जीवन अनपेक्षित वळणे आणि आव्हानांनी भरलेले आहे. आजारपण, मृत्यू, घटस्फोट, नोकरी गमावणे, अपयश किंवा जीवनातील इतर वेदनादायक आणि कठीण प्रसंग यासारख्या अडचणींना तोंड देताना, दिशाहीन किंवा हादरल्यासारखे वाटू शकते, जणू काही आपल्या पायाखालची जमीन सरकली आहे.

जीवनात कठीण काळ अपरिहार्य असतात आणि या कठीण काळात केवळ आपल्या भावनिक आरोग्याचीच नाही तर मानसिक शक्तीचीही चाचणी घेतली जाते. अशा काही युक्त्या शिकता आल्या तर , अशा संघर्षाच्या वेळी मार्गावर राहण्यास मदत होईल. 

जेंव्हा आयुष्य आपणास काही लिंबू देते तेंव्हा आपण त्याचे सरबत बनवता तो कां?

काही लोक प्रतिकूलतेच्या पहिल्या टप्प्यावरच कोलमडतात आणि दीर्घकाळापर्यंत तणावाखाली राहतात. त्या कठीण प्रसंगातून मार्ग काढण्याच्या ऐवजी ते फक्त सुटकेचा मार्ग शोधतात.

या उलट, काही लोक जीवनात कोणतीही आव्हाने आली , तरी त्यातून बाहेर येतात. त्यांच्याकडे अडथळ्यांमधून परत उभे रहाण्याची अविश्वसनीय हातोटी असते आणि ते जोमाने, उत्साहाने आणि आत्मविश्वासाने संकटांचा सामना करतात.

या लोकांमध्ये काय फरक आहे तर, जेंव्हा इतर लोक धीर सोडून देतात, तेंव्हा ते प्रयत्न चालू ठेवतात. या चिकाटीसाठी मानसिक कणखरपणा विकसित करणे आवश्यक आहे – पुढे जाण्यासाठी वाटाघाटी करताना अनिश्चितता आणि अस्वस्थता स्वीकारण्याची क्षमता आवश्यक आहे . ते थंड, शांत आणि एकसंघ मनाने कठीण परिस्थितींवर मात करण्यास सक्षम असतात. ते उपाय शोधून मार्गावर परत येण्यास तयार असतात. ते निराशेच्या हवाली जाऊन त्यांना जे हवे आहे त्यापासून परावृत्त होत नाहीत. त्याऐवजी, ते लक्ष केंद्रित करतात आणि यशस्वी होण्याची योजना करतात.

आपण काय करता? आपण उताराचा सामना करता, फक्त कणखर होण्यासाठी? किंवा वादळ जाईपर्यंत आपण खडकाच्या खाली लपता कां ? आपणास कार्यरत ठेवणारी ताकद आणि चिकाटी आपण कशी विकसित करू शकता? रहस्य काय आहे?

“मानसिक खंबीरपणा” – प्रतिकूल परिस्थितीत खंबीर राहणे

कठीण प्रसंगांना तोंड देताना जे सकारात्मक गुण अंगी असावे लागतात त्याला बोली भाषेत “मानसिक कणखरपणा” असे म्हटले जाते.

आपणास येणाऱ्या अडचणीत आपले लक्ष आणि दृढनिश्चय टिकवून ठेवण्याची ही क्षमता आहे. आपल्या आयुष्यातील घटना क्वचितच आपल्याला पाहिजे तशा घडतात, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या मार्गावरून दूर जावे. मनाचा खंबीरपणा हा कधीतरी येणाऱ्या अपयशाच्या वेळी आपणास मोठा हादरा न बसू देता, आपल्या चुकांमधून शिकण्याची दृढता देतो. आपल्या आयुष्यातील एखादी गोष्ट खूप चांगली झालेली असली आणि आपणास खंबीर असण्याची गरज असते तेव्हाही हीच लवचिकता आणि धैर्य आपणास भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे बळ देते. मूलत:, मानसिक खंबीरपणा ही आंतरिक शक्ती किंवा हिंमत आहे जी आपणास पुढे जायला, पुढे रेटायला आणि प्रयत्न करत रहायला शक्ती देते, जरी प्रसंग कठीण वाटतं असला तरी.

मानसिक कणखरपणा इतका महत्त्वाचा कां आहे?

आपणास आपल्या आयुष्यात आणखी काही हवे असेल, मग खूप स्पर्धा असूनही नोकरीत अधिक चांगले काम करायचे असेल किंवा आपण यापूर्वी आलेल्या अडथळ्यांच्या तीव्रतेची पर्वा न करता आपली कौशल्ये वाढवायची असतील – तर मानसिकदृष्ट्या कणखर होण्याची वेळ आली आहे.

पुरेशा मानसिक सामर्थ्याशिवाय, जीवनातील आव्हाने आपणास आत्म-शंका, चिंता आणि नैराश्याने भरून काढू शकतात. त्या अस्वस्थ भावनांमुळे नकारात्मक विचार येऊ शकतात याचा आपल्या वागणुकीवर आणि कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. कठीण परिस्थितीतही खंबीर राहण्यासाठी आपणास आपले विचार, भावना आणि वर्तन हे व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे.

संशोधनातून असे दिसून आले आहे की, आपली ध्येये साध्य करण्यासाठी आपली मानसिक कणखरता इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाची भूमिका बजावते. मग ती उद्दिष्टे आरोग्य,व्यापार, क्रीडा, व्यवसाय, नातेसंबंध किंवा सर्वसाधारण आयुष्यातील असोत. हे चांगलेच आहे, कारण कणखर मन विकसित करण्याचे अनेक मार्ग आहेत!

आव्हानांना तोंड देण्यासाठी मानसिक कणखरता विकसित करणे

आपण सर्वजण अधिक लवचिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर व्हायला शिकू शकतो. हे सर्व आदर्श मनोवैज्ञानिक, शारीरिक, भावनिक आणि अध्यात्मिक अवस्थेत असण्याबद्दल आहे, जेणेकरुन काम करत रहावे आणि उत्तम कामगिरी करता यावी.

कठीण काळात आपणास अधिक लवचिक बनण्यास मदत करण्यासाठी येथे ८ साधने आहेत

१. विश्वास ठेवा. “आपणास कधीही अशी समस्या दिली जात नाही, जी आपण हाताळू शकत नाही. आपल्या समोर येणारी प्रत्येक समस्या ही आपल्यात कौशल्य, प्रतिभा आणि त्यातून बाहेर पडण्याची क्षमता आहे याची जाणीव करून देण्यासाठी असते! आपली खरी क्षमता उघड करणे हे निव्वळ आपल्यासाठी आहे.” अध्यात्मिक गुरु गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या या शब्दांमध्ये खूप उत्थान करणारे ज्ञान आहे. जे काही घडत आहे तो एक आशीर्वाद आहे आणि काहीही शाश्वत नाही आणि हा कठीण काळ देखील निघून जाईल यावर विश्वास ठेवलयाने, आपल्याला आवश्यक धैर्य आणि सकारात्मकता मिळते.

२. आपला दृष्टीकोन विशाल असू द्या. आयुष्य हे सुख-दुःखाचे, चांगले आणि कठीण काळ यांचे मिश्रण आहे. परंतु लक्षात ठेवा की वेदना अपरिहार्य असली तरी, दुःख निश्चितपणे ऐच्छिक आहे. जीवनाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टीकोन आपणास वेदनादायक काळातून पुढे जाण्याचे बळ देतो. या जगात आपली अत्यंत गरज आहे हे जाणून घ्या. सर्व अनंत शक्यतांसह, तुमचे जीवन ही एक भेट आहे, कारण ते केवळ आपल्यासाठी नाही तर इतर अनेकांसाठीही आनंद आणि आनंदाचे झरे बनू शकते.

३. दीर्घ श्वसन सुरू करा. ही क्रिया आपणास शरीराला चांगल्या मानसिक कार्यक्षमतेसाठी तयार करते. फक्त लक्ष द्या – आपण आत्ता आपला श्वास रोखून धरत आहात कां? आपण जितके जास्त ताण आणि तणावात असाल, तितके नकळत आपला श्वास रोखून धरण्याची शक्यता जास्त असते. खरं तर, आपणास डोकेदुखी, पाठदुखी किंवा खांदे जखडणे आणि मानेच्या स्नायूं जखडण्याचाही अनुभव येत असेल.

आपल्यासाठी हा एक औषधोपचार आहे: ५-७ दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू बाहेर सोडा. ४ अंक मोजेपर्यंत हळू आणि सहजतेने श्वास घ्या, ४ आकडे श्वास धरा, ४ आकडे मोजेपर्यंत आणखी हळू श्वास सोडा आणि २ च्या संख्येपर्यंत थांबा. हे दिवसातून ३ वेळा करा. जेंव्हा आपण उज्जयी श्वास वापरतो तेंव्हा हे आणखी शक्तिशाली असते. यामुळे दिवसभर चांगले रक्ताभिसरण आणि स्थिर श्वासोच्छ्वास निर्माण होतो, आपण जरी कोणत्याही परिस्थितीला तोंड देत असलात.

४. हसणे आणि हास्य. जेंव्हा जगणे कठीण होते, तेंव्हा कठीण जाते, बरोबर? आपल्या आनंदाची ताकद आपणास येणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीतून मोजली जाते. जेंव्हा सर्व काही ठीक चालले असते, तेंव्हा मोठे स्मित हास्य देणे ही काही बुद्धीमानी नाही! परंतु जर आपण कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही प्रसंगात हसत असाल तर ते परिपक्वता, सामर्थ्य आणि बुद्धिमत्तेचे लक्षण आहे. कधीकधी आपल्याला फक्त बनावट हसावे लागेल जो पर्यंत आपल्याला ते जमत नाही तो पर्यंत. पुढच्या वेळी आपण भारावून जाल, तेंव्हा हसण्याचा प्रयत्न करा आणि आपणास किती आराम आणि आत्मविश्वास वाटेल ते पहा.

जेंव्हा वेळ कठीण असते, तेंव्हा हसण्याची ही सर्वोत्तम वेळ असते. आपल्या विनोदबुद्धीचा शोध घेण्यासाठी आपण ही वेळ वापरू शकता. हे केवळ आपल्या भावनिक अवस्थेतच नाही तर आपल्या शारीरिक अस्तित्वालाही मदत करेल. हे वापरून पहा आणि दररोज सकाळी ५ मिनिटे पोटभर हसा, जरी आपणास वेडेपणा वाटत असेल तरीही करा आणि काय होते ते पहा.

मानसिकदृष्ट्या कणखर लोकांचा असा विश्वास आहे की आनंद ही मनाची स्थिती आहे – ठिकाण, वस्तू, व्यक्ती किंवा वस्तू नाही. ते जाणीवपूर्वक आनंदी राहण्याचा सराव करतात आणि ते घडवून आणणे त्यांच्या हातात आहे हे त्यांना ठाऊक आहे. मग आपण कशाची वाट पाहत आहात?

५. अलिप्त व्हा. हे सर्व आपल्यासाठी नाही हे ध्यानात ठेवल्यास आपण अडथळ्यांमधून बाहेर पडू शकता आणि आणखी मजबूत होऊ शकता. गोष्टी वैयक्तिकरित्या घेऊ नका किंवा “सर्व लोकांमधून, मीच कां?” असा विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. वैयक्तिक करू नका किंवा स्वत: ला आत्म-दयेच्या सापळ्यात पडू देऊ नका. त्याऐवजी, आपण काय नियंत्रित करू शकता यावर लक्ष केंद्रित करा.

६. इतरांना मदत करा आणि प्रगती करा. आपणास आश्चर्य वाटेल की जेंव्हा मी स्वतःच संकटात असतो, तेंव्हा मी इतरांना कशी मदत करू शकेन ? पण माझ्यावर विश्वास ठेवा, यांचा खरोखर फायदा होतो. विज्ञान देखील हे सिद्ध करत आहे. संशोधनात असे दिसून येते की जे इतर लोकांना सतत मदत करतात, त्यांना कमी नैराश्य येते, ते जास्त शांतता, कमी वेदना आणि चांगले आरोग्य अनुभवतात. ते जास्त काळ जगू शकतात. दररोज काही परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा आणि आपणास दिसेल की ते केवळ आपण ज्यांना मदत करत आहात त्यांनाच मदत करत नाही, तर आपल्या आत्म्याचे देखील उत्थान करते. आपण प्रचंड आंतरिक शक्ती अनुभवाल.

७. इतरांशी जोडले जा. मानव हा सामाजिक प्राणी आहे. आपल्याला भावनिक आधाराची, मूल्यांची आणि एकमेकांशी जोडले असण्याची तीव्र इच्छा असते. अमेरिकेमध्ये केलेल्या मानसिक आरोग्य सर्वेक्षणात असे आढळले आहे की ७१ टक्के लोक तणावाच्या काळात मित्र किंवा कुटुंबाकडे आधारासाठी वळले. कोकेनच्या आहारी जाण्याऐवजी बाहेर जा किंवा फोन करा आणि आपल्या प्रियजनांशी संपर्क साधा.

८. ध्यान करा. मानसिक कणखरपणा म्हणजे आपल्या भावना, विचार आणि वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी शांततेची शक्ती वापरणे , ज्यामुळे आपल्याला यश आणि स्वातंत्र्य मिळू शकेल. ध्यानाद्वारे अनुभवलेली शांतता आणि शांत जागा हा बुद्धिमत्तेचा एक प्रकार आहे, जाणण्याचा एक प्रकार जो आपल्या भावना, विचार आणि वर्तनाच्या पलीकडे जातो. ध्यान हे सर्वात सक्षम साधनांपैकी एक आहे जे आपण आपल्या जीवनातील सर्व क्षेत्रांवर प्रभाव टाकण्यासाठी वापरू शकतो.

भावनांचे रूपांतर करण्यासाठी हे मार्गदर्शित ध्यान आत्ताच वापरून पहा.

शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहून, योग्य प्रकारचा आहार आणि चांगली झोप घेऊन आपल्या शरीराकडे लक्ष द्या. आपले आरोग्य हे आपले सर्वात शक्तिशाली स्त्रोत आहे आणि ते राखण्यासाठी आपणास वरील सर्व ८ साधने अधिक प्रभावीपणे सराव करण्यास मदत करतील.

मानसिकदृष्ट्या मजबूत व्यक्ती बनण्यासाठी सराव आणि सजगता लागते. यासाठी आपल्या वाईट सवयी सोडून देणे आणि त्या बदलण्यासाठी नवीन चांगल्या सवयी शिकणे आवश्यक आहे. आणि कधीकधी याचा अर्थ असा असू शकतो की आपल्या स्वतःच्याच मार्गातून बाहेर पडा आणि गोष्टी घडू द्या.

काळ कठीण आहे… पण या कठीण काळातून पूढे जात रहा. आपण त्यातून बरेच काही शिकू शकतो. आनंदी रहा आणि मानसिकदृष्ट्या खंबीर रहा आणि आपल्या मार्गात येणारी कोणतीही गोष्ट आपण हाताळण्यास सक्षम असाल याची खात्री बाळगा!

सेजल शाह द्वारे, E-YRT ५०० श्री श्री योग शिक्षक, YACEP, आर्ट ऑफ लिव्हिंग शिक्षक , NYU पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल स्कूल मान्य योग-CME रिट्रीट फॅसिलिटेटर, माइंड-बॉडी वेलनेस लेखक, होमिओपॅथ

    Wait!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity


    *
    *
    *
    *
    *