
मेधा योग लेवल २
लवचिक व्हा, आत्म-नियंत्रण विकसित करा, मोठा विचार करा, सुरक्षित रहा, शेअरिंगद्वारे शिका
पात्रता: मेधा योग भाग १ पदवीधर, १३ ते १८ वर्षे वयोगटातील मुलं मुली
नोंदणी करा!किशोरवयीन मुलांना कसा फायदा होईल?
जागतिक महामारी, वयाशी संबंधित समस्या आणि अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, किशोरवयीन मुलांना हे लक्षात येईल की ते आमच्या पद्धतीद्वारे कोणत्याही आव्हानांना तोंड देऊ शकतात.

सुरक्षित वाटते
किशोरवयीन मुले शारीरिक, भावनिक आणि बौद्धिक बदलांशी सुरेखपणे जुळवून घेण्यास शिकतात - कारण येथे त्यांना सुरक्षित वाटते.

शेअरिंगद्वारे शिका
किशोरवयीन मुले केवळ त्यांच्या समस्यांबद्दलच बोलत नाहीत तर त्यांच्या समवयस्कांच्या समस्या आणि संघर्ष ऐकून शिकतात.

आत्म-नियंत्रण तयार करा
किशोरवयीन मुले आपल्या भावना आणि कृतींना सामोरे जाण्यास शिकतात, त्यांच्या स्वतःच्या जीवनाची जबाबदारी घेतात. ते आत्म-नियंत्रण विकसित करतात.

मोठा विचार करा
किशोरवयीन मुले पूर्णपणे आत्ममग्न असू शकतात - जोपर्यंत त्यांना लक्ष केंद्रित करण्यासाठी काहीतरी मोठे लक्ष्य सापडत नाही. आम्ही त्यांना त्यासाठी प्रोत्साहन देतो.
मेधा योग म्हणजे काय?
संशोधनात असे दिसून आले आहे की 'आनंदी किशोर मुलेच पुढे स्वस्थ प्रौढ बनतात'. पण आनंदी किशोरवयीन मुले दुर्मिळ होत आहेत. बालपणापासून प्रौढत्वापर्यंतचा बदल शैक्षणिक क्षेत्र, प्रवेश परीक्षा, समवयस्कांचा दबाव आणि नातेसंबंध यांचे तणाव वाढवणाऱ्या आव्हानांनी भरलेला असतो.
मेधा योग भाग २ मध्ये, किशोरवयीन मुले भीती आणि प्रतिबंधांवर मात करण्यासाठी ज्ञान आणि सखोल ध्यानाच्या शिकलेल्या सोप्या प्रक्रियांच्या आधाराने स्वतःला विकसित करतात आणि आपल्यातील अद्वितीय सामर्थ्यांचा शोध घेतात. ते ध्यानातून लाभणारी बौद्धिक तीक्ष्णता, सेवेचा आनंद, मौनाचे स्वातंत्र्य अनुभवू लागतात. हे शिबिर किशोरांना इतरांपेक्षा चांगले असण्याच्या स्पर्धेऐवजी स्वतःशीच स्पर्धा करण्याची वृत्ती विकसित करण्यात मदत करते. आयुष्यभराच्या यशाचा पाया रोवला जातो.
शिबिरातले मुख्य घटक

सेवा
किशोरवयीन मुले सेवेत गुंततात आणि आपल्या 'स्व' चा शोध घेतात आणि आपण राहत असलेल्या वातावरणाशी आणि समाजाशी गहिरा संबंध प्रस्थापित करतात.

मुद्रा प्राणायाम
छोट्याश्या पण शक्तिशाली श्वासोच्छवासाच्या तंत्राद्वारे, किशोरवयीनांना संपूर्ण शरीरात वाढलेली ऊर्जा अनुभवता येते. रोजचा काही मिनिटांचा सराव सर्वांगीण बदल घडवतो.

गटचर्चा
किशोरवयीन मुले आपली मते आणि भीती उघडपणे व्यक्त करतात आणि इतरांचे ऐकत असताना सक्रियपणे त्यावर उपाय शोधतात; ते चौकटीबाहेर जाऊन विचार करतात, नव्या कल्पना शोधतात आणि त्या अमलात आणतात.

मौन आणि ध्यान
किशोरवयीन मुले आपल्या आतील आवाज शोधतात आणि आपली स्वप्ने सादर करतात, कारण ते आत्मपरीक्षण करतात आणि आपल्या 'स्व' च्या गाभ्याशी, अंतर्मनाशी जोडले जातात.
भीतीचा माझ्यावर पूर्णपणे पगडा होता. इन्टयूशन प्रक्रिया लेव्हल २ मध्ये मी सुधारण्यासाठी माझ्यात वचनबध्दता आली. आत्ता मी खेळामध्ये खूप चांगला झालोय आणि अभ्यासात देखील सुधारलोय.

सुखांत भट्टाचार्जी
इन्टयूशन प्रक्रिया लेव्हल २ शिबिरार्थी
आत्मविश्वास वाढला. मी माझ्या वर्गमित्र, मैत्रिणींशी देखील बोलू शकत नव्हते. आत्ता प्रार्थनेच्या वेळी सर्वां समोर आत्मविश्वासाने भाषण करू शकते.

मीरा
विद्यार्थी
जीवनातील खूप लाभदायक गोष्टी शिकायला मिळाल्या. गुरुदेव करतात तसेच मी देखील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य अणू इच्छितो, त्यांना आनंदी करू इच्छितो.

अक्षय
विद्यार्थी
माझ्यामध्येच एक चांगली व्यक्ती, एक आत्मविश्वासू व्यक्ती गवसली. मी सुदर्शन क्रिया सातत्याने करते, जिच्यामुळे माझी एकाग्रता आणि शैक्षणिक कौशल्य वाढले.

श्रीया
विद्यार्थी
मेधा योगावर संशोधन
▴ २२%
सुधारित कार्यप्रदर्शन अचूकता
▴ २९%
आरोग्यात चांगला बदल
▾ ६९%
भावनिक समस्या कमी
▾ ६७%
कमी चंचलता
▾ ५०%
समवयस्कांसोबतच्या समस्या कमी झाल्या
▾ ७८%
आचरण समस्या कमी
संस्थापक
गुरुदेव श्री श्री रवि शंकर
गुरुदेव श्री श्री रविशंकर हे जागतिक मानवतावादी, अध्यात्मिक नेते आणि शांतीदूत आहेत. तणाव मुक्त, हिंसा मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी अभूतपूर्व अशा जागतिक चळवळीचे नेतृत्व ते करतात.
आणखी जाणून घ्यामला हे शिबीर करायचे आहे पण...
शिबिराबद्दल अधिक सांगू शकाल का?
मेधा योग हा गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी विकसित केलेल्या प्रक्रियांवर आधारित आहे. प्राचीन योगपद्धति आणि व्यायाम यावर आधारित आहे. ध्यान, योग आणि श्वासोच्छवासाच्या प्रक्रियांसह मुलांना त्यांच्या भीती आणि चिंतांवर मात करत परिपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगायला शिकवले जाते. ते खुल्या व्यासपीठावर त्यांच्या समस्यांवर चर्चा करतात आणि त्यांच्या सहकारी सहभागींबरोबर आपलेपणा अनुभवतात. किशोरवयीन मुलांना आपलेपणाची भावना सर्वात जास्त आवश्यक असते आणि हे शिबीर त्यांना ती प्रदान करते. मुलांना अध्यात्म आणि भारतीय परंपरेची ओळखही करून दिली जाते.
जेव्हा मी साइन अप करतो/करते, तेव्हा काय होते?
आपल्याला आपल्या किशोरवयीन मुलांच्या तपशीलांसह एक फॉर्म भरण्यास सांगितले जाईल. एकदा ते पूर्ण झाल्यानंतर, आपल्याला पेमेंट गेटवेवर निर्देशित केले जाईल. एवढंच, तुमचं काम संपलं ! यानंतर आम्ही मेल आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्या संपर्कात राहू, जेणेकरून तुम्हाला कार्यक्रमाच्या वेळेची माहिती मिळेल.
आणखी एक ऑनलाइन क्लास? तो करावा की नाही याबद्दल मी साशंक आहे?
आपल्याला काय म्हणायचे आहे हे आम्हाला पूर्णपणे समजते. परंतु जर आपल्या किशोरवयीन मुलाने संघर्षमुक्त, शांत, आनंदी आणि उत्पादक जीवन जगले तर ते योग्य ठरणार नाही का? आपल्या किशोरवयीन मुलांना वयाशी संबंधित दबाव आणि ताणतणाव असतात.ज्यामुळे त्यांच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम होतो परंतु त्याबद्दल त्यांना माहित असू शकते किंवा नसूही शकते. हे शिबीर या आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करेल
माझी किशोरवयीन मुले या शिबिरात थेट प्रश्न विचारू शकतात का?
हो ! हे शिबीर संवादात्मक आहे आणि किशोरवयीन मुलांनी आपली मते आणि निरीक्षणे मांडण्यासाठी आणि त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी स्वागत आहे.
माझा मुलगा / मुलगी अंतर्मुख आहे आणि कदाचित या शिबिराच्या उपक्रमांमध्ये तो / ती भाग घेऊ शकत नाही. त्याचा त्याला/तिला फायदा होईल का?
होय, नक्कीच ! या शिबिराचा तुमच्या किशोरवयीन मुलांना खूप फायदा होईल. लाजाळू किशोरवयीन मुले या शिबिरादरम्यान आणि नंतर त्यांच्या संकोचांवर मात करण्यास आणि बोलण्यास शिकतात.