पुरुषांमधील पाठदुखी त्रासदायक आणि असह्य असते. कधी कधी वेदना इतकी असह्य असते की थोडीशी पाठीची हालचाल झाली की पेशंट ओरडतो “ओह sss”.

भारतीय तरूणांवर केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की भारतीय तरुण पाठीच्या खालच्या भागामधील दुखण्याची समस्येसाठी (एल बी टी) देखील प्रवण आहेत. या अभ्यासामध्ये असे आढळून आले आहे की, तरुणांमध्ये पाठीच्या खालच्या भागातील दुखणे बदलण्यायोग्य आणि न बदलण्यायोग्य असे दोन्ही प्रकारचे धोके दिसून येतात. असे धोके वेळीच ओळखले तर तीव्र ते जुनाट पाठदुखी प्रगती वेळीच रोखता येईल.

पुरुषांमध्ये पाठदुखीची प्रमुख कारणे आणि ते रोखण्याचे मार्ग

  • वय – तरुणांपेक्षा वयस्कर पुरुषांना स्नायूंची झीज झाल्याने पाठदुखीचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. पण आजकाल, पाठदुखीचा त्रास साधारणपणे ३० किंवा ४० वयाच्या आसपास सुरू होतो.
  • हालचाल न करणे / व्यायामाचा अभाव – पाठीचे आणि ओटीपोटाचे न वापरलेले स्नायू कमकुवत होतात ज्यामुळे पाठदुखी होते.
  • काही प्रकारचे कर्करोग किंवा सांधेदुखी सारख्या आजारांमुळे पाठदुखी वाढू शकते.
  • वाढलेले वजन – जास्त वजनामुळे पाठीवर ताण येऊ शकतो.
  • चुकीच्या पद्धतीने आणि वारंवार वजन उचलणे – पायांच्या ऐवजी पाठीचा वापर करून वजन उचलल्याने पाठीत स्नायूंना उसण भरु शकते. न थांबता उचलत राहाण्या ऐवजी थांबत थांबत तसेच कोणाची तरी मदत घेऊन वजन उचला किंवा उचलण्याचे योग्य तंत्र वापरा. वजन उचलताना, आपल्या मानेच्या मागील बाजूपासून शेवटच्या मणक्यापर्यंत पाठ सरळ ठेवा.
  • चिंता किंवा नैराश्यामुळे स्नायूंवर ताण येतो. त्यामुळे पाठदुखी वाढते.
  • व्यसन – धूम्रपान करणे किंवा इतर तंबाखूजन्य पदार्थांचा वापर केल्याने खोकला होतो, ज्यामुळे ‘स्लिप डिस्क’ होण्याची शक्यता वाढते. धूम्रपान केल्याने पाठीच्या कण्यातील रक्त प्रवाह कमी होतो आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो.
  • नोकरी व्यवसायातील तणावपूर्ण कामकाज – कामामध्ये शरीराच्या कमीत कमी हालचाली आणि तणावपूर्ण अशा बैठ्या स्थितीमध्ये तासनतास दीर्घकाळ काम करत राहणे. या कारणांमुळे कुटुंबातील पुरुष बऱ्याचदा पाठदुखीच्या त्रासाची तक्रार करतात. काही कामांचे स्वरूप शारीरिक दृष्ट्या कष्टदायी असते जसे की, वजन उचलणे, खेचणे इत्यादी (उदा. अग्निशमन दल, आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ, इतर वैद्यकीय सेवा क्षेत्र). जड वस्तू वारंवार उचलणे आणि ओढणे यामुळे पाठ, खांदे आणि स्नायू-अस्थि संस्थेवर ताण येतो. यामुळे खांदे आणि पाठीला दुखापत होऊ शकते.

पुरुषांमध्ये पाठदुखीची कारणे कोणती

  • स्थानिक पाठदुखी (तुमच्या पाठीचा कणा, स्नायू आणि तुमच्या पाठीच्या इतर ऊतीमधील (टिशूज) वेदना).
    • पाठीच्या मणक्यातील पाठदुखीची कारणे
      • संधीवात
      • स्पॉन्डिलायटिस – मणक्यामध्ये दाह आणि कडकपणा होतो.
      • आघात / दुखापत
      • गाठ
      • मणक्यांमधील चकत्यांची झीज – वयानुसार, चकत्या सपाट होऊ शकतात आणि मणक्यांना कमी संरक्षण देऊ शकतात.
    • पाठदुखी – केवळ टिशूजशी संबंधित
      • अस्थिबंधनातील ताण
      • स्नायूंमधील ताण
      • स्नायूंमधील घट्टपणा
  • पाठदुखीचा प्रादुर्भाव (अवयवातील समस्येमुळे होणारी वेदना जी पाठीमागे पसरते किंवा ती तुमच्या पाठीत आहे असे वाटते).
    • पित्ताशयाचा दाह
    • मूत्रपिंडाला संसर्ग आणि मुतखडे
    • यकृत समस्या
    • स्वादुपिंडाचा दाह
    • लैंगिक संक्रमित संसर्ग
    • पोटातील अल्सर – छिद्र पडणे
    • मूत्रमार्गात संसर्ग
    • अंडकोशाला इजा
    • अंडवृद्धी
  • झोपेची समस्या असलेल्या पुरुषांना पाठदुखीचा त्रास इतरांपेक्षा जास्त होतो.
  • पाठदुखी हाडांमध्ये पसरल्यास नंतरच्या टप्प्यात प्रोस्टेट कर्करोगाशी संबंधित असतो. मेटास्टॅटिक प्रोस्टेट कर्करोग बहुतेक वेळा मणक्याचे, फासळ्या आणि नितंबांपर्यंत पोहोचतो.
  • अचानक अस्ताव्यस्त हालचाली केल्याने पाठीचे स्नायू आणि पाठीच्या अस्थिबंधनांवर ताण येऊ शकतो. खराब शारीरिक स्थिती असलेल्या लोकांसाठी, पाठीवर सतत ताण पडल्यामुळे वेदनादायक स्नायू उबळ होऊ शकतात.
  • चकत्या मणक्यातील हाडांमधील उशी म्हणून काम करतात. फुगवटा किंवा फुटलेल्या चकत्या पाठीच्या मज्जातंतूला दाबू शकतात.
  • मणक्याचे हाडे अपघातादरम्यान फ्रॅक्चर होऊ शकतात, जसे की कार अपघात किंवा पडणे. ऑस्टियोपोरोसिस सारख्या वैद्यकीय परिस्थितीमुळे फ्रॅक्चरचा धोका वाढतो.

पुरुषांमध्ये पाठदुखी कशी कमी करावी

पाठदुखी साठीचे व्यायाम-निरोगी पाठीच्या कण्यासाठी आणि चांगल्या शारीरिक ठेवणीसाठी

डॉ. अंकिता ढेलिया, सल्लागार ऑस्टिओपॅथ आणि क्रॅनिओसॅक्रल थेरपिस्ट, खालील व्यायाम सुचवतात.

व्यायाम प्रकार १

मान आणि कंबर हलवण्याकडे आमचा कल असतो, पण मधल्या पाठीकडे दुर्लक्ष केले जाते , ज्यामुळे कुबड येते. या व्यायामामुळे खांद्याच्या स्नायूमधील वेदना देखील कमी होतात.

  1. खुर्चीवर बसा.
  2. तुमचा उजवा हात तुमच्या खांद्याच्या रेषेत ठेवा आणि तुमचे कोपर काटकोनात वाकवा आणि तुमची बोटे समोर ठेवा.
  3. तुमचा हात जमिनीला समांतर ठेवा आणि तुमचा तळहात खालच्या दिशेने ठेवा.
  4. जसजसे आपण हात पुढे नेतो तसतसे आपले डोके डावीकडे (विरुद्ध बाजूला) वाकवा.
  5. पुढे, कोपरापासून हात मागे घ्या आणि आपले डोके उजवीकडे (त्याच बाजूला) वाकवा.
  6. दहा वेळा पुन्हा करा.
  7. आता डाव्या हाताने व्यायामाचा सराव करा.

व्यायाम प्रकार 2

हा व्यायाम तुमच्या पाठीच्या वरच्या बाजूस, संपूर्ण मान आणि खांद्यासाठी चमत्कार करतो.

  1. खुर्चीवर बसा.
  2. बोटांना एकमेकात गुंतवा आणि डोक्याच्या मागे कोणत्याही स्तरावर ठेवा.
  3. उजवा हात वाकवा, जेणेकरून कोपर पुढे जाईल.
  4. दुसरी कोपर मागे ढकला.
  5. आरामात जितके ताणता येईल तितके ताणा
  6. दहा वेळा पुन्हा करा.
  7. आता डाव्या हाताने व्यायामाचा सराव करा.

पाठीच्या अधिक व्यायामासाठी, आमच्या ब्लॉगला भेट द्या – “पाठीच्या कण्याचे ७ व्यायाम घरी”.

शारीरिक ताणाचे योगप्रकार

या आसनांचा दररोज सराव केल्याने पाठ मजबूत आणि लवचिक राहण्यास मदत होते.

  • अर्ध चक्रासन
  • मार्जरासन
  • शिशुआसन
  • उष्ट्रासन
  • भुजंगासन
  • धनुरासन
  • सेतूबंधासन

निष्कर्ष

पुरुषांमध्‍ये तीव्र पाठदुखीमुळे वैयक्तिक जीवनाची गुणवत्ता बिघडते आणि आर्थिक भार वाढतो. म्हणूनच, तरुणांमध्ये बदल करण्यायोग्य धोकादायक पद्धतीबद्दल जागरूकता निर्माण केल्यामुळे जीवनशैलीत बदल होऊ शकतात, त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारू शकते आणि उत्पादकता वाढू शकते.

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *