाच्या वर्तणुकीतील बदल तसेच वाढत्या वयासोबत उद्भवू शकणाऱ्या इतर समस्यांचा उलगडा देखील करण्यास मदत करेल.