जाणून घेऊयात काही सोप्या युक्त्या आणि पद्धती.
मला जोधपूर चे गोशाळा मैदान, जबलपूरचे फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटयूट आणि अहमदाबाद चे प्रल्हाद नगर ही ठिकाणे खूप आठवतात. तुम्हाला माहितेय कां ? कारण वजन कमी करण्यासाठी चालायला या जागा खूप छान आहेत. येथे दर १ किलोमीटर नंतर फलक लावले आहेत जे आपल्याला प्रोत्साहन देतात,. तसेच कोणतेही वाहन नाही किंवा खड्डे नाहीत. आणि आपल्या सारखेच ध्येय असलेली माणसे चालताना बघून आपल्याला स्फूर्ती मिळते.
मी वजन कमी करण्यासाठी डॉ मानस परिहार,नाडी वैद्य, श्री श्री तत्व यांचे सल्ले घेतले. त्यामध्ये चालणे हा सर्वात मोठा घटक होता. त्यांनी चालण्याच्या काही युक्त्या सांगितल्या ज्या वजन कमी करण्यात खूप उपयुक्त ठरल्या. दुसऱ्यांना चालताना बघून काही युक्त्या मी स्वीकारल्या.
फक्त चालून वजन कमी होते का
चालून वजन कमी होते हे मी अनुभवले आहे. पण फक्त एकांतात चालून एवढे परिणामकारक बदल होत नाहीत. उदाहरणार्थ, तुम्ही चाललात आणि नंतर नुसते बसून राहिलात किव्वा पौष्टिक अन्न घेतले नाहीत , तर शरीरावर त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो. मी चालण्याबरोबरच आपल्या सत्वहीन अन्नाला बदलून आहारात फळे वाढवली आणि सत्वहीन अन्न कमी केले. मी चांगले आणि सातत्यपूर्ण वजन कमी करण्यासाठी चालण्याबरोबरच खालील काही गोष्टी केल्या.
- चालण्याबरोबर मी अति खाणे टाळले. मला गोड पदार्थ आवडतात. ते मी दुपारीच खायचो जेव्हा पचनक्रिया चांगली कार्यरत असते.
- मी उभे राहून करण्याची काही योग आसने केली. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी जोरात चालण्याने पायाला किंवा मांड्यांना गोळे येण्याचा त्रास झाला नाही.
- दिवसभरात अधून मधून सारखे पाणी पीत रहा. चालण्याच्या सरावाने स्वतःला हायद्रेटेड ठेवल्याने शरीराची कार्यक्षमता वाढते आणि अचानक हृदयाचे ठोके वाढण्यापासून किंवा शरीराचे तापमान वाढण्यापासून बचाव होतो.
- आपल्या आहाराचे निरीक्षण करा. सूर्यास्तानंतर कमी कर्बोदके असलेले अन्न खा. हे तुम्हाला ताजेतवाने जागे होण्यास मदत करू शकते.
- रोज रोज तोच तोच पणा टाळण्यासाठी कधी कधी चाला किंवा पळा.
वजन कमी करण्यासाठी चालण्याच्या १५ युक्त्या
जेवढे तुम्ही जास्त आणि जोरात चालाल , तेवढ्या तुमच्या कॅलरीज निघून जातील. वजन कमी करण्यासाठी चालण्याच्या युक्त्या खालीलप्रमाणे आहेत.
- चालण्यासाठी लागणाऱ्या साधनावर व्यवस्थित विचार करून खर्च करा: चालण्यासाठी आरामदायी, कुशन असलेल्या, वजनानी हलके, तळवे लवचिक असलेले, टाचा मजबूत असलेले बूट निवडा.
- चांगली जागा निवडा: जिथे तुम्हाला रोज चालायचा कंटाळा येणार नाही. तुमची चालण्याची जागा बदलत रहा ज्याने तुम्हाला उत्साही वाटेल.
- चालण्याचा धर्म पाळा -मला डॉ. सुमनलता श्रीवास्तव ज्या माझ्या शेजारी मित्र आहेत आणि संस्कृत पंडित आहेत , त्यांच्यामुळे मला चालण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी पावसाळ्यात सुद्धा कधीही चालणे थांबवले नाही. एक छत्री घेऊन त्या रोज चालायच्या आणि प्रयत्नपूर्वक चालण्याचा एक दिवस सुद्धा चुकवला नाही
- जेवणानंतर चाला – मला जेव्हा डॉक्टरांनी जेवणानंतर चालायचा सल्ला दिला होता, तेव्हा आश्चर्य वाटले होते. पण एक अभ्यास असे सांगतो की जर एखाद्या व्यक्तीला जेवणानंतर लगेच चालल्याने ओटीपोटात दुखणे, थकवा किंवा इतर अस्वस्थता असा त्रास नसेल आणि ती व्यक्ती दुपारच्या व रात्रीच्या जेवणानंतर रोज ३० मिनिटे जोरात चालली तर वजन कमी होण्यात खूप फायदा होतो जो ३० मिनिटे जेवणापूर्वी किंवा जेवण झाल्यावर १ तासानंतर चालण्यापेक्षा.
- जास्त चाला व कमी बसा – एका संशोधनात असे म्हटले आहे की सर्वसामान्य व्यक्तीने दिवसातून सरासरी ५००० किंवा त्यापेक्षा कमी पावले चालणे टाळावे , उलट ७५०० किंवा त्यापेक्षा जास्त पावले चालावे. त्यापैकी ३००० किंवा जास्त पावले न थांबता चालावीत. (ज्याला अंदाजे ३० मिनिटे लागतात). म्हणजेच मिनिटाला १०० किंवा जास्त पावले. अधिक चांगल्या परिणामासाठी विश्रांती घेताना बसण्याऐवजी बारीक सारीक हालचाली करत राहणे गरजेचे आहे.
- चालताना संगीत ऐकणे, श्राव्य संवाद, गाणी ऐकणे याने आपण अधिक आणि जास्त वेळ चालण्याची प्रेरणा मिळते.
- तंदुरुस्तीसाठी तयार केलेले विशेष यंत्रवापरून आपण रोजच्या चालण्याच्या प्रगतीचे निरीक्षण करू शकतो!
- शरीरावर वजन बांधून डोंगर चढणेयाने फक्त वजन कमी होत नाही तर स्नायूंना बळकटी सुध्दा मिळते.
- चालताना हात पुढे मागे हलवत चालणेयाने कंबरेवरच्या शरीराला चांगला व्यायाम होतो आणि वजन कमी होण्यास मदत होते.
- ट्रेड मिलवर चालल्यापेक्षा शक्यतो निसर्गाच्या सांनिध्यात चालावे.
- दिवसा चालावे जेणेकरून आपल्याला सूर्याप्रकाशातून ‘ड ‘ जीवनसत्व मिळेल.
- चालण्यासाठी खास एक मित्र शोधाआणि त्याच्याबरोबर रोज चाला. एकमेकांना प्रोत्साहन मिळत राहील.
- मागच्या दिशेला सावकाश चालण्याचा सराव करा. त्याने गुढग्यांना आणि स्नायूंना चांगले प्रशिक्षण मिळते.
- लवकरात लवकर प्रगती करण्याकडे लक्ष द्या त्याने पावलांवर आणि पायांवर ताण कमी येतो.
- चालण्याच्या आधी, नंतर आणि चालताना थोडे थोडे पाणी पीत हायड्रेटेड रहा.
डॉ. मानस परिहार, वैद्य, श्री श्री तत्त्व यांच्या सल्यांवर आधारित.
लेखन – प्रतिभा शर्मा.