आजकाल तरुणांमध्ये पाठदुखी ही सामान्य बाब असली तरी (चुकीच्या बसण्याच्या पद्धतीमुळे किंवा कामासाठी खूप वेळ बसल्यामुळे) एका बाजूची पाठ दुखी दीर्घकाळ लक्षात येत नाही. काहींना सतत मुंग्या येतात तर काहींना थोड्या वेळाने वेदना कमी होतात व पुन्हा काही वेळाने होऊ लागतात. पाठीच्या एका बाजूच्या दुखण्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
पाठीच्या एका बाजूच्या दुखण्याची कारणे
पाठीच्या डाव्या किंवा उजव्या बाजूच्या दुखण्याच्या कारणांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
- इजा
वृद्धांमध्ये हाडांची कमी घनता किंवा संधिवातामुळे किरकोळ दुखापती हा चिंतेचा विषय आहे.
- अतिव्यायाम
जास्तीची कसरत, अति व्यायाम किंवा खेळामुळे स्नायूंची झीज होऊन वेदना होतात.
- ऊतीमुळे (पेशी समूह)
कमी शारीरिक हालचाल, बैठी जीवनशैली, अधिक वेळ बसणे किंवा चुकीच्या पद्धतीने बसल्याने स्नायू/ सांधे ताठरतात व त्यामुळे पेशीसमूहा संबंधित एका बाजूची पाठदुखी होऊ शकते.
- अंतर्गत समस्या
काहीवेळा खराब चयापचय, मूत्रपिंडाचा संसर्ग किंवा मूत्रपिंडात खडे तयार झाल्यास एका बाजूची पाठ दुखी होऊ शकते. खरे कारण जाणून घेण्यासाठी इतर लक्षणांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. गर्भाशयाच्या आतील बाजूस आलेली सूज आणि मासिक पाळीच्या विसंगतीमुळे स्त्रियांमध्ये पाठीच्या उजव्या बाजूला खालच्या भागात पाठ दुखी होऊ शकते.
- गर्भधारणा
गरोदरपणात वजन वाढल्याने पोटाचे स्नायू कमकुवत होतात आणि पाठीचा कणाही काहीसा कमकुवत होतो. ह्या आणि इतर संप्रेरकीय बदलांमुळे स्त्रियांमध्ये एका बाजूची पाठ दुखी होऊ शकते.
या दुखण्यावर उपचार कसे करावे?
एका बाजूच्या पाठ दुखीची अनेक कारणे असू शकतात. दुखणे हे त्याच ठिकाणी आहे की वेगवेगळ्या ठिकाणी होते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ मज्जा तंतू दबल्यामुळे होणाऱ्या सायटिकाच्या (कंबरेपासून पायापर्यंत होणाऱ्या वेदना) दुखण्यात पाठीच्या एका बाजूस खालच्या भागात जळजळ होते परंतु ती पायाकडे सरकते.
दुखण्याचे खरे कारण शोधण्यासाठी शारीरिक तपासणीनंतर अनेक चाचण्या आहेत. उदाहरणार्थ क्ष किरण, हाडांचे स्कॅनिंग, अल्ट्रासाऊंड, एम आर आय स्कॅन आणि रक्त चाचण्या इत्यादी. अर्थात वैद्यकीय तपासण्यामुळे तुम्हाला दुखण्याचे मूळ कारण समजू शकते, तथापि पाठदुखी पासून पूर्णतः बरे होण्यासाठी हे घरगुती उपाय करून पहा :
- आपल्या शरीराकडे लक्ष द्या
आपले शरीर आपल्याला विश्रांती, खाणे, शरीरास ताण देणे इत्यादीशी संबंधित संदेश देत असते. त्याकडे दुर्लक्ष करू नका. पाठदुखीच्या आरामासाठी सातत्यपूर्ण योगाभ्यास केल्यास, तुमच्या स्थितीत निश्चितपणे आराम मिळेल. तथापि तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर व्यायाम थांबवा.
- जीवनशैलीत सकारात्मक बदल करा
जीवनातील शिस्त हा जीवनशैलीमधील कोणत्याही समस्येवर उपचाराचा मार्ग आहे. तुमच्या पाठीसाठी कोणते व्यायाम चांगले आहेत हे जाणून घ्या व योग्य आहाराचे नियमित पालन करा. कधी कधी अन्नामुळे काही समस्या उद्भभावू शकतात व त्यामुळे डावीकडे वरच्या बाजूला पाठदुखी होऊ शकते आणि म्हणूनच चांगला आरोग्यदायी आहार घेणे आवश्यक आहे.
- गलंगल मूळ (कोशीकुळींजन)
गलंगल मूळ ही जळजळ विरोधी गुणधर्मासाठी ओळखली जाणारी वनस्पती आहे. चहा बनवताना त्याची मुळं उकळून व गाळून घ्या व प्या. त्याचा दोनदा वापर केल्यास पाठ दुखी पासून लगेच आराम मिळेल.
- तुमच्या पाठीच्या कण्याची काळजी घ्या
तुमच्या कण्याला कमजोर करू शकणारी कोणतीही गोष्ट टाळा. उदाहरणार्थ अति खाणे, धूम्रपान, जास्त झोप (सुस्ती किंवा आळस) इत्यादी. पाठीचा कणा मजबूत असल्यास तुमची हाडे निरोगी राहतील व स्नायू लवचिक राहतील.
- गरम किंवा थंड उपचारपद्धती
तुमच्या बाजूच्या पाठदुखीच्या स्वरूपाप्रमाणे गरम किंवा थंड उपचारपद्धती घ्या. स्नायूंच्या ताठरपणावर किंवा दुखण्यावर गरम शेक द्या व जळजळ होत असेल तर बर्फ वापरून पहा.
- सजगता आणि ध्यान
जागरूकता व ध्यान आपल्याला प्रभावीपणे आतला आवाज ऐकून वर्तमानाची जाणीव करून देतात. नियमितपणे ध्यान केल्याने तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर नियंत्रण येते. यामुळे तुम्हाला सकारात्मक स्वयंचर्चा करण्यास मदत होते व तुमच्या स्थितीत सकारात्मक बदल होतात. जागरूकता आपल्याला जे योग्य आहे ते करण्यासाठी आपले लक्ष केंद्रित करते. आरामदायक बूट, योग्य स्थिती, योग्य विश्रांती इत्यादीवर तुमचे लक्ष केंद्रित होते.
वेदनाशामक औषधे किंवा जळजळ कमी करणाऱ्या औषधांमुळे वेदना कमी होऊ शकतात. मात्र वरील उपचार तुमच्यात सकारात्मक दृष्टिकोन आणू शकतात व तुम्हाला नैसर्गिक रित्या चांगले बनवू शकतात.