आकडेवारी नुसार भारतामध्ये दर तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करत आहे. गेल्या पांच दशकांपासून भारतामध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. ही समस्या चालू पिढीमध्ये दिसून येत आहे. मागील पिढ्या जास्त संवेदनशील होत्या. आता, जीवन खूपच आरामदायी बनले आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होत आहेत, म्हणून तुम्ही जास्त उदास होता. तुम्हाला खुप प्रयत्न करावे लागत नाहीत. तुम्हाला सारे काही सहज उपलब्ध होते, म्हणून तुमचे मन भटकते.
मनाला सतत काहीतरी करावेसे वाटत असते. तुम्ही धावणे किंवा चांगला व्यायाम असे काही शारीरिक काम करत असता, तेंव्हा मन काहीही करत नसते. पण निव्वळ बसून फक्त सोशल मीडिया (सामाजिक माध्यमे) पहात असता तेंव्हा तुमचे मन भरकटत असते. त्यामुळे उदासीनता निर्माण होऊ लागते.
नैराश्य येते कुठून?
- घटलेली ऊर्जा: जेंव्हा तुमच्या उर्जेचा स्तर घटलेला असतो, तेव्हा नैराश्यास सुरवात होते. जेंव्हा उर्जेचा स्तर योग्य असतो, आपण ठीक असतो. जसे उर्जेचा स्तर खालावू लागतो , तसे तुम्हाला निरस वाटू लागते आणि तुम्ही उदास होता. जेंव्हा तो आणखी खाली घसरतो तेंव्हा तुमचा तुमच्यामधील रस निघून जातो.
- माझ्याबद्दल काय? नुसते बसून विचार करत रहायचा की माझ्याबद्दल काय? माझ्याबद्दल काय? माझ्याबद्दल काय ? उदास होण्याचे हे तंत्र आहे. बसा आणि निव्वळ स्वतःचा विचार करत रहा. माझे कसे होणार? माझे काय होणार? माझे काय होणार? माझे काय होणार? नक्की खड्ड्यात जाल!
- कौतुकाची कमतरता: कंटाळा येण्याने जर नैराश्य आणि औदासिन्य येत असेल तर तो शाप आहे. जीवनात तुम्हाला कशाची आवड किंवा कौतुक नसेल तर तुम्ही नकारात्मकतेने ग्रासून जाल; जी व्यक्ती प्रेम वा भक्ती करत नाही ती नक्कीच नैराश्यात जाईल.
- निष्क्रिय समजूत: नैराश्य हे जीवनात आता काहीच बदल होऊ शकणार नाही असा समज असण्यामुळे येते. जेंव्हा तुम्हाला वाटत असते की जीवनात सर्व काही ठप्प झाले आहे, थांबले आहे आता पुढे काहीही नाही, कोठेही जायचे नाही तेव्हा तुम्ही उदास, निराश होता.
नैराश्य आणि चिंता यांच्यापासून कसे मुक्त व्हावे?
- उत्साह जागवा: सर्वप्रथम तुमच्यामध्ये उत्साह जागवा. मागे वळून पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की यापूर्वी तुम्ही कित्येक अडचणींवर मात केली आहे. लक्षात घ्या की यामधून देखील तुम्ही बाहेर पडणार आहात.
- दृष्टीकोण व्यापक ठेवा: मोठ्या समस्यांकडे बघा. सभोवती पहा, यापेक्षा कितीतरी मोठ्या समस्या, अडचणी आहेत, तुमची समस्या छोटी जाणवू लागेल. ज्याक्षणी तुम्हाला तुमची समस्या छोटी जाणवेल, तुम्हाला ऊर्जा प्राप्त होईल आणि मग समस्येचा सामना करण्याचा, ती सोडवण्याचा आत्मविश्वास निर्माण होईल.
- ‘आनंदाची रेष ! एका हुशार व्यक्तीने फळ्यावर एक रेष काढली आणि त्याच्या विद्यार्थ्यांना सांगितले की तिला स्पर्श न करता, न पुसता तिला छोटी करा. तुम्ही कशी कराल? तिला स्पर्श न करता छोटी करायची आहे. एक हुशार मुलाने त्या रेषेखाली आणखी एक रेषा तिच्यापेक्षा लांब रेषा काढली. पहिली रेषा आपोआप छोटी झाली. येथे शिकवण अशी आहे की , तुमच्या समस्या मोठ्या वाटत असतील तर त्यापासून नजर हटवा , कारण तुमचे फक्त तिकडेच लक्ष आहे. जेंव्हा तुम्ही तुमचे लक्ष तुमच्या समस्यांवरून हटवाल आणि इतर समस्याग्रस्तांकडे न्याल , तेव्हा अचानक जाणवू लागेल की तुमच्या समस्यांचे ओझे तुम्ही पूर्वी समजत होता तितके काही मोठे नाही. तुम्हाला वाटत असेल की खूप मोठी समस्या आहे तर त्यापेक्षा आणखी मोठे समस्याग्रस्त आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या. अचानक तुम्हाला जाणवेल की माझी समस्या छोटी आहे आणि ती मी सोडवू शकतो.
- सेवेबाबत वचनबध्द व्हा: मग आणखी एक पाऊल टाका. जे तुमच्यासाठी उपयोगाचे आहे , त्याकडे लक्ष केंद्रित करा. त्यासाठी आपली शक्ति वापरा. एक उद्देश निश्चित करा. आनंदाच्या मागे धावण्यापेक्षा इतर व्यक्तींच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणे हे खरे अर्थपूर्ण आहे. जे जास्त गरजवंत आहेत त्यांची सेवा करा. जेंव्हा इतरांची सेवा करण्यासाठी तुम्ही वचनबध्द व्हाल , तेंव्हा तुमच्या समस्या छोट्या बनून जातील. जर तुम्ही सतत तुमच्याबद्दलच विचार करत बसाल तर तुमच्या समस्या अवाढव्य बनतील. आपल्या सभोवती काय घडते आहे हे जर डोळे उघडून पाहाल तर समजेल की तुम्हाला एकट्यालाच फक्त समस्या नाही आहेत.
- मन खंबीर बनवा: आपल्या मन:शक्तीवर विश्वास ठेवा. जे पेराल तेच उगवेल. आपल्या चेतनेमध्ये सकारात्मकतेचे बीज पेरा , जेणेकरून तुमचे मन नकारात्मकतेपेक्षा सकारात्मकता आकर्षित करेल.
- आपली ऊर्जा वाढवा: तुम्ही एखाद्याला औषध देत राहाल. काही काळ त्याचा फायदा होईल. पण काही काळाने त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे औषध हा काही उपाय नाही. मग आणखी काय करू शकता? व्यायाम, योग्य आहार, ध्यान, श्वसन प्रक्रिया, सुदर्शन क्रिया™ अशा गोष्टींमुळे मुळे आपली ऊर्जा वाढवावी लागेल. यामुळे उर्जेचा स्तर उच्च राहील. ध्यानामुळे तुम्ही तरतरीत, आनंदी आणि जास्त अंतर्ज्ञानी बनाल. त्यामुळे भूतकाळात काय घडले, ते विसरून वर्तमान काळात आणखी ताजेतवाने वाटेल. जेंव्हा उर्जेचा स्तर उच्च असेल, तेंव्हा तुम्हाला आनंदी, उत्साही वाटेल. परिपूर्ण असाल तेव्हा तुम्हाला आनंदी, समाधी, ध्यान जाणवेल . म्हणून हे खूप खूप महत्वाचे आहे.
- स्वयंस्फुर्त बना! जेंव्हा काही मिनिटे स्वतःमध्ये खोल उतराल तेंव्हा स्वयंस्फुर्ती येऊ लागेल. जेंव्हा सगळे नीट आणि तुम्हाला हवे तसे आहे तेंव्हा हसत राहणे ही मोठी गोष्ट नाही. पण आपल्यामध्ये धैर्य जागवून म्हणा, ‘काहीही होऊ दे, मी हसत राहणार’, पहा तुमच्यामध्ये प्रचंड ऊर्जा जागृत झालेली तुम्हाला जाणवेल. मग समस्या काही नाही; त्या येतात आणि जातात.
- आपल्या श्वासाची शक्ती अनुभवा: आपला श्वास आपल्या भावनांशी जोडला आहे. प्रत्येक भावनेसाठी श्वासाची एक विशिष्ट लय आहे. म्हणून तुम्ही तुमच्या भावनांवर प्रत्यक्ष ताबा मिळवू शकत नाही तर आपल्या श्वासाच्या मदतीने मिळवू शकता. जर तुम्ही नाटकात काम करत असाल , तर तुमचा दिग्दर्शक तुम्हाला सांगेल की जर राग दाखवायचा आहे तर जलद श्वास घ्या. जर तुम्हाला शांत, प्रसन्न दृश्य दाखवायचे असेल तर तुमचा श्वास सौम्य आणि संथ हवा. आपण आपल्या श्वासाच्या लयीप्रती सजग झालो तर आपण आपल्या मनावर नियंत्रण प्राप्त करू शकतो. आपण कोणत्याही नकारात्मक भावना उदा. क्रोध, मत्सर आणि लोभ सारख्या भावनांवर नियंत्रण प्राप्त करू शकतो आणि आपल्या मनापासून हसू शकतो. सुदर्शन क्रिया™ सारख्या श्वसन प्रक्रिया नक्की मदत करतात. कित्येक संशोधनांमध्ये निदर्शनास आले आहे की ताण तणाव, चिंता, औदासिन्य (नैराश्य) हे दैनंदिन सुदर्शन क्रियेच्या सरावाने कमी होते.
- परमात्म्यावर विश्वास ठेवा: रागामध्ये कित्येक वेळा आपण म्हणतो की, ‘ जाऊ दे, मी नाद सोडून देतो.’ त्या ऐवजी नैराश्य वा रागाशिवाय म्हणा की , ‘मी ही समस्या सोडवू शकत नाही म्हणून समस्या सोडून देतो; देवच मला मदत करू दे.’ मग खात्री बाळगा की नक्की मदत मिळेल. वैश्विक शक्ती तुम्हाला मदत करेल यावर विश्वास बाळगा. मदत होईल, यावर विश्वास बाळगा. वैश्विक शक्ती तुम्हाला नक्की मदत करेल.
सारांश
औदासिन्यातून बाहेर येण्यासाठी आणि आंतरिक शांती मिळण्यासाठी दृष्टीकोण विस्तारणे आणि सक्रिय कृती गरजेची आहे. दृष्टीकोण विस्तृत बनवणे, समस्या या तात्पुरत्या आहेत यांची जाणीव आणि इतरांची सेवा करण्याकडे आपला कल वाढवणे यामुळे ऊर्जेमध्ये आणि आनंदामध्ये वृद्धीचा अनुभव येतो. हे घडण्यासाठी श्वसन शक्तीवर नियंत्रण आणि ध्यान आवश्यक आहे. मग आपण संवेदनशीलता आणि आनंद निर्माण करू शकतो. विश्वास आणि स्वयंस्फुर्ती मुळे आपण आनंदी आणि आणखी परिपूर्ण जीवनाकडे मार्गक्रमणा करू शकतो.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या हॅपिनेस प्रोग्रॅम द्वारे औदासिन्यावर मात करण्याचा आणि आपली आंतरिक शांती शोधण्याचा मार्ग शोधा.
व्यावसाईक वैद्यकीय सल्ला वा निदान वा उपचार यांना पर्याय हा या लिखाणाचा उद्देश नाही. कोणत्याही वैद्यकीय आजारांच्या प्रश्नांसाठी आपले डॉक्टर वा प्रशिक्षित आरोग्य तज्ञ यांचा सल्ला नेहमी घ्या.