पाठदुखी ही एक वेदनादायक बाब आहे जी असह्य होईपर्यंत अनेकजण दुर्लक्ष करतात. कदाचित, तुम्ही देखील ही तुमच्या आयुष्यातील एक कायमची बाब मानली असेल, जसे की तुम्हाला कामावर जाताना ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागतो. परंतु तसे वाटण्याची खरच गरज नाही. पाठदुखीची करणे आणि काही त्यावर काही सोप्या आणि व्यवहार्य क्लुप्त्या पाहूया.
पाठदुखी जाणून घेणे: दुर्लक्ष न करण्यासारखी काही कारणे
- तणाव, चिंता आणि नैराश्य
- खूप तास सलग बसावे लागणे
- खराब झोप
- बसण्याची सवय
- खराब मनस्थिति आणि खालावलेली ऊर्जा पातळी
- दुखापत किंवा फ्रॅक्चर
- शरीरातील निर्जलीकरण
- पाठीच्या समस्यांचा कौटुंबिक इतिहास
- गंभीर वैद्यकीय समस्यांचे निराकरण केलेले नसणे
- संधिवात किंवा स्लिप डिस्क
- कठोर व्यायाम
डॉक्टरांना भेट द्या: पहिली पायरी
तुमची पाठदुखी हे मूतखडा, संधिवात किंवा स्लिप डिस्क सारख्या अंतर्निहित स्थितीचे लक्षण असू शकते. नंतरची गुंतागुंत टाळण्यासाठी डॉक्टरांना भेटा. जर तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला हिरवा झेंडा दाखविला तर तुमच्या जीवनशैलीत काही बदल करुन आरोग्यदायी सवयी अंगिकारण्याची हीच वेळ आहे.
पाठदुखीवर मात करण्यासाठी रोजच्या ८ शक्तिशाली सवयी
रोजच्या सुदर्शन क्रियेने तुमच्या मानसिक आरोग्याचे रक्षण करा
भावनिक त्रास, नैराश्य, चिंता आणि तणाव यामुळे तीव्र आणि जुनाट दोन्ही पाठदुखी होऊ शकते. सुदर्शन क्रिया श्वासोच्छवासाचे तंत्र आणि ध्यानाचा दररोज सराव करणे हे तुमच्या मानसिक आरोग्याचे रक्षण करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. अभ्यासांतून असे दिसते की केवळ दोन आठवड्यांच्या सुदर्शन क्रिया सरावाने ५६ % ताण कमी होतो. अभ्यासातून हे देखील दिसून आले की सुदर्शन क्रिया, वैद्यकीयदृष्ट्या आणि अवैद्यकीयदृष्ट्या आलेले नैराश्य आणि चिंता प्रभावीपणे दूर करू शकते.
योगाने तुमची पाठ बळकट करा
तुमच्या पाठीच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी आणि पाठदुखी दूर करण्यासाठी आणि रोखण्यासाठी योग उत्कृष्ट आहे. पाठदुखीसाठी योग आणि खालच्या पाठदुखीसाठी योगासनांचा तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समावेश करा आणि फरक अनुभवा.
हालचाल करत रहा
पाठदुखीसाठी हालचाल हा एक आवश्यक प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाय आहे. तुमच्या डेस्कवर जास्त वेळ बसल्याने तुमच्या पाठीच्या स्नायूंवर आणि पाठीच्या डिस्कवर खूप दबाव पडतो, ज्यामुळे पाठदुखी अपरिहार्य होते. नियमित अंतराने ब्रेक घेणे महत्वाचे आहे. उभे रहा आणि थोडे चाला किंवा दर अर्ध्या तासानंतर पाच मिनिटे उभे राहा आणि शरीराला ताण ध्या.
आपली बसण्याची ,उभे रहाण्याची ढब जाणून घ्या
तुम्ही ज्या पद्धतीने उभे राहता, बसता आणि चालता त्याचा तुमच्या पाठीच्या आरोग्यावर परिणाम होतो. अस्वस्थ अवस्थांमध्ये हे समाविष्ट आहे:
- चालताना पाय ओढणे
- उभे असताना एका पायावर जास्त भार टाकणे
- बसताना एका पायावर जास्त भार टाकणे
- उभे असताना फक्त एक हात हलवत रहाणे
तुम्हाला चुकीच्या अवस्थांची जाणीव होताच, तुम्ही ती ताबडतोब दुरुस्त करू शकता आणि तुमची नैसर्गिक ढब पुन्हा सुरू करू शकता.
तुमचे पाण्याचे सेवन तपासा
डिहायड्रेशनमुळे(शरीरातील पाण्याचे प्रमाण खूप कमी झाले तर) तुमच्या मणक्यातील चकत्यांमधील पाणी कमी होते आणि पाठदुखी होते. म्हणूनच हायड्रेटेड राहणे (पाण्याचे प्रमाण टिकवणे) खूप महत्वाचे आहे. पाणी पिण्याच्या योग्य पद्धतींचा अवलंब करा आणि तुमच्या शरीरातील पाण्याचे शोषण वाढवा.
योग्य झोपा आणि तुमची झोपण्याची अवस्था सुधारा
झोपेच्या अयोग्य गुणवत्तेमुळे दिवसा अयोग्य स्थिती येते, ज्यामुळे पाठदुखी वाढते. याशिवाय झोपण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळेही पाठदुखी होते.
- आदर्श मार्ग म्हणजे गर्भाच्या स्थितीत कुशीवर झोपणे.
- तुमचे डोके आणि खांदे तुमच्या शरीराच्या इतर भागाशी जुळतात याची खात्री करून योग्य उंचीची उशी वापरा.
- तुमची उशी खूप उंच किंवा खूप कमी असल्यास, तुम्हाला पाठदुखी होण्याची शक्यता असते.
- चांगली झोप येण्याच्या काही उपायांचा अवलंब करा ज्यामुळे तुमची झोप सुधारेल.
तुमचा आहार तपासा
मध्यपान, धूम्रपान, कॅफीन, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि कृत्रिम साखरेमुळे पाठदुखी वाढते. निरोगी आणि संतुलित आहार हे उपचारांसाठी योग्य आहे.
आठवड्यातून दोनदा स्वयं-मालिश करा
रक्ताभिसरण वाढवण्यासाठी आणि वात असंतुलन दूर करण्यासाठी आठवड्यातून दोनदा तिळाच्या तेलाने पाठीला मसाज करा.