सर्वप्रथम, ताणतणाव म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे का? ताण म्हणजे करण्यासारखे बरेच काही करायचे आहे आणि वेळ खूप कमी किंवा खूप कमी उर्जा. जेव्हा आपल्याला खूप काही करायचे असते पण पुरेशी उर्जा आणि वेळ नसतो, तेव्हा आपल्याला ताण येतो.
आता, आपण आपली उर्जा कशी वाढवायची?
- योग्य प्रमाणात अन्न – खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही
- योग्य प्रमाणात झोप – ६ ते ८ तास – जास्त नाही, कमी नाही.
- काही प्राणायाम शिकणे – त्याने आपली उर्जा वाढते.
- थोडा वेळ ध्यान केल्याने मनावरचे सर्व ताण दूर होतात. सकाळी आणि संध्याकाळी १५-२० मिनिटे ध्यान करणे तुम्हाला पुरेसे आहे.
प्रत्येक गोष्ट ही कधी ना कधीतरी पहिल्यांदा होत असते, पण आत्ता तुम्ही पहिल्यांदाच तणावग्रस्त होत नाही आहात. जरा आयुष्यात मागे वळून पाहा आणि ते सारे क्षण आठवा जेव्हा तुम्हाला वाटले की आता बास झाले ! सगळे संपले आता. पण तुम्ही त्यातूनही बाहेर पडलात आणि जिवंत आणि मस्त आहात. लक्षात ठेवा, पूर्वी भूतकाळात तुमच्यासमोर खूप आव्हाने आली होती आणि तुम्ही त्या सर्वांवर मात केली होती. तेव्हा, हा विश्वास ठेवा की तुम्ही हे आव्हान सुद्धा पेलू शकता.
तुमचा दृष्टीकोन विशाल ठेवा. या विश्वातील गोष्टी निसर्गाच्या वेगळ्याच कायद्यानुसार घडत असतात. तुम्हाला जाणवले असेल की पूर्वी तुम्ही लोकांशी अतिशय चांगले वागला होतात, पण अचानक काही लोक तुमचे शत्रू झाले. तुमचे मित्र तुमचे शत्रू झाले.
याच्या उलटे पण घडते. तुम्ही ज्यांच्यासाठी फार काही केले नव्हते, त्यांनी सुद्धा तुम्हाला खूप गरज असताना मदत केली. म्हणजे मैत्री आणि वैर हे विश्वाच्या काही विशेष कायद्यांच्या अनुसार होते, ज्याला कर्म म्हणतात. जेव्हा तुमची वेळ चांगली असते, तेव्हा तुमचा सगळ्यात वाईट शत्रू तुमच्या मित्रासारखा वागतो आणि जेव्हा तुमची वेळ वाईट असते तेव्हा तुमचा मित्र पण शत्रू सारखा वागतो. तेव्हा, घडणाऱ्या गोष्टीना एका वेगळ्या पातळीवरून समझण्याचा प्रयत्न करा. आणि धीर धरा, ही वेळ सुद्धा पार पडेल.
थांबा – ही वेळ सुद्धा पार पडेल. कधी कधी आपल्याला असे वाटते की सर्व सोडून द्यावे. आपण निराश होतो. ताण तणावामुळे असे होते. त्यावेळी कोणताही निर्णय घेऊ नका. तुम्हाला नंतर त्याचा पश्चात्ताप करायची वेळ येऊ शकते. आधी स्वतःकडे परत या. स्वतःला परत येण्यासाठी वेळ देण्याने सुद्धा ताण दूर होतो.
बाहेर फिरायला जा, बसा आणि सूर्यास्त पहा… शहरांमध्ये कदाचित उंच इमारतींमुळे तुम्ही सुर्यास्त पाहू शकणार नाही. पण शक्य तितके निसर्गाच्या सहवासात राहणे, मुलांबरोबर खेळणे इ. गोष्टीचा सुद्धा फायदा होईल. दुर्दैवाने आपण फक्त सोफ्यावर बसतो, टीव्ही बघतो आणि सत्वहीन खाण (जंक फूड) खात बसतो. हे आपल्या समाजाच्या आरोग्यासाठी चांगले नाही. आरोग्यपूर्ण समाजासाठी आपल्याला आपली जीवनशैली बदलणे गरजेचे आहे.
आणि शेवटी तणाव येण्याआधीच त्याला थांबवा ! अशी एक म्हण आहे की तुम्ही युद्धभूमीवर धनुर्विद्या शिकू शकत नाही. तुम्हाला युद्धाला जायच्या आधी धनुर्विद्या शिकायला पाहिजे. त्यामुळे, जेव्हा आपल्याला ताणतणाव आलेला असतो , तेव्हा तणावमुक्त होण्यासाठी काही करणे अवघड आहे. पण तुम्हाला काही करायचे असेल तर ते आधी करावे लागेल, म्हणजे तुम्ही तणावग्रस्त होणारच नाही.
अर्थात, तणावमुक्त होण्यासाठी तुम्हाला तुमची वागणूक बदलावी लागेल, खाण्याच्या सवयी बदलाव्या लागतील, जीवनातल्या घटनांकडे बघायचा दृष्टीकोन बदलावा लागेल, तुमची संवाद साधायची, टीका ऐकण्याची आणि सहन करण्याची क्षमता वाढवायला लागेल. सर्वसाधारणपणे, जीवनाकडे बघायचा दृष्टीकोनच सर्व काही ठरवत असतो.
आर्ट ऑफ लिव्हिंगचा पाया आहे, हॅपीनेस प्रोग्राम. सुदर्शन क्रिया™ या तंत्राने जगभरातल्या लाखो लोकांना ताणतणाव दूर करण्यासाठी, सखोल विश्राम घेण्यासाठी आणि जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी मदत केली आहे. जगातल्या चार खंडात केलेल्या अभ्यासावरून , तसेच येल आणि हार्वर्ड विश्वाविद्यालय आणि पिएर रिव्हयूड जर्नल्समध्ये जे प्रकाशित झाले आहे त्यावरून असे सिद्ध झाले आहे की सुदर्शन क्रियेचे बरेच फायदे होतात. तणावाच्या ग्रंथी म्हणजे, कोर्टीसोल कमी होतो आणि एकूणच जीवनाबद्दल समाधानाची भावना वाढते.